Maharashtra

Ahmednagar

CC/13/409

Umed Sarvo,Prop.Pramod Shankarlal Bihani - Complainant(s)

Versus

Nandlal Pannalal Jain - Opp.Party(s)

S.B.Mundada

11 Feb 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/13/409
( Date of Filing : 06 Dec 2013 )
 
1. Umed Sarvo,Prop.Pramod Shankarlal Bihani
Plot No.W-16,MIDC,Ahmednagar
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Nandlal Pannalal Jain
Govt.Transport Contractor,1,Shatrunjay Housing Society,Lam Road,Vihit Gaon,Nashik Road,Nashik-422 101
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:S.B.Mundada, Advocate
For the Opp. Party: Ithape Sachin, Advocate
Dated : 11 Feb 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

          तक्रारदार यांचा अहमदनगर येथे उमेद सर्वो या नावाने ऑईल विक्रीचा व्‍यवसाय आहे. तक्रारदाराकडे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. या कंपनीची अधिकृत डिलरशिप असुन सदर फर्म मार्फत तक्रारदार हे ऑईलची ठोक व किरकोळ स्‍वरुपात विक्री करतात. सदर व्‍यवसायासाठी तक्रारदार हे इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. च्‍या नाशिक येथील कार्यालयातुन ऑईल मागवतात. सामनेवाले यांचा नाशिक येथे एन.पी.जैन गव्‍हर्नमेंट ट्रान्‍सपोर्ट कॉन्‍ट्रॅक्‍टर या नावाने ट्रान्‍सपोर्टचा व्‍यवसाय आहे. सामनेवाला हे विविध ग्राहकांना त्‍यांचा माल नोंदविलेल्‍या ठिकाणी पोहोच करतात.

3.   अशा प्रकारची परिस्थिती असतांना नाशिक येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. या कंपनीकडे तक्रारदार यांनी ऑईल चे बॅरल, ड्रम, बकेट आणि बॉक्‍स ची ऑर्डर दिली होती. सदरचा माल कंपनीने सामनेवाले यांच्‍या ट्रान्‍सपोर्ट मार्फत दिनांक 05.12.2011 रोजी पाठविला होता. सदरचा माल हा गाडी नंबर एम.एच.15,बी.जे.1691 या गाडीतुन तक्रारदाराकरीता सदरचे दिवशी सायंकाळी 4.00 वाजता पाठविला असे कंपनीने तक्रारदारास सांगितले. परंतू दिनांक 08.12.2011 रोजी मालासह तक्रारदाराकडे आलेल्‍या ट्रक क्रमांक एम.एच.12-ए.व्‍ही.6158 या गाडीवरील ड्रायव्‍हर नामे किसन श्रीपत कडभाने याने तक्रारदारास माल आणल्‍याचे सांगितले. तक्रारदाराने बिलाप्रमाणे माल खाली करुन घेत असताना सदरील माल कमी असल्‍याचे निदर्शनास आल्‍यावर तक्रारदाराने त्‍याबाबत सदरील ड्रायव्‍हरकडे चौकशी केली, त्‍यावेळी सदरील ड्रायव्‍हर याने सदरची गाडी क्रॉसिंग करुन नगरला आणलेली आहे आणि तक्रारदाराच्‍या मालाची दोडीश्‍वरात सामनेवाले यांच्‍या गाडीतून चोरी झालेली आहे. त्‍यामुळे माल कमी आहे असे स्‍पष्‍टीकरण दिले. तक्रारदाराने सामनेवाला यांच्‍याकरीता किसन कडभाने यांच्‍याकडे दिनांक 09.12.2011 रोजी व्‍हाऊचरव्‍दारे रक्‍कम रुपये 10,300/- भाडयापोटी दिलेले होते ते सामनेवाले यांना मिळालेले आहेत.

4.   तक्रारदाराने सदरील नमुद ड्रायव्‍हर समक्ष गाडीतील चलनाप्रमाणे माल तपासुन घेतला असता बकेट व बॉक्‍स मिळुन एकुण 175 नग कमी मिळाले म्‍हणजेच तक्रारदारास एकुण 2879.50 लिटर इतका माल कमी मिळाला आहे. तक्रारदाराने ताबडतोब सदरची बाब नमुद ड्रायव्‍हरचे निदर्शनास आणुन दिली. सदरील ड्रायव्‍हरने माल कमी मिळाल्‍याची नोंद करुन घेऊन सदरची बाब मान्‍य केली आणि सामनेवाले यांचे वतीने दिनांक 08.12.2011 रोजी समक्ष माल कमी मिळाल्‍याबाबत तक्रारदारास लिहुन दिलेले होते व आहे.

5.   वास्‍तविक पाहता कंपनीकडुन सदरचा माल सामनेवाला यांच्‍याकडे मिळाला असता जसाच्‍या तसा तक्रारदाराकडे पोहोच करणे ही सामनेवाला यांची जबाबदारी होती. परंतु सामनेवाला व त्‍यांच्‍या कर्मचा-यांच्‍या हलगर्जीपणामुळे व निष्‍काळजीपणामुळे तक्रारदारास कमी माल मिळाला. तक्रारदाराने सामनेवाला यांना सदरची बाब सांगितली असता त्‍यांनी माल कमी असल्‍याबाबत चुक कबुल केली. तसेच सदरील ट्रक क्रमांक एम.एच.15.बी.जे.1691 या ट्रकवरील ड्रायव्‍हरचे विरोधात त्‍याने परस्‍पर मालाची विल्‍हेवाट लावल्‍याबाबत पोलीस स्‍टेशनला फिर्याद दिली असल्‍याबाबतचे कळविले आणि तक्रारदाराचे मालाची तातडीने भसरपाई करुन देण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले. उभयतांचे व्‍यावसायिक संबंध लक्षात घेता तसेच मालाचे भरपाईबाबत आश्‍वासन दिल्‍यामुळे तक्रारदाराने आजपावेतो सामनेवालाविरुध्‍द कारवाई केली नव्‍हती. परंतु वेळोवेळी पाठपुरावा करुनही सामनेवाला यांनी केवळ टोलवाटोलवी करुन शेवटी नुकताच स्‍पष्‍ट नकार दिलेला आहे. सदरचा माल तक्रारदारापर्यंत पोहोचवण्‍याची सामनेवाला यांची कायदेशिर व नैतिक जबाबदारी होती. परंतु तक्रारदारास संपुर्ण माल मिळाला नाही. तसेच कबुल करुनही सामनेवाला यांनी नुकसान भरपाई दिली नाही आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदारासोबत गैरव्‍यवहार केलेला आहे. सामनेवाला यांनी तक्रारदारास मोठया प्रमाणावर आर्थिक, शारीरीक व मानसिक त्रास दिलेला आहे. त्‍यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने दिनांक 25.04.2013 रोजी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस दिली. सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळाली. परंतु त्‍यांनी नोटीसीप्रमाणे न वागता खोटयानाटया स्‍वरुपाचे नोटीस उत्‍तर पाठविले. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदारास सदोष सेवा पुरवून मनस्‍ताप दिलेला आहे. त्‍यामुळे नाईलाजाने तक्रारदारास सदरचा तक्रार अर्ज मे.न्‍यायमचासमोर दाखल करणे भाग पडले आहे.

6.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. यांनी तक्रारदारास पाठविलेल्‍या मालापैकी सामनेवाला यांनी गाडीतील चलनाप्रमाणे एकुण 2879.50 लिटर इतका माल कमी दिलेला आहे. तो संपुर्ण माल तक्रारदारास द्यावा अथवा सदरील मालाची बाजारभावाने होणारी रक्‍कम तक्रारदारास द्यावी. तसेच सदरील रकमेवर दिनांक 08.12.2011 या तारखेपासुन प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपावेतो द.सा.द.शे. 24 टक्‍के दराने व्‍याजासह होणारी रक्‍कम तक्रारदारास देण्‍याबाबत सामनेवाला यांना हुकूम व्‍हावा. सामनेवाला यांनी वेळोवेळी तक्रारदारास आर्थिक मानसिक व शारीरीक त्रास दिला त्‍याचे मनस्‍तापापोटी रक्‍कम रु.1,00,000/- तक्रारदारास देण्‍याचा सामनेवाले विरुध्‍द हुकूम व्‍हावा.  या तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.20,000/- मिळावा.  

7.   तक्रारदाराने सदरचे तक्रारीसोबत निशाणी 6 ला इंडियन ऑईल कार्पोरेशन लि.यांनी दिनांक 7.12.2011 रोजी तक्रारदारास दिलेले पत्र, सदर कंपनीचे तक्रारदारास पाठविलेल्‍या मालाचा तपशिल दिनांक 7.12.2011, सामनेवाला यांचे ड्रायव्‍हरने लिहून दिलेली रुजुवात दिनांक 8.12.2011, सामनेवाला यांच्‍या ड्रायव्‍हरला दिलेल्‍या रकमेचे व्‍हाऊचर दिनांक 9.12.2013, तक्रारदाराने सामनेवालाला दिलेली नोटीस दिनांक 1.4.2013, सामनेवाला यांनी दिलेले नोटीस उत्‍तर दिनांक 10.5.2013  इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

8.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीस काढण्‍याचे आदेश करण्‍यात आला. त्‍याप्रमाणे सामनेवाला यांनी निशाणी 14 ला लेखी म्‍हणणे / कैफियत दाखल केली आहे. सामनेवाला यांचे कथन की, प्रस्‍तुत सामनेवाला हा एकल संचालक पध्‍दतीने म्‍हणजेच प्रोप्रायटरी फर्म म्‍हणून व्‍यवसाय करीत असुन तक्रारदाराने तक्रारीमध्‍ये नमुद केल्‍याप्रमाणे गर्व्‍हनमेंट किंवा गर्व्‍हनमेंट कॉन्‍ट्रॅक्‍टर असा कोणताही हुद्दा, पद अगर व्‍यवसाय धारण  करीत नाही. सामनेवाला याचा स्‍वतःच्‍या मालकीच्‍या वाहनांमधुन ग्राहकाचे मागणीप्रमाणे वस्‍तु अगर सामान यांची अपेक्षीत गंतव्‍य स्‍थानी पोहच करुन देणेकरीता वाहतुक सुविधा उपलब्‍ध करुन देणे अशा प्रकारचे काम करीत असतो. सदरील सेवेचा पुरवठा करीत असताना, वाहतुक करीत असलेल्‍या सामानाची सुरक्षितता हा सामनेवाले याच्‍या जबाबदारीचा भाग नाही. कायद्यातील तरतुदींनुसार वाहतुकदार वाहतुक करीत असलेल्‍या मालाची मालकाने मालाच्‍या मुल्‍यांकनानुसार योग्‍य तो विमा घेणे गरजेचे व आवश्‍यक आहे. तशीच नियमित प्रथादेखील आहे. यावरुन वाहतुकी दरम्‍यान मालाच्‍या सुरक्षितते संबंधात/ किंवा कोणतीही संभाव्‍य हानी झाल्‍यास त्‍यास माल वाहतुकदार जबाबदार राहात नाही. तक्रारदाराने सर्व आवश्‍यक पक्षकार समाविष्‍ट केलेले नाही, त्‍यामुळे सदर तक्रारीस “ नॉन जॉईंडर ऑफ नेसेसरी पार्टीज ” या तत्‍वाची बाध येत असल्‍यामुळे, प्रस्‍तुतची तक्रार रद्द होणेस पात्र आहे.

9.   सदरील प्रकरणामध्‍ये तक्रारदार याने दिनांक 05.12.2011 रोजी वाहतुक करावयाच्‍या मालाची कोणताही ट्रान्झिट विमा उतरविलेला नव्‍हता व नाही, त्‍यामुळे जर तक्रारदाराचे म्‍हणणेप्रमाणे तक्रारदाराचे खरोखरीच काही नुकसान झाले असल्‍यास, सदरील नुकसानीची भरपाई करुन देण्‍याची कोणतेही उत्‍तरदायित्‍व सामनेवाले यांचेवर येत नाही. तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल कागदपत्रांवरुन असे निदर्शनास येते की, प्रस्‍तुत सामनेवाले याने दिनांक 07.12.2011 रोजी वावी पोलीस स्‍टेशन मु.पो.वावी ता.सिन्‍नर जि.नाशिक यांचेकडे प्रथम खबर क्रमांक 143/2011 दिनांक 07.12.2011 अन्‍वये वाहन चालक भिमराव कंटाळु भालेराव याचे विरुध्‍द फिर्याद दाखल केलली असुन, सदरील फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्‍हा दाखल करुन घेतलेला आहे. प्रस्‍तुतची तक्रार / फिर्याद दाखल करुन सामनेवाले याने त्‍याच्‍यावर असणा-या कायदेशिर बंधनाचे संपुर्ण परिपालन केलेले असुन, यानंतर कोणतेही कर्तव्‍य पार पाडण्‍याची कोणतीही जबाबदारी या सामनेवालेवर येत नाही.

10.  उलटपक्षी, प्रस्‍तुत सामनेवाला याने स्‍वखर्चाने दुस-या वाहनाची सोय करुन तक्रारदाराचा माल तक्रारदाराकडे दिनांक 08.12.2011 रोजी पाठविलेला होता व सदरील माल घेऊन गेलेला ट्रक ड्रायव्‍हर नामे-श्री.किसन श्रीपत कडभाने याचेवर दबाव आणुन त्‍याचेकडून दिनांक 08.12.2011 रोजीचा तथाकथित जबाब तथा रुजुपत्र व दिनांक 09.12.2011 रोजीचे पेमेंट व्‍हाऊचर यांच्‍यवर जबरदस्‍तीने सहया घेतलेल्‍या आहेत.  सदरील रुजुपत्र व दिनांक 09.12.2011 रोजीचे पेमेंट व्‍हाऊचर यांचेमधील संपुर्ण मजकुर हा खोटा व बनावट असुन तो या सामनेवाले यांना मान्‍य व कबुल नाही. याशिवाय दिनांक 09.12.2011 रोजी तक्रारदाराने सामनेवाले यांना रक्‍कम रुपये 10,300/- नगर अर्बन को.ऑप बँक वरील धनादेश क्रमांक 116307 अन्‍वये सामनेवालेस अदा केले, हे कथन सामनेवाले यास मान्‍य व कबुल नाही. उलटपक्षी, सामनेवाले यांचा कोणताही संबंध नसताना, सामनेवालेस देय असणारे कायदेशिर देणे दयावे लागु नये, म्‍हणुन तक्रारदार राईचा पर्वत करुन निःकारण अकांड-तांडव करीत आहे. प्रस्‍तुतचा तक्रारदार यांने सामनेवालेस माल वाहतुकीच कोणतीही रक्‍कम अदा केलेली नसल्‍यामुळे तक्रारदार व सामनेवाला यांचे दरम्‍यान ग्राहक व सेवा पुरवठादार असा नातेसंबंध कधीही निर्माण झालेला नाही, त्‍यामुळे देखील प्रस्‍तुतची तक्रार रद्द करण्‍यात यावी.

11.  प्रस्‍तुतचे तक्रारीस कोणतेही सबळ कारण घडलेले नसुन तक्रारदाराचे तथाकथित नुकसानीस सामनेवाला हा परोक्ष अगर अपरोक्षरित्‍या जबाबदार नाही. सामनेवाला याने वावी पोलिस स्‍टेशन, वावी ता.सिन्‍नर जि.नाशिक येथे दिनांक 07.12.2011 रोजी फिर्याद दाखल करुन त्‍याच्‍या जबाबदारीचे संपुर्ण र्निवाहन केलेले आहे. प्रत्‍यक्ष घडलेल्‍या घटनेचा सामनेवाला हा लाभार्थी नसुन घडलेल्‍या घटनेबाबत सामनेवालेच्‍या मनात कोणताही हेतु नव्‍हता व नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले याच्‍या नियंत्रणाबाहेर घडलेल्‍या गोष्‍टी करीता सामनेवालेस जबाबदार धरता येणार नाही. प्रस्‍तुत घटनाक्रमामध्‍ये सामनेवाले याचा दुरान्‍वये देखील कोणताही संबंध येत नसुन, युक्‍तीवादाकरीता मान्‍य केले तरी अदा न केलेले वाहतुक बिल (इंधन, चालकाचा पगार, घसारा, भांडवली गुंतवणुक व त्‍यावरील व्‍याज, कमिशन, कर इ.) वजा जाता खाली काहीही शिल्‍लक रहात नाही. अशा परिस्थितीत ज्‍या तथाकथित घडलेल्‍या घटनेमध्‍ये सामनेवाले याचा कोणत्‍याही स्‍वरुपाचा परोक्ष अगर अपरोक्ष संबंध नाही, अशा बाबी करीता सामनेवालेस 2879.50 लिटर इतक्‍या मालाची किंमत त्‍यावर दिनांक 08.12.2011 या तारखेपासुन प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपावेतो द.सा.द.शे.24 टक्‍के दराने होणारे व्‍याज, तक्रारदाराचे मनस्‍तापापोटी रक्‍कम रुपये 1,00,000/-, तक्रारदार अर्जाचा खर्च रक्‍कम रुपये 20,000/- व इतर दादी यांची केलेली मागणी ही समतेच्‍या तत्‍वेच्‍या विरोधात असुन सामनेवालेवर अन्‍याय करणारी व कायदयास धरुन नाही. सबब प्रस्‍तुत तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द करावा. तक्रारदार यानी सदरील तक्रार सामनेवाले यांचे विरुध्‍द दाखल करुन सामनेवाले यांस विनाकारण खर्चात टाकले म्‍हणुन रक्‍कम रुपये 25,000/- ची नुकसान भरपाई पोटी व खर्चापोटी देण्‍याचा तक्रारदाराविरुध्‍द आदेश पारीत करावा.

12.  सामनेवाला यांनी निशाणी 15 ला अॅफिडेव्‍हीट दाखल केले आहे. तक्रारदार यांनी निशाणी 18 ला इंडियन कॉर्पोरेशन कंपनीचे तक्रारदारास प्राप्‍त झालेले बिलाची मुळ 11 प्रती, सामनेवालातर्फे ड्रायव्‍हर श्रीकीसन कडभाने यांनी तक्रारदारास दिलेले पत्राची कार्बन कॉपी दिनांक 8.12.2011, तक्रारदाराने अदा केलेल्या रकमेचे मुळ व्‍हाऊचर दिनांक 9.12.2011, सामनेवाला यांची मुळ पावती दिनांक 5.12.2011, तक्रारदाराने पाठविलेली नोटीसची स्‍थळप्रत एप्रिल 2013, सामनेवाला यांची नोटीस उत्‍तर झेरॉक्‍स प्र‍त 10.5.2013, फिर्याद दिनांक 7.12.2011 व वृत्‍तपत्र कात्रण  इत्‍यादी कागदपत्र दाखल केले आहेत.

13.  तक्रारदाराने दिनांक 24.12.2018 रोजी निशाणी 19 सोबत मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे दाखल केले आहेत.

1)AIR 200 Supreme Court 1461, Patel Road Ways Ltd V/s. Birla Yamaha Ltd.,

2)Goods Carriers Can’t disown their liability

3)M/s. Delhi V.P.M.P. Transport Company V/s. M/s. New India Asurance Company Ltd.,

4)The Carriage By Road Act 2007

14.  तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्र, उभयतांचे युक्‍तीवादाचे अवलोकन केले व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारादार हे सामनेवालाचे ग्राहक आहेत काय.?                    

 

... नाही.

2.

तक्रारदार हे सामनवेालाकडून नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय.?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

15.   मुद्दा क्र.1  – तक्रारदार यांनी इंडीयन ऑईल कार्पोरेशन कंपनी लिमिटेड यांनी उत्‍पादकीय डीलरशीप घेतेलेली आहे असे नमुद केलेले आहे. तक्रार अर्ज, सामनेवालाची कैफियत, उभय पक्षकाराचे दस्‍तावेज व त्‍यांनी दाखल केलेल्‍या युक्‍तीवादाचे अवलोकन केले असता, तक्रारदाराने इंडीयन ऑईल कंपनीकडून माल खरेदी केला आहे असे दिसून येते. तक्रारीत नमुद सामनेवालाकडून माल घेतलेला नाही. तक्रारदार यांनी आवश्‍यक पक्षकार समाविष्‍ट केलेले नाही. हा सामनेवालातर्फे केलेला युक्‍तीवाद योग्‍य आहे. कारण तक्रारदाराने इंडीयन ऑईल कार्पोरेशन, अंबड नाशिक यास सामनेवाला पक्ष म्‍हणून समाविष्‍ट केलेले नाही. तक्रारदाराने दाखल केलेले दस्‍तावेजांनुसार तक्रारदाराने तक्रारीत नमुद माल हा इंडीयन ऑईल कार्पोरेशन लि.अंबड नाशिक येथून खरेदी केलेला दिसून येतो. तक्रारदाराने तक्रारीत नमुद केलेला माल सामनेवाला यांचेकडून घेतलेला नाही. तक्रारदार यांनी इंडीयन ऑईल कार्पोरेशन कंपनी लिमिटेड यांनी उत्‍पादकीय डीलरशीप घेतेलेली आहे असे नमुद केलेले आहे. तक्रारदार यांनी निशाणी 18/3 मध्‍ये नमुद केलेल्‍या पिवळया व्‍हाऊचर मधील नमुद चेक वटला  किंवा नाही या बद्दल काहीही पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे पैसे हे सामनेवालाने स्विकारले किंवा नाही याबद्दल तक्रारदार हे सिध्‍द करु शकले नाही. त्‍यामुळेही तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक होत नाहीत, तसेच सेवा देणार असा संबंध शाबीत केलेला नाही. म्‍हणून तक्रारदार हा सामनेवालाचा ग्राहक नाही. तक्रारदाराने दिनांक 24.12.2018 रोजी निशाणी 19 सोबत दाखल केलेले न्‍याय निवाडे सदर तक्रारीस लागू होत नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 

16.  या बाबींचे अवलोकन केले असता तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक होत नाहीत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. त्‍यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

17.   मुद्दा क्र.2  – वरील नमुद कारणांमुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे “ग्राहक” होत नसल्‍यामुळे तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र ठरत नाहीत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

18.   मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.