Maharashtra

Beed

CC/12/104

Smt Sakhubai Anna Wadekar - Complainant(s)

Versus

N.R.Enterprises,(Shri Mahendra Munshiram Kholi) - Opp.Party(s)

Adv Ahalade U.N.

17 Dec 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/104
 
1. Smt Sakhubai Anna Wadekar
Rf/o Balewade Post Waghluj Ta Ashti
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. N.R.Enterprises,(Shri Mahendra Munshiram Kholi)
R/o 108,Dr Ambedkar Road,Dehu Road Pune
Pune
Maharashtra
2. Manager,Futur General Insuranance,CO Ltd.
Branch Office,5th Floor,Orian Building,477A 477B 478C 478D 478D 2 Koregaon Road Pune
Pune
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
अँड.आल्‍हादे
......for the Complainant
 
ORDER

 

निकाल
                      दिनांक- 17.12.2013
                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)
            तक्रारदार सखुबाई आण्‍णा वाडेकर यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी नुकसान भरपाई देण्‍यास टाळाटाळ करुन सेवेत त्रूटी ठेवली आहे म्‍हणून नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी दाखल केली आहे.
             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार यांचे पती आण्‍णा मच्छिद्र वाडेकर हे एन.आर.इंटरप्रायजेस 108 डॉ. आंबेडकर रोड. देहू रोड पुणे येथे नौकरीत होते. तक्रारदार यांचे पती सदरील कंपनीमध्‍ये टेम्‍पो ड्रायव्‍हर म्‍हणून नौकरी करीत होते. दि.7.5.2010 रोजी सामनेवाले कंपनीचा टेम्‍पो एम.एच.12-आर-7028 हा मुंबई कडून पुण्‍याकडे जात होता. तक्रारदार यांचे पती सदरील टेम्‍पो चालवित होते. सदरील टेम्‍पो रोड डिव्‍हाईडवर चढून पलटी झाला व तक्रारदाराचे पती सदर अपघातामध्‍ये जागीच मयत झाले. तदनंतर वाय.सी.एम.एच. हॉस्‍पीटल पिंपरी चिंचवड येथे पोस्‍टमार्टम करण्‍यात आले व नंतर त्‍यांचे गांवी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. सदरील अपघातात बाबत हिंजवडी पोलिस स्‍टेशन पुणे येथे सी.आर.पी.सी.174 प्रमाणे पोलिस स्‍टेशनला नोंद करण्‍यात आली.पोलिसांनी घटनेचा पंचनामा, व इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा केला व तसेच साक्षीदारांचे जबाव नोंदविण्‍यात आले. तक्रारदार यांचे तक्रारीत कथन की, अपघाताचे वेळी सामनेवाले क्र.2 यांचे सांगणेनुसार तक्रारदार यांचे पती टेम्‍पो चालवित होते. सामनेवाले क्र.1 यांनी त्‍यांच्‍या 20 कामगांराचा प्रत्‍येकी रु.2,00,000/- चा ग्रूप विमा उतरविलेला होता.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत. तक्रारदार हे मयत आण्‍णा वाडे कर यांचे पती असून कायदेशीर वारस आहेत. तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे मार्फत सामनेवाले क्र.2 विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून क्‍लेम व सर्व कागदपत्रासह प्रकरण पाठविले. सामनेवाले यांनी काही दिवसातच रक्‍कम देतो असे वेळोवेळी सांगितले. तक्रारदार यांनी लेखी पत्र पाठवून सामनेवाले यांचेकडे क्‍लेमची मागणी केली. सामनेवाले यांनी सदरील रक्‍कम दिली नाही. तक्रारदार हे सदरील विमा योजनेचा लाभ मिळण्‍यास पात्र आहेत. सामनेवाले यांनी क्‍लेम न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून रु.2,00,000/- मिळावेत, तसेच सामनेवाले यांनी सदरील रक्‍कमेवर 18 टक्‍के व्‍याज दयावे, तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
 
            सामनेवाले क्र.1 यांना मंचाची नोटीस मिळाली ते मंचासमोर हजर झाले नाही सबब, त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आलार.
            सामनेवाले क्र.2 यांची नोटीस न बजावता दि.5.2.2012 रोजी मंचास प्राप्‍त झाली. तदनंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेवर नोटीस बजावणीकामी कोणतीही कारवाई केली नाही अगर तरतूद केली नाही. सबब, तक्रारदार यांनी तजविज न केल्‍यामुळे सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्‍द तक्रार रदद करण्‍याचा आदेश दि.5.9.2013 रोजी करण्‍यात आला.
               तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर, यूक्‍तीवाद केला नाही. तक्रारदार यांनी पुराव्‍याकामी शपथपत्र दाखल केले नाही. तक्रारीतील कथन व सोबत दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
 
            मुददे                                            उत्‍तर
1.     सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रूटी
      ठेवली आहे ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय              नाही.
2.    तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई
      मिळण्‍यास पात्र आहेत काय                                 नाही.
3.    काय आदेश                                  अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                              कारणमिंमासा
मुददा क्र.1 व 2 ः-
            तक्रारदार यांनी तक्रारीत केलेले कथन लक्षात घेतले. तक्रारदार यांचे कथन की, त्‍यांचे पती आण्‍णा वाडेकर हे टेम्‍पो चालक होते व  सामनेवाले क्र.1 कंपनीमध्‍ये ते नौकरीत होते. दि..7.5.2010 रोजी सदरील टेम्‍पोचा अपघात झाला व तक्रारदार यांचे पती त्‍या अपघातात मयत झाले. सामनेवाले क्र.1 यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे कामगाराची विमा पॉलिसी काढलेली होती. तक्रारदार यांनी कागदपत्राची पूर्तता करुनही सामनेवाले यांनी क्‍लेम दिला नाही म्‍हणून सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे.
            तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली त्‍यावेळी सदरील अपघाता बाबत कोणतेही कागदपत्र सादर केले नाही. तक्रारदार यांनी कथन की, हिंजेवाडी पोलिस स्‍टेशन यांना सदरील अपघाताची खबर देण्‍यात आली. पोलिसांनी अपघाता बाबत रिपोर्ट लिहीलेला आहे. पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा तयार केला व तसेच शवविच्‍छेदनाचा अहवाल दिला.वर नमूद केलेली कागदपत्र तक्रारदार यांनी या तक्रारीसोबत दाखल केलेले नाहीत. तक्रारदार यांनी विभागीय व्‍यवस्‍थापक फयूचर जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. मुंबई यांचेकडे दि.9.9.2011 रोजी एक अर्ज दिलेला आहे त्‍यांची झेरॉक्‍स प्रत या मंचासमोर दाखल केली आहे. त्‍या अर्जामध्‍ये तक्रारदार यांनी त्‍यंाचे पती अपघातात मयत झाले आहे त्‍यांचे क्‍लेमची रक्‍कम देण्‍यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीसोबत फयूचर जनरल इंडिया इन्‍शुरन्‍स कंपनी लि. यांहचे पॉलिसीची झेरॉक्‍स प्रत दाखल केलेली आहे.  सदर पॉलिसी ही एन.आर.इंटरप्रायजेस या कंपनीने घेतलेली आहे. सदर पॉलिसी अंतर्गत 20 कामगार यांची जबाबदारी स्विकारली आहे. सदरील कामगाराची नांवे सदर पॉलिसीमध्‍ये नमूद केलेली आहेत. त्‍यामध्‍ये क्रमांक 6 वर आण्‍णा वाडेकर यांचे नांव आहे. सदरील कागदपत्र व्‍यतिरिक्‍त तक्रारदार यांनी कोणतेही कागदपत्र हजर केले नाही. तक्रारदार व त्‍यांचे वकील गैरहजर राहिले तसेच त्‍यांनी सामनेवाले क्र.2 यांचे विरुध्‍द नोटीस बजावणीकामी कोणतीही तजविज केली नाही. सदरील विमा कंपनी विरुध्‍द तजविज न केल्‍यामुळे तक्रार अगोदरच रदद करण्‍या बाबत आदेश दिलेला आहे. तक्रारदार यांनी त्‍यांचे शपथपत्रही दाखल केलेले नाही अगर सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारुन सेवेत त्रूटी ठेवली आहे ही बाब सिध्‍द केलेली नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे.
 
मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
 
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघुलेखक
  
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.