जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 257/2008. प्रकरण दाखल तारीख - 22/07/2008 प्रकरण निकाल तारीख - /11/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य 1. सूवर्णा शंकरराव कोटगीरे वय. 43 वर्षे धंदा घरकाम रा. हडको, नांदेड अर्जदार 2. अरविंद विठठलराव कूंचेलीकर वय, 48 वर्षे, धंदा व्यापार रा.हडको नांदेड. विरुध्द. नांदेड जिल्हा मधयवर्ती सहकारी बँक लि. नांदेड शाखा इतवारा नांदेड, मार्फत बँक मॅनेजर गैरअर्जदार अर्जदारा तर्फे वकील - अड. आर.बी.कव्हाळे गैरअर्जदार तर्फे वकील - अड.एस.डी. भोसले. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्या सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्याकडे ठेवलेल्या ठेव पावती प्रमाणे रक्कम रु.1,86,638/- व त्यावर दि.25.5.2005 पासून रक्कम मिळेपर्यत 15 टक्के व्याज दराने व रु.81,000/- वर दि.12.10.2002 पासून 11 टक्के व्याज दराने व्याजासह पूर्ण रक्कम मिळावी म्हणून तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. मानसिक व आर्थिक ञास म्हणून रु.25,000/-व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मागितलेले आहेत. अर्जदार क्र. 1 व 2 यांचे नांवे खालील प्रमाणे मूदत ठेवीत रक्कम ठेवलेली आहे. -------------------------------------------------------------------------- ठे.चे नांव ठेव पावती ठेव दि. ठेव रक्कम कालावधी देय दि.एकूण रक्कम --------------------------------------------------------------------------- सौ.सूवर्णा 101849 25.4.00 30000/- 63 महिने 25.7.05 64992 सौ.सूवर्णा 101808 5.3.00 20000/- 63 महिने 5.6.05 43328 सौ.सूवर्णा 142783 9.3.02 15000/- 72 महिने 9.3.08 30470 सौ.सूवर्णा 151244 12.10.02 20000/- 6 वर्षे 12.4.09 40500 अरविंद 151245 12.10.02 20500/- 78 महिने 12.4.09 40500 कुचलीकर --------------------------------------------------------------------------- एकूण रक्कम 1,05,500/- 2,19,790/- --------------------------------------------------------------------------- अर्जदार क्र. 2 यांचे मूलगा हा राजेश अरविंदराव कुचलीकर हा वै्द्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करीत असून त्यांचे शिक्षणासाठी त्यांना रक्कमेची अत्यंत आवश्यकता आहे. गैरअर्जदार यांना वारंवार विनंती केली असता, त्यांनी ती रक्कम दिली नाही म्हणून हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले, त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार ही दोन वेगवेगळया असणा-या दोन वेगवेगळया अर्जदारांनी दाखल केलेली आहे. गैरअर्जदार यांचे बँक ही आर.बी.आय. च्या अधिपत्या खाली चालते व तीस बँक रेग्यूलेशन अक्ट लागू आहे. नाबार्ड ने तपासणी केलेल्या अहवालाप्रमाणे दि.20.10.2005 रोजी कलम 35 (अ) प्रमाणे गैरअर्जदार यांचे व्यवहारावर आर्थिक निर्बध घातलेले आहेत. त्यामूळे आता आर.बी.आय. च्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना ती रक्कम करता येणार नाही असे करुन सेवेत ञूटी ही होणार नाही. आर.बी.आय. च्या नियमाप्रमाणे हार्डशिर्प ग्राऊंडवर शैक्षणीक,आरोग्य, विवाह, इत्यादी कारणासाठी आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देता येईल. याप्रमाणे अर्जदार क्र. 1 ने रु.75,000/- यापूर्वीच आर.बी.आय. च्या परवानगीने दि.24.1.2008 रोजी उचलून घेतलेले आहेत. त्यामूळे अर्जदारांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. दोन्ही अर्जदारांनी पूरावा म्हणून आपआपली साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली आहे, तसेच गैरअर्जदार यांनी ही आपले शपथपञ दाखल केलेले आहे. अर्जदारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांची सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार क्र. 1 व 2 यांचे नांवे गूंतवलेली रक्कम ही त्यांना असलेल्या तातडीच्या मदतीसाठी आर.बी.आय. च्या परवानगीने रक्कम मिळू शकते व यावर हार्डशिप ग्राऊंडवर अर्जदार यांनी आवश्यक त्या कागदपञासह प्रपोजल गैरअर्जदार बँकेच्या शिफारशीसह पाठवावे लागते. आर.बी.आय. ने समोरच्याची निकड लक्षात घेऊन रक्कम मंजूरी देते व ती मंजूरी केलेली रक्कम गैरअर्जदाराने देणे बंधनकारक आहे. कलम 35 (अ) लावून आर.बी.आय. ने आर्थिक निर्बध गैरअर्जदार बँकेवर घातलेले आहेत. त्यामूळे अर्जदाराची गुंतवलेली रक्कम त्यांना वापस मिळून शकली नाही असे करुन सेवेत ञूटी होणार नाही. अर्जदार क्र. 1 व 2 यांचे मूदत ठेवीच्या रक्कम वापस देण्याचा दिनांक हा 2009 आहे. म्हणजे अर्जदार यांना मूदत पूर्व रक्कम हवी आहे असे दिसते व यातील अर्जदार क्र. 2 यांनी हार्डशिप ग्राऊंडवर रु.75,000/- उचलल्याचे गैरअर्जदार म्हणतात. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदारांचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार क्र. 1 यांचे दुसरे हार्डशिप ग्राऊंड वरील प्रपोजल आवश्यक त्या कागदपञासह व योग्य ती शिफारस करुन आर.बी.आय. कडे पाठवावे व आर.बी.आय. कडून मंजूर होऊन आलेली रक्कम गैरअर्जदारांनी ताबडतोब अर्जदार क्र. 1 यांना दयावी. तसेच गैरअर्जदार क्र. 2 यांचे हार्डशिप ग्राऊंड वरील प्रपोजल आवश्यक त्या कागदपञासह व योग्य ती शिफारस करुन आर.बी.आय. कडे पाठवावे व आर.बी.आय. कडून मंजूर होऊन आलेली रक्कम गैरअर्जदारांनी ताबडतोब अर्जदार क्र. 2 यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च ज्याचा त्यांनी आपआपला सोसावा. 5. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |