Maharashtra

Sangli

CC/10/148

Drakshyani Kashinath Borigidde - Complainant(s)

Versus

Nanaso Sagare Co.Op.Cr.Soc.Kavathe Mahankal etc. 15 - Opp.Party(s)

26 Aug 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/148
 
1. Drakshyani Kashinath Borigidde
Karoli, Tal.Kavathe Mahankal, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Nanaso Sagare Co.Op.Cr.Soc.Kavathe Mahankal etc. 15
Kavathe Mahankal, Tal.Kavathe Mahankal, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                                         नि. २७
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर  
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र.१४८/१०
-------------------------------------------
तक्रार नोंद तारीख   :  २६/३/२०१०
तक्रार दाखल तारीख  :  २९/३/२०१०
निकाल तारीख       २६/८/२०११
-------------------------------------------
सौ द्राक्षायणी काशिनाथ बोरीगिड्डे
व.व. ६५, धंदा काही नाही
रा.करोली (टी), ता.कवठेमहांकाळ जि.सांगली               ..... तक्रारदारú
  
 विरुध्‍द
 
१. नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
   कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
 
२. श्री नारायण यशवंत पवार, वय वर्षे सज्ञान
    धंदा शेती रा.रांजणी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
३. श्री सुकुमार बाबा कोठावळे,
    वय वर्षे सज्ञान, धंदा व्‍यापार,
    रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
४. श्री शिवलिंग चन्‍नय्या स्‍वामी
    वय वर्षे सज्ञान, धंदा व्‍यापार,
    रा.नागज, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
५. श्री गणपती आप्‍पासो सगरे,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती,
    रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
६. श्री सुहास शिवाजी पाटील,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती,
    रा.आगळगाव, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
७. श्री विश्‍वनाथ विठोबा कोळेकर
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती,
    रा.निमज, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
८. श्री आण्‍णाप्‍पा लिंगाप्‍पा सावळे,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती,
    रा.हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
९. श्री सत्‍यवान परशुराम कुंभारकर,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती,
    रा.शिंदेवाडी (हिं), ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
१०. श्री दत्‍तात्रय कृष्‍णा माळी,
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.कोकळे, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
११. श्री रामचंद्र सुखदेव जगताप
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.अग्रण धुळगांव, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
१२. श्री विश्‍वास भगवान पवार
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.देशिंग, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
१३. श्री शहाजी रामचंद्र एडके
    वय वर्षे सज्ञान, धंदा शेती
    रा.म्‍हैशाळ (एम), ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
१४. सौ संगिता संभाजी बजबळे,
    वय वर्षे सज्ञान, धंदा गृहिणी
    रा.थबडेवाडी, ता.कवठेमहांकाळ जि. सांगली
 
१५. शाखाधिकारी,
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठे महांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली          .....जाबदार
 
                                           तक्रारदारú तर्फेò            : +ìb÷.आर.एस.पाटील
 जाबदार क्र.१ ते १५       : एकतर्फा
 
नि का त्र
 
 
द्वारा- सदस्‍या श्रीमती सुरेखा बिचकर
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने दामदुप्‍पट ठेवी अन्‍वये गुंतविलेली रक्‍कम परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे सोसायटी असा केला जाईल) यांचेकडे दामदुप्‍पट ठेवी अंतर्गत रक्‍कम गुंतविली होती. तक्रारदार यांच्‍या ठेवीची रक्‍कम मागणी करुनही जाबदार यांनी अदा केली नाही. सबब, आपल्‍याला रक्‍कम देवविण्‍यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ नि.३ अन्‍वये प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण ३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणी जाबदार क्र.१ ते १५ यांना नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाही तसेच त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्‍यात आला.
 
३.    तक्रारदारांनी त्‍यांची रक्‍कम जाबदार सोसायटीमध्‍ये गुंतविल्‍याबाबतची प्रत नि.२६ चे यादीने दाखल केली आहे. तक्रारदार यांनी ठेवपावती क्र.७९ व ८० अन्‍वये प्रत्‍येकी रक्‍कम रु.५०,०००/- प्रमाणे एकूण रु.१,००,०००/- जाबदार यांचेकडे दि.२५/५/२००४ रोजी गुंतविल्‍याचे दिसून येते. सदर ठेव ही दामदुप्‍पट योजनेअंतर्गत गुंतविली असून परत मिळणारी एकूण रक्‍कम रु.२,००,०००/- आहे. त्‍यामुळे सदरची रक्‍कम रु.२,,००,०००/- ही ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून म्‍हणजे दि.२६/५/२००९ पासून द.सा.द.शे. १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे.
 
४.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार सोसायटीबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
 
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र. २ ते १४ यांना  पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो. जाबदार क्र.१५ हे जाबदार संस्‍थेचे कर्मचारी असलेने त्‍यांना ठेवपरतीसाठी वैयक्तिक जबाबदार धरता येणार नाही. रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या सोसायटीमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती सोसायटीच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्‍कर्ष निघतो. 
 
५.    तक्रारदार यांनी शारिरिक मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची व तक्रारअर्जाचे खर्चाची मागणी केली आहे. तक्रारदार यांना आपली रक्‍कम मिळण्‍यासाठी या न्‍यायमंचात धाव घ्‍यावी लागणे ही बाब निश्चितच तक्रारदारांना शारिरिक मानसिक त्रास देणारी आहे. त्‍यामुळे सदरची मागणी अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.
 
सबब, मंचाचा आदेश की,
दे
 
१. यातील जाबदार क्र.१ सोसायटीसोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.७९ व ८० वरील परत मिळणारी एकूण रक्‍कम रु.२,,००,०००/-दि.२६/५/२००९ पासून द.सा.द.शे.१०% दराने व्‍याज अदा करावी.
 
२. यातील जाबदार क्र.१ सोसायटीसोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- अदा करावेत.
 
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.१०/१०/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: २६/०८/२०११    
                  (सुरेखा बिचकर)                    (अनिल य.गोडसे÷)
                       सदस्‍या                                       अध्‍यक्ष           
                          जिल्‍हा मंच, सांगली                      जिल्‍हा मंच, सांगली.  
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.