Maharashtra

Sangli

CC/10/218

Arun Bhimrao Patole - Complainant(s)

Versus

Nanaso Sagare Co.Op.Cr.Soc., etc.15 - Opp.Party(s)

20 Sep 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/218
 
1. Arun Bhimrao Patole
Karoli (T), Tal.Kavathe Mahankal, Dist.Sangli
...........Complainant(s)
Versus
1. Nanaso Sagare Co.Op.Cr.Soc., etc.15
Kavathe Mahankal, Tal.Kavathe Mahankal, Dist.Sangli
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONORABLE A.Y.Godase PRESIDENT
 HON'ABLE MRS. Geeta Ghatge MEMBER
 HON'ABLE MRS. Surekha Bichkar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                           नि.नं. ३४
जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
 
मा.अध्‍यक्ष अनिल य.गोडसे
मा.सदस्‍या - श्रीमती गीता घाटगे
 
 
ग्राहक तक्रार अर्ज क्र. २१८/२०१०
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख      ७/०५/२०१०
तक्रार दाखल तारीखः  १०/०५/२०१० 
निकाल तारीखः      - २०/०९/२०११
----------------------------------------------
 
श्री अरुण भीमराव पाटोळे,
वय ७२ वर्षे, व्‍यवसाय शेती
रा.करोली (टी), ता.कवठेमहांकाळ, सध्‍या मयत
 
१अ. श्रीमती कुसुम अरुण पाटोळे
वय ६३ वर्षे, व्‍यवसाय घरकाम
रा.करोली (टी), ता.कवठेमहांकाळ
 
१ब. सौ संगिता संजय धायगुडे
वय ४१ वर्षे, व्‍यवसाय नोकरी
रा. सोलापूर जि. सोलापूर
 
१क. सौ पुष्‍पलता निनाद माने
वय ३५ वर्षे, व्‍यवसाय नोकरी
रा. बारामती
 
१ड. स्‍वाती अरुण पाटोळे,
वय २८ वर्षे, व्‍यवसाय शिक्षण
रा. करोली (टी), ता.कवठेमहांकाळ                       .... तक्रारदार
विरुध्‍द
 
१.  नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
    (नोटीस/समन्‍स चेअरमन/सचिव यांचेवर बजवावे)
 
२. शाखाधिकारी/मॅनेजर,
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
३. श्री नारायण यशवंत पवार, चेअरमन
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
४. श्री सुकुमार बाबा कोठावळे, व्‍हाईस चेअरमन
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
५. श्री गणपती आप्‍पासो सगरे, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
६. श्री शिवलिंग चन्‍नप्‍पा स्‍वामी, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
७. श्री सुहास शिवाजी पाटील, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
८. श्री विश्‍वनाथ विठोबा कोळेकर, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
९. श्री आण्‍णाप्‍पा लिंगप्‍पा सावळे, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
१०. श्री सत्‍यवान परशुराम कुंभारकर, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
११.  श्री दत्‍तात्रय कृष्‍णा माळी, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
१२. श्री रामचंद्र सुखदेव जगताप, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
१३. श्री विश्‍वास भगवान पवार, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
१४. श्री शहाजी रामचंद्र एडके, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
 
१५. सौ संगिता संभाजी बजबळे, संचालक
    नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.
    कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली                 .....जाबदार
 
                      तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री उल्‍हास ज. चिप्रे
                      जाबदार क्र.१ ते १५ एकतर्फा
 
   नि का ल प त्र
 
द्वारा- मा. सदस्‍या- गीता घाटगे
 
१.     प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्‍थेने मुदत ठेवी व सेव्हिंग्‍ज खात्‍याअन्‍वये गुंतविलेल्‍या रकमा परत दिल्‍या नाहीत म्‍हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार नानासाहेब सगरे को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली (ज्‍यांचा उल्‍लेख यापुढे सोसायटी असा केला जाईल) यांचेकडे रकमा गुंतविलेल्‍या होत्‍या. यातील सर्व ठेवींच्‍या मुदती पूर्ण झाल्‍या आहेत.  तक्रारदारांनी गुंतविलेल्‍या रकमांची सोसायटीकडे मागणी केली असता सोसायटीने त्‍या देण्‍यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्‍याला रकमा देवविण्‍यात याव्‍यात अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्‍वये एकूण १९ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
 
 
 
 
 
 
 
२.    प्रस्‍तुत प्रकरणातील जाबदार क्र. १ ते १५ यांचेवर मंचाच्‍या नोटीसीची बजावणी होऊनसुध्‍दा ते प्रस्‍तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्‍यांचेविरुध्‍द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्‍यात आले. 
 
३.    तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्‍द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्‍कम देण्‍यास जाबदार सोसायटीबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो.  या मुद्याच्‍या अनुषंगाने सन्‍मा. मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्‍द राजश्री चौधरी  या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्‍याचे अवलोकन करता त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे निष्‍कर्ष काढल्‍याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.  
सन्‍मा. उच्‍च न्‍यायालयाने वर दिलेल्‍या या निष्‍कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्‍ट्र सहकार कायद्यातील कलम ८८ अन्‍वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्‍यांचे दायित्‍व निश्चित केल्‍याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्‍तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्‍यंत महत्‍वाचे असल्‍याचे मंचास वाटते आणि म्‍हणून जाबदार क्र.३ ते १५ यांना पुराव्‍या अभावी तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो तसेच जाबदार क्र.२ हे सोसायटीचे कर्मचारी असलेने त्‍यांनाही तक्रारदाराची रक्‍कम देण्‍यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही असेही मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून सोसायटीने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्‍याने ज्‍या सोसायटीमध्‍ये ठेव गुंतविलेली आहे, ती सोसायटीच तक्रारदाराच्‍या ठेवीसाठी सर्वस्‍वी जबाबदार ठरते असा मंचाचा निष्‍कर्ष निघतो.
 
४.    प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी ठेवपावत्‍यातील रकमांबरोबर बचत खात्‍यात गुंतविलेल्‍या रकमेचीही मागणी केली आहे. तथापि बचत खात्‍याच्‍या मूळ पासबुकाचे अवलोकन करता व त्‍याच्‍या प्रस्‍तुत प्रकरणी दाखल करण्‍यात आलेल्‍या सत्‍यप्रतीचे अवलोकन करता त्‍यावर शाखा करोली टी असा शिक्‍का आढळून येतो. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांच्‍या गुंतविलेल्‍या रकमांसाठी केवळ पतसंस्‍थेलाच जबाबदार धरणेत आलेले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी पतसंस्‍थेच्‍या करोली टी शाखेस तक्रारदारांनी जाबदार म्‍हणून सामील केलेले नाही हे नि.१ चे अवलोकन करता स्‍पष्‍ट होते. या वस्‍तुस्थितीच्‍या पार्श्‍वभूमीवर ज्‍या शाखेस तक्रारदारांनी जाबदार म्‍हणून सामील केलेले नाही, त्‍या शाखेत गुंतविलेली रक्‍कम प्रस्‍तुत प्रकरणी मंजूर करणे निश्चितच योग्‍य व न्‍याय होणार नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे बचत खात्‍यात गुंतविलेल्‍या रकमेबाबत प्रस्‍तुत निकालपत्रात कोणताही आदेश करणेत येत नाही. मात्र योग्‍य त्‍या शाखेस पक्षकार करुन बचत खात्‍यातील रकमेबाबत दाद मागण्‍याची मुभा तक्रारदारांना राहील.
 
 
 
५.    प्रस्‍तुत प्रकरणी दाखल ठेवपावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन करता तसेच नि.२८ वरील तक्रारदारांचे व्‍याजनिवेदन पाहता तक्रारदारांना ठेवींत गुंतविलेल्‍या रकमांवर कोणतेही व्‍याज मिळाल्‍याचे दिसून येत नाही. ठेवींच्‍या मुदतीही पूर्ण झालेल्‍या आहेत. सबब या सर्व ठेवींतील गुंतविण्‍यात आलेल्‍या रकमा ठेव ठेवल्‍याचे तारखेपासून ठेवपावतीमध्‍ये नमूद केलेल्‍या व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहेत. तसेच सेव्हिंग्‍ज खात्‍यातील शेवटच्‍या तारखेस शिल्‍लक रक्‍कम त्‍या अखेरच्‍या तारखेपासून १० टक्‍के व्‍याजदराने मंजूर करण्‍यात येत आहे.  हे व्‍याजदर मंजूर करीत असताना गुंतविलेल्‍या रकमांची मागणी करुनही ती न देवून पतसंस्‍थेने तक्रारदारांना दूषित सेवा पुरविल्‍याची बाब लक्षात घेणेत आलेली आहे. 
 
६.    तक्रारदार मयत श्री अरुण भीमराव पाटोळे हे मयत असलेबाबत व तक्रारदार क्र.१अ ते १ड हे त्‍यांचे वारस असलेबाबत तक्रारदार यांनी नि.२५ ला शपथपत्र दाखल केले आहे.   सबब ठेवीतील रकमा तक्रारदार क्र.१अ ते १ड यांना मंजूर करण्‍यात येत आहेत.
 
सबब, मंचाचा आदेश की,
 
दे
 
१. यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र.८१०५, ८१०६, ८१०७, ८१०८ व ८१०९ मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.५०,०००/- (पन्‍नास हजार फक्‍त) दि.१३/१२/२००४ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
२. यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र.८१३४, ८१३५, ८१३६, ८१३७, ८१३८, ८१३९, ८१४०, ८१४१, ८१४२ व ८१४३ मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.५०,०००/- (पन्‍नास हजार फक्‍त) दि.२१/२/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
३. यातील जाबदार सोसायटी व सोसायटीतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावत्‍या क्र.८४३४ व ८४३५ मधील प्रत्‍येकी रक्‍कम रु.५०,०००/- (पन्‍नास हजार फक्‍त) दि.५/१०/२००५ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याजासह अदा करावी.
 
४. यातील जाबदार पतसंस्‍था व पतसंस्‍थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्‍हणून रक्‍कम रु.२,०००/- (दोन हजार फक्‍त) अदा करावेत.
 
५. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्‍थेने दि.५/११/२०११ पर्यंत न केल्‍यास तक्रारदार त्‍यांचेविरुध्‍द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
 
सांगली
दिनांकò: २०/०९/२०११              
                                          
 
                  (गीता सु.घाटगे)                                 (अनिल य.गोडसे÷)
                        सदस्‍या                                                   अध्‍यक्ष           
                    जिल्‍हा मंच, सांगली.                                   जिल्‍हा मंच, सांगली                 
 
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /   /२०११
      VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù.   /    /२०११
 
 
[HONORABLE A.Y.Godase]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Geeta Ghatge]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Surekha Bichkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.