जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.145/2008. प्रकरण दाखल दिनांक – 09/04/2008. प्रकरण निकाल दिनांक – 13/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. सौ.नलिनी विजयराव भागानगरे, अर्जदार. वय वर्षे 53, धंदा घरकाम, रा.33, पाटबंधारे नगर, तरोड रोड, नांदेड-5. विरुध्द. 1. एन.बी.टेलीशॉपींग प्रा.लि., गैरअर्जदार. द्वारा – प्रोप्रा.5 वा मजला, 5/सी मेट्रो हाऊस, वाणी विहार स्केअर, भुवनेशवर (ओरीसा) 2. पोस्ट ऑफिस तरोडा रोड, द्वारा- पोस्ट मास्टर नांदेड-5. 3. सुपरिटेंडंट ऑफ पोस्ट ऑफिसेस, द्वारा- सुपरिंटेंडंट नांदेड वीभाग,नांदेड 52, शिवाजीनगर,नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.एम.डी.देशपांडे. गैरअर्जदार क्र. 1 तर्फे - एकतर्फा. गैरअर्जदार क्र.2 ते 3 - अड.श्रीमती.ए.एस.बंगाळे. निकालपत्र (द्वारा मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे,अध्यक्ष) यातील अर्जदार सौ.नलिनी भागानगरे यांची थोडक्यात तक्रार अशी की, त्यांनी दुरचित्रवाणीवर रुद्राक्ष विक्रीची जाहीरात पाहुन गैरअर्जदार क्र. 1 यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन चौकशी केली. रुद्राक्षाला रु.3,050/- एवढी किंमत लागेल व त्याची व्हि.पी. सोडवावी लागेल असे सांगितले. त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 कडे मागणी नोंदविल. 8-9 दिवसांत व्हि.पी. बाबतची सुचनापत्रक दि.24/03/2008 रोजी गैरअर्जदार क्र. 2 मार्फत प्राप्त झाली,त्यावर विस्तृत माहीती नव्हती. त्यांनी दि.29/03/2008 रोजी व्हि.पी.सोडवुन घेतली परंतु ते उघडुन पाहीले तेंव्हा तीचे पती व शेजारी एस.एस.दिवान हे होते. त्यामध्ये एकमुखी रुद्राक्ष व चैन सोडुन सी.डी.,महायंत्रम,सर्टीफिकेट ऑफ गॅरंटी त्यावर तारीख नंबर नव्हता आणि पुस्तीका असे प्राप्त झाले, त्यात बिलही नव्हते. अशा प्रकारे गैरअर्जदार क्र. 1 ने अनुचित सेवा दिली आणि धंदयातील अनुचित पध्दतचा अवलंब केला. यात सौ.नलिनी भागानगरे यांनी तरोडारोड पोष्ट ऑफिसला संपर्क साधुन तक्रार केली आणि .व्हि.पी. ची रक्कम गैरअर्जदार क्र. ला अदा करु नये असे सांगितले. जाहीरातीतील भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन सुध्दा याबाबत तक्रार केली त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. गैरअर्जदार क्र. 3 कडुन ऑर्डरची प्रत आणि बिल मागण्यात आले, याबाबतचा खुलासा अर्जदाराने दिला कारण बिल आलेच नव्हते. या सर्व प्रकारामुळे त्यांना खुप मानसिक व शारीरिक त्रास झाला. ज्या भ्रमणध्वनी क्रमांकावर आदेश देण्यात आला होता तो स्थानिक आहे व गैरअर्जदार क्र. 1 हे आपला व्यवसाय मंचाच्या कार्यक्षेत्रात त्याद्वारे करतात म्हणुन ही तक्रार दाखल करुन त्यांनी रुद्राक्षासाठी गैरअर्जदाराकडे दिलेले रक्कम रु.3,050/- गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने अर्जदारास परत करावे तीवर 18 टक्के व्याज गैरअर्जदार क्र. 1 ने द्यावे व त्यांना झालेल्या मानसिक शारिरीक व आर्थीक नुकसानीबद्यल गैरअर्जदार क्र. 1 ने रु.25,000/- द्यावे व तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावे अशा मागण्या केल्या आहेत. यात गैरअर्जदारांना नोटीस देण्यात आली. गैरअर्जदार क्र. 1 ला रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठविलण्यात आली ती घेण्यास इन्कार दिला म्हणुन ती परत आली यास्तव त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दि.10/06/2008 रोजी पारीत केला. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांनी व्हि.पी.संबंधीची बाब तसेच अर्जदाराने त्यांचेकडे तक्रारी संबंधीच्या बाबी मान्य केल्या, इतर मजकुर माहीतीच्या अभावी नाकबुल केली, व या प्रकरणी त्यांनी सेवेत कोणताही दोष ठेवलेला नाही यास्तव त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज व्हावी असा उजर घेतला. अर्जदार यांनी आपल्या तक्रारअर्जा सोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केले. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत कोणतेही दस्तऐवज व शपथपत्र दाखल दाखल केले नाही. अर्जदारा तर्फे वकील एस.डी.देशपांड आणि गैरअर्जदारा तर्फे वकील श्रीमती.ए.एस.बंगाळे यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरणांत मुख्य तक्रार गैरअर्जदार क्र.1 यांच्या विरुध्द आहे व गैरअर्जदार क्र. 1 ला रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवुनही ते हजर झाले नाही वा त्यांनी आपला बचाव केला नाही वा म्हणणे मांडले नाही. त्यांना या प्रकरणांत कोणताही बचाव करावयाचा नव्हता हे स्पष्ट आहे. अर्जदार यांनी भ्रमणध्वनीद्वारे आदेश दिला व त्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 ने त्यांना व्हि.पी. पार्सल गैरअर्जदार क्र. 2 व 3 च्या मार्फत पाठविला ते अर्जदारांना मिळाले त्यांनी त्याच दिवशी फोडुन पाहीले त्यात रुद्राक्ष व चैन नव्हते इतर बाबी मात्र होत्या असे दिसुन येते आणि म्हणुन त्यांनी लगेच त्याच दिवशी गैरअर्जदार क्र.2 कडे तक्रार केली. सदरची तक्रार रेकॉर्डवर दाखल आहे. त्यामध्ये रुद्राक्ष व चैन, डिलीव्हरी चालन बिल मिळाले नाही अशी तक्रार त्यांनी त्वरीत केली. अशा परिस्थितीत त्यांची तक्रार खोटी असण्याचे कारण आम्हास दिसुन येत नाही. अर्जदाराने तातडीने कार्यवाही केली म्हणुन गैरअर्जदार क्र. 2 ने त्यांचे व्हि.पी.ची रक्क्म रोखुन ठेवली, असे दिसते की, रु.3,050/- चा व्हि.पी.पोटी एकुण रु.3,203/- गैरअर्जदार क्र.2 कडे द्यावे लागले ही बाब गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना मान्य आहे. अर्जदारास अशा प्रकारे मुख्य वस्तुच प्राप्त झाली नाही तेंव्हा गैरअर्जदार क्र. 1 ने सेवेत त्रुटी ठेवली तसेच अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे. दुरचित्रवाणीवर आकर्षक जाहीरात देऊन हा फसवणुकीचा प्रकार आहे. स्वाभावीकच अर्जदाराला मानसिक त्रासा झाला आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी या प्रकरणांत कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी ठेवली नाही व या प्रकरणांत आवश्यक अशी प्रतिपक्ष आहे. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यात येते. 2. गैरअर्जदार क्र. 2 कडे अर्जदाराने जमा केलेली रक्कम रु.3,203/- अर्जदारास परत करावे. 3. गैरअर्जदार क्र.1 ने सदर रक्कमेवर दि.29/03/2008 पासुन ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतोचे कालावधी करीता द.सा.द.शे.12 टक्के व्याज द्यावे. 4. गैरअर्जदार क्र. 1 ने अर्जदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.5,000/- द्यावे आणि तक्रारीचा खर्च रु.1,000/- द्यावे. 5. आदेशाचे पालन एक महिन्यात करावे. 6. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |