Maharashtra

Nagpur

CC/10/385

Sau. Karan Dipakrao Joshi - Complainant(s)

Versus

Nagmitra Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit - Opp.Party(s)

Shri Askar

25 Oct 2010

ORDER


DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR.District Consumer Forum, 5th Floor, New Administrative Building, Civil Lines, Nagpur-440 001
Complaint Case No. CC/10/385
1. Sau. Karan Dipakrao JoshiNagpur ...........Appellant(s)

Versus.
1. Nagmitra Nagari Sahakari Pat Sanstha MaryaditNagpur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 25 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 25/10/2010)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दिनांक 14.06.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          प्रस्‍तुत तक्रारीत तक्रारकर्तीने गैरअर्जदार पतसंस्‍था पंजीकृत व जूनी असल्‍यामुळे तिने संस्‍थेच्‍या एजंट सौ. सरिता उमेकर (कोड क्र. एन.145) मार्फत दरमहा रु.250/- चे एक आर.डी.खाते क्र.7257 दि.18.10.2008 रोजी चालू केले होते. सदर खात्‍याची परिपक्‍वता दि.18.10.2009 असुन त्‍यामध्‍ये दि.22.09.2009 पर्यंत रु.3,000/- भरल्‍याची संस्‍थेची नोंद आहे. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, संस्‍थेचे आर्थीक व्‍यवहार बंद असुन अध्‍यक्ष, लालेंद्र मेहरकूटे फरार आहेत. तसेच सदर संस्‍थेवर सहकार विभागाने श्री. जयंत तलमले यांची प्रशासक म्‍हणून नियूक्‍ती केलेली आहे.
 
3.          तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, तिने संस्‍थेचे अध्‍यक्ष, श्री मेहरकुटे यांना प्रशासकांमार्फत दि.11.03.2009 रोजी नोटीस पाठविण्‍यांत आली, परंतु त्‍यांनी सदर नोटीसला कोणतेच उत्‍तर दिलेले नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार मंचात दाखल केलेली असून आर.डी.खाते क्र.7257 मध्‍ये जमा असलेल्‍या रु.3,000/- ची 18% व्‍याजासह मागणी केलेली आहे. तसेच तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने तिचा विश्‍वासघात केल्‍यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला म्‍हणून त्‍याबद्दल रु.1,500/- व तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रु.700/- ची मागणी केलेली आहे.
 
4.          प्रस्‍तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्‍यांत आली असता, सदर नोटीस ‘Intimation’, या शे-यासह परत आल्‍यानंतर मंचाने दि.28.09.2010 रोजी प्रकरण गैरअर्जदारा विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला.
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.15.10.2010 रोजी आली असता तक्रारकर्तीचे प्रतिनिधी हजर. मंचाने तक्रारीत दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
      -// नि ष्‍क र्ष //-
 
6.          तक्रारकर्तीने गैरअर्जदार संस्‍थेच्‍या एजंट सौ. सरिता उमेकर (कोड क्र. एन.145) मार्फत दरमहा रु.250/- चे एक आर.डी.खाते क्र.7257 दि.18.10.2008 रोजी चालू केले होते. सदर खात्‍याची परिपक्‍वता दि.18.10.2009 असुन त्‍यामध्‍ये दि.22.09.2009 पर्यंत रु.3,000/- भरल्‍याची संस्‍थेची नोंद आहे ही बाब तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेज क्र.2 वरुन स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारकर्ती गैरअर्जदाराची सेवाधारक/ग्राहक ठरते असे मंचाचे मत आहे.
 
7.          प्रस्‍तुत तक्रारीत गैरअर्जदाराने तक्रारकर्तीचा विश्‍वासघात केल्‍यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागला म्‍हणून त्‍याबद्दल रु.1,500/- व तक्रारीच्‍या खर्चाबद्दल रु.700/- ची मागणी केलेली आहे. आम्‍ही तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार व दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता तक्रारकर्ती मानसिक त्रासाकरीता रु.500/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.500/- मिळण्‍यांस पात्र असल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
8.          मंचामार्फत गैरअर्जदाराला नोटीस बजावली असता सदर नोटीस ‘Intimation’, या शे-यासह परत आल्‍यानंतर मंचाने दि.28.09.2010 रोजी प्रकरणी गैरअर्जदारा विरुध्‍द आदेश करुन प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केला. तसेच सदर नोटीसची प्रत व लिफाफा तक्रारीसोबत दाखल आहे. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार सत्‍य प्रतिज्ञेवर दाखल केलेली असुन त्‍या सोबत दस्‍तावेजपण दाखल केलेले आहेत. आम्‍ही सदर दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता वरील निष्‍कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत .
 
            -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस सेवेत त्रुटी दिल्‍याचे घोषीत करण्‍यांत येते.
3.    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला आर.डी.खाते क्र.7257       मधील जमा रक्‍कम रु.3,000/- दि.18.10.2008 रोजी पासुन रक्‍कम अदा होई      पर्यंत द.सा.द.शे. 6%       व्‍याजासह अदा करावे.
4.    गैरअर्जदाराला आदेश देण्‍यांत येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक  त्रासाबद्दल रु.500/- व तक्रारीच्‍या खर्चाचे रु.500/- अदा करावे.
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे  दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT