आदेश (दिः 06/04/2011 ) द्वारा श्री.एम.जी.रहाटगावकर - मा.अध्यक्ष 1. तक्रारकर्त्याचे थोडक्यात कथन असे की, दि.27/08/2007 रोजी तिने विरुध्द पक्षाकडुन सोन्याची कानाची जोडी रु.4,600/- या रकमेला विकत घेतली विकत घेण्याचे काही दिवसातच दागिने काळे पडू लागल्याने विरुध्द पक्षाकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळेस वातावरणातील खारटपणामुळे असे झाले असावे असे उत्तर त्याने दिले. ग्राहक संरक्षण परिषदेत तक्रार केल्यानंतर दि बॉम्बे बुलियन असोसिएशन लिमिटेडचा या मान्यताप्राप्त प्रयोग शाळेकडुन वादग्रस्त दागिन्याची तपासणी केली असता 23C ऐवजी 17.50 व 18.00Cचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आजच्या बाजारभावानुसार फरकाची रक्कम मिळावी तसेच नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मंजूर करण्यात यावा अशी तीची मागणी आहे. निशाणी 2 अन्वये तक्रारीचे समर्थनार्थ प्रतिज्ञापत्र तसेच निशाणी 3(1) ते 3(2) अन्वये कागदपत्रे दाखल केले. त्यात दि.27/08/2007 रोजीचे विरुध्द पक्षांनी दिलेले बिल, दि बॉम्बे बुलियन असोसिएन लिमिटेडचा दि.20/06/2008 रोजीचा तपासणी अहवाल यांचा समावेश आहे.
2. विरुध्द पक्षांने निशाणी 10 अन्वये लेखी जबाब व निशाणी 11 अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यांचे थोडक्यात म्हणणे असे की, त्यांचेकडुन पैसे उकळण्याचे उद्देशाने सदर खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन वृत्तपत्रात तक्रारकर्तीने त्यांची बदनामी होईल अशी बातमी छापून आणली. त्याचे लहान दुकान असल्याने त्याचे जवळ व्हॅट नंबर नाही. तक्रारकर्तीने त्यांना दिलेल्या दागिन्याची मागणी .. 2 .. (तक्रार क्र.323/2008) नोंदविली त्या वेळेस स्वतःच दिलेले तिचे दागिने 23 कॅरटचे नव्हते. तिने त्यात नवीन सोन्याची भर टाकण्यास त्याला सांगितले. त्यामुळे 23C चे 3.65 ग्राम सोन्याची त्याने भर टाकली. तक्रारकरर्तिने दिलेले आधिचे सोने व त्याने भर टाकलेले सोने अशा एकत्रीत सोनयाचे कानातले बनवण्यात आले, त्यामुळे तक्रारीसोबत दाखल केलेला दाखला विचारात घेता येणार नाही. तीने 4.860gm + 4.100gm = 8.960gm वजनाच्या आधिच्या रिंग दिल्या होत्या. त्यात त्याने 3.65gm 23Cचे सोन्याची भर घातली त्यावेळी सोन्याचा भाव रु.8,800/- असा होता. भर घातलेल्या सोन्याचे रु.3,212/- व घडणावळ रु.1,388/-असे एकुण रु.4,600/-चे बिल तिला देण्यात आले. तिने सुरवातीला ज्यावळेस आपले जुने दागिने दिले होते त्यावेळेस सोबत त्यातील शुध्दतेबाबतचा कोणताही दाखला आणलेला नव्हता. दि.27/07/2007 रोजी तीने दुकानातुन दागिने आपल्या ताब्यात घेतले. रक्कम दि.17/05/2008 रोजी दिली. नउ महिन्याच्या विलंबानंतर तिने बिलातील रक्कम दिलेली आहे. त्यामुळे खर्चासह सदर खोटी तक्रार मंचाने खारीज करावी असे त्यांचे म्हणणे आहे. जबाबासोबत निशाणी 12 अन्वये वृत्तपत्रातील बातमी दाखल करण्यात आली. निशाणी 14 अन्वये तक्रारकर्तीने लेखी युक्तीवाद दाखल केला. निशाणी 17 अन्वये विरुध्द पक्षाने आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
3. मंचाने उभय पक्षांचे म्हणणे विचारात घेतले, तसेच त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले. त्याआधारे मंचाने खालील मुद्दे विचारात घेतले - 1.विरुध्द पक्ष तक्रारकर्तीला पुरविलेच्या सेवेतील त्रृटीसाठी जबाबदार आहे काय? उत्तर - होय. 2.तक्रारकर्ती विरुध्द पक्षाकडुन नुकसान भरपाई व न्यायिक खर्च मिळणेस पात्र आहे काय? उत्तर - होय. स्पष्टिकरण मुद्दा क्र.1 - मुद्दा क्र. 1 चे संदर्भात विचार केला असता असे स्पष्ट होते की, तक्रारकर्तीने तिच्या जवळील स्वतःची जुनी कुडी तसेच जुनी अंगठी विरुध्द पक्षाच्या दुकानात नेली या सोन्याच्या जुन्या दागिन्यातुन नवीन कनातले तयार करावे असे तिने सांगितले जुन्या दागिन्यामध्ये नवीन सोने टाकायचे व नविन दागिने तयार करायचे असे उभयतात ठरले. निशाणी 3(1) हे दि.27/08/2007 रोजीचे बिल असुन यात particulars या स्तंभात 23C KDM असा स्पष्ट उल्लेख आहे. याचाच अर्थ असा की तक्रारकर्तीला विरुध्द पक्षाने 23C KDM सोन्याचा दागिना बनवुन देण्याचे कबुल केले होते. दागिन्याचे वजन या बिलात नमुद आहे. जुन्या दागिन्यामध्ये विरुध्द पक्षाने भर टाकुन नविन दागिने घडवायचे असे ठरले होते. भर टाकलेल्या सोन्याची किंमत रु.8,800/- प्रमाणे आकारली जाणार होती. तसेच मजुरीची रक्कम जोडुन रु.4,600/- बिलाची रक्कम तक्रारकर्तीने त्याला दिली. मंचाच्या मते या बिलातील 23C KDM हा विरुध्द पक्षाने केलेला उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. नविन दागिना हा 23C .. 3 .. (तक्रार क्र.323/2008) KDMचा राहिल असे लेखी आश्वासन बिलातील या नोंदीवरुन मिळते. प्रत्यक्षात घेतल्याचे काही दिवसात कुडया काळ्या पडल्याने 'दि बॉम्बे बुलियन असोसिएशन लिमिटेडचा', या 1948 सालापासुन कार्यरत असणा-या मान्यताप्रात संस्थेकडुन सोन्याच्या कुडयांची तपासणी करण्यात आली. तपासणी अहवाल तक्रारीसोबत जोडलेला आहे मंचाच्या मते सदर अहवाल अमान्य करण्यासाठी कोणतेही समाधानकारक कारण विरुध्द पक्षाला मंचासमोर आणता आलेले नाही. त्यामुळे सदर पुरावा हा विश्वसनिय आहे असे या मंचाचे मत आहे. या सदरच्या अहवालात खालीलप्रमाणे उल्लेख आढळतो. Date - 20/06/2008 Customers name Jayshree Avinash Salve Sample Type Gold Ear Ring Operator Vaishali Element Mean Gold 77.43% Silver 11.56% Copper 10.41% Zinc 0.440% Cadmium 0.085% Nickel 0.67% उपरोक्त चाचणी अहवालाचा विचार केला असता असे स्पष्ट होते की दागिना हा 23C KDM नुसन 18C सोन्याचा आहे. मंचाच्या मते विरुध्द पक्षाने 23C KDMचा दागिना देण्यात येईल अशी लेखी नोंद केली परंतु प्रत्यक्षात 23C नसुन 18C चे असल्याने अनुचीत व्यापार प्रथा ठरते. विरुध्द पक्षाने कबुल केल्यानुसार तक्रारकर्त्याला अपेक्षित सेवा दिली नसल्याने ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1)(ग) अन्वये सदोष सेवेसाठी जबाबदार ठरतो. सबब 23C ऐवजी 18C दागिने तक्रारकर्त्यास दिल्याचे निश्चित झाल्याने आजच्या बाजारभावानुसार वादग्रस्त दागिन्याच्या एकुण वजनाचा विचार करुन 23C सोन्याचा भाव व 18C सोन्याचा भाव यातील फरकाची रक्कम विरुध्द पक्षानी तक्रारकर्तीला देणे आवश्यक आहे असे मंचाचे मत आहे. स्पष्टिकरण मुद्दा क्र. 2- मुद्दा क्र. 2 संबंधि विचार केला असता असे स्पष्ट होते की लेखी आश्वासनानुसार 23C सोन्याचे दागिने न देता विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस 18C चे दागिने दिले या त्याच्या कृतीमुळे तक्रारकर्तीचा अपेक्षा भंग झाला व तीला मनस्ताप सहन करावा लागला तसेच तीच्या मागणीची योग्य दखल विरुध्द पक्षाने न घेतल्याने तिला मंचात तक्रार दाखल करणे भाग पडले. सबब, न्यायाचे दृष्टिने विरुध्द पक्षाकडुन मानसिक त्रासासाठी नुकसान भरपाई रु.3,000/- व न्यायिक खर्च रु,2,000/- तक्रारकर्ती मिळणेस पात्र आहे.
... 4 ... (तक्रार क्र.323/2008) 4. सबब आदेशा पारित करण्यात येतो की- आदेश 1.तक्रार क्र. 323/2008 मंजूर करण्यात येते. 2.आदेश पारित तारखेच्या 2 महिन्याचे आत विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस खालीलप्रमाणे रक्कम द्यावी. अ)आजच्या बाजारभावानुसार वादग्रस्त दागिन्याचे वजनाचा विचार करुन 23C सोन्याचे भाव व 18 C सोन्याचा भाव याचा हिशोब करुन येणारी फरकाची रक्कम तक्रारकर्तीस देण्यात यावी. ब) मानसिक त्रासासाठी रक्कम रु.3,000/-(रु. तीन हजार फक्त) द्यावे. क) न्यायिक खर्चाचे रक्कम रु.2,000/- (रु. दोन हजार फक्त) द्यावे. 3.विहित मुदतीत आदेशाचे पालन विरुध्द पक्षाने न केल्यास उपरोक्त संपुर्ण रक्कम आदेश तारखेपासुन ते प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे 12% व्याजासह तक्रारकर्ती वसुल करण्यास पात्र राहिल.
दिनांक – 06/04/2011 ठिकाण – ठाणे (ज्योती अय्यर) (एम.जी.रहाटगावकर ) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
| [HONABLE MRS. Jyoti Iyyer] MEMBER[HONABLE MR. M.G. RAHATGAONKAR] PRESIDENT | |