जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.201/2008. प्रकरण दाखल दिनांक – 05/06/2008. प्रकरण निकाल दिनांक – 20/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.जगदेवराव नागोराव पवार, अर्जदार. वय वर्षे 30, धंदा शेती, रा.बोरी (खु) ता.कंधार जि.नांदेड. विरुध्द. 1. प्रशासक, गैरअर्जदार. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य कार्यालय,शिवाजी महाराज पुतळयाजवळ, नांदेड. 2. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा, तामसा. माळाकोळी ता.लोहा जि.नांदेड. अर्जदारा तर्फे. - स्वतः. गैरअर्जदार क्र.1 ते 3 - अड.एस.डी.भोसले. निकालपत्र (द्वारा मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि यांच्या सेवेच्या त्रुटीसबद्यल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडुन रु.2,90,000/- मिळावेत याबद्यल तक्रार दाखल केलेली आहे. तपशिल | ठेव दिनांक | मुदत | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | मुदत ठेव | 09.06.2000 | 09.09.2005 | 30111 +आजपर्यंतचे व्याज | मुदत ठेव | 05.12.2000 | 05-03-2006 | 32121+ आजपर्यंत व्याज | | 05.12.2000 | 05.01.2000 | रु.10,000+आजपर्यं व्याज |
गैरअर्जदारकडे मुदतठेव बँक खाते व चिंतामणी सुयोगमंगलम योजने देऊ केलेल्या सेवा अपु-या ठरल्या आहेत. त्यांच्य मुलाच्या शिक्षणांसाठी रक्कम मिळावी असा आदेश गैरअर्जदारांना करावे अशी विनंती केली आहे. चिंतामक्त सुयोगमंगलम योजनेत दर महाप्रमाणे 84 मासिक हप्ते भरुन दि.12/08/2007 रोजी रु.41,796/- मिळणार होते ते गैरअर्जदारांनी दिले नाही. दि.26/09/2005 पर्यंत 61 मासिक हप्ते भरलेले आहेत. 23 मासिक हप्ते भरणे शिल्लक आहेत. सदर हप्ते ते बिन व्याजी भरण्यास तयार आहे. ऑक्टोंबर 2005 पासुन पैसे स्विकारणे बंद केल्यामुळे ते पैसे भरु शकत नाही. म्हणुन ही तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने ठरलेल्या विविध योजनेमध्ये ठरलेल्या रक्कमा गैरअर्जदाराने मान्य केले आहे. मुदत ठेव रक्कम रु.30,114/- व रु.10,000/- व रुद्य32,121/- व त्यांच्या पत्नीचे बचत खात्याचे रु.11,000/- हे मान्य आहेत. चिंतामुक्त योजनेत अर्जदराने फक्त् रु.23,581/- जमा केलेला आहे व अल्पमुदत ठेव खाते क्र.49136 मध्ये रु.1,360/- जमा आहेत. दुसरे अल्पमुदत ठेव खाते क्र.4214 रु.320/5 जाम आहेत. प्रत्येक रक्कमेवरील आतापर्यंत व्याज हे भारतीय रिझर्व बँकेच्या ठरलेल्या आदेशानुसार देण्यात येईल. गैरअर्जदार त्यांच्या पुर्व परवानगी ती रक्कम देऊ शकणार नाही. गैरअर्जदार यांची आर्थीक परीस्थिती डबघाईस आल्यामुळे आर.बी.आय.ने दि.20/10/2005 पासुन बँक रेग्युलेशन अक्ट कलम 35 ए प्रमाणे आर्थीक निर्बंध घातल्यामुळे त्यांची पुर्व परवागनी शिवाय आता ती रक्कम देण्यात येत नाही असे करुन त्यांनी सेवेत त्रुटी केलेली आहे. म्हणुन अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदारानी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदारांनी यांनी पुरावा म्हणुन आपली साक्ष जयप्रकाश धर्मया पत्रे यांच्या शपथपत्राद्वारे नोंदविली आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी पावती क्र.107155 द्वारे रु.15,000/- मुदत ठेवीत ठेवलेले आहेत व मुदती अंती ही रक्कम रु.30,114/- मिळणार होते. त्यानंतर पावती क्र.126030 रु.5,200/- गुंतवणुक केलेली होती. मुदती अंती रु.10,000/- मिळणार होते. 120835 रु.16,000/- ठेवलेले आहेत. ज्याचे रु.32,121/- मिळणार होते. पास बुक खाते क्र.4916 मध्ये रु.1,360/- जमा आहेत व पास बुक खाते क्र.4214 यावर रु.340/- जमा आहेत. या सर्व रक्कमा गैरअर्जदार यांना मान्य आहे. चिंतामुक्ती ठेव योजनेमध्ये अर्जदाराचे पत्नीच्या नांवाने दि.09/09/2005 आणि दि.12/07/2007 पर्यंत रक्कम द्यावयाची होती. गैरअर्जदाराच आसा आक्षेप आहे की, त्यांनी वेळेवर पैसे भरलेले नाही त्यामुळे योजनेप्रमाणे त्यांना व्याज मिळणार नाही व या योजनेत ऑक्टोबर 2005 पासुन बॅकेने आर.बी.आय.च्या निर्देशा प्रमाणे पैसे स्विकारणे बंद केले होते. त्यामुळे अर्जदार पैसे भरु शकले नाही. आजही त्यांचे पैसे भरण्याची तयारी आहे त्यामुळे अर्जदाराचा काहीही कसुर नाही. आर.बी.आय.ने कलम 35 ए लावुन गैरअर्जदारावर आर्थीक निर्बंध घातल्यामुळे त्यांची पुर्व परवानगी शिवाय त्यांनी ही रक्कम देऊ शकत नाही असे केल्याने सेवेतील त्रुटी होणार नाही. म्हणुन मानसिक त्रासाबद्यल खर्च देय नाही. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्यापासुन 15 दिवसांच्या आंत गैरअर्जदार यांनी अर्जदाराचे विविध योजनेत गुंतविलेले पैसे त्यांना हार्डशिप ग्राऊंडवर ही रक्कम मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रासह आर.बी.आय.कडे मंजुरीसाठी पाठवावे व त्यांनी मंजुर केलेली रक्कम अर्जदारास ताबडतोब देण्यात यावी. 3. मानसिक त्रासाबद्यल आदेश नाही. 4. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |