जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/141 प्रकरण दाखल तारीख - 23/06/2009 प्रकरण निकाल तारीख – 13/11/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य श्रीमती.राजाबाई भ्र.किशन मेखाले, वय वर्षे 70 धंदा निरंक, अर्जदार. रा.वाघी ता. जि.नांदेड. विरुध्द. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, गैरअर्जदार. शाखा –नाळेश्वर ता.ज.नांदेड. मार्फत – शाखाधिकारी. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.एन.चौव्हान. गैरअर्जदारा तर्फे - एकतर्फा निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,अध्यक्ष) अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की,अर्जदार ह वृध्द महिला असून वृध्दापकाळात आजार, दैनंदिन उपचाराचे खचार्च गैरअर्जदाराचे बॅकेत भविष्यासाठी ठेव ठेवलेली आहे. ज्या ठेवीची पावती क्र.402235/2000 रु.80,000/- द.सा.द.शे. 7 टक्के व्याजाचे दराने ठेवली आहे. तीची मुदत देखील दि.20/05/2006 रोजी संपलेली आहे. अर्जदार ही वार्ध्यक्याने आजारी असून, थकलेली आहे. तीच्या आजारपणात ठेवीची रक्कम मागणी करुनही उपलब्ध न झाल्यामुळे अर्जदार हालाखीचे परिस्थितीत आहे. त्यामुळे उपचार देखील पैशा अभावी घेता येत नाही. म्हणुन त्यांची मागणी आहे की, त्यांचे रक्कम रु.80,000/- व्याजासह देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार यांना या मंचाची नोटीस पाठविण्यात आली. त्यांना नोटीस तामील होउनही ते मंचात हजर होऊन आपले म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द प्रकरणांत एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. अर्जदार यांचा अर्ज, शपथपत्र त्यांनी दाखल केलेली कागदपत्र याचा विचार होता, खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र.1 व 2 अर्जदार यांनी पावती नं.402235 ठेवीमध्ये रु.80,000/- गुंतविले हे कागदपत्र पाहिले असता, सिध्द होते. परंतु अर्जदार यांना रक्कमेची त्यांच्या आजारासाठी गरज पडली असेल ही बाब सुध्दा नाकरता येत नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय.ने कलम (35) (ए) लावून बॅकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादले असल्यामुळे गैरअर्जदार आर.बी.आय.च्या परवानगी शिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी होत नाही. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर अर्जदार हे हार्डशिपच्या ग्राऊंडवर आर.बी.आय.ने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्ज, आजारा बाबातचे कागदपत्र व तर कागदपत्र दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव बँकेकडे सादर करुन तो प्रस्ताव बँकेने ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठवून देणे बाबत कारवाई करणे आवश्यक आहे व आर.बी.आय.ने मंजुर केलेली रक्कम अर्जदार यांना देणे बाबत योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपत्रासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव आर.बी.आय.ने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यात गैरअर्जदार यांचेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय.कडे सादर करावा व आर.बी.आय.ने मंजुर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना द्यावी. 3. मानसिक त्रासाबद्यल व दावा खर्चा बद्यल आदेश नाही. 4. संबंधीत पक्षकार यांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |