तक्रारदारातर्फे – वकील – एस.एस.महाजन,
सामनेवाले 1 व 2 तर्फे – वकील – एस.आर.कुडके,
सामनेवाले 3 तर्फे – वकील – एल.एम.काकडे,
।। निकालपत्र ।।
( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 यांचेकडून अँपे पॅसेंजर रजि.क्र.एमएच 23-सी-7169 हे वाहन ता. 11.1.2006 रोजी रक्कम रु.1,47,250/- मध्ये खरेदी केले. तक्रारदारांनी रक्कम रु.35,000/- सामनेवाले नं.3 यांना रोख रक्म अदा केली. तसेच सामनेवाले नं.3 मार्फत सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून रु.1,12,250/- एवढया रक्कमेचे कर्ज मंजूर करुन घेतले. त्यावेळी सामनेवाले नं.3 यांनी सदर कर्जाच्या परतफेडीसाठी कर्जाच्या सेक्यूरीटीचे पुढील तारखेचे तक्रारदारांची सही असलेले कोरे धनादेश तक्रारदारांकडून घेतले. सदर कर्जाची परफेड 25 हप्त्यामध्ये प्रतिमहा रु.4,490/- प्रमाणे करण्याचे ठरले होते. सदर कर्जाचे हप्ते तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 यांचेकडे देण्याचे ठरले होते. सदर रक्कम सामनेवाले नं.3 हे सामनेवाले नं.2 यांचेकडे जमाकरतील तसेच सामनेवाले नं.2 सामनेवाले नं.1 यांचेकडे मूख्य कार्यालयात जमा करतील. त्याप्रमाणे तक्रारदारांनी जुन,2006 पासून सदर कर्जाची परतफेड नियमितपणे दरमहा सामनेवाले नं.3 यांचेकडे नगदी स्वरुपात रक्कम देवून केली. तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 यांचेकडे दिलेल्या चेकपैकी एकही चे वटवण्यासाठी बँकेत टाकण्याची वेळ येवू दिलेली नाही. तक्रारदारांनी कर्ज रक्कमेची परतफेड करुनही सदर वाहनाचे आर.सी बूक व नो-डयूज दिलेले नाही. तक्रारदारांचे कर्ज खातेमध्ये कोणत्याही प्रकारची थकबाकी निघत नसूनही सामनेवाले यांनी तक्रारदारांना एनओसी व वाहनाची कागदपत्रे दिलेली नाहीत. सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांना ता. 3/12/2009 रोजी रु. 35,920/- थकीत असल्या बाबत नोटीस पाठवली. तक्रारदारांना सदरची नोटीस मान्य नसल्यामुळे सदर नोटीशीचे उत्तर ता.18.12.2009 रोजी वकीला मार्फत सामनेवाले नं.1 ते 3 यांना पाठवले असून सदर नोटीसमध्ये भरणा केलेल्या कर्ज पावत्या व रक्कमांचा उल्लेख केला आहे. सदर नोटीशचे उतर सामनेवाले नं.1 व 2 यांना मिळूनही तक्रारदारांना आर.सी.बुक व नो-डयूज प्रमाणपत्र दिलेले नाही.
तरी तक्रारदारांची विनंती की, सामनेवाले नं.1 ते 3 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.20,000/-, अर्जाचा खर्च रु.3,500/- व नोटीसचे उत्तराचा खर्च रु.1,500/- असे एकुण रक्कम रु.25,000/- वसूल होवून मिळावे. त्याचप्रमाणे तक्रारदारांच्या वाहनाचे आर.सी.बूक व नो-डयूज प्रमाणपत्र देण्या बाबत सामनेवाले यांना आदेश करण्यात यावे.
सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 व 2 हजर झालेले असून त्यांनी त्यांचा खुलासा ता.30.6.2010 रोजी न्यायमंचात दाखल केला आहे.
सामनेवाले नं.1 व 2 यांचा लेखी खुलासा थोडक्यात असा की, सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेलीविधाने नाकरलेली असून तक्रारदारांनी फक्त 25 हप्ते भरल्याची बाब सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांनी कर्जाची रक्कम अदा करण्यापूर्वीच सदर कर्जाची थकबाकी 33 हप्त्यामध्ये प्रतिमहा रक्क्म रु.4,490/- प्रमाणे परतफेड करण्याबाबत माहिती असून तक्रारदारांनी 8 कर्जाचे हप्ते भरणा केलेले नसल्यामूळे रक्केम रु.35,920/- ( Over due interest ) कर्जाचे थकीत हप्त्यावरील व्याजासहीत रु.1,07,628/- एवढी रक्कमेची थकबाकी असल्यामुळे, सदर वाहनाचे आर.सी.बुक व नोडयूज प्रमाणपत्र दिलेले नसल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसूरी केलेली नाही. सदरचा व्यवहार हा पूणे येथे झालेला असल्यामूळे सदरचे प्रकरण न्यायमंचाच्या अधिकार क्षेत्रात ( Jurisdiction ) येत नाही. तरी तक्रारदारांची तक्रार रु.5,000/- नुकसान भरपाईच सामनेवाले खर्चासह रद्द करण्यात यावी.
सामनेवाले नं.3 न्यायमंचात हजर झाले असून त्यांनी त्यांचा खुलासा दाखल केलेला आहे. सामनेवाले नं.3 यांचा लेखी खुलासा थोडक्यात की, सामनेवाले नं.3 यांनी तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेली विधाने नाकरलेली असून तक्रारदारांना सामनेवाले नं.3 मार्फत अथवा समक्ष सामनेवाले नं.1 व 2 यांच्या शोरुममध्ये खूर्ची व टेबल टाकून बसत होते. तसेच इतरही कंपनीचे फायनान्सर कर्जाऊ रक्कम देण्यासाठी बसत होते. सदर कराराशी सामनेवाले नं.3 यांचा संबंध नाही. सदर करार तक्रारदार व सामनेवाले नं.1 व 2 यांच्यात झालेला असून या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती असण्याचा प्रश्नच येत नसल्यामूळे तक्रारदारांनी सामनेवाले नं.3 यांना नाहक सदर प्रकरणात पार्टी केल्यामूळे रु.10,000/- नुकसानभरपाई रक्कमेसह तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले नं.1 ते 3 यांचा खुलासा दाखल कागदपत्र, याचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील एस.एस.महाजन यांचा युक्तीवाद ऐकला. सामनेवाले नं. 1 व 2 यांचे विद्वान वकील एस.आर.कुडके यांचा दाखल केलेला खुलासा हाच युक्तीवाद समजण्यात यावा असे निवेदन केले. सामनेवाले नं.3 यांचा युक्तीवाद नाही.
तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे सामनेवाले नं;1 व 2 यांचेकडून सामनेवाले नं.3 मार्फत रक्कम रु.1,12,250/- चे कर्ज अँपे पॅसेंजर क्र.एम.एच. 23 सी-7169 हे वाहन सामनेवाले यांचेकडून खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले. सदर कर्जाची परतफेड 25 हप्त्यात प्रतिमहा 4490/- प्रमाणे करण्याचे ठरले. तक्रारदारांनी जून,2006 पासुन सदर कर्जाची परफेड नियमितपणे केली. प्रत्यक्षात मात्र सामनेवाले यांनी 33 हप्ते तक्रारदारांकडून भरणा करुन घेतले. अशा प्रकारे तक्रारदारांनी कर्ज रक्कमेची परतफेड करुनही तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदर वाहनाचे आर.सी.बुक तसेच नो-डयूज प्रमाणपत्र दलेले नाही. परंतु सामनेवाले नं.2 यांनी तक्रारदारांना ता.3.12.09 रोजी रक्कम रु.1,07,628/- थकबाकी असल्याबाबत नोटीस पाठविली. तक्रारदारांनी सदर नोटीसीस वकिलामार्फत ता.18.12.2009 रोजी उत्तर दिले. सदर नोटीसीमध्ये तक्रारदारांनी भरणा केलेल्या कर्ज पावत्या व रक्कमेचा उल्लेख करुनही तक्रारदारांना आर.सी.बुक तसेच नो-डयूज प्रमाणपत्र दिलेले नाही, अशी तक्रारदारांनी तक्रार आहे.
सामनेवाले नं.1 व 2 यांनी लेखी खुलाशात नमुद केल्याप्रमाणे सदर कर्ज कराराचे कर्जाची परतफेड 33 हप्त्यात करावयाची असुन तक्रारदारांनी 25 हप्ते परतफेड केले आहे. 8 हप्त्याची रक्कम रु.35,920/- ( ओव्हर डयुज व्याज ) व्याजासह एकुण रु. 1,07,628/- तक्रारदाराकडे थकबाकी असल्यामुळे नो-डयूज तसेच वाहनाची मुळ कागदपत्रे देता येत नाहीत. तसेच सदरचा व्यवहार पूणे येथे झालेला असल्यामुळे सदर प्रकरण न्यायमंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही, असे नमुद केले आहे. सामनेवाले नं.3 यांचा खुलाशात नमुद केल्याप्रमाणे सामनेवाले नं.1 व 2 फायनांन्सर कंपनी सामनेवाले नं.3 यांची बीड येथील शोरुममध्ये खुर्च्याटाकुन कर्ज रक्कम देण्यास बसत होते. तक्रारदारांनी सदरचे वाहन सामनेवाले नं.3 यांचेकडून खरेदी केल्या बाबतची पावतीचे अवलोकन केले असता सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून हायरपरचेस अग्रिमेंट असल्या बाबत दिसून येते. अशा परिस्थितीत सदरचा व्यवहार बीड येथे झाल्याची बाब स्पष्ट होते. त्यामुळे सदरचे प्रकरण न्यायमंचाचे अधिकारक्षेत्रात येते असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदार व सामनेवाले यांच्यात झालेला कर्ज करार ( लोन अग्रिमेंट ) सदर प्रकरणात दाखल नाही, त्यामुळे कीती हप्त्यामध्ये कर्जाची परतफेड करावयाचे होते ? किती कर्ज परतफेड केले व कीती शिल्लक आहे या बाबतचा खुलासा होत नाही ? सामनेवाले नं.1 व 2 यांनी दाखल केलेला तक्रारदाराचा खातेउता-यामध्ये नमुद केल्याप्रमाणे सदरचे कर्जाचा कालावधी 36 महिन्याचा असल्याचे दिसून येते. तसेच तक्रारदारांनी 32 हप्त्याची परतफेड केल्याचे दिसून येते. सामनेवाले नं.1 व 2 यांचे खुलाशात नमुद केल्याप्रमाणे सदर करार 33 हप्त्यात करावयाचे ठरलेले असल्यामुळे तक्रारदारांनी फक्त 25 हप्ते परफेड केलेले आहे. तसेच 8 हप्त्याची परतफेड थकबाकी आहे. अशा प्रकारे सामनेवाले नं.1 व 2 यांनी दाखल केलेली कागदपत्र व खुलाशातील विधानामध्ये विसंगती आढून येते. तक्रारदार व सामनेवाले नं.1 व 2 यांचेत झालेला कर्ज करार सामनेवाले नं. 1 व 2 यांचे ताब्यात आहे. सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 व 2 यांनी सदरचे कर्ज करार दाखल करणे आवश्यक होते. तसेच सामनेवाले नं.1 व 2 यांनी तक्रारदारांना पाठवलेल्या ता.6.12.2009 च्या नोटीसमध्ये सदर कर्ज प्रकरणाचे हप्त्याबाबत, व्याजदरा बाबत, तसेच कालावधी बाबत नमुद केलेले नाही. तसेच रक्कम रु.1,07,628/- थकीत कर्ज रक्कमे बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सदरची थकबाकी कशी आली याबाबत खलासा नाही. तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे 33 हप्त्यात परतफेड केल्याबाबत नमुद केले आहे. तसेच सदरचे कर्ज खाते उता-यामध्ये तक्रारदारांनी 33 हप्त्याचा भरणा केल्याचे दिसून येते. सामनेवाले यांनी जास्तीचे हप्ते भरुन घेतल्या बाबतचा कोणताही पुरावा नाही. अशा परिस्थितीत सदर कर्ज रक्कमेचे 25 हप्त्यामध्ये परतफेड करण्याचे ठरले बाबतची बाब स्पष्ट होत नाही.
तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन सामनेवाले नं.1 व 2 यांनी दाखल केलेल्या कर्ज खात्याचा उता-यावरुन तक्रारदारांनी 32 हप्त्याची परतफेड केल्याचे दिसून येते. सदर खाते उत्ता-यावर नमुद केल्याप्रमाणे कर्जाचा कालावधी 36 महिन्याचा दिसून येतो. तसेच 8 हप्त्याची थकबाकी व्याजासहीत रक्कम रु.1,07,628/- एवढे असल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी सदर रक्कम रु.1,07,628/- एवढी थकबाकी बाबत ता. 6.12.2009 रोजी सामनेवाले नं.1 व 2 यांनी नोटीस दिलेली असल्याची बाब तक्रारदारांना मान्य नाही. तक्रारदारांनी सदर नोटीसचे उतर ता.18.12.2009 रोजी दिले असुन सदरची थकबाकीची रक्कम निश्चितपणे नमुद केलेली नाही. तसेच तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून घेतलेल्या कर्ज रक्कमेची पूर्णत: परतफेड केल्याची बाब स्पष्ट होत नाही. तक्रारदारांनी कर्ज रक्कमेची परतफेड केली नसल्यामुळे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी सदरील वाहनाची मुळ कागदपत्रे तसेच नो-डयुज प्रमाणपत्र दिले नाही. सामनेवाले नं.1 व 2 यांची सदरीच कृती सेवेत कसूरी केले असल्याची बाब स्पष्ट होत नाही. सामनेवाले नं. 1 व 2 यांची सेवेत कसूरीची बाब स्पष्ट न झाल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे नो-डयूज प्रमाणपत्र, कागदपत्रे आर.सी.बुक तसेच नुकसान भरपाईची रक्कम रु.25,000/- देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडून कर्ज घेतलेले असल्यामुळे तसेच या संदर्भात सामनेवाले नं.3 यांचा सबंधन नसल्यामुळे सामनेवाले नं;3 यांची सेवेत कसूरीची बाब स्पष्ट होत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड