द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष
1. सदर प्रकरणाचे नोटिस विरुध्द पक्षाला नोंदणीकृत डाकीनी पाठविण्यात आली होती. नोटिसीची तामिली करण्यात आल्याबाबत पोस्ट ऑफीस ठाणे यांनी खालील प्रमाणे दाखला दिलेला आहे.
'Article has been delivered on 31/03/2010'
सदर दाखल्याची प्रत अभिलेखात उपलब्ध आहे. या प्रकरणी दि.28/04/2010, 17/05/2010, 03/06/010, 05/08/2010, 23/11/2010 व 04/01/2011 याप्रमाणे अनेक तारखा झाल्या. विरुध्द पक्षाने मंचासमक्ष हजर राहुन तक्रारी संदर्भात लेखी जबाब दाखल न केल्याने सदर प्रकरणी एकतर्फी सुनावणी ग्राहक कलम13(1) (ब)(2) अन्वये करण्यात आली. मंचासमक्ष हजर असणा-या तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकण्यात आले व त्यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र व दस्तऐवजांचा विचार करण्यात आला. त्याआधारे असे आढळते की दि.29/04/2009 रोजी त्याने विरुध्द पक्ष 1 कडुन भ्रमणध्वनी संच जी-900/brown batch 35388602-310434 रु.19,985/-या किमतीस विकत घेतला याची पावती तक्रारीसोबत दाखल करण्यात आलेली आहे. हमी
... 2 ... (तक्रार क्र.132/2010)
कालावधीत सुरवातीस जुन 2009 मध्ये मोबाईल चार्जर नादुरूस्त झाला. विरुध्द पक्षाला अनेक वेळा विनंती केल्यानंतर चार्जर बदलुन देण्यात आला. तक्रारकर्त्याच्या कथनानुसार ऑक्टोबर 2009 मध्ये मोबईलचा टच स्क्रीन बिघडला. विरुध्द पक्षाकडे चौकशी केली असता स्पेअर पार्टस नाही असे सांगण्यात आले. सोनी कंपनीला इमेल केल्यानंतर भ्रमणध्वनी संच सेवा केंद्रात जमा करण्याबाबत त्याला सांगण्यात आले. त्यांनी दुरूस्तीसाठी 20 दिवस घेतले. विरुध्द पक्ष 2 कडे 'फोन सिग्नल वारंवार जातो' या तक्रारीसाठी संपर्क साधला असता प्रतीसाद मिळाला नाही. घेतल्यापासुन 11 महिन्याच्या काळात केवळ 3 ते 4 महिने वादग्रस्त भ्रमणध्वनी संचाने व्यवस्थित काम केले. सुरवातीपासुन सतत त्यात बिघाड होत असल्याने प्रार्थनेत नमुद केल्यानुसार नुकसान भरपाई व न्यायिक खर्च देण्यात यावा असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे.
2. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे असे आढळते की, त्याने दि.19/04/2009 रोजी विरुध्द पक्षाच्या दुकानात रु.19,985/-किमतीला मोबाईल विकत घेतला होता. त्यानंतर त्यात बिघाड झाला. त्याने विरुध्द पक्षासोबत वारंवार संपर्क साधला व दुरुस्ती करुन द्यावी अशी मागणी केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या तक्रारीसंदर्भात त्याला इमेल द्वारे पाठविलेल्या उत्तराची प्रत त्याने जोडलेली आहे. त्या पत्राच्या आधारे असे आढळते की तक्रारकर्त्याच्या भ्रमणध्वनी संचात वारंवार होत असणारा बिघाड विरुध्द पक्ष दुरूस्त करु शकलेला नाही. अपेक्षेप्रमाणे त्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली नाही. ऐवढया मोठया रक्कमेला विकत घेतलेल्या भमणध्वनीसंचात वारंवार बिघाड निर्माण होणे ही बाब मोबाईल संचातील मुलभुत दोषांची निदर्शक आहे. सबब मंचाच्या मते विरुध्द पक्ष 1 व 2 हे दोषपुर्ण भ्रमणध्वनी संच तक्रारकर्त्यास विकण्याबाबत जबाबदार आहेत. तसेच त्याला दोषपुर्ण सेवा दिल्याबाबत जबाबदार आहेत. त्यामुळे न्यायाचे दृष्टिने विरुध्द पक्षाने वादग्रस्त भ्रमणध्वनी संचातील दोष दुरूस्त करणे आवश्यक आहे व असे शक्य नसल्यास तक्रारकर्त्यास विक्रीची रक्कम परत करण्यास जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडुन न्यायिक खर्च, अंतिम आदेशात नमुद केल्याप्रमाणे देण्यास पात्र आहे.
3. सबब अंतिम आदेश पारित करण्यात येतो-
अंतरिम आदेश
1.तक्रार क्र. 132/2010 मंजुर करण्यात येते.
2.विरुध्द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्या आदेश पारित तारखेच्या 45 दिवसाचे आत वादग्रस्त भ्रमणध्वनी संच दुरूस्त करुन द्यावा, अथवा तक्रारकर्त्यास खरेदी किंमत रक्कम रु.19,985/-(रु. एकोणिस हजार नौशे पंचाऐंशी फक्त) परत करावी.
... 3 ... (तक्रार क्र.132/2010)
3.तक्रारकर्त्यास झालेल्या गैरसोय व मनस्तापासाठी नुकसान भरपाई रु.3,000/-(तीन हजार फक्त) व न्यायिक खर्च रु.2,000/-(दोन हजार फक्त) एकुण रु.5,000/- (पाच हजार फक्त) द्यावे.
4.विहित मुदतीत उपरोक्त आदेशाचे पालन न केल्यास तक्रारकर्ता उपरोक्त संपुर्ण रक्कम आदेश पारित तारखेपासुन ते रक्कम फिटेपावेतो द.सा.द.शे 12% व्याजासह विरुध्द पक्ष 1 व 2 कडुन वसुल करण्यास पात्र राहतील.
दिनांक - 13/01/2011