जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/271 प्रकरण दाखल तारीख - 11/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 14/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.एस.आर.देशमुख. - सदस्या मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मारोती पि.गंगाराम खंदारे, वय वर्षे 50, धंदा शेती, अर्जदार. रा.साप्ती ता.हदगांव जि.नांदेड. विरुध्द. 1. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गैरअर्जदार. द्वारा शाखाधिकारी, शाखा तळणी, सध्या शाखा- नीवघा ता.हदगांव जि.नांदेड. 2. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, मुख्य व्यवस्थापक, मुख्य शाखा, शिवाजी पुतळया जवळ, नांदेड. 3. श्री.एस.डी.चौधरी, माजी शाखाधिकारी,ना.जि.म.स.बँक लि, रा.नीवघा ता.हदगांव जि.नांदेड. 4. श्री.बी.बी.संगनाळे, माजी रोखपाल, नां.जि.म.स.बँक लि, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एन.के.कल्याणकर. गैरअर्जदारक्र.1 व 2 तर्फे वकील. - अड.एस.डी.भोसले. गैरअर्जदार क्र. 3 - एकतर्फा गैरअर्जदार क्र. 4 तर्फे वकील - अड.व्ही.एम.पवार. निकालपत्र (द्वारा- मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख,सदस्य) अर्जदार हा मुळचा साप्ती ता.हदगांव येथील राहणार आहे. अर्जदार यांची गैरअर्जदार मध्यवर्ती बँक शाखा तळणी येथे त्यांचे बचत खाते क्र.557 आहे. अर्जदाराने वेळोवेळी पैशाची उचल केली तसेच वेळेनुसार बँकेत पैसे जमा केले. अर्जदाराने दि.03/06/2005 रोजीचा व्यवहार केला त्या वेळेस अर्जदाराच्या खात्यामध्ये रु.1,04,648/- एवढी रक्कम शिल्लक होती. त्यानंतर बँक डबघईला आल्यामुळे अर्जदाराच्या खात्यात नविन जेवढे पैसे जमा होती. तेवढेच पैसे खातेदारास देण्यात येत होते. त्यामुळे अर्जदाराच्या खात्यात रक्कम रु.1,04,648/- एवढी रक्कम बाकी होती. सदरील नविन जमा झालेले पैसे अर्जदारास दिल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराच्या खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेचे नोंद केलेली नाही. सदरील खात्यातील रक्कम गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी परस्पर उचलून घेतल्यामुळे सदरील शिल्लक रक्कमेच्या नोंद केल्या नाहीत. अर्जदाराचा व्यवहार हा त्याच्या जवळ असलेल्या बचत खाते पुस्तिके प्रमाणे सुरळीत व व्यवस्थीत होता. दि.03/06/2005 पासुन अर्जदाराच्या खात्यात रु.1,04,648/- जमा होते. दि.09/06/2006 रोजी अर्जदार बँकेत जावून विनंती करुन स्वतः लेजर बुकची पाहणी केली असता, अर्जदाराच्या लेजर बुकला रु.38,914/- दिसून आले. परंतु वास्तविकता अर्जदाराच्या खात्यात रु.1,04,648/- एवढी रक्कम शिल्लक होती. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांची खाते निहाय चौकशी तसच शासकीय लेखा परिक्षण श्रेणी 2 यांचेकडुन सदर शाखेचे लेखा परिक्षण केले. सदरील लेखापरिक्षणानुसार गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी सदर बँकेच्या व्यवहारात गैर व्यवहार केल्याचे नमुद केले व त्यांनी त्या संदर्भात पोलिस स्टेशन हदगाव येथे दि.18/10/2007 रोजी गुन्हा नं.123/2007 दाखल केला. भारतीय रिझर्व बँकेने खातेदाराच्या खात्यातील रक्कम रु.3,000/- उचलण्यास परवानगी दिल्यामुळे दि.31/08/2009 रोजी रु.3,000/- अर्जदाराने उचलून घेतले असता गैरअर्जदाराच्या बचत खाते पुस्तिकेत रक्म रु.38,700/- शिल्लक असल्याचे लिहले ते अर्जदारास मान्य नाही. कारण त्या अगोदरच्या व्यवहारात रक्कम रु.1,04,648/- एवढी रक्कम बाकी होती. अर्जदाराच्या खाते उता-यावर रु.38,914/- व बचत खाते पुस्तिकेवर रु.1,04,648/- एवढी रक्कम बाकी असतांना अर्जदारास फक्त रु.41,700/- एवढी रक्कम शिल्लक असल्याचे प्रमाणपत्र दिले. सदरील रक्कमातील फरकावरुन अर्जदाराच्या खात्यातील रक्कम परस्पर उचलल्याचे स्पष्ट निदर्शनास येते. अर्जदाराने वकिला मार्फत गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांना नोटीस पाठविल परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांनी अर्जदाराच्या बचत खाते क्र.557 मधील रक्कम रु.62,948/- एवढी रक्कम परस्पर उचलून अर्जदाराचा विश्वासघात केला व सेवा देण्यात कसून केला. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, मानसिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जदाराच्या खात्यातील रक्कम परस्पर उचलून घेतलेली रक्कम रु.62,948/- व दावा खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अशी एकुण रक्कम रु.87,948/- व्याजासह गैरअर्जदार क्र. 1 ते 4 कडुन मिळावे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले, त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराची तक्रारी ही ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 डी-1 प्रमाणे न्यायमंचामध्ये योग्य नसल्यामुळे रद्य करण्या यावे. सदरील प्रकरण न्यायदंडाधिकारी हदगांव यांचेकडे सदरील प्रकरण प्रलंबीत असल्यामुळे प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत सदरील तक्रार एकाच कारणावरुन दोन ठिकाणी चालणार नाही. अर्जदारांनी केलेले इतर सर्व विपरीत विधाने गैरअर्जदारांनी नाकबुल केली आहे. गैरअर्जदाराचे असे म्हणणे की, दि.09/06/2006 रोजी अर्जदाराच्या लेजरबुला रु.38,914/- एवढी रक्कम शिल्लक होती. परिच्छेद क्र. 13 मधील मजकुर खोटा असुन या संबंधी गैरअर्जदार क्र. 3 व 4 हे जबाबदार आहेत हे म्हणणे खोटे आहे. अर्जदारास कोणत्याही प्रकारचे शारीरिक त्रास व मानसिक त्रास आर्थीक त्रास दिलेला नाही. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांची खातेनिहाय चौकशी केली व त्यांच्यावर गुन्हा क्र. 123/07 दाखल केलेला आहे हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार क्र. 3 व 4 यांना निलंबित केलेले असल्यामुळे अर्जदाराची रक्कम त्यांच्याकडुन वैयक्तीकरित्या अर्जदारांनी घ्यावी. अफरातफर रक्कमेच्या वसुली बाबत दावा दाखल केल्यामुळे रु.62,948/- देण्यास गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे जबाबदार नाहीत. अर्जदाराची तक्रार न्यायमंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे ती खर्चासह फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र. 3 यांना या मंचाची नोटीस मिळुनही ते हजर न झाल्याने त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण पुढे चालविण्यात आले. गैरअर्जदार क्र. 4 हे हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदारास गैरअर्जदार क्र. 4 व्यक्तीशः ओळखत नाही. तसेच अर्जदाराने पेमेंट स्लिपवर स्वतःचा अंगठा करुन गैरअर्जदार क्र.1 कडुन पेमेंटची उचल केली आहे. व अर्जदार हा स्वतःचा अंगठा करुन त्यांच्या खात्यावर त्यांनी स्वतः व्यवहार केला आहे. त्यामुळे गैरअर्जदार अर्जदार क्र. 4 चा सदरील खात्यावरील व्यवहाराशी कसलाही संबंध नाही. कारण अर्जदाराच्या पेमेंट स्लिपवर त्याचा अंगठा असून त्या पेमेंट स्लिप आजही त्याच्या अंगठयाची खात्री करण्यासाठी गैरअर्जदार क्र. 1 यांचेकडे उपलब्ध आहे. त्यामुळे त्या पे स्लिपवर अंगठयाची तपासणी करण्यासाठी तज्ञाकडे पाविण्या करीता रेकॉर्ड गैरअर्जदार क्र. 1 कडे उपलब्ध असल्यामुळे सदरील पे स्लिप तज्ञाकडे पाठवून अर्जदाराच्या अंगठयाची तपासणी व्हावी. गैरअर्जदार क्र. 4 यांनी अर्जदाराच्या खात्यातुन कोणतीही रक्कम परस्पर उचलून घेतलेली नाही. गैरअर्जदार क्र. 4 चे असे म्हणणे की, गैरअर्जदार क्र. 4 ची 2006 रोजी शाखा तळणीहून बँकेच्या आष्टी शाखेत बदली झाली. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 4 चा दि.02/06/2006 पासून गैरअर्जदार क्र. 1 व 2 शी काहीही संबंध नसल्यामुळे गैरअर्जदारास अर्जातील मुद्या क्र. 8 ते 10 संबंध कसलीही माहिती नाही. म्हणुन अर्जदाराचा तक्रारअर्ज गैरअर्जदार क्र. 4 विरुध्द खर्चासह फेटाळण्यात यावी, असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यानी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकार यांना दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी आहे काय व ते अर्जदाराने सिध्द केले काय? 3. अर्जदाराने मागणी केलेली रक्कम देण्यास गैरअर्जदार होय. बांधील आहेत काय? 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 – अर्जदार हे तळणी ता.हदगांव जि.