जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/140. प्रकरण दाखल तारीख - 23/06/2009 प्रकरण निकाल तारीख – 13/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते - सदस्य मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या ज्ञानेश्वर कोंडीबा मेखाले वय, 23 वर्षे, धंदा शिक्षण रा.वाघी ता. जि.नांदेड अर्जदार विरुध्द. शाखाधिकारी, दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. शाखा वाघी (नाळेश्वर) ता. जि. नांदेड गैरअर्जदार. अर्जदारा तर्फे वकील - अड. ए.एन. चौहाण. गैरअर्जदार तर्फे वकील - कोणीही हजर नाही. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे वाघी ता.जि.नांदेड येथील रहीवासी असून त्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी गैरअर्जदार बँकेकडे रक्कम रु.50,000/- दि.7.7.2004 रोजी बचत ठेवीमध्ये 13 महिन्यासाठी जमा केले होते. तसेच सदर ठेवीची मूदत दि.7.8.2005 पर्यत होती व मूदंतीनंतर 6.50 टक्के व्याज दराने रक्कम मिळणार होती. अर्जदारास पूढील शिक्षणासाठी रु.55000/- ची आवश्यक होती. त्यामूळे त्यांनी गैरअर्जदार बँकेकडे रक्कमेची मागणी केली असता त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला.त्यामूळे अर्जदाराची मागणी आहे की, पूढील शिक्षणासाठी रु.50,000/- ठेव व्याजासह मिळावी असे आदेश व्हावेत. गैरअर्जदार यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश करुन प्रकरण पूढे चालविण्यात आले. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच अर्जदारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः– अर्जदार यांनी पावती नंबर 365058 ठेवीमध्ये रु.50,000/- गुंतविले हे कागदपञ पाहिले असता सिध्द होते. पण अर्जदार यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम (35 ए) हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर अर्जदार हे हार्डशिपच्या ग्राऊंडवर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज, शिक्षणाबाबतचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव बँकेकडे सादर करुन तो प्रस्ताव बँकेने ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठवून देणे बाबत कारवाई करणे आवश्यक आहे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देणे हे गैरअर्जदार यांचेवर बंधनकारक राहील. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपञासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यात गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |