Maharashtra

Nagpur

CC/24/2020

MANOJ ANANDBIHARI JHA - Complainant(s)

Versus

NAGPUR JILHA MAHSUL TRUTIYA SHARENI KARMACHARI SANGHATANA, NAGPUR, THROUGH PRESIDENT - Opp.Party(s)

ADV. ARVIND DUBEY

23 Nov 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/24/2020
( Date of Filing : 15 Jan 2020 )
 
1. MANOJ ANANDBIHARI JHA
R/O. PLOT NO.61, MATOSHRI NAGAR, BABADE LAYOUT, WANADONGRI, HINGNA ROAD, NAGPUR-441110
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. NAGPUR JILHA MAHSUL TRUTIYA SHARENI KARMACHARI SANGHATANA, NAGPUR, THROUGH PRESIDENT
COLLECTOR OFFICE PREMISES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. NAGPUR JILHA MAHSUL TRUTIYA SHARENI KARMACHARI SANGHATANA, NAGPUR, THROUGH SECRETARY
COLLECTOR OFFICE PREMISES, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ARVIND DUBEY, Advocate for the Complainant 1
 ADV. PRASAD DESHPANDE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 23 Nov 2022
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍याने दिनांक 31.10.2018 रोजी  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या पार्किंगमध्‍ये दुचाकी वाहन (Splendor Pro Hero Bike)  स्‍पेलेंडर प्रो. हिरो बाईक   वाहन क्रं. MH-40-AE-1265 हे उभे केले होते व त्‍याकरिता वि.प.ने रुपये 5/- शुल्‍क स्‍वीकारुन पावती क्रं. 6917 दिली होती आणि सदरच्‍या वाहनाला हॅन्‍डल लॉक करण्‍यास मनाई केली होती. तक्रारकर्त्‍याने जिल्‍हाधिकारी कार्यालयातील आपले काम आटोपल्‍यानंतर वाहन घेण्‍यास गेला असता त्‍या ठिकाणी आपले वाहन नसल्‍याचे आढळल्‍यामुळे त्‍याने पार्किंग व्‍यवस्‍थपकाशी संपर्क साधला असता त्‍यांनी वाहनाचे आर.सी.बुक, लायसन्‍स, इन्‍श्‍युरन्‍स कागदपत्र इत्‍यादी दस्‍तावेज आणण्‍यास सांगितले व वाहन चोरी गेल्‍याबाबतची पोलिस स्‍टेशनला तक्रार नोंदविण्‍याचे सुचविले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याने सदर येथील पोलिस स्‍टेशनला आय.पी.सी.च्‍या कलम 379 अंतर्गत  वाहन चोरी गेल्‍याची दि. 01.11.2018 ला तक्रार नोंदविली.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याच्‍या जवळ एकच वाहन होते व त्‍याची  अंदाजे किंमत रुपये 40,000/-  असून वाहन चोरी गेल्‍यामुळे त्‍याला बाहेरील कामे करण्‍यास अतिश्‍य मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 10.06.2019 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍यावर विरुध्‍द पक्षाने दि. 03.07.2019 रोजी आपले उत्‍तर पाठविले होते. परंतु आजतागायत तक्रारकर्त्‍याला त्‍याचे वाहन परत मिळालेले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने सेवेत त्रुटी केले असल्‍याचे घोषित करावे. तसेच वि.प. 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला वाहनाची किंमत रुपये 40,000/- द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील बहुतांश परिच्‍छेद निहाय कथन नाकारलेले असून आपल्‍या विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडे पार्किंग मध्‍ये दि. 31.10.2018 रोजी वाहन उभे केलेले नाही. तक्रारकर्त्‍याने ति-हाईत व्‍यक्‍तीस पाठवून संगनमताने स्‍वतःच सदरचे वाहन चोरी केलेले आहे.  जिल्‍हाधिकारी कार्यालयात बहुतांश लोकांचे  येणे जाणे सुरु असते.  तक्रारकर्त्‍याचे वाहन चोरीला गेली असल्‍याची एफ.आय.आर.  सदर पोलिस स्‍टेशनला नोंदविल्‍याची बाब मान्‍य असून तक्रारकर्त्‍याने आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड कडून दि. 02.11.2018 रोजी सदरच्‍या वाहनाचा विमा काढलेला असल्‍यामुळे वाहन तक्रारकर्त्‍याकडेच आहे व तो विरुध्‍द पक्षाकडून पैसे उकळण्‍याकरिता खोटे आरोप करीत आहे.

 

  1.       विरुध्‍द पक्षाने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने केवळ रुपये 5/- देऊन वाहन पार्क केले होते व सदरचे वाहन उभे करण्‍याकरिता केवळ जागा दिली होती असून जिल्‍हाधिकारी कार्यालयातील पार्किंगची जागा ही कमर्शिअल नसून  No Profit and No Loss या आधारावर चालवित असून त्‍यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचा विमा उतरविलेला नव्‍हता.  तक्रारकर्त्‍याने वाहन चोरीला गेल्‍याची तक्रार केली असता त.क.च्‍या नांवे असलेल्‍या वाहनाच्‍या कागदपत्रांची मा‍गणी केली, त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने सदरची कागदपत्रे वाहनात ठेवलेली असल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाचे आर.सी.बुक बघितले असता त्‍याने सदरचे वाहन हे सन 2013 मध्‍ये खरेदी केले असल्‍यामुळे सन 2019 मध्‍ये वाहनाची किंमत रुपये 10,000/- पेक्षा जास्‍त नाही. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याला त्‍याच्‍या मागणीप्रमाणे वाहनाची किंमत व मानसिक, शारीरिक त्रासाची रक्‍कम देण्‍यास असमर्थ असून ही रक्‍कम देण्‍यास जबाबदार नाही. म्‍हणून सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.  

 

  1.      उभय पक्षाने दाखल केलेले दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केल्‍यावर आयोगाने निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

 

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?            होय  

  1. ?   होय
    1. ?                             अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने  दिनांक 31.10.2018 रोजी  जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या पार्किंगमध्‍ये दुचाकी वाहन Splendor Pro Hero Bike  वाहन क्रं. MH-40-AE-1265 करिता विरुध्‍द पक्षाला रुपये 5/- शुल्‍क देऊन पावती क्रं. 6917 स्‍वीकारुन वाहन उभे केले होते याबाबत उभय पक्षात वाद नाही व यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्त्‍याने  वाहन चोरीला गेली असल्‍याची एफ.आय.आर. सदर पोलिस स्‍टेशनला दि. 01.11.2018 रोजी  नोंदविली होती. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 5/- देऊन वाहन पार्क केले होते  हे दाखल पावतीवरुन दिसून येते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे वाहन सुरक्षित ठेवण्‍याची विरुध्‍द पक्षाची जबाबदारी होती. तक्रारकर्त्‍याच्‍या आर.सी.बुक वरुन सदरचे वाहन हे सन 2013 मध्‍ये खरेदी केले असल्‍याचे दिसून येते. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात मान्‍य केले आहे की, सन 2019 मध्‍ये त.क.च्‍या वाहनाची किंमत रुपये 10,000/- आहे. त्‍यामुळे विरुध्‍द पक्षाच्‍या कथना प्रमाणेच तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाकडून वाहनाची किंमत रुपये 10,000/- मिळण्‍यास पात्र आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनाची सुरक्षा योग्‍य प्रकारे केली नसल्‍याने त्‍याचे वाहन चोरीला गेल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला नाहक शारीरिक, मानसिक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावा लागला म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला वाहनाची किंमत रुपये 10,000/-  द्यावी.
  3. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 1,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 1,000/-द्यावे.
  4. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  5. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.