जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.255/2008. प्रकरण दाखल दिनांक – 18/07/2008. प्रकरण निकाल दिनांक – 20/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. मा.श्री.सतीश सामते सदस्य. श्री.ईफतेखार मोहम्मद अब्दुल गफार, अर्जदार. वय वर्षे सज्ञान, धंदा नौकरी (शिक्षक) रा.नांदेड. विरुध्द. 1. प्रशासक, गैरअर्जदार. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, मुख्य कार्यालय,शिवाजी महाराज पुतळयाजवळ, नांदेड. 2. शाखाधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा, सराफ, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड. शेख आय.एम. गैरअर्जदार क्र.1 ते 2 - अड.एस.डी.भोसले. निकालपत्र (द्वारा मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार यांच्या सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार यांची तक्रार आहे. गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडील बँक खाते क्र.388 मध्ये रु.92,199/- शिल्लक आहे. ही रक्कम अर्जदारांना हवी असतांना डिसेंबर 2008 मध्ये पवीत्र हज यात्रा करण्यासाठी या रक्कमेची मागणी केली परंतु गैरअर्जदाराने ही रक्कम दिली नाही. शिवाय मुलांच्या कॉम्प्युटर शिक्षणांसाठी त्यांना अनुक्रमे रु.14,000/- व रु.22,000/- खर्च करणे आहे परंतु या कारणासाठी गैरअर्जदार यांनी रक्कम दिली नाही. म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, बॅक खाते क्र.388 मधील रक्कम रु.90,000/- व मानसिक त्रास रु.10,000/- व दावा खर्च अर्जदारांना देण्याचे आदेश करण्यात यावे. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदार यांना कशासाठी रक्कम हवी आहे हे माहीत नाही व भारतीय रिझर्व बॅकेने घातलेले निर्बंध कलम35 ए प्रमाणे त्यांच्या पुर्व परवानगी शिवाय त्यांना ती रक्कम देता येणार नाही असे केल्याने सेवेमध्ये कुठेही त्रुटी होत नाही. त्यामुळे मानसिक त्रासाबद्यल त्यांची मागणी कायदेशिर नाही त्यामुळे अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात यावे असे म्हटले आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच गैरअर्जदारांनी आपली साक्ष जयप्रकाश धर्मया पत्रे यांचे शपथपत्राद्वारे नोंदविली आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले कागदपत्र बारकाईने तपासुन व केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? नाही. 2. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. मुद्या क्र. 1 - अर्जदार यांनी खाते क्र. 388 चे पास बुक दाखल केलेले आहे. या पास बुकावरुन दि.31/03/2008 रोजी त्यांच्या खात्यावर रु.92,199/- जमा असल्याचे दिसून येते व गैरअर्जदारांना ते मान्य आहे पण आर.बी.आय.ने लावलेल्या कलम 35 ए नुसार त्यांच्यावर आर्थिक निर्बंध असल्या कारणाने आर.बी.आय.च्या पुर्व परवानगी शिवाय त्यांना ती रक्कम देता येणार नाही व असे केल्याने सेवेत त्रुटी होणार नाही. म्हणुन अर्जदार हे मानसिक त्रास व दावा खर्च मिळण्यास पात्र नाही. आर.बी.आय.च्या परिपत्रकानुसार हार्डशिप ग्राउंडवर अर्जदार यांना रक्कम मिळु शकते त्यांना शैक्षणिक व हज यात्रेसाठी पैश्याची तातडीची आवश्यता असल्याबद्यलचे हार्डशिप ग्राऊंडवर प्रस्ताव दाखल करुन अशा प्रकारची रक्कम त्यांना मिळु शकते. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांची तक्रार खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. हा निकाल लागल्या पासुन 15 दिवसांच्या आंत गैरअर्जदारांनी अर्जदाराचा अर्ज हार्डशीप ग्रांऊडवर आवश्यक त्या कागदपत्रासह व योग्य शिफारसीनुसार मंजुरीसाठी आर.बी.आय.कडे पाठवावा व आर.बी.आय.ने मंजुर केलेली रक्कम अर्जदारांना ताबडतोब देण्यात यावी. 3. मानिसीक त्रासाबद्यल आदेश नाही. 4. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |