Maharashtra

Nanded

CC/09/55

Anil Nagnathrao Pandilwar - Complainant(s)

Versus

Nanded Marcheant Co-op.Bank limited,Nanded Branch,Degalur. - Opp.Party(s)

Adv.Jayant Gopalrao Kurtadikar

15 May 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/55
1. Anil Nagnathrao Pandilwar R/oMukramabad Tq.Mukhed Dist.Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Nanded Marcheant Co-op.Bank limited,Nanded Branch,Degalur. Branch,Degluar Dist.Nanded.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 15 May 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
प्रकरण क्र.2009/55
                                                     प्रकरण दाखल दिनांक  04/03/2009.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 15/05/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                       मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
शुभम ज्‍वेलर्स,
प्रो.प्रा.अनिल पि.नागनाथराव पंदीलवार
वय, 43 वर्षे, धंदा, व्‍यापार,                                 अर्जदार रा. मुक्रामाबाद, ता. मुखेड जि.नांदेड.
 
विरुध्‍द
 
मॅनेजर,
नांदेड मर्चन्‍टस को-ऑपरेटीव्‍ह बँक लि.                      गैरअर्जदार शाखा देगलूर ता.देगलूर जि. नांदेड.
 
अर्जदारा तर्फे            - .अमित डोईफोडे.
गैरअर्जदारा तर्फे          - अड.एस.जी.बियाणी.
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष)
 
              गैरअर्जदार नांदेड मर्चन्‍टस को ऑपरेटीव्‍ह बँक  यांच्‍या सेवेच्‍या ञूटी बददल   अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे नोंदविली आहे.
              प्रकरणाची हकीकत थोडक्‍यात खालील प्रमाणे, अर्जदाराचे शुभम ज्‍वेलर्स या नांवाने मूक्रामाबाद ता. देगलूर जि. नांदेड येथे गेल्‍या आठ ते दहा वर्षापासून सोन्‍याचांदीचे दूकान आहे. इस, 2000 पासून अर्जदार हा गैरअर्जदाराचा नजरगहाण कर्ज घेतलेले आहे. त्‍यांचे खाते नंबर 394  असून अर्जदाराने त्‍यांचे सदरील दूकानातील माला करीता रु.3,00,000/- कर्जाची उचल केलेली आहे.  नियमाप्रमाणे सर्व कर्जाचे सोपस्‍कार पूर्ण करण्‍यात आलेले आहेत. कर्ज घेण्‍यासाठी अर्जदाराच्‍या दूकानातील मालाच्‍या स्‍टाकच्‍या दूप्‍पट रक्‍कमेचा विमा बँकेच्‍या संयूक्‍त नांवाने काढवयाचा असतो, परंतु विम्‍याचा हप्‍ता हा अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यातून कपात केला जाईल व चे परस्‍पर विमा कंपनीला बॅकेमार्फत दिला  जाईल असे अर्जदाराला सांगितले. म्‍हणजे दूकानातील  स्‍टाकला धोका निर्माण झाल्‍यास ती त्‍यांच्‍या विम्‍याची लाभाची रक्‍कम बँकेला मिळेल व ती अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यावर वळती केली जाईल. अशा प्रकारे सदरच्‍या विम्‍याच्‍या लाभाची रक्‍कम कर्जापोटी बॅकेत जमा होईल. गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या खात्‍यातून सूरुवातीलाच स्‍टाकच्‍या रक्‍कमेच्‍या विम्‍याच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम संबंधीत विमा कंपनीला दरवर्षी भरली आहे.
 
              दि.8.5.2008 रोजी अर्जदाराच्‍या दूकानात चोरी झाली व मालाच्‍या स्‍टाकची रु.2,47,000/- ची चोरी झाली. या बाबतची खबर नंबर 39/08 दि.8.5.2008 रोजी मूक्रामाबाद पोलिस स्‍टेशन मध्‍ये देण्‍यात आली. गैरअर्जदारांनी स्‍टाकचा विमा घेतलेला असल्‍यामूळे त्‍यांच दिवशी गैरअर्जदार बँकेत जाऊन मॅनेजरला घटनेची माहीती दिली. त्‍यावेळी मॅनेजर यांनी विमा कंपनीकडून वरील रक्‍कम मिळवून ती अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यावर वळते करण्‍याचे आश्‍वासन दिले. बँकेचे मॅनेजर श्री. कूलकर्णी यांनी अर्जदारास  असे सांगितले की, वर्ष,2008 चा हप्‍ता गैरअर्जदाराच्‍या नजरचूकीने भरण्‍यात आलेला नाही म्‍हणून विम्‍याचा लाभ मिळणे कठीण आहे. अर्जदाराचा खाते उतारा काळजीपूर्वक पाहिल्‍यास दरवर्षीचा अकरावा महिना बहूदा विम्‍याच्‍या  हप्‍त्‍याची देयक मूदत आहे. गैरअर्जदार बँकेने 2007 च्‍या 11 व्‍या महिन्‍यात अर्जदाराच्‍या खात्‍यात पूरेशी रक्‍कम शिल्‍लक असून देखील विम्‍याचा हप्‍ता कपात केलेला नाही किंवा संबंधीत विमा कंपनीस भरला देखील नाही. या बरोबर गैरअर्जदाराची चूक लपविण्‍यासाठी दि.9.5.2008 रोजी म्‍हणजे अर्जदाराकडील चोरीच्‍या दूस-याच दिवशी म्‍हणजे तब्‍बल सहा महिन्‍याने उशिराने हप्‍ता भरला. वास्‍तविक गैरअर्जदाराने अर्जदाराची नूकसान भरपाई मिळवून देण्‍यासाठी योग्‍य कारवाई केली नाही व तसेच करण्‍यास नकार दिला. विम्‍याच्‍या लाभापासून वंचीत ठेवले.दि.6.10.2008 रोजी गैरअर्जदाराने त्‍यांची जबाबदारी फेटाळून लावली. गैरअर्जदाराने केलेल्‍या सेवेतील ञूटीमूळे अर्जदारास झालेल्‍या नूकसान भरपाई पोटी रु.2,47,000/-  व्‍याजासह अर्जदारास मिळावेत. तसेच मानसिक ञासापोटी रु.50,000/- मिळावेत म्‍हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
 
              गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असून, चूक व बेकायदेशीर आहे. अर्जदार हे शूभम ज्‍वेलर्स या नांवाने कमर्शियल व्‍यवसाय करुन नफा मिळवित आहेत. त्‍यामूळे त्‍यांची तक्रार फेटाळण्‍यात यावी. बँकेने अर्जदार यांना देगलूर शाखेकडून रु.3,00,000/- चे कर्ज दि.17.7.2000 रोजी दिले होते.   ते त्‍यांने दि.28.9.2007 रोजी पूर्ण कर्ज बेबाकी केले. यानंतर परत दि.24.7.2007 रोजी  बॅकेकडे अर्ज देऊन कर्जाची मागणी केली. परत अर्जदाराचे दि.28.9.2007 रोजी रु.3,00,000/- पाच वर्षाच्‍या मूदतीकरिता फिक्‍स लोन दिलेले आहे. संपूर्ण मजकूर कर्जाविषयीचे अटी अर्जदार यांना मान्‍य केल्‍या आहेत. त्‍यावर त्‍यांचे फर्मचा शिक्‍का ही आहे. दि.28.9.2007 रोजी उचललेल्‍या कर्ज मंजूरी पञकातील अटी पैकी एक अट क्रमांक 10 नुसार   मालाच्‍या स्‍टॉकच्‍या पुरेशा रक्‍कमेचा विमा बँकेच्‍या संयुक्‍त नांवाने करावा लागेल विम्‍याचे नुतनीकरण करण्‍याची सुचना वेळावेळी बँकेस द्यावी लागेल व विमा काढल्‍याची खाञी करुन घ्‍यावी लागेल. विमा बाबतची सर्व प्रकारची जबाबदारी अर्जदार यांचेवर आहे. सदरील चूक ही अर्जदाराने जाणीवपूर्वक केलेली असल्‍यामूळे ते यासाठी वैयक्‍तीक जबाबदार आहेत. यापूर्वी मालाचा विमा संयूक्‍त नांवाने काढण्‍या संबंधी अर्जदाराने बॅकेला तोंडी विनंती केल्‍यामूळे मालाचा विमा उरविण्‍यात आला व हप्‍त्‍याची रक्‍कम अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यात टाकण्‍यात आली. अर्जदारानें यानंतर फिक्‍स लोन घेतले व त्‍यामूळे त्‍यांचा विमा उतरविण्‍याची जबाबदारी ही अर्जदार यांचीच आहे. बँकेचे अधिकारी श्री. कूलकर्णी यांनी शुभम ज्‍वेलर्स या फर्मला भेट दिलेली नाही. अथवा फिक्‍स लोन कर्जा संबंधी काहीही बोलले नाही. दूकानात झालेल्‍या चोरी बददल विमा क्‍लेम मिळण्‍यासाठी चौकशी सूध्‍दा केलेली नाही. बँकेने दि.6.10.2008 रोजीच्‍या पञाने अर्जदाराला असे कळविले की, बॅकेच्‍या नियमानुसार व कर्ज मंजूरी अटी पञकातील अटीप्रमाणे कर्ज अदा केले असून त्‍यातील अट क्रमांक 10प्रमाणे मालाचा विमा काढण्‍याची संपूर्ण जबाबदारी अर्जदारावर राहील. कर्जदार या नात्‍याने मागणी केल्‍यास ती कागदपञके पुरविण्‍याची जबाबदारी बँकेची असून बँक ती कागदपञे देण्‍यास तयार आहे. अर्जदार हे कमर्शियल व्‍यवसाय करीत असल्‍यामूळे गैरअर्जदार यांची काही चूक नसल्‍यामूळे अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्‍यात यावा असे म्‍हटले आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                               उत्‍तर 
1. गैरअर्जदार बँकेच्‍या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द
       करतात काय  ?                                  होय.                     
 2. काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
 
 
                          कारणे
मूददा क्र.1 ः-
              प्रस्‍तूत प्रकरणात वादाचा मूददा फक्‍त मालाच्‍या स्‍टॉकचा विमा कोणी काढावा या बददलचा आहे. अर्जदाराने सन 2000साली रु.3,00,000/- चे कर्ज स्‍टॉकसाठी घेतले व त्‍यांची परतफेड ही केली व त्‍यानंतर परत त्‍यांनी दि.28.9.2007 रोजी परत रु.3,00,000/- चे कर्ज घेतले. त्‍यावेळेस गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचेकडून कर्ज मंजूर करतेवेळेस काही नियम व अटी शर्तीवर अर्जदार यांचे सहया घेतल्‍या होत्‍या. त्‍याप्रयमाणे नियम नंबर 10 वर मालाच्‍या स्‍टॉकच्‍या पुरेशा रक्‍कमेचा विमा बँकेच्‍या संयुक्‍त नांवाने करावा लागेल विम्‍याचे नुतनीकरण करण्‍याची सुचना वेळावेळी बँकेस द्यावी लागेल व विमा काढल्‍याची खाञी करुन घ्‍यावी लागेल. विमा बाबतची सर्व प्रकारची जबाबदारी अर्जदार यांचेवर आहे.अर्जदार यांचे दूकानात दि.8.5.2008 रोजी चोरी झाली व रु.2,47,000/- चा माल चोरीस गेला याबददल एफ.आय.आर नंबर 39/08, पंचनामा, या प्रकरणात दाखल केला आहे. झालेल्‍या नूकसानी बददल जबाबदार कोण ? बँकेचे कर्ज असताना विमा कोणी काढावा ?  एवढाच वाद आहे. अर्जदाराने सन 2000 ला रु.3,00,000/- चे कर्ज घेतले होते. त्‍यांचा दरवर्षी वेळोवेळी विमा गैरअर्जदार बँकेने उतरविला होता व त्‍यासंबंधी अर्जदाराच्‍या खात्‍यात त्‍यांचे नांवाने रक्‍कम टाकून गैरअर्जदाराने त्‍यांचा चेक 2007 पर्यत विमा कंपनीस देऊन विमा काढलेला आहे. नंतर दि..8.9.2007 रोजी नवीन कर्ज घेतल्‍यावर यांस गैरअर्जदार बँकेने काही नवीन अटी लावल्‍या व यात विमा काढण्‍याची जबाबदारी अर्जदार यांची आहे असे नियम केलेले आहे. अर्जदाराकडे दि.8.5.2008 रोजी चोरी झाली असे असताना अर्जदार हा नूकसान भरपाई हा स्‍वतः जबाबदार राहीला असता. परंतु गैरअर्जदार बँकेने त्‍यांना सूचना दिल्‍यानंतर घाबरुन जाऊन तातडीने दिउ..9.5.2008 रोजी रु.5933/ः- विम्‍याचा हप्‍ता विमा कंपनीला दिला व मालाच्‍या स्‍टॉकचा विमा काढला. आता उशिर झाला आहे, कारण एक दिवस आधीच अर्जदार यांचे दूकानात चोरी झाली होती अशा परिस्थितीत विम्‍याचा लाभ अर्जदारास मिळणार नव्‍हता परंतु गैरअर्जदार यांनी आपली चुक लपविण्‍याचा प्रयत्‍न केला. याआधी देखील अर्जदाराच्‍या खात्‍यात पूरेशी रक्‍कम उपलब्‍ध असताना गैरअर्जदार यांनी विमा रक्‍कमेचा चेक दिला नव्‍हता. गैरअर्जदार बँकेची जबाबदारीच नाही तर अर्जदाराच्‍या सूचने शिवाय विमा कंपनीने किंवा त्‍यांचे अर्जाशिवाय अशा प्रकारचा प्रिमियमचा चेक विमा कंपनीस गैरअर्जदारांनी दिला यांचा अर्थ गैरअर्जदार यांना नियम जरी केले असले तरी ते नियम बंधनकारक नाहीत, गैरअर्जदार यांनी स्‍वतःच्‍या सोयी साठी काहीचे बाहय नियम केले.  गैरअर्जदारांनी अर्जदारास कर्ज दिल्‍या कारणाने गैरअर्जदार यांना स्‍वतःच्‍या कर्जाच्‍या सूरक्षेसाठी विमा धेणे आवश्‍यक होते व त्‍यात गैरअर्जदार यांचे नियमाप्रमाणे बँकेच्‍या नावांवरच संयूक्‍त नांवाने विमा पॉलिसी घेतली पाहिजे अशी एक अट होती म्‍हणजेच मालाचा स्‍टॉक चोरीला गेला तर विम्‍याची मिळणारी रक्‍कम ही  गैरअर्जदार बॅकेस मिळेल व ती अर्जदाराच्‍या कर्ज खात्‍यात जमा केल्‍यास अर्जदाराचे कर्जही कमी झाले असते व गैरअर्जदार यांनी दिलेली रक्‍कम सूरक्षित राहीली असती म्‍हणून नैसर्गीकरित्‍या मूळ जबाबदारी ही गैरअर्जदार बँकेवर येते व या सर्व गोष्‍टीचा बारकाईने विचार केल्‍यानंतर असे लक्षात येते की, गैरअर्जदार बँकेनेच त्‍यांनी दिलेलया कर्जाप्रमाणे  विमा उतरविला पाहिजे. इथे गैरअर्जदार यांनी चूकीमूळे का होईना किंवा हलगर्जीपणामूळे विमा काढण्‍याचे विसरुन गेले व आता गैरअर्जदारांची जबाबदारी नाही असे म्‍हणत आहेत. ही बाब लक्षात घेण्‍यासारखी आहे. गैरअर्जदार बँकेने विमा न काढून सेवेत ञूटी केलेली आहे.
 
        प्रश्‍न राहीला रु.,2,47,000/- नूकसानी बददल. दि.8.4.2007 रोजी ज्‍या दिवशी दूकानात चोरी झाली त्‍या दिवशी दूकानात किती स्‍टॉक होता हे पाहणे महत्‍वाचे आहे. एफ.आय. आर व पोलिस स्‍टेशन यांचे स्‍टेटमेंट मध्‍ये रु.2,47,000/- चा माल चोरीला गेला असे म्‍हटले आहे. याप्रमाणे अर्जदार यांनी दि.3.10.2009 रोजी गैरअर्जदार बँकेस सदरील रक्‍कम मिळण्‍यासाळी अर्ज ही दिला आहे. तो अर्ज ही या प्रकरणात दाखल आहे. गैरअर्जदार बँकेने कूलकर्णी या अधिका-यामार्फत उत्‍तर ही दिलेले आहे व नूकसान देण्‍याचे नाकारलेले आहे. गैरअर्जदार यांनी बजाज अलायंन्‍स जनरल इन्‍शूरन्‍स या कंपनीची पॉलिसी दाखल केली आहे. त्‍यामूळे दि.9.5.2008 रोजी ते दि.8.5.2009 या कालावधीसाठी विमा आहे. पण आता विमा कंपनीस यास जबाबदार राहू शकत नाही. अर्जदारांनी स्‍टॉक स्‍टेटमेंट बॅंकेस दर महिन्‍यास देणे आवश्‍यक असते ते स्‍टेटमेंट बँकेत कर्ज असल्‍यामूळे दिले असेल व ते स्‍टॉक स्‍टेटमेंट बॅकेने या प्रकरणात दाखल केलेले नाही. म्‍हणून नेमके दि.8.5.2008 रोजी काय स्‍टॉक होता ? हे समजू शकत नाही. त्‍यामूळे बँकेने आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यात रु.2,47,000/-  नूकसान अर्जदाराचे झालेच नाही असा आक्षेप ही घेतलेला नाही.त्‍यामूळे रु.2,47,000/- चे नूकसान झाले असेच गृहीत धरावे लागेल व चोरीला गेलेल्‍या मालाचा पोलिस श्‍वान पथक यांनी शोध घेतला असता कोणताही माल हस्‍तगत करण्‍यात आला नाही. त्‍यामूळे रु.2,47,000/- ही रक्‍कम नूकसान भरपाईची गृहीत धरुन तेवढा मावेजा अर्जदार यांना मिळाला पाहिजे व यात गैरअर्जदार यांची चूक असल्‍यामूळे त्‍यांनीच तो अर्जदारास दिला पाहिजे या नीर्णयास आम्‍ही आलो आहोत.
          यात अर्जदार यांनी एक सायटेशन जे की,
Sampurna Singh Deo Vs. Dena Bank 2003(1) CPR (NC) 2003 (1) CPJ 212 .     (73) Insurance : Premiim amount cheque Dishonoured. 
 
Consumer Proection ?Act, 1986 –Section 21 (a)-- Compensation claimj of Rs-.59.21 lakhs against Insurance Company and Bank—premium amout cheque was returned dishonoured and loss occurred on 7.4.1997—Claim against Insurance Companry, was liable to fail—Banks awas alleged negligent as cheque towards premium for Insurance Policy was returned unpaid despite sufficient funds—Complainant permitted to amend complaint so as to prosecute claim against Bank and complaint against Insurance Company was liable to be dismissed.
 
          यात बँकेने विमा कंपनीस चेक दिला होता, परंतु रक्‍कम असूनही तो चेक वटवला नाही म्‍हणून बँकेस नूकसान भरपाई देण्‍याचे आदेश देण्‍यात आले.
         वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
                                 आदेश
1.                                                                 अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
 
2.                                                                 गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत चोरीच्‍या नूकसानी भरपाई बददल रक्‍कम रु.2,47,000/- व त्‍यावर प्रकरण दाखल केल्‍यापासून म्‍हणजे दि.04.03.2009 पासून 12 टक्‍के व्‍याजाने पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत अर्जदारास व्‍याजसह दयावेत.
 
3.                                                                 झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.15,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2,000/- मंजूर करण्‍यात येतात.
 
4.                                                                 पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)                                                (श्री. सतीश सामते)    
           ‍ध्‍यक्ष.                                                                   सदस्‍य
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.