नि.क्र.20
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.प्रभारी अध्यक्ष : सौ वर्षा शिंदे
मा.सदस्या : सौ मनिषा कुलकर्णी
तक्रार अर्ज क्र. 170/2011
--------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : 27/06/2011
तक्रार दाखल तारीख : 06/08/2011
निकाल तारीख : 08/08/2013
--------------------------------------------------
श्री बाळासाहेब मारुती माळी
वय वर्षे – 25, धंदा – शेती
रा.मु.विठुरायाची वाडी, पो. हिंगणगाव,
ता.कवठेमहांकाळ जि. सांगली ...... तक्रारदार
विरुध्द
1. नानासाहेब सगरे को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
कवठेमहांकाळ ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली
तर्फे व्यवस्थापक,
श्री शिवलिंग मुरग्याप्पा आरळी,
वय वर्षे – सज्ञान, धंदा – नोकरी
रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली
2. श्री नारायण यशवंत पवार (चेअरमन), व.व.सज्ञान
धंदा - सुखवस्तू, रा.रांजणी ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
3. श्री सुकुमार बाबा कोठावळे, (व्हा.चेअरमन), व.व.सज्ञान
धंदा - सुखवस्तू, रा.कवठेमहांकाळ ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
4. श्री शिवलिंग चन्नय्या सवामी
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.नागज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
5. श्री गणपती आप्पासो सगरे, (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
6. श्री सुहास शिवाजी पाटील (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.आगळगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
7. श्री विश्वनाथ विठोबा कोळेकर (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.निमज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
8. श्री आण्णाप्पा लिंगाप्पा साबळे (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
9. श्री सत्यवान परशुराम कुंभारकर (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.शिंदेवाडी(एम), ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
10. श्री दत्तात्रय कृष्णा माळी (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.कोकळे, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
11. श्री रामचंद्र सुखदेव जगताप (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.अग्रणी धुळगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
12. श्री शहाजी रामचंद्र एडके (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.म्हैशाळ (एम), ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
13. सौ संगिता संभाजी बजबळे (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.थबडेवाडी, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
14. श्री विश्वास भगवान पवार, (संचालक)
वय वर्षे – सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.देशिंग, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एम.एन.शेटे
जाबदार क्र.1 ते 14 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
1. तक्रारदाराने सदरचा तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये दाखल केला आहे. सदरची तक्रार स्वीकृत करुन जाबदारांना नोटीसीचे आदेश पारीत झाले व सदर नोटीस लागू होऊनही जाबदार मंचासमोर हजर झाले नाहीत.
2. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे -
जाबदार संस्था ही महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था आहे. जाबदार क्र.1 ही संस्था असून, जाबदार क्र.2 हे तिचे चेअरमन व जाबदार क्र.2 हे तिचे व्हाईस चेअरमन तर जाबदार क्र.4 ते 14 हे जाबदार क्र.1 संस्थेचे संचालक/संचालिका आहेत. जाबदार क्र.1 संस्थेचा लोकांकडून ठेव, पिग्मी, इ. स्वरुपात ठेवी स्वीकारणे व त्यावर व्याज देणे. त्या स्वीकारलेल्या ठेवी गरजू सभासद लोकांना कर्ज म्हणून वाटप करणे व त्यापासून नफा मिळवणे असा आहे. प्रस्तुतची तक्रार तक्रारदार यांनी जाबदार पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम मुदतीनंतरही परत मिळाली नाही म्हणून दाखल करण्यात आलेली आहे.
3. तक्रारदाराने जाबदार क्र.1 ते 14 यांचेकडे खालील तपशीलाप्रमाणे दामदुप्पट ठेव योजनेअंती रक्कम गुंतविलेली होती.
अ.क्र. |
पावती नं. |
रक्कम ठेवल्याचा दिनांक |
रक्कम परतीचा दिनांक |
ठेव रक्कम रु. |
मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम |
1 |
000435 |
20/6/03 |
19/6/08 |
17000 |
34000 |
2 |
1658 |
26/5/04 |
26/5/09 |
10000 |
20000 |
3 |
1670 |
16/6/04 |
16/6/09 |
10000 |
20000 |
4 |
000532 |
17/6/04 |
16/6/09 |
5000 |
10000 |
5 |
1470 |
2/7/03 |
2/7/08 |
19500 |
39000 |
|
|
|
|
एकूण रक्कम |
123000 |
उपरोक्त ठेवींबाबत जाबदार यांचेकडे तक्रारदाराने अनेक वेळा विनंती करुनही जाबदार यांनी सदरचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. भविष्यातील आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी तक्रारदार यांनी सदरची गुंतवणूक केलेली होती. जाबदार यांचेकडे गुंतविलेली ठेवरक्कम व्याजासह रु.1,23,000/- मिळावी यासाठी मंचाकडे तक्रारअर्ज दाखल केला आहे.
4. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने अर्जासोबत स्वतःचे शपथपत्र तसेच नि.4 सोबत एकूण 6 कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. जाबदार क्र. 1 ते 14 यांना नोटीस लागूनही ते या तक्रारअर्जाचे कामी मंचासमोर उपस्थित राहिले नाहीत व आपले म्हणणे दाखल केलेले नाही. म्हणून त्यांचेविरुध्द आज रोजी हे मंच एकतर्फा आदेश पारीत करीत आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, सादर केलेले पुरावे आणि त्यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद या सर्वांचे अवलोकन केल्यावर मंचासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत.
अ.क्र. |
मुद्दे |
उत्तरे |
1 |
तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत का ? |
होय |
2 |
जाबदार यांनी तक्रारदारास द्यावयाच्या सेवेमध्ये त्रुटी निर्माण केली आहे काय ? |
होय |
3 |
काय आदेश ? |
खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्र.1 ते 3
7. नि.4/1 ते 4/5 ला तक्रारदार याने जाबदार क्र.1 ते 14 यांचेकडे दामदुप्पट ठेव योजनेमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवपावत्या पुराव्यादाखल दाखल केलेल्या आहेत. त्यामुळे तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक-सेवादार नाते प्रस्थापित झाल्याचे दिसून येते आणि म्हणून तक्रारदार हे निश्चितपणे जाबदार क्र.1 ते 14 यांचे ग्राहक आहेत.
8. तक्रारदाराने जाबदार पतसंस्थेमध्ये दामदुप्पट ठेवयोजनेमध्ये गुंतवणूक केलेली रक्कम मुदत संपल्यानंतर व तक्रारदाराने तोंडी व लेखी मागणी करुनही न देणे ही सेवेतील त्रुटी आहे. गुंतवणूकदारांचे पैसे मुदतीनंतर देण्याची सर्वस्वी जबाबदारी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या ही जाबदार क्र.1 ते 14 यांची आहे. यासंदर्भात सन्मा. राष्ट्रीय आयोगाने 2009 (1) CPR 87 (NC) आशिष रमेशचंद्र बिर्ला विरुध्द मुरलीधर राजधर पाटील आणि इतर या न्यायनिवाडयामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की,
Non refund of maturity amount of fixed deposit made with cooperative credit society, the Directors society jointly and severally liable. Corporate/Cooperative veil was liable to be removed and Directors were liable to be held responsible for deficiency in service.
तसेच या प्रकरणी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेसमोरील रिट पिटीशन क्र.117/11, मंदाताई संभाजी पवार व इतर विरुध्द स्टेट ऑफ महाराष्ट्र यामधील आदेशाचाही आधार घेतला आहे.
9. वरील निवाडयावरुन हे स्पष्ट होते की, जाबदार क्र.1 ते 14 हे सेवेतील त्रुटीला सर्वस्वी जबाबदार असून तक्रारदार हे त्यांनी गुंतविलेली रक्कम जाबदारांकडून मिळण्यास हक्कदार आहेत. त्यामुळे मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
अ.क्र. |
पावती नं. |
ठेव रक्कम रु. |
मुदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम |
1 |
000435 |
17000 |
34000 |
2 |
1658 |
10000 |
20000 |
3 |
1670 |
10000 |
20000 |
4 |
000532 |
5000 |
10000 |
5 |
1470 |
19500 |
39000 |
|
|
एकूण रक्कम |
123000 |
2. जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांनी त्यांचेकडे दामदुप्पट योजनेंतर्गत गुंतविलेली रक्कम व्याजासह अनुक्रमे खालीलप्रमाणे अदा करावी.
3. सदरचे ठेव पावत्यांची मूळ रक्कम मुदत संपल्याच्या तारखेपासून रक्कम पूर्ण अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने परत देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
4. जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार माञ) देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
5. जाबदार क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिक वा संयुक्तपणे तक्रारदार यांना तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार माञ) देण्याचे आदेश देण्यात येत आहेत.
6. वर नमूद आदेशाची अंमलबजावणी निकाल जाहीर झालेल्या तारखेपासून 45 दिवसांत
करावी.
7. जाबदार यांनी आदेशाची पुर्तता न केल्यास तक्रारदार त्यांचे विरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील तरतूदीनुसार दाद मागू शकतील.
सांगली
दि. 08/08/2013
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा शिंदे)
सदस्या प्रभारी अध्यक्ष