Maharashtra

Nagpur

CC/10/383

Shri Anil Ramrao Shinde - Complainant(s)

Versus

Nagmitra Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit - Opp.Party(s)

POA Shri Askar

25 Oct 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/383
1. Shri Anil Ramrao ShindeNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Nagmitra Nagari Sahakari Pat Sanstha MaryaditNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 25 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 25/10/2010)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दिनांक 14.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार पतसंस्‍था पंजीकृत व जूनी असल्‍यामुळे त्‍याने रु.20,000/- एक वर्षांचे मुदतीकरीता जमा केल्‍याचे नमुद केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याचे वैशाली जनरल स्‍टोअर्स या नावाने दुकान असुन गैरअर्जदारांचे प्रतिनिधी दरोरोज वसूलीसाठी येत असतो म्‍हणून दि.18.04.2009 रोजी रु.100/- बचत खाते क्र.एन/14805 चालू केले व त्‍यात नियमीतपणे दि.25.09.2009 पर्यंत रु.16,300/- जमा केलेले आहे. तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, परिपक्‍वता तिथीनंतरही गैरअर्जदार बचत ठेवीची रक्‍कम देत नसुन संस्‍थेने आर्थीक व्‍यवहार बंद असुन अध्‍यक्ष, लालेंद्र मेहरकूटे फरार आहेत. तसेच सदर सेस्‍थेवर सहकार विभागाने श्री. जयंत तलमले यांची प्रशासक म्‍हणून नियूक्‍ती केलेली आहे.
 
3.          तक्रारकर्त्‍याने पुढे नमुद केले आहे की, त्‍याने संस्‍थेचे अध्‍यक्ष, श्री मेहरकुटे यांना प्रशासकांमार्फत दि.07.05.2009 रोजी नोटीस पाठविण्‍यांत आली, परंतु त्‍यांनी सदर नोटीसला कोणतेच उत्‍तर दिलेले नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल केलेली असून सावधीजमा योजनेत जमा केलेल्‍या रु.20,000/- व बचत खाते क्र.एन/14805 मध्‍ये जमा असलेल्‍या रु.16,300/- ची 18% व्‍याजासह मागणी केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने त्‍याचा विश्‍वासघात केल्‍यामुळे त्‍याचे स्‍वास्‍थ बिघडले व दुकान बंद ठेवावे लागले व त्‍यामुळे त्‍याला मानसिक त्रास सहन करावा लागला म्‍हणून त्‍याबद्दल रु.2,500/- व तक्रारीच्‍या खचाबद्दल रु.700/- ची मागणी केलेली आहे.
 
4.          प्रस्‍तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्‍यांत आली असता, सदर नोटीस ‘Intimation’, या शे-यासह परत आल्‍यानंतर मंचाने दि.28.09.2010 रोजी प्रकरण गैरअर्जदारा विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला.
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.15.10.2010 रोजी आली असता तक्रारकर्त्‍याचे प्रतिनिधी हजर. मंचाने तक्रारीत दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
-// नि ष्‍क र्ष //-
 
6.          तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार संस्‍थेत रु.20,000/- दि. 01.12.2008 ते 01.12.2009 या कालावधीकरीता 13% व्‍याजासह मुदत ठेवीत ठेवले होते व त्‍याची परिपक्‍वता रु.22,600/- होती, ही बाब तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेज क्र.1 वरुन स्‍प्‍ष्‍ट होते. तसेच तक्रारकर्त्‍याने दैनिक बचत खाते क्र.एन/14805 मधे प्रतिदीन रु.100/- प्रमाणे दि.25.09.2009 पर्यंत एकूण रु.16,300/- जमा केल्‍याची बाब त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तावेज क्र.2 वरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदाराचा सेवाधारक/ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
 
7.          प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराने त्‍याचा विश्‍वासघात केल्‍यामुळे त्‍याचे स्‍वास्‍थ बिघडले व दुकान बंद ठेवावे लागले व त्‍यामुळे त्‍याला मानसिक त्रास सहन करावा लागला म्‍हणून त्‍याबद्दल रु.2,500/- व तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रु.700/- ची मागणी केलेली आहे. आम्‍ही तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार व दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्त्‍याने केलेली मागणी योग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
8.          मंचामार्फत गैरअर्जदाराला नोटीस बजावली असता सदर नोटीस ‘Intimation’, या शे-यासह परत आल्‍यानंतर मंचाने दि.29.09.2010 रोजी प्रकरणी गैरअर्जदारा विरुध्‍द आदेश करुन प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला. तसेच सदर नोटीसची प्रत व लिफाफा तक्रारीसोबत दाखल आहे. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार सत्‍य प्रतिज्ञेवर दाखल केलेली असुन त्‍या सोबत दस्‍तावेजपण दाखल केलेले आहेत. आम्‍ही सदर दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता वरील निष्‍कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत .
 
            -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदाराने तक्रारकर्त्‍यास सेवेत त्रुटी दिल्‍याचे घोषीत करण्‍यांत येते.
3.    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला मुदत ठेवींची       परिपक्‍वता रक्‍कम रु.22,600/- दि.01.12.2009 पासुन द.सा.द.शे. 13%     व्‍याजासह तसेच तक्रारकर्त्‍याने दैनिक बचत खाते क्र.एन/14805 मधे प्रतिदीन रु.100/- प्रमाणे दि.25.09.2009 पर्यंत जमा केलेली रक्‍कम रु.16,300/-       द.सा.द.शे.3% व्‍याजासह अदा करावे.
4.    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या मानसिक त्रासाबद्दल रु.2,500/- व तक्रारीच्‍या खर्चाचे रु.700/- अदा करावे.
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे  दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT