आदेश (पारीत दिनांक : 07.07.2011) मा.अध्यक्ष श्री रामलाल भ.सोमाणी यांचे कथनानुसार ग्रा.सं.कायदा कलम 12 अंतर्गत तक्रारकर्त्याचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे : 1. तक्रारकर्ता यांची जळगाव, ता.आर्वी, जिल्हा वर्धा येथे शेती आहे व त.क. आजुबाजूच्या शेतक-यांची शेती सुध्दा मक्त्याने करतात तर यातील वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता आहेत व वि.प.क्रं-2 हे स्थानिक बियाणे विक्रेता आहेत. तक्रारकर्त्याची मुख्य तक्रार ही वि.प.क्रं-1 निर्मित टीएजी-24 या शेंगदाणा बियाण्याच्या दोषा संबधीची आहे. CC/25/2011 2. तक्रारकर्ते यांनी, वि.प.क्रं-1 निर्मित व वि.प.क्रं-2 विक्रेता यांचे कडून विकत घेतलेल्या बियाण्याचा तपशिल खालील प्रमाणे विकत घेतलेले बियाणे | लॉट क्रमांक | प्रतीबॅग वजन 20 किलो, दर प्रत्येकी रुपये 1400/- प्रमाणे विकत घेतलेल्या बॅग्स | बिल क्रमांक व दिनांक | बिलावर विकत घेणा-याचे नाव | बिलाची एकूण रक्कम | शेरा | शेंगदाणा टीएजी-24 | 45420 | एकूण-06 बॅग | बिल क्रं-118/ दि.23/01/2009 | नारायणराव ईखार, रा.जळगाव | 8400/- नगदी | |
3. तक्रारकर्ते यांचे असेही म्हणणे आहे की, यातील 03 बॅग बियाणे श्री नारायणराव ईखार व 03 बॅग बियाणे तक्रारकर्ते यांनी स्वतःसाठी सन-2009-10 या कृषी हंगामासाठी विकत घेतले होते. त.क.यांचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी विकत घेतलेले सदर शेंगदाणा बियाणे हे त्यांचे मामा श्री रामकृष्ण बाजीराव सोनुने यांचे शेत सर्व्हे क्रं-120, आराजी 0.48 हे.आर. मध्ये चांगली मशागत करुन पेरले. सदर्हू शेती ते ब-याच वर्षा पासून पाहत असून त्यात पिके घेत आहेत. मशागती पूर्वी त्यांनी सदर्हू शेतामध्ये शेणखत टाकून नांगरणी वखरणी केली आणि त्यानंतर पेरणी केली, पेरणीसाठी त्यांना प्रतीएकर रुपये-1400/- खर्च आला. पेरणी करते वेळी 2 बॅग डी.ए.पी. व 2 बॅग सुपर फॉस्फेट खताच्या मात्रा दिल्यात, त्यासाठी रुपये-1000/- खर्च आला व किटकनाशकाचे फवारणी करीता रुपये-3000/- खर्च आला.सदर शेतात त.क.यांनी दिनांक-16/02/2009 रोजी 0.40 हेक्टर आर शेतात 03 किलो बॅग बियाण्याची पेरणी केली. तृषार सिंचनाद्वारे शेतात पाणी पुरवठा केला. 4. पेरणी नंतर शेंगदाण्याचे झाडांची उत्तम वाढ झाली होती मात्र तीन महिन्याचा कालावधी उलटून गेल्या नंतर सुध्दा झाडांना शेंगा आलेल्या नव्हत्या व थोडयाफार ज्या काही शेंगा आल्या होत्या त्यात शेंगदाणा नव्हता. त्यामुळे त.क.यांनी पेरलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे होते. 5. त.क.यांनी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दि.07/05/2009 रोजी तक्रार केली असता, तक्रारीचे अनुषंगाने दिनांक-23/05/2009 रोजी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने सदर शेताची पाहणी केली असला, समितीस सदर्हू टीएजी-24 शेंगदाण्या बियाणे हे मिश्रीत वाण असून त्यामुळे शेंगदाणा झाडांना शेंगा आल्या नाहीत असे निर्दशनास आले आणि त्यावरुन जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने तसा अहवाल तक्रारकर्ता यांना दिला. अशाप्रकारे निकृष्ट दर्जाच्या बियाण्याची विक्री करुन उभय वि.प.नीं त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिली. 6. शेंगदाणा बियाण्याची मळणी केल्या नंतर केवळ 1.5क्विंटल उत्पादन झाले. मळणी करीता रुपये-2000/- खर्च आला. त.क.यांना यापूर्वी प्रतीएकर 20 क्विंटल शेंगदाणा उत्पादन मिळत होते. या सर्व प्रकारामुळे त.क.यांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास CC/25/2011 सहन करावा लागला. त.क.यांचे अपेक्षीत 18.5 क्विंटलचे नुकसान झाले. प्रतीक्विंटल दर रुपये-2500/-ते रुपये-3000/- दरा प्रमाणे एकूण रुपये-46,250/- नुकसान झाले. म्हणून त.क.यांनी उभय वि.प.नां वकिलाचे मार्फतीने दि.-31.08.2009 रोजीची रजिस्टर पोस्टाद्वारे नोटीस दिली असता, त्यावर उभय वि.प.नीं कोणतीही कार्यवाही केली नाही वा उत्तरही दिले नाही. त.क.यांचे अपेक्षीत उत्पन्नापोटी झालेले नुकसान रुपये-46,250/- अधिक पेरणीसाठी झालेला खर्च रुपये-10,000/- अधिक मानसिक शारिरीक त्रास रुपये-20,000/-, नोटीसखर्च रुपये-1500/- व तक्रारखर्च रुपये-5000/- असे मिळून एकूण रुपये-72,750/- एवढया नुकसान भरपाईची मागणी त.क.प्रस्तुत तक्रारीद्वारे करीत आहे. 7. म्हणून शेवटी तक्रारकर्ता यांनी वि.जिल्हा न्यायमंचा समक्ष प्रस्तुत तक्रार दाखल करुन उभय वि.प.विरुध्द खालील प्रकारे मागण्या केल्यात 1) वि.प.क्रं 1 व 2 यांनी, त.क.यांना दोषपूर्ण सेवा दिल्याचे जाहिर करण्यात यावे. 2) उभय वि.प.कडून वैयक्तिक आणि संयुक्तिक स्वरुपात त.क.यांना रुपये-76,750/- एवढी नुकसान भरपाई आणि त्यावर तक्रार दाखल दिनांका पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 12 टक्के प्रमाणे व्याज यासह रक्कम देण्याचे आदेशित व्हावे. 3) या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्ता यांचे बाजूने मिळावी. इत्यादी स्वरुपाच्या मागण्या तक्रारअर्जात केल्यात. 8. प्रस्तुत प्रकरणात उभय विरुध्दपक्षांना जिल्हा न्यायमंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीसेस पाठविण्यात आल्यात. 9. वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता तर्फे लेखी जबाब लायकराम, एरिया मॅनेजर यांनी प्रतिज्ञालेखावर दाखल केला. त्यांनी तक्रारकर्त्यांचे तक्रारअर्जातील संपूर्ण विपरीत विधाने माहिती अभावी नाकबुल केलीत तसेच त.क.यांची मागणी नाकबुल केली. त्यांची कंपनी ही भारत सरकार अंगीकृत उपक्रम असून त्यांचे द्वारे निर्मित बियाणे हे उत्कृष्ट दर्जाचे असते. त्यांचे द्वारा निर्मित बियाणे आंध्र प्रदेश सिडस सर्टिफीकेट एजन्सी या राज्य शासनाच्या बिज प्रमाणिकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले असते. 10. बिला नुसार वि.प.क्रं-1 निर्मित व वि.प.क्रं-2 द्वारे निर्मित केलेले बियाणे हे श्री नारायणराव ईखार यांनी खरेदी केलेले आहे, त.क.यांनी खरेदी केलेले नाही, त्यामुळे, उभयतांमध्ये ग्राहक विक्रेता असे संबध प्रस्थापित होत नाहीत, सबब, तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. 11. श्री नारायणराव ईखार यांनी खरेदी केलेल्या बियाण्या पैकी 03 बॅग बियाणे त.क.यांनी पेरले ही बाब सुध्दा नाकबुल केली. बियाण्याची पेरणी त.क.यांनी त्यांचे मामा यांचे शेतात केली ही बाब सुध्दा नाकबुल केली. पेरणीसाठी आलेला खर्च व त्या अनुषंगाने केलेली मागणी अमान्य केली. त.क. यांचे म्हणण्या नुसार त्यांनी 0.41 आर करीता 60 किलो बियाण्याची पेरणी केली परंतु हे बियाण्याचे प्रमाण जास्त होते कारण प्रतीएकरला CC/25/2011 फक्त 30 ते 35 किलो बियाण्याची आवश्यकता असते. तसेच त.क.यांचे म्हणण्या नुसार 2 बॅग डी.ए.पी. व 2 बॅग सुपर फॉस्फेट प्रमाण सुध्दा जास्त दिलेले असल्यामुळे झाडाची उंची वाढल्याने भूईमुगाचे काटे जास्त वर लागल्यामुळे शेंगाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता असते. त.क.यांनी पाण्याच्या पाळया 8 दिलेल्या आहेत त्या सुध्दा जास्त आहेत. चुकीचे शेतीचे नियोजनामुळे नुकसान झालेले आहे. 12. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने भेटीचे दरम्यान मोका पंचनामा करणे व पंचनाम्याचे वेळी उभय पक्षांचे बयान नोंदविणे आवश्यक आहे परंतु अशी कार्यवाही केलेली नाही असे अहवाला वरुनच स्पष्ट होते. महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीत एकूण 07 सदस्य असताना फक्त पाच अधिकारी पाहणीचे वेळी उपस्थित होते, त्यामुळे जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा दिनांक-23/05/2009 रोजीचा अहवाल ग्राहय धरण्यात येऊ नये. बियाणे तक्रार निवारण समितीचे अहवालावर कृषी शास्त्रज्ञाची सही नाही, त्यामुळे बियाणे भेसळयुक्त होते वा निकृष्ट दर्जाचे होते ही बाब सिध्द होऊ शकत नाही. 13. तक्रारीस कारण हे 23/01/2009 रोजी घडल्याचे गृहीत धरल्यास तक्रार मुदतबाहय आहे. सबब त.क.यांची तक्रार खोटी व चुकीची असल्यामुळे खारीज व्हावी, असा उजर वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांचे द्वारे घेण्यात आला. 14. वि.प.क्रं-2 स्थानिक बियाणे विक्रेता जगदीश हरिकिसन चांडक यांनी लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. त्यांनी त.क.यांचे तक्रारीतील संपूर्ण विपरीत विधाने माहिती अभावी नाकबुल केलीत. वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता असून ते वि.प.क्रं-1 चे अधिकृत विक्रेता आहेत ही बाब मान्य केली. त्यांनी निर्गमित केलेल्या बिला नुसार वि.प.क्रं-1 निर्मित व वि.प.क्रं-2 द्वारे निर्मित केलेले बियाणे हे श्री नारायणराव ईखार यांनी खरेदी केलेले आहे, त.क.यांनी खरेदी केलेले नाही, त्यामुळे, त.क.यांना तक्रार दाखल करण्याचा अधिकार नाही. त्यांचा त.क.यांचेशी कोणताही संबध येत नाही. 15. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल हा एक रेकॉर्डचा भाग असून सदर अहवाल त्यांना मान्य नसल्याचे नमुद केले. वादातील बियाणे अन्य कास्तकारांना सुध्दा विक्री केले परंतु त्यांची कधीही तक्रार आली नसल्याचे नमुद केले. त्यांनी विकत घेतलेले बियाणे हे सिलबंद स्थितीत विकत घेतले होते व सदर बियाणे कोरडया जागेत चांगल्या वातावरणात ठेऊन विक्री केली. ते बियाणे निर्माता नसून विक्रेता आहेत. त.क.यांना त्यांनी बियाणे विक्री केली नसल्यामुळे, त.क. हे त्यांचे ग्राहक होत नाहीत. सबब त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज व्हावी, असा उजर वि.प.क्रं-2 बियाणे विक्रेता यांनी घेतला. 16. त.क.यांनी तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रं-9 वरील यादी नुसार एकूण 07 दस्तऐवज दाखल केलेत, ज्यामध्ये प्रामुख्याने बियाण्याचे बिलाची प्रत, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल, कृषी अधिका-यांचे पत्र, त.क.यांनी दिलेली CC/25/2011 नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोच पावती अशा दस्तऐवजांचा समावेश आहे. 17. वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांनी लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. सोबत पान क्रं-41 वरील यादी नुसार जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचे गठना संबधी महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक तसेच डॉ.पंजाबराव कृषी विद्यापिठ अकोला यांचे भुईमूग पिका संबधीचे माहितीपत्रकाची प्रत दाखल केली. तसेच लेखी युक्तीवाद व मा.वरीष्ठ न्यायालयाची निकालपत्रे दाखल केलीत. 18. वि.प.क्रं-2 बियाणे विक्रेता यांनी लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर दाखल केला. अन्य दस्तऐवज दाखल केले नाहीत. 19. प्रस्तुत प्रकरणात वि.प.क्रं-1 यांचे अधिवक्ता यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रकरणातील दाखल शपथपत्रा वरील लेखी कथन आणि दस्तऐवजाचे सुक्ष्म वाचन व अवलोकन केल्या नंतर मंचा समक्ष निर्णयान्वित करण्या करीता खालील मुद्ये काढण्यात आले :- अक्रं मुद्या उत्तर (1) त.क.यांची तक्रार मुदतीत आहे काय? होय. (2) त.क.,वि.प.चां ग्राहक आहे काय? नाही. (3) जर होय, तर,वि.प.ने त.क.ला दोषपूर्ण सेवा दिली काय ? व त्यामुळे त.क.चे पिकाचे नुकसान झाले आहे काय ? (4 ) जर होय तर, नुकसान भरपाईसाठी कोण वि.प. .. .. .. .. .. जबाबदार आहेत? .. .. .. .. .. (5) काय आदेश? अंतीम आदेशा नुसार : कारणे व निष्कर्ष :: मुद्या क्रं-1 20. त.क.ची तक्रार मुदतीत नाही, असा आक्षेप वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांनी घेतलेला आहे आणि पुढे असे नमुद केले की, बियाणे खरेदीचे तारखे पासून सदर तक्रार ही मुदतीत दाखल नाही कारण वादातील बियाणे हे दिनांक-23.01.2009 रोजी खरेदी केलेले आहे आणि जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल हा दि.-23.05.2009 रोजीचा आहे. तसेच तक्रार ही बियाण्याचे दोषा संबधी असल्यामुळे ती बियाणे खरेदीचे तारखे पासून मुदतीत नाही. 21. त.क. आणि वि.प.क्रं-2 यांचे वतीने कोणताही युक्तीवाद मंचा समक्ष झालेला नाही किंवा त.क.ने वि.प.चे लेखी जबाबा नंतर कोणताही पुरावा किंवा शपथपत्र दाखल केलेले CC/25/2011 नाही आणि उपलब्ध दस्तऐवजा वरुन त.क.ला योग्य संधी दिल्या नंतर प्रकरण निकाला करीता घेण्यात आले. 22. मंचाने तक्रारीतील उपलब्ध दस्तऐवजांचे सुक्ष्मपणे वाचन केले असता असे स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने पिका बद्यलची तक्रार ही दि.-23.05.2009 चे दरम्यान केलेली आहे, जर बियाण्यामध्ये दोष आला नसता , तर तक्रार करण्याचे कोणतेही कारण नव्हते आणि म्हणून वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांचा तक्रार मुदतीत नसल्या बद्यलचा आक्षेप हा रास्त नसल्याने फेटाळण्यात येतो, व तक्रार मुदतीत आहे असे ग्राहय धरण्यात येते. मुद्या क्रं-2 23. वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांनी असा ठाम आक्षेप घेतलेला आहे की, यातील तक्रारकर्ता हा वि.प.चा ग्राहक होत नाही आणि आपल्या कथनात त्यांनी स्पष्ट नमुद केले की, वादातील बियाणे हे श्री नारायणराव ईखार यांचे नावे खरेदी केल्या बद्यलच्या पावत्या प्रकरणात दाखल आहेत आणि श्री नारायणराव ईखारचा किंवा त.क.यांचे शेताचा 7/12 सुध्दा प्रकरणात दाखल नाही आणि म्हणून तक्रारकर्ते यांचा वि.प.शी ग्राहक आणि विक्रेता असा संबध येत नाही. 24. मंचाद्वारे, त.क.ने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे सुक्ष्मपणे अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदर बियाणे खरेदीचे दिनांक-23.01.2009 चे बिल हे श्री नारायणराव ईखार यांचे नावाचे आहे. त.क.ने तक्रारीतील परिच्छेद क्रं-3 मध्ये नमुद केले आहे की, त्यांनी बियाण्याची बॅग श्री नारायणराव ईखार यांचे कडून घेतलेली आहे परंतु या कथनाचे पुष्टयर्थ्य मंचा समक्ष त.क.तर्फे असा कोणताही पुरावा आलेला नाही किंवा श्री नारायणराव ईखार यांचा प्रतिज्ञालेख प्रकरणात दाखल नाही. मंचाद्वारे, अभिलेखावरील पान क्रं-11 वरील दिनांक-23.05.2009 रोजीचा जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने केलेला चौकशी अहवाल सन-2009-2010 त्यामधील पान क्रं-2 मध्ये नमुद नुसार त.क.ने त्याचे मामा श्री रामकृष्ण सोनोने यांचे शेतामध्ये भूईमुगाची परेणी केली होती असे स्पष्ट होते. परंतु तक्रारकर्त्याने प्रस्तुत प्रकरणात श्री रामकृष्ण सोनोने यांचे नावाचा 7/12 उतारा किंवा त्यांचा प्रतिज्ञालेख दाखल केलेला नाही. मंचा समक्ष असा कोणताही सबळ पुरावा आलेला नाही, जेणेकरुन, तक्रारकर्ता हा शेतकरी आहे हे सिध्द होईल. तसेच त.क.ने स्वतः शेती करीत असताना त्यांचे मामाचे शेतामध्ये भूईमुगाची परेणी केली होती ही बाब श्री नारायणराव ईखार किंवा श्री रामकृष्ण सोनोने यांचे प्रतिज्ञालेखा अभावी सिध्द होऊ शकत नाही तसेच त.क.ने वि.प.चे आक्षेपांना कोणतेही प्रतिउत्तर किंवा विरोध दर्शविणारे शपथेवरील लेखी कथन किंवा दस्तऐवज प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले नाहीत. CC/25/2011 25. वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांनी मा.वरीष्ठ न्यायालयांचे खालील दोन निवाडे प्रस्तुत प्रकरणात दाखल केलेले आहेत. IV (2010) CPJ 119 (NC) Syngenta India Ltd.-V/s- Velaga I (2009) CPJ 180 (NC) Maharashtra Hybrid Seeds Co.Ltd.-V/s- Parchuri Narayana वि.प.क्रं-1 बियाणे निर्माता यांनी दाखल केलेले मा.वरिष्ठ न्यायालयांचे उपरोक्त दोन्ही निवाडे प्रस्तुत प्रकरणास लागू पडत नाही कारण त्यातील परिस्थिती आणि प्रस्तुत प्रकरणातील परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे. 26. ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-2 (1) (d) चे तरतुदी नुसार "ग्राहक" या शब्दाची परिभाषा खालील प्रमाणे दिलेली आहे- (d) Consumer means any person who,- (i) buys any goods for a consideration which has been paid or promised or partly paid and partly promised, or under any System of deferred payment and includes any user of such goods other than the person who buys such goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the approval of such person, but does not include a person who obtains such goods for resale or for any commercial purpose; or ………………. ग्राहक संरक्षण कायदयाचे उपरोक्त ग्राहकाचे परिभाषे वरुन व प्रस्तुत प्रकरणातील लेखी कथन व दस्ताऐवज व कागदोपत्री पुरावे हया वरुन मंचाचे मते यातील त.क.हे वि.प.चें प्रत्यक्ष्य व अप्रत्यक्ष्यरित्या "ग्राहक" होत नाहीत किंवा लाभार्थी म्हणून ग्राहक होत नाही आणि म्हणून मुद्या क्रं-2 चे उत्तर नकारार्थी येत असल्याने या एकाच मुद्यावरुन प्रस्तुत तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. मुद्या क्रं-3 ते 5 27. मुद्या क्रं-2 नुसार मंचाने ग्राहय धरले आहे की, यातील तक्रारकर्ता हा वि.प.चां "ग्राहक" होत नाही आणि त्यामुळे हया मुद्यांचे स्पष्टीकरण देण्याचे कोणतेही कारण उदभवत नाही . म्हणून मुद्या क्रं-3 ते 5 चे उत्तर नकारार्थी येते. CC/25/2011 28. वरील सर्व विवेचना वरुन, प्रस्तुत प्रकरणात न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1½ त.क.हा वि.प.चां "ग्राहक" होत नसल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते. 2) खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत. 3) उभय पक्षांना या आदेशाची सही शिक्क्याची प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्ध करुन द्यावी. 4) मंचामध्ये मा.सदस्यांकरीता दिलेले (ब) व (क) फाईल्सच्या प्रती तक्रारकर्त्याने घेवून जाव्यात.
| HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi, Member | HONABLE MR. Shri Ramlal Bhavarlal Somani, PRESIDENT | , | |