Maharashtra

Nashik

CC/145/2011

Jyoti Arundas Purasvani - Complainant(s)

Versus

Nashik Co.Op.Credit Company Ltd - Opp.Party(s)

Pramila Jadhav

14 Oct 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/145/2011
 
1. Jyoti Arundas Purasvani
Panchavati,nashik-3
...........Complainant(s)
Versus
1. Nashik Co.Op.Credit Company Ltd
Dindori road,Panchavti,nashik-3
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Pramila Jadhav, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान  यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र      

           

     अर्जदार यांना सामनेवालाकडून बचत खात्‍यावरील रक्‍कम रु.87,236/- मिळावी, या रकमेवर आजपावेतो 18% दराने व्‍याज मिळावेत, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

     सामनेवाला यांनी याकामी पान क्र.20 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.21 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.

     अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेतः

 

मुद्देः

1.  अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय

2.  अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय?-- होय.

                                           तक्रार क्र.145/2011

3.  सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे काय?-होय.

4.  अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून बचत खात्‍यावरील रक्‍कम व्‍याजासह वसूल

    होऊन  मिळणेस पात्र आहेत काय?-- होय

5.  अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्‍द अंशतः

    मंजूर करणेत येत आहे.

विवेचनः

याकामी अर्जदार यांचेवतीने पान क्र.26 लगत व सामनेवाला यांनी पान क्र.25 लगत युक्‍तीवादाबाबत पुरसिस दाखल केलेली आहे.

अर्जदार यांनी याकामी पान क्र.8 लगत बचत खात्‍याची झेरॉक्‍स प्रती हजर केलेली आहे. पान क्र.8 चे कागदपत्र सामनेवाले यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेले नाही. पान क्र.8 चे बचत खात्‍याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये सामनेवाला संस्‍थेवर 2005 पासून अवसायकाची नेमणुक झालेली आहे. त्‍यामुळे सदर माजी चेअरमन यांचा सदर संस्‍थेशी आजमितीस काहीएक संबंध राहीलेला नाही, त्‍यांचे सर्व अधिकार काढून घेण्‍यात आले आहेत.  सदर अर्जादारास संबंधीत प्रशासक/अवसायक हेच पैसे देवु शकतात. सदर अवसायक/प्रशासक हे पैसे वाटप करीत आहेत. विलंबमाफीचा अर्जामधील जे कारण विलंब माफीकरीता दिलेले आहे ते रास्‍त व न्‍याय्य नाही. Delay defeat justice  या तत्‍वानुसार संपुर्ण अर्ज फेटाळण्‍यास पात्र आहे. असे म्‍हटलेले आहे.

याबाबत अर्जदार यांनी तक्रार दाखल करतांनाच विलंब माफीचा अर्ज सादर केलेला आहे.  सदरचा अर्ज दि.7/7/2011 रोजी मंजूर करण्‍यात येवून तक्रार अर्जास झालेला विलंब माफ करण्‍यात आलेला आहे.  सामनेवाला यांनी अर्जदार यांना पान क्र.9 प्रमाणे दि.06/06/2011 रोजी पत्र दिलेले आहे.  विलंब माफी अर्जावरील आदेश व पान क्र.9 चे पत्र याचा विचार होता अर्जदार यांचा अर्ज मुदतीत आहे असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला कॅपीटल संस्‍थेवर अवसायकाची नेमणूक झालेली असली तरी कर्जदार यांचेकडून कर्जाऊ रकमेची वसुली करुन ठेवीदारांची ठेवीची रक्‍कम व्‍याजास‍ह परत करण्‍याची संपूर्ण जबाबदारी सामनेवाला कॅपीटल संस्‍था/अवसायक यांचेवर आहे. अर्जदार यांनी सामनेवाला यांना पान क्र.9 प्रमाणे पत्र दिलेले आहे.  सदर पत्र/नोटीस

 

                                              तक्रार क्र.145/2011

मिळाल्‍यानंतरही सामनेवाला यांनी अर्जदार यांची पान क्र.8 चे बचत खात्‍यावरील संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह परत केलेली नाही. याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.

याबाबत मंचाचे वतीने मा.राष्‍ट्रीय आयोग नवी दिल्‍ली यांचेसमोरील रिव्‍हीजन अर्ज क्र.2528/2006 नि.ता.24/7/2008 भारतीय रिझर्व बँक वि. ईश्‍वर आप्‍पा या वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे. 

अर्जदार यांनी पान क्र.12 व 13 लगत दाखल केलेल्‍या ठेवपावत्‍यान्‍वये रक्‍कम सामनेवाला यांचेकडे ठेवलेली होती.  सदर ठेवपावत्‍यांची मुदत संपल्‍यानंतर सदर रक्‍कम बचत खाते क्र.3131 मध्‍ये वर्ग केलेली आहे.                                                                                              

पान क्र.8 चे बचत खात्‍याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून पान क्र.8 चे बचत खात्‍यावरील संपुर्ण रक्‍कम रक्‍कम व्‍याजासह वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसूल होऊन मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवाले यांचेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे व तक्रार अर्ज दाखल करावा लागला आहे.  यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास झाला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यास खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे  सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे दोन्‍ही बाजुंची युक्‍तीवादाबाबतची पुरसीस, वर उल्‍लेख केलेले वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेः

                       आ दे श

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना सामनेवाला यांनी पुढीलप्रमाणे रकमा द्याव्‍यातः

   (अ) बचत खाते क्र.3131 वरील रक्‍कम रु.87,236/- दयावेत व या मंजूर 

   रकमेवर दि.21/01/2007 पासून संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के

   दराने व्‍याज द्यावे.

 

                                             तक्रार क्र.145/2011

3) मानसिक त्रासापोटी रु.5,000/- दयावेत.

4) अर्जाचे खर्चापोटी  रु.1000/-दयावेत.

5) वर कलम 2 (अ) प्रमाणे देय असलेल्‍या रकमेपैकी काही रक्‍कम यापूर्वी अर्जदार यांना सामनेवाले बँकेने अदा केलेली असल्‍यास त्‍याची वजावट वरील 2 (अ) रकमेतून करावी.

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.