नि.13
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 167/2011
तक्रार नोंद तारीख : 27/06/2011
तक्रार दाखल तारीख : 06/08/2011
निकाल तारीख : 22/04/2013
----------------------------------------------
श्री मारुती गणपती माळी
वय 61 वर्षे, धंदा – शेती
रा.मु.विठुरायाचीवाडी, पो.हिंगणगांव
ता.कवठेमहांकाळ, जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. नानासाहेब सगरे को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि.
कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ जि.सांगली
तर्फे व्यवस्थापक, श्री शिवलिंग मुरग्याप्पा आरळी
वय वर्षे सज्ञान, धंदा – नोकरी
रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
2. श्री नारायण यशवंत पवार, चेअरमन
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.राजंणी, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
3. श्री सुकुमार बाबा कोठावळे, व्हाईस चेअरमन
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
4. श्री शिवलिंग चन्नया स्वामी
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.नागज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
5. श्री गणपती आप्पासो सगरे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.कवठेमहांकाळ, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
6. श्री सुहास शिवाजी पाटील, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.आगळगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
7. श्री विश्वनथ विठोबा कोळेकर, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.निमज, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
8. श्री आण्णाप्पा लिंगाप्पा साबळे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.हिंगणगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
9. श्री सत्यवान परशुराम कुंभारकर, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.शिंदेवाडी (एम), ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
10. श्री दत्तात्रय कृष्णा माळी, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.कोकळे, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
11. श्री रामचंद्र सुखदेव जगताप, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.अग्रणी धुळगांव, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
12. श्री शहाजी रामचंद्र एडके, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.म्हैशाळ (एम), ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
13. सौ संगिता संभाजी बजबळे, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.थबडेवाडी, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली
14. श्री विश्वास भगवान पवार, संचालक
वय वर्षे सज्ञान, धंदा – सुखवस्तू
रा.देशिंग, ता.कवठेमहांकाळ, जि. सांगली ...... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड एम.एन.शेटे
जाबदार : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. सदरची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 अन्वये तक्रारदाराने दाखल केलेली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदाराने जाबदार क्र.1 या पतसंस्थेत पावती क्र. 530 दि.10/6/2004 अन्वये रक्कम रु.15,000/- मुदतठेव स्वरुपात, तर पावती क्र.1469 दि.2/7/2003 अन्वये रक्कम रु.30,000/- च्या मुदत ठेवी ठेवलेल्या आहेत. पावती क्र.530 ची मुदत दि.9/6/2009 संपल्यानंतर, रक्कम रु.30,000/- तर पावती क्र.1469 ची मुदत दि.2/7/2008 ला संपल्यानंतर रक्कम रु.60,000/- अशी एकूण रक्कम रु.90,000/- तक्रारदारास मिळणेची आहे. मुदत संपलेनंतर वेळोवेळी, तक्रारदाराने जाबदार क्र.1 कडे आपल्या रकमेची मागणी केली. तथापि, जाबदारांनी टोलवाटोलवीची उत्तरे देवून रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. सदर रकमांची अर्जदारास आवश्यकता असूनही जाबदारांनी ती रक्कम देण्याचे टाळले आहे व त्यायोगे तक्रारदारास दूषित सेवा दिलेली आहे. रकमा न मिळाल्याने तक्रारदारास शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जाबदार क्र.1 या संस्थेचे, जाबदार क्र.2 हे चेअरमन असून जाबदार क्र.3 हे व्हाईस चेअरमन आहेत तर जाबदार क्र.4 ते 16 हे संचालक/संचालिका आहेत. जाबदार क्र.1 ते 16 हे संयुक्तरित्या व वैयक्तिकरित्या तक्रारदरास ठेव पावतीच्या देय रकमा, व्याजासह तसेच नुकसान भरपाई दाखल रु.5,000/- आणि तक्रारअर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- देण्यास जबाबदार आहेत. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद रकमाच्या पुढील व्याजासह जाबदार क्र.1 ते 14 यांचेकडून संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या वसुल करुन मागितल्या आहेत.
3. प्रस्तुत प्रकरणात, नोटीसांची बजावणी होवून देखील जाबदार क्र.1 ते 14 जर झाले नाहीत त्यामुळे सदरचे प्रकरण त्यांचेविरुध्द एकतर्फी चालविण्यात आले.
4. तक्रारदाराने आपले कथनांचे पुष्ठयर्थ नि.3 ला शपथपत्र दाखल करुन, नि.4 सोबत एकूण 3 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यात वर नमूद केलेल्या ठेवपावत्यांच्या झेरॉक्सप्रती आणि जाबदार क्र.1 संस्थेचे संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे.
5. तक्रारदाराने दाखल केलेल्या व वर नमूद केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन करता असे दिसून येते की, जाबदार क्र.1 हया संस्थेच्या दामदुप्पट योजनेखाली तक्रारदाराने दि.2/7/2003 रोजी पावती क्र.1469 ने रक्कम रु.30,000/- तर दि.10/6/2004 रोजी पावती क्र.530 ने रक्कम रु.15,000/- , पाच वर्षांकरिता ठेवली. मुदतीअंती त्यास रक्कम रु.60,000/- आणि रु.30,000/- परत मिळावयाची होती. तक्रारदाराचे शपथपत्रांवरुन हे सिध्द होते की, मुदतीनंतर त्याने वेळोवेळी जाबदारांकडून रकमांची मागणी केली परंतु जाबदारांनी वेळोवेळी कारणे सांगून रकमा देण्याचे टाळले व अद्याप त्यास रकमा परत केल्या नाहीत. जाबदारांचे हे कृत्य स्पष्टपणे सेवेतील त्रुटी आहे. जाबदारांनी हया प्रकरणात हजर होवून आपली लेखी कैफियत देवून रकमा न देण्याकरिता काही स्पष्टीकरण देखील दिलेले नाही.
6. प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदाराने आली संपूर्ण तक्रार सिध्द केलेली आहे व त्यायोगे त्यास जाबदार क्र.1 ते 14 यांचेकडून मागितलेल्या सर्व रकमा व्याजासह मिळणेस तो पात्र आहे अशा निष्कर्षाला हे मंच आलेले आहे. सबब, आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1. तक्रारदाराची तक्रार ही खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार क्र.1 ते 14 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास वर नमूद ठेव पावतींच्या मुदतीनंतरच्या देय रकमा म्हणजे रक्कम रु.30,000/- व रु.60,000/- अनुक्रमे, तक्रारदारास हया याआदेशापासून 45 दिवसांत, तक्रार दाखल तारखेपासून द.सा.द.शे.8.5% दराने व्याजासह द्याव्यात.
3. तसेच जाबदार क्र.1 ते 14 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी म्हणून रु.5,000/- द्यावेत.
4. तसेच जाबदार क्र.1 ते 14 यांनी संयुक्तरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु.500/- द्यावेत.
5. जाबदार क्र.1 ते 14 यांनी विहीत मुदतीत रकमा न दिल्यास तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 किंवा 27 खाली प्रकरण दाखल करण्याची मुभा राहील.
सांगली
दि. 22/04/2013
( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष