निकालपत्र
(पारित दिनांक 04-02-2009)
द्वारा. श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. वि.प.क्र. 2 ते 5 यांनी एन.डी.आर. मल्टी सर्व्हीसेस मार्केटींग प्रा. लि. नोंदणी क्र. यु/51909 ही कंपनी सुरु केली व गोंदिया जिल्हयाकरिता अनेक योजना प्रस्तावित केल्या. या योजनांप्रमाणे वि.प. हे ग्राहकांकडून अग्रिम रकाम स्विकारायचे व परिपक्वता कालावधी नंतर आकर्षक वस्तू दयावयाचे.
2. तक्रारकर्ता यांनी खालील तक्त्याप्रमाणे वि.प. यांच्याकडे रकमा जमा केल्या आहेत.
अ.क्र. तक्रारकर्त्याचे नाव अकांउट नंबर रक्कम
1. सत्यशिला मनोहर मेश्राम़ 146 2300/-
2. कृष्णाबाई अशोक पटले 655 1900/-
3. सयन श्रावण रहांगडाले 785 1900/-
4. लता अशोक उके 784 1700/-
5. निर्मला नमाजी पटले 787 1600/-
6. मालता माणिकराव मेश्राम 912 1400/-
7. पूना रामचंद्र शेंद्रे 908 1300/-
8. प्रतीमा अरविंद टेंभेकर 690 3600/-
9. मनोज ज्ञानेश्वर शहारे 696 1700/-
10. विमला ताराचंद चावरे 910 1700/-
11. नम्रता रेखालाल राऊत 918 1800/-
12. शांताबाई लोकचंद रहांगडाले 770 1800/-
13. कौतीकलाबाई गेंडालाल रहांगडाले 789 1300/-
14. केवल रघूनाथ केकाडे 780 1600/-
15. सिंधू भरतलाल क्षिरसागर 782 1900/-
16. फूलन सदाशिव दानवे 1217 1000/-
17. ललीता किशोर तिलगामे 1220 900/-
18. रत्नमाला महादेव बागडे 1214 900/-
19. मिरा सेवकराम केकाडे 1263 800/-
20. सुनील रामू शहारे 700 1600/-
21. अनिल रामू शहारे 147 4400/-
22. टेकेश्वर जगन उके 656 1400/-
23. सागर अनिल शहारे 1056 1800/-
24. नंदा वामन उके 654 700/-
25. दशरथ शालीकराम कटरे 783 5700/-
26. कला सहेशराम रहांगडाले 657 1400/-
27. सुनील आशाराम बिसेन 698 800/-
28. ज्ञानेश्वर सोमाजी मेश्राम 1057 700/-
29. किरन पटले 919 1600/-
-------------------------------------------------------------------------------------------
एकूण रक्कम 51200/-
3. काही तक्रारकर्ता हे आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांनी तीन ते चार महिन्याची अग्रिम हप्त्याची रक्कम वि.प. यांना दिली नाही म्हणून डिसेंबर 2006 मध्ये काही तक्रारकर्ता यांनी वि.प. यांना मागणी केली की, त्यांनी जेवढी रक्कम भरली आहे त्या किंमतीची वस्तू दयावी अथवा भरण्यात आलेली संपूर्ण रक्कम ही 18 टक्के व्याजासह परत करण्यात यावी. परंतू वि.प.क्र.1 ते 5 यांनी जाणीवपूर्वक तक्रारकर्ता यांची मागणी फेटाळली.
4. एप्रिल 2007 मध्ये सर्व तक्रारकर्ता यांनी वि.प. यांच्याकडे वस्तू देण्याची अथवा ठरलेली रक्कम 18 टक्के व्याजासह परत देण्याची मागणी केली. परंतू वि.प. यांच्यातर्फे त्यावर विचार करण्यात आला नाही.
5. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, सर्व तक्रारकर्ता यांच्याकडून भरण्यात आलेली एकूण रक्कम रु. 51,200/- ही डिसेंबर 2006 पासून ती रक्कम तक्रारकर्ता यांना प्राप्त होईपर्यंत 18 टक्के व्याजासह वि.प. यांच्याकडून मिळावी तसेच प्रत्येक तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई म्हणून रु. 5000/- हे वि.प. यांच्याकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
6. दि. 20/12/08 च्या दैनिक कशीश या वर्तमानपत्रात जाहीर सुचना प्रकाशीत करुन वि.प. क्र 1 व 2 यांच्यासाठी ग्राहक तक्रारीबद्दलची माहीती प्रकाशीत करण्यात आली होती व त्यांना दि. 05/01/09 रोजी उत्तर देण्यात सांगण्यात आले होते. परंतू वि.प.क्र. 1 व 2 हे दि.05/01/09 रोजी मंचात हजर न झाल्यामुळे त्यांच्याविरुध्द प्रकरण एकतर्फी पुढे चालविण्याचा आदेश दि. 12/01/09 रोजी पारित करण्यात आला.
7. वि.प. क्र. 3 यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 47 वर दाखल केला आहे. वि.प. क्र. 3 म्हणतात की, श्री. रमेश टेंभरे यांचे नाव हे आवश्यक पार्टी म्हणून ग्राहक तक्रारीत टाकणे आवश्यक होते. वि.प.क्र. 2 यांना सर्व विरुध्द पक्ष यांचेकडून कंपनीचे आर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार देण्यात आले होते. वि.प.क्र. 3 यांना तक्रारकर्ता यांच्या वतीने कधीही कोणतीही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे ते तक्रारकर्ता यांच्या रकमेसाठी जबाबदार नाहीत. दि. 16/09/06 रोजी वि.प.क्र. 3 यांचा मुलाचा मुत्यू झाल्यामुळे त्यांना धक्का बसला व त्यांचे आरोग्य बरोबर नाही. त्यामूळे ते वि.प.क्र. 1 कंपनीत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार ही खारीज करण्यात यावी.
8. वि.प.क्र. 4 यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 49 वर दाखल केला आहे. ते म्हणतात की, तक्रारकर्ता हे ग्राहक या व्याख्येत बसत नाहीत. वि.प.क्र. 2 यांनी वि.प.क्र. 3 ते 5 यांच्या परवानगीशिवाय योजना हया जारी केल्या. जे कंपनीच्या नियम व अधिसूचनांचे उल्लंघन आहे. त्यामुळे वि.प.क्र. 4 यांनी दि. 28/02/05 रोजी कंपनीचे संचालक या पदाचा राजीनामा दिला व तो स्विकारण्यात आलेला असल्यामुळे वि.प.क्र. 4 यांच्याविरुध्दची तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे.
9. वि.प.क्र. 5 यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 51 वर दाखल केला आहे. ते म्हणतात की, वि.प.क्र. 5 यांना वि.प.क्र. 2 यांनी जारी केलेल्या योजनांची माहिती नव्हती. ते 65 वर्ष वयाचे असून अनेक रोगांनी ग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांचे वि.प.क्र. 1 कंपनीशी संबंध नाही व ते कंपनीच्या कारभाराकरिता व योजनांकरिता जबाबदार नाहीत. सदर ग्राहक तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदयाच्या कक्षेत बसत नसल्यामुळे ती खारीज करण्यात यावी.
10. सदर प्रकरणात तक्रारकर्ता व वि.प.क्रमांक 4 व 5 यांच्यावतीने युक्तीवाद करण्यात आला. वि.प.क्रमांक 4 व 5 यांनी गिरजानंद व इतर वि. एच.पी. स्टेट कॉ-ऑपरेटीव्ह मार्केटींग अन्ड कंन्सूमरस् फेडरेशन लि. (एच.आय.एम.एफ.ई.डी) व इतर हा I (2007) सीपीजे 379 मध्ये प्रकाशीत झालेल्या न्यायनिवाडा रेकॉर्डवर दाखल केला आहे. त्यामध्ये आदरणीय हिमाचल प्रदेश राज्य आयोगाने असे म्हटले आहे की, ''ग्राहक मंचाची परवानगी न घेता ग्राहकांच्या वतीने दाखल करण्यात आलेली संयुक्त ग्राहक तक्रार ही खारीज होण्यास पात्र आहे''. सदर प्रकरणात सुध्दा एकूण 29 ग्राहकांच्या वतीने संयुक्त ग्राहक तक्रार दाखल करण्यात आली आहे व अशी संयुक्त तक्रार दाखल करत असताना ग्राहक मंचाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.