जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/142. प्रकरण दाखल तारीख - 23/06/2009 प्रकरण निकाल तारीख – 07/09/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य कु.सूरेखा कोंडीबा मेखाले वय, सज्ञान वर्षे, धंदा शेतमजूरी रा.वाघी ता. जि.नांदेड अर्जदार विरुध्द. शाखाधिकारी, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड जि. नांदेड गैरअर्जदार. अर्जदारा तर्फे वकील - अड. ए.एन.चव्हाण गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हिने गैरअर्जदार बँकेकडे मूदत ठेव दि.12.09.1997 रोजी रक्कम गूंतविले होती व सदर रक्कमेची मूदत दि.12.09.2008 रोजी संपली आहे मूदतीनंतर अर्जदारास रु.50,517/- 15 टक्के व्याजाने मिळणार होते.अर्जदारास स्वतःचे लग्नाकरिता सदर रक्कमेची आवश्यकता होती. परंतु गैरअर्जदारानी आर.बी.आय. चे निर्बध असल्यामूळे रक्कम देऊ शकत नाही असे सांगितले. सदर रक्कमेची त्यांना लग्नासाठी आवश्यकता आहे. तक्रार अर्जासोबत मूदत ठेवीबददल पावती, लग्नासाठीच्या खर्चाचे तपशील पावत्या, इत्यादी कागदपञ दाखल केलेली आहेत. तरी त्यांनी अर्जदाराची रक्कम दिली नाही. त्यामूळे ही तक्रार दाखल करुन अशी विनंती केली की, मूदत ठेवीमधील रु.50,517/- रक्कम व्याजासह मिळावी, अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यांनी हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे रु.50,517/- जमा आहेत. तिच्या रक्कमेची देयक दिनांक 12.09.2008 रोजी संपलेली आहे हे त्यांना मान्य आहे. पैसे परत देत नाहीत व व्याजही देत नाहीत हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने दि.20.10.2005 रोजी 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज व त्यांसोबत लग्नासंबंधी उपलब्ध कागदपञ दाखल करुन प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव मंजूरीसाठी आर.बी.आय. कडे पाठविण्यास बँक तयार आहे. मंजूर होऊन आलेली रक्कम बँक अर्जदारास देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार हिचे मूदत ठेव पावती मध्ये रु.50,517/- जमा आहेत ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. पण अर्जदार यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम 35 ए हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. गैरअर्जदार बँकेने म्हटल्याप्रमाणे अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज, लग्नासंबंधीचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव त्यांचेकडे सादर केल्यास तो प्रस्ताव बँक ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठविण्यास तयार आहे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देण्यास तयार आहे. अशा प्रकारे रक्कम न देऊन बॅकेने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपञासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यात गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्य जे.यु.पारवेकर लघूलेखक. |