नांदेड येथील राहणार असून त्यांनी गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तळणी येथे बचत खाते उघडलेले आहे ते गैरअर्जदारास मान्य आहे. म्हणुन अर्जदार हे गैअर्जदाराचे ग्राहक आहेत म्हणुन मुद्या क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येते. मुद्या क्र. 2 –. गैरअर्जदार यांच्या लेखापाल व तात्कालीन शाखाधिकारी व कॅशीअर यांच्या विरुध्द पोलिस स्टेशन हदगांव येथे तक्रार दाखल आहे. सदरील प्रकार हा जरी बॅकेचे कर्मचारीची चुक असले तरी देखील तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असुन ते अर्जदाराची रक्कम देणे टाळु शकत नाहीत. अर्जदार हे तळणी येथील राहणार आहेत ते सामान्य शेतकरी आहेत. शेतीमधुन नीघणा-या नफयापासुन काही रक्कम त्यांनी गैरअर्जदार यांचेकडील बचत खात्यामध्ये जमा केलेले होते. अर्जदाराचे बचत खाते क्र.557 असुन अर्जदाराने सदरील पासबुकची छायाप्रत मंचासमोर दाखल केलेली आहे. त्यांनी मागणी केलेल्या व्यवहाराची नोंद त्या पासबुकात आहे. सदरील खाते पुस्तकात दि.03/06/2005 रोजी रक्कम रु.1,04,648/- जमा होती सदरील रक्कम उचल करण्या करीता गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पासबुक व स्लिप दाखल केले असता गैरअर्जदारांचे कर्मचारी यांनी एवढी रक्कम तुमच्या खात्यात शिल्लक नसत्यामुळे ती तुम्हाला मिळणार नाही असे सांगितले. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 यांना त्यांच्या खात्याबद्यलची माहीती देण्या करीता विनंती केली त्यावेळी गैरअर्जदारांनी अर्जदारास खाते संदर्भात माहीती देण्यास टाळाटाळ केली त्यानंतर अनेक वेळा अर्जदाराने गैरअर्जदाराकडे खाते संदर्भात माहीती दाखविली नाही व गैरअर्जदार यांनी सदरील माहीती आजपर्यंत दिलेली नाही. अर्जदारास यापुर्वी सदर बँकेत लेखापाल व बॅकेचे तात्कालीन शाखाधिकारी व कॅशीअर यांच्या विरुध्द पोलिस स्टेशन हदगांव येथे तक्रार दाखल केलेली होती, या गोष्टीची माहीती होती त्यामुळे अर्जदारास शंका आली की, त्यांचे खात्यातही अशाच पध्दतीचा गैरव्यवहार झाला असण्याची शंका आहे. अर्जदाराच्या खाते उता-यावर रु.38,914/- व बचत खाते पुस्तीकेवर रु.1,04,648/- बाकी असताना देखील अर्जदारास फक्त रु.41,700/- शिल्लक असल्याचे प्रमाणपत्र दिले. आजपर्यंत गैरअर्जदाराने अर्जदाराचे पैसे परतफेड केलेली नाही. रिझर्व बँकचे निर्बंध लावल्यामुळे बॅकेचा व्यवहार बंद होते. सध्याच्या परिस्थितीत रिझर्व बॅकेने लावलेले निर्बंध शिथील केलेले आहे , ग्राहकांना त्यांची ठेवी परत मिळत आहे. त्यांचे स्वतःचे अधिकाराचे पैसे गैरअर्जदाराने परत केले नसल्यामुळे अर्जदारास मानसिक त्रास झाला त्याबद्यल अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन रु.20,000/- नुकसान भरपाई व दावा खर्च रु.5,000/- मागीतली आहे व रक्कम रु.62,948/- वापस करावे अशी विनंती केली आहे. रिझर्व बॅकेने आर्थीक निर्बंध शिथील केले असले तरी अटी व नियम पालन करणे आवश्यक आहे. सदरील अर्जदाराचे हे अटी व नियमाचे बाहेरचे असल्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराची रक्कम देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे.. अर्जदार याचे बचत खाते व खाते उता-यामध्ये असलेले रु.62,948/- एवढी उचलण्याचा त्यांचा हक्क आहे तरी कुठलीही गोष्टी खातर त्यांच्या खात्यात असलेली रक्कम बँक अडवून ठेवू शकत नाही. सदरील खात्यातील रक्कमेची उचल किंवा अफरातफर कोणाकडुन झाले हे सिध्द झाल्यानंतर बँकेने व्यक्तशः त्या व्यक्तिकडुन ती रक्कम वसुल करावी व अर्जदारास एक महिन्याच्या आंत रु.62,948/- दि.03/06/2005 पासुन 9 टक्के व्याज दराने द्यावे. सदरील रक्कम एक महिन्यात न दिल्यास संपुर्ण रक्कमेवर दि.03/06/2005 पासुन 12 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यंत अर्जदारास द्यावे. तसेच मानसिक त्रास व दावा खर्चाबद्यल अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु.10,000/- द्यावे, या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास रक्कम रु.62,948/- दि.03/06/2005 पासुन 9 टक्के व्याज दराने व्याजासह द्यावे. असे न केल्यास संपुर्ण रक्कमेवर दि.03/05/2005 पासुन 12 टक्के व्याजाने रक्कम फिटेपर्यंत अर्जदारास द्यावे. 3. अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासाबद्यल, दावा खर्च म्हणुन अर्जदारास गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी रु.10,000/- द्यावे. 4. संबंधीत पक्षकार यांना निकालाच्या प्रती देण्यात याव्यात. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |