Maharashtra

Nagpur

CC/329/2019

SMT RANJANA KRUSHNANAND SWAMI - Complainant(s)

Versus

N.S.N ENTERPRIZES THROUGH PROP. SHRI NARAYAN NEBHANDAS JESWANI - Opp.Party(s)

ADV UDAY KSHIRSAGAR

03 Sep 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/329/2019
( Date of Filing : 13 Jun 2019 )
 
1. SMT RANJANA KRUSHNANAND SWAMI
NARI ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. N.S.N ENTERPRIZES THROUGH PROP. SHRI NARAYAN NEBHANDAS JESWANI
453C, BEHIND SHAKTI KIRANA , CARNALBAG OPP MODEL MILL CLOSED GATE, GANESHPETH NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV UDAY KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 Adv. Sandeep Pande, Advocate for the Opp. Party 1
Dated : 03 Sep 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हा पेपर प्‍लेटस / पत्रावळी  बनविण्‍याचे यंत्र व त्‍याकरिता लागणारा कच्‍चा माल इत्‍यादी पुरविण्‍याचा व्‍यवसाय करतो. तक्रारकर्तीने स्‍वयंरोजगार करण्‍याकरिता पंजाब नॅशनल बॅंक , शाखा-  नारी रोड, नागपूर येथून रुपये 1,00,000/- चे मुद्रा लोन घेतले व विरुध्‍द पक्षाकडून  विरुध्‍द पक्षाकडून पत्रावळी / पेपर प्‍लेटस बनविण्‍याचे यंत्र व त्‍याकरिता लागणारा कच्‍चा माल इत्‍यादी खरेदी केला. विरुध्‍द पक्षाने सदर यंत्राद्वारे दर दिवशी 10,000 ते 12,000 पत्रावळी बनतील असे आश्‍वासन  तक्रारकर्तीला दिले होते. विरुध्‍द पक्षाने त्‍याकरिता सदर यंत्राची किंमत रुपये 75,000/-, हायड्रोलिक ऑईल रुपये 3500/- , पत्रावळी डाय रुपये 9000/-,  कच्‍चा माल रुपये 13,750/- असे रुपये 1,01,250/- चे कोटेशन दिले होते. तसेच तक्रारकर्तीने या यंत्राद्वारे दररोज 10,000 पत्रावळी तयार केल्‍यास त्‍यांना त्‍यापासून रुपये 700/- रोजचा फायदा होईल असे सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 11.01.2019 रोजी पंजाब नॅशनल बॅंक , मानकापूर शाखा, नागपूर यांच्‍या द्वारे रुपये 1,00,000/-कर्ज घेऊन वि.प.कडून सदरचे यंत्र विकत घेतले.

 

  1.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिने वि.प.कडून सदरचे यंत्र खरेदी केल्‍यापासून सदरची मशीन विरुध्‍द पक्षाने सांगितलेल्‍या क्षमतेपेक्षा कमी उत्‍पादन करीत होती. सदरची मशीन केवळ 1000 प्‍लेटस दररोज बनविते त्‍यामुळे तक्रारकर्तीला रोज केवळ रुपये 70/- चा नफा होत आहे. या रक्‍कमेत बॅंकेचे व्‍याज ही निघत नाही अशी परिस्थिती आहे. त.क.ने वि.प.कडे याबाबत वारंवांर तोंडी तक्रार केली. परंतु त्‍याचा काहीही उपयोग न झाल्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 11.05.2019 रोजी वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली.  वि.प.ने त्‍यावर उत्‍तर सादर केले की, त्‍यांनी केवळ 1000 ते 1200 प्‍लेटस एका दिवशी तयार होतील असेच सांगितले होते. त.क. ही बेरोजगार होती व स्‍वयंरोजगाराकरिता तिने सदरची मशीन खरेदी केली होती. ज्‍या उद्देशाने त.क.ने विरुध्‍द पक्षाकडून सदरची मशीन खरेदी केली तो उद्देशच विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या खोटया आश्‍वासनामुळे पूर्ण होऊ शकला नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून पेपर प्‍लेटस बनविण्‍याची मशीन परत घेऊन त्‍यापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 1,01,250/- मशीन खरेदी केल्‍याच्‍या दिनांकापासून म्‍हणजेच दि. 15.01.2019 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा अशी विनंती केली आहे.
  2.      विरुध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी जबाबात नमूद केले की, तक्रारकर्तीने मुद्रा लोन हे व्‍यापारी व्‍यवसायाकरिता घेतले होते. त्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 2 (1) (डी) (i) प्रमाणे ग्राहक या संज्ञेत येत नाही.  तक्रारकर्तीने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाप्रमाणे तीने बॅंक ऑफ इंडिया, मानकापूर येथील शाखेतून कर्ज घेतले असल्‍याचे दिसून येते. मुद्रा लोन हे सरकारने स्‍वयंरोजगाराकरिता नसून ते व्‍यापारी कारणास्‍तव देण्‍यात येणारे कर्ज आहे. तक्रारकर्तीने बॅंक ऑफ इंडिया मानकापूर शाखेला जाणूनबुजून पक्षकार केलेले नाही. बॅंकेला पक्षकार बनविले असते तर त्‍यांनी मुद्रा लोन हे स्‍वयंरोजगाराकरिता नसून व्‍यापारी कर्ज असल्‍याचे सांगितले असते. जर तक्रारकर्तीने PRIME MINISTER ROJGAR YOJANA (PMRY LOAN) अंतर्गत कर्ज घेतले असते तर ते स्‍वयंरोजगाराकरिता घेणारे कर्ज असते. त्‍यामुळे तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍द पक्षाने सदरची मशीन या व्‍यतिरिक्‍त पुष्‍कळ ग्राहकांना विकलेली आहे. ते सर्व ग्राहक 1000 ते 1500 पेपर प्‍लेटस प्रति तासाप्रमाणे तयार करतात. त्‍यामुळे या मशीनचे सुध्‍दा 1000 ते 1500 पेपर प्‍लेटस बनविण्‍याची क्षमता आहे व त्‍यानुसार तक्रारकर्ती रुपये 1000/- प्रमाणे मिळवू शकते. त्‍याकरिता विरुध्‍द पक्षाने दस्‍तावेज क्रं. 5 वर त्‍यांच्‍या ग्राहकांची यादी जोडलेली आहे. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्ती ही बॅंके सोबत तसेच विरुध्‍द पक्षा सोबत धोका करीत आहे. तक्रारकर्तीस व्‍यवसाय करणे शक्‍य झाले नाही, त्‍याकरिता ती विरुध्‍द पक्षाला जबाबदार ठरवित आहे. तसेच बॅंके तर्फे घेतलेले कर्जाचे हप्‍ते सुध्‍दा ती नियमितपणे भरीत नाही. तक्रारकर्तीला बॅंकेच्‍या कर्जाची परतफेड करावयाची नसल्‍यामुळे तक्रारकर्तीने सदरचे कारण दाखवित आहे. करिता विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीने लावलेल्‍या आक्षेपास जबाबदार नसल्‍याने तो तक्रारकर्तीला कुठलीही नुकसानभरपाई देण्‍यास जबाबदार नाही.

 

  1.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, लेखी युक्तिवाद व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद, तसेच विरुध्‍द पक्षाचे लेखी जबाबाचे वाचन केल्‍यावर खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

 

  1.     मुद्दे                                                                         उत्‍तर  

1 तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                 होय.

2. विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केली काय?      होय

3. काय आदेश ?                                    अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्तीने  विरुध्‍द पक्षाकडून पेपर प्‍लेटस / पत्रावळी बनविण्‍याची मशीन खरेदीकरिता पंजाब नॅशनल बॅंक, शाखा – मानकापूर, नागपूर येथून रुपये 1,00,000/- चे मुद्रा लोन  घेतले असल्‍याचे नि.क्रं. 2 (1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. तसेच पत्रावळी/पेपर प्‍लेटस बनविण्‍याचे यंत्र व त्‍याकरिता लागणारा कच्‍चा माल इत्‍यादी वस्‍तूर विरुध्‍द पक्षाकडून खरे केले असल्‍याचे नि.क्रं. 2(2) वर दाखल पावतीवरुन स्‍पष्‍ट होते. सदर यंत्राद्वारे दर दिवशी 10,000 ते 12000 पत्रावळी बनतील असे एन.एस.एन. इन्‍टरप्रायजेस या कंपनीचे जाहिरात पत्रक नि.क्रं. 2(3) वर दाखल आहे व त्‍यासंबंधी दैनंदिन बनविण्‍यात येणा-या पत्रावळया संबंधीचे हिशोबाचे दिलेले दस्‍तावेज पान क्रं. 12 वर  दाखल केलेले आहे व त्‍यात प्रति दिवस 10000-12000 पत्रावळया बनतील व त्‍यानुसार ग्राहकाला दररोज रुपये 700/- प्रमाणे नफा होईल. सदर नफयातून इलेक्‍ट्रीक, पन्‍नी, व बोरी इत्‍यादीचा खर्च रुपये 260/- वजा करता ग्राहकास रुपये 440/- प्रमाणे नफा मिळेल असे अंदाजाचे दस्‍तावेज दिलेले असल्‍याचे दिसून येते.
  2.      तक्रारकर्तीने वि.प.कडून सदरचे यंत्र खरेदी केल्‍यापासून सदरची मशीन क्षमतेपेक्षा कमी उत्‍पादन करीत होती व  केवळ 1000 प्‍लेटस दररोज बनत असल्‍याचे बाबतची तोंडी तक्रार करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 11.05.2019 रोजी वि.प.ला कायदेशीर नोटीस पाठविली.  परंतु विरुध्‍द पक्षाने त्‍यावर समाधानकारक उत्‍तर दिले नाही. तसेच तक्रारकर्तीने ज्‍या उद्देशाने विरुध्‍द पक्षाकडून सदरची मशीन खरेदी केली तो उद्देशच विरुध्‍द पक्षाच्‍या खोटया आश्‍वासनामुळे पूर्ण होऊ शकला नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून सदरच्‍या यंत्राची रक्‍कम परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. 

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीकडून पत्रावळी बनविण्‍याची मशीन परत घेऊन  तक्रारकर्तीला मशिन खरेदी रक्‍कम रुपये 87,500/- व त्‍यावर दिनांक 15.01.2019 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत  द.सा.द.शे. 12 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला अदा करावी.

 

  1.  विरुध्‍द पक्ष तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक करिता नुकसान भरपाई म्‍हणून 15,000/- व तक्रारीचा खर्च प्रत्‍यकी रुपये 5,000/- द्यावे.

 

  1.  उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1.  उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.