Maharashtra

Ahmednagar

CC/17/115

Sopan Vitthal Gondkar - Complainant(s)

Versus

My Arvind Seals Agency, Karita Pro-Pra. Arvind Pandurang Bawke - Opp.Party(s)

Pingle

05 Apr 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/115
( Date of Filing : 06 Apr 2017 )
 
1. Sopan Vitthal Gondkar
Shirdi, Tal- Rahata,
Ahmadnager
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. My Arvind Seals Agency, Karita Pro-Pra. Arvind Pandurang Bawke
A/P- Sakuri, Tal- Rahata
Ahmadnager
Maharashtra
2. Manager, Advance Pesticides
Gate No 152/2/1, A/P- Brahmanwade, Tal- Sinnar, Nashik
Nashik
Maharashtra
3. Manager, Purva Chemicals Ltd.
24 To 29, Samarth Co-Op.Industrial Estate, Mukhed Road, Pimpalgaon Bu, Tal- Niphad
Ahmadnager
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Pingle , Advocate
For the Opp. Party: M.D.Sarda & M.S. Kabra, Advocate
Dated : 05 Apr 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     तक्रारदार हा शेतकरी असून तो शेती व्‍यवसाय करता. तो त्‍याचे शेतीमध्‍ये सोयाबीन, मका, गहु अशी पिके करतो. सामनेवाले नं.1 यांचा शेतीचे औषध विक्रीचा व्‍यवसाय आहे. त्‍यांचे मौजे साकुरी येथे मे.अरविंद सेल्‍स एजन्‍सी या नावाने दुकान आहे. त्‍यामुळे अर्जदार ग्राहक व सामनेवाले हे विक्रेता असे नाते उभयतांमध्‍ये निर्माण झालेले आहे.

3.   सामनेवाले नं.1 यांचे कृषी सेवा केंद्रामधून तक्रारदाराने त्‍यांचे मालकीचे मौजे शिर्डी येथील गट नं.13/1, 13/5 व 27/3 याचे एकत्रीत क्षेत्र 1 हे. या गव्‍हाचे पिकातील तणावर फवारणी करणेसाठी तणनाशक औषधाची मागणी सामनेवाले नं.1 यांचे दुकानात केली व त्‍यामुळे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास त्‍यांचे दुकानातुन सदर गव्‍हावरील तणनागशक म्‍हणून पुढील औषधे दिली.

1) Mitsu-8 G Batch No.161005.

2) Leafan 50 % 1 Lit.

3) Folibooster 1 Lit.

4.   सदरच्‍या औषधामुळे गव्‍हातील तण जळून जाईल, असा विश्‍वास व भरोसा सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास दिला व वरील औषधाचे परिणामामुळे फक्‍त गव्‍हातील तण जळून गव्‍हाचे पिक जोमदार येईल, असा विश्‍वास व भरोसा तक्रारदारास दिल्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले नं.1 कडून खरेदी केलेली सामनेवाले नं.2 व 3 यांचे कंपनीची वर नमुद औषधे अनुक्रमे सामनेवाले नं.2 कंपनीचे  Mitsu-8 G Batch No.161005 व  Leafan 50 % 1 Lit. व सामनेवाले नं.3 कंपनीचे Folibooster 1 Lit. ही औषधे खरेदी केली. त्‍याचा बिल नं.सीओएम 10302 ता.15.12.2016 असे आहे व सामनेवाले नं.1 याने सांगितल्‍याप्रमाणे वरील औषधाची रक्‍कम रु.1540/- देवून तक्रारदाराने त्‍याचे बिल अदा केले. सामनेवाले नं.1 ने सांगितल्‍याप्रमाणे वर दिलेल्‍या औषधाची फवारणी तक्रारदाराने त्‍यांचे वरील जमीनीतील गव्‍हाचे पिकास केली असता तक्रारदाराचे सदर गव्‍हाचे पिक हे पिवळसर होवून त्‍याची वाढ खुंटून गेली व संपुर्ण गव्‍हाचे पिक जळून नष्‍ट झाले. वस्‍तुतः वरील औषधामुळे व सुचविल्‍याप्रमाणे तक्रारदाराचे गव्‍हातील तण जळून जोणे जरुरीचे होते, परंतु तसे न होता संपुर्ण गव्‍हाचे पिकावरील औषधामुळे नष्‍ट झालेले आहे व त्‍यामुळे तक्रारदाराचे मोठे प्रमाणात नुकसानही झाले. अशा प्रकारे तक्रारदारास चुकीची, भेसळयुक्‍त, सदोष औषधे सामनेवाले नं.1 ने दिली. व तक्रारदाराची फसवणूक केली. त्‍यासाठी सामनेवाले नं.1 ते 3 वैयक्तिकरित्‍या सर्वस्‍वी जबाबदार आहेत.

5.   तक्रारदाराने वरील जमीनीतील गव्‍हाचे पिकासाठी नांगरट, रोटा कल्‍टी व्‍हेटर, 15 ट्रेलर शेणखत, युरिया, इफको, ग्रीन गोल्‍ड रासायनिक खत तसेच मशागतीसाठी सुमारे रु.79,350/- खर्च केलेला आहे. परंतु तुमचे भेसळयुक्‍त सदोष औषधामुळे व सामनेवाले नं.1 ते 3 च्‍या कृतीमुळे व दिलेल्‍या चुकीच्‍या औषधामुळे गव्‍हाचे पिक संपुर्ण जळून नष्‍ट झालेले आहे. त्‍यामुळे मशागतीसाठी तक्रारदारास जो खर्च रु.79,350/- झाला. तसेच गव्‍हाचे पिकाचे उत्‍पन्‍न तक्रारदारास सुमारे 60 क्विंटल इतके मिळाले असते व त्‍याची किंमत सुमारे 1,08,000/- इतके उत्‍पन्‍न मिळाले असते. म्‍हणजे तक्रारदारास सुमारे रु.28,650/- इतका नफा झाला असता, परंतु सामनेवाले नं.1 ते 3 चे भेसळयुक्‍त सदोष औषधामुळे व सामनेवाले नं.1 ते 3 च्‍या निष्‍काळजीपणामुळे, कृतीमुळे व सामनेवाले नं.2 व 3 चे कंपनीच्‍या भेसळयुक्‍त सदोष औषधामुळे व चुकीच्‍या तण नाशक औषधामुळे तक्रारदाराचे गव्‍हाचे पिक जळून गेल्‍यामुळे नुकसान झालेले आहे. त्‍यामुळे गहू पिकाचा खर्च रु.79,350/- अधिक गहु पिकाचा नफा रु.28,650/- अशी एकूण रु.1,08,000/- नुकसान भरपाई देण्‍याची सामनेवाले नं.1 ते 3 यांची जबाबदारी वैयक्‍तीक व संयुक्‍तीक अशी आहे. सामनेवाले नं.1 ने सामनेवाले नं.2 व 3 चे वर नमुद कंपनीचे सदोष औषधे तक्रारदाराचे गव्‍हाचे पिकावर फवारणीसाठी देवून अनफेअर ट्रेड प्रॅक्‍टीसचा गंभीर गुन्‍हा सुध्‍दा केलेला आहे. सामनेवाले नं.1 यांना वेळोवेळी भेटूनही तक्रारदाराने त्‍यांचे झालेल्‍या नुकसानीबाबत सांगितलेले आहे. तसेच तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी राहाता जि.अहमदनगर यांचेकडेही रितसर सामनेवाले नं.1 विरुध्‍द तक्रार अर्ज करुन कृषी अधिकारी यांनीही सदरचे पिकाची समक्ष शेतात येवून पहाणी करुन पंचनामे सुध्‍दा केलेले आहे. त्‍याबद्दलही तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यास वेळोवेळी कल्‍पना दिलेली आहे व त्‍याकामी  सामनेवाले नं.1 ने तक्रारदारास टाळाटाळीची उत्‍तरे दिलेली आहेत. त्‍यामुळे तक्रारदाराने अॅड.जे.के.गोंदकर यांचेमार्फत दिनांक 02.03.2017 रोजी वरील नुकसानीबद्दल रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविलेली आहे. त्‍याबद्दल सामनेवाले नं.1 ने आज पावेतो सदर नोटीसला कोणतेही उत्‍तर दिलेले नाही. तसेच त्‍यानंतर सामनेवाले नं.2 व 3 यांनासुध्‍दा सदर घटनेबाबत अॅड.आर.एम.पिंगळे यांचेमार्फत रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठवून कळविलेले आहे. व  त्‍यानंतर सामनेवाले नं.2 अॅडव्‍हान्‍स पेस्‍टीसाईड यांनी खोटया व लबाडीच्‍या मजकूराचे नोटीस उत्‍तर देवून आपली जबाबदारी टाळलेली आहे. सामनेवाले नं.1 व 3 ने नोटीसीबद्दल कोणताही खुलासा आजपोवेतो केलेला नाही व त्‍यांनीही जबाबदारी टाळण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे व तक्रारदाराचे मानसिक व आर्थिक नुकसान केलेले आहे.

6.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज वकील फी व खर्चासह मंजुर करण्‍यात यावा. अर्जातील कारणास्‍तव सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराचे गव्‍हाचे पिकासाठी झालेल्‍या खर्चाची रक्‍कम रु.79,350/- व गहु पिकाचा अपेक्षीत नफा रु.28,650/- अशी एकुण रु.1,08,000/- प्रचलीत व्‍याजासह तक्रारदारास देण्‍याचा हुकूम सामनेवाले नं.1 ते 3 विरुध्‍द वहावा. तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी, मनस्‍तापापोटी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरत्‍या रक्‍कम रु.1,00,000/- तक्रारदारास देण्‍याचा हुकूम सामनेवाले नं.1 ते 3 विरुध्‍द व्‍हावा.

7.   तक्रारदाराने तक्रारीसोबत निशाणी 2 ला अॅफिडेव्‍हीट तसेच निशाणी 5 ला खालील प्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

1) तक्रारदाराचे मालकीचे जमीनीचा खाते क्र.3495 चा खातेउतारा सर्टीफाईड प्रत दिनांक 30.03.2017.

2) शिर्डी येथील सर्वे नं.13/1 चा 7/12 उतारा सर्टीफाईड प्रत दिनांक 30.03.2017

3) शिर्डी येथील सर्वे नं.13/5 चा 7/12 उतारा सर्टीफाईड प्रत दिनांक 30.03.2017

4) शिर्डी येथील सर्वे नं.27/3 चा 7/12 उतारा सर्टीफाईड प्रत दिनांक 30.03.2017

5) श्रीकृष्‍ण कृषी सेवा केंद्र यांचे गव्‍हाचे बियाणे खरेदी केल्‍याचे बील दिनांक 17.11.2016

6) शिडी वि.का.सेवा सह.सोसायटी लि.शिर्डी यांचे बील नं.5956 ची कलर झेरॉक्‍स प्रत दिनांक 16.11.2016.

7) शिर्डी वि.का.सेवा सह.सोसायटी लि.शिर्डी यांचे बील नं.5957 ची कलर झेरॉक्‍स प्रत दिनांक 16.11.2016.

8) मे.अरविंद सेल्‍स एजन्‍सी यांचे दिनांक 15.12.2016 चे बिल झेरॉक्‍स प्रत.

9) कृषी अधिकारी, पंचायत समिती राहाता यांना दिलेला दिनांक 27.12.2016 चा अर्ज 27.12.2016.

10) तालुका बियाणे तक्रार निवारण समिती प्रक्षेत्र पाहाणी अहवाल पंचनाम्‍यासह सत्‍य प्रत दिनांक 10.01.2017.

11) सामनेवाले नं.1 यांची आलेली पोहच दिनांक 14.03.2017

12) सामनेवाले नं.1 यांची आलेली पोहच दिनांक 14.03.2017

13) सामनेवाले नं.2 व 3 यांना पाठविलेली नोटीस स्‍थळ प्रत दिनांक 23.3.2017.

14) सामनेवाले नं.2 यांनी पाठविलेले नोटीस उत्‍तर 16.9.2015

15) अर्जदाराचे गव्‍हाचे पिकाचे झालेल्‍या नुकसानीचा फोटो कलर झेरॉक्‍स.

8.   तक्रारदाराची तक्रार दाखल करण्‍यात येऊन सामनेवालांना मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आली. त्‍याप्रमाणे सामनेवाला मे.मंचात हजर झाले. त्‍यापैकी सामनेवाला नं.1 यांना तक्रारकर्ताचे तक्रारीतील कथन खोडलेले असून सामनेवाला नं.1 यांना असे कथन केले आहे की, सामनेवाला नं.1 हा मौजे साकुरी येथे शेतीस उपयुक्‍त औषध विक्रीचा व्‍यवसाय करतात. सामनेवाले नं.1 यांचा संपुर्ण व्‍यवसाय हा विश्‍वासावर आधारीत असून ते संबधीत कंपनीच्‍या विश्‍वास व भरवशावर सदरील व्‍यवसाय करतात. औषध कंपनी ज्‍या प्रमाणे सुचना व मार्गदर्शन करते त्‍या प्रमाणे सामनेवाले नं.1 हे शेतक-यांना योग्‍य त्‍या सुचना करुन सल्‍ला मसलत करुनच औषधे देत असतात. तसेच सदरील औषध विक्रेत्‍यांने संबधीत कालावधीत अनेक शेतक-यांना त्‍याच औषधाची विक्री केली परंतू त्‍यामध्‍ये कोणाचीही कोणतीही तक्रार आलेली नाही. म्‍हणजेच त्‍यांनी दिलेल्या सुचनांचे व नियमांचे योग्‍य ते पालन करुनच शेती मालांस औषध फवारणी केलेली आहे. संबधीत शेतक-यांची यादी ऐनवेळी मे.न्‍यायालयात सादर करण्‍यांस सामनेवाले नं.1 हे तयार आहेत. प्रस्‍तुत अर्जातील शेतक-याने सामनेवाले यांनी दिलेल्‍या सुचनांचे व सल्‍ल्‍यांचे कुठल्‍याही प्रकारे पालन न करता मनमानेल त्‍या पध्‍दतीने व चुकीच्‍या पध्‍दतीने औषध फवारणी केलेली असेल. त्‍यामुळे त्‍यास सर्वस्‍वी तोच म्‍हणजेच मुळ शेतकरीच जबाबदार आहेत. त्‍यांस सामनेवाला नं.1 यांने नुकसान भरपाई देण्‍याची कोणतीही नैतिक जबाबदारी नाही. सदरील शेतक-यांने सामनेवाले नं.1 यांना चुकीची माहिती दिली. त्‍याने सदरील औषध हे तिन एकरासाठी पाहिजे असल्‍यांचे सांगितले व प्रत्‍यक्षात अडीच एकरांसाठी वापरले. तसेच शेत मजुराने 500 लि.पाणी वापरणे ऐवजी 200 लि. पाणी वापरले आहे. त्‍यामुळे औषधाचे प्रमाण व त्‍यातील औषधाचा होणारा परीणाम हा कमी जास्‍त स्‍वरुपात झालेला आहे. तसेच शेतक-यांने औषधे घेतांना स्‍वतः विकत घेतलेली मात्रा शेतीत उपयोग करताना शेतातील शेत मजुराचे साहयाने शेतातील पिकांस फवारणी केलेली आहे. यामध्‍ये औषध विक्रेत्‍याचा सल्‍ला घेणारा शेतकरी वेगळा तर फवारणी करणारा शेत मजुर दुसरा असल्‍याने होणा-या नुकसानीस फक्‍त शेतकरीच जबाबदार असल्‍याने त्‍याचे थोडया नुकसानीची जबाबदारी सामनेवाले नं.1 म्‍हणजेच औषधविक्रेत्‍यावर येत नाही.

9.   तसेच शेतक-याने स्‍वतः फवारणी केलेली नसल्‍याने सदर विकत घेतलेले औषधे त्‍यांचे शेतमजुराचे हवाली केलेले आहेत. त्‍यामध्‍ये औषध विक्रेत्‍यांने सांगितल्‍याप्रमाणे तण नाशक स्‍वतंत्र मारणे गरजेचे असतांना शेतमजुराने सर्व औषधे एकत्र करुन शेतात फवारले असल्‍याने शेतक-याचे नुकसान झालेले आहे. त्‍यांस फक्‍त शेतकरीच जबाबदार आहे. त्‍यामुळे शेतक-यांस नुकसान भरपाई सामनेवाले नं.1 कडे मागता येणार नाही. तसेच योग्‍य त्‍या सुचनांचा वापर न करता बेफिकीरीने औषधे वापरले आहे. त्‍यामुळे संबधीत शेतकरी हा सत्‍य परीस्थिती लपवून ठेवुन मे.कोर्टात आलेला आहे. तसेच शेतक-यांची तक्रार आल्‍यानंतर औषध विक्रेत्‍याने तातडीने शेतात जाऊन शेताची पाहाणी केली असता गव्‍हाचे पिक हे पिवळसर दिसत असल्‍याने लक्षात आले. त्‍यावेळी संबधीत सामनेवाले नं.1 यांनी शेतक-यांस तातडीने गव्‍हाचे पिकांस पाणी देण्‍यांचे सांगितले. परंतू सदरील शेतक-याने त्‍याकडे जाणीव पुर्वक व हेतूपुस्‍कररित्‍या दुर्लक्ष केले व गव्‍हाचे पिकांस वेळेत पाणी दिले नाही. त्‍या ऐवजी सदरील   शेतक-यांने केलेले नाही. तसेच सदरील शेत माल सुधारणे साठी संबधीत सामनेवाले नं.1 यांनी काही औषधे संबधीत शेतक-यास दिलेले आहे त्‍याचा देखील त्‍याने वापर केला नसल्‍याने देखील सदरील गव्‍हाचे पिकांचे नुकसान झालेले आहे. त्‍यामुळे सदरील गव्‍हाचे पिकांचे थोडयाशा प्रमाणात झालेल्‍या नुकसानीस फक्‍त संबधीत शेतकरीच जबाबदार आहे. त्‍यामुळे देखील सदरील शेतक-याचे नुकसान झालेले आहे. त्‍या कारणांस्‍तव सदर शेतक-यांस सामनेवाले नं.1 यांनी नुकसान भरपाई देण्‍याची कोणतीही गरज व आवश्‍यकता नाही. त्‍याचे शेतमालाचे थोडया प्रमाणात झालेल्‍या नुकसानीस फक्‍त शेतकरी स्‍वतःच जबाबदार आहे. त्‍यांचे क्षेत्राजवळील शेतक-यांनी औषध फवारणी केलेली आहे व त्‍यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. तसेच संबधीत कृषी अधिकारी यांनी सदरील शेत मालाची पाहाणी केली व त्‍याच औषध माल वापरलेल्‍या इतर शेतक-यांच्‍या मालांची देखील पाहाणी केली असता त्‍यांचे शेतमालास कुठलाही धोका अगर नुकसान झालेले दिसले नाही तसे त्‍यांचे जाब जबाब देखील संबधीत कृषी अधका-याने घेतलेले आहे. त्‍यामुळे त्‍यांस सामनेवाले नं.1 कडून कोणत्‍याही कारणास्‍तव नुकसान भरपाई देता येणार नाही.

10.  सामनेवाले नं.1 यांनी निशाणी 8 सोबत खालील प्रमाणे कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

1) दंडवते मधुकर सोपान यांचे औषधाचे बील दिनांक 23.1.2017.

2) पोटे अरुन बाबासाहेब यांचे औषधाचे बील दिनांक 27.12.2017.

3) गोंदकर सोपान विठ्ठल यांचे औषधाचे बील दिनांक 23.12.2016.

4) कृषी अधिकारी राहाता यांनी पंचनामा दिनांक 10.1.2017.

5) अरुण बबन पोटे यांचे अॅफिडेव्‍हीट दिनांक 27.1.2017.

6) संबधीत शेतमालाचे फोटोग्राफ

7) सदरील औषध खरेदी करणा-या इतर शेतक-यांचे नावे व बिल 251 शेतकरी 742 नग दिनांक 31.3.2017 ते 1.4.2017.

11.  सामनेवाला नं.2 यांनी निशाणी 11 ला त्‍यांचा लेखी जबाब दाखल केलेला आहे. त्‍यांचे जबाबात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने ही तक्रार पुर्णतः दोषपुर्ण दाखल केलेली असून त्‍यास कसल्‍याही प्रकारे कायद्याचा आधार नाही. अर्जदाराने संपुर्ण प्रकरणामध्‍ये कोठेही नमुद केलेले नाही की, त्‍याने सदर पिकाची पेरणी कधी केली व पेरणीनंतर किती दिवसांनी त्‍याने पिकावर फवारणी केली आहे. तसेच प्रकरणामध्‍ये कृषी अधिकारी यांनी कोणत्‍या तारखेस शेत पाहाणी केली याची सुध्‍दा तारीख कोठेही नमुद केलेली नाही. तसेच अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवाल प्रकरणामध्‍ये दाखल केला जो फक्‍त प्रथम दर्शनी असल्‍याने त्‍याला कसलाही आधार नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवाल हा फक्‍त शेत गट नं.13 चा आहे व अर्जदार हा 3 वेगवेगळया गट नं. चे शेतात फवारणी केल्‍याचे सांगत आहे. त्‍यामुळे अर्जदाराचे कथनास कोठेही दुजोरा मिळत नसल्‍याने अर्जदाराचे कथनावर विशवास ठेवणे नैसर्गिक न्‍याय विरोधी आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामध्‍ये सामनेवाला नं.2 यांचे औषधे व सामनेवाला नं.3 चे सुध्‍दा औषध वापरल्‍याचे सांगत आहे. सामनेवाला नं.2 नमुद करतात की, अर्जदाराने जर तिनही औषधे हे एकाच शेतात वापरले असल्‍याचे दिसून येते कारण की, सदरचा अहवाल हा फक्‍त गट नं.13 चाच आहे. याचाच अर्थ की अर्जदाराने केलेली फवारणी ही चुकीच्‍या पध्‍दतीने केली आहे. ज्‍यामुळे नेमके कोणाच्‍या औषधामुळे नुकसान झाले आहे हे स्‍पष्‍ट होत नाही. वास्‍तविक पाहता जर अर्जदाराने औषधी फवारणी करतांना एकाच पध्‍दतीने वेगवेगळया कंपनीचे औषधी फवारणी केली त्‍यामुळे अर्जदार हा स्‍वतः त्‍याचे नुकसानीस जबाबदार आहे. त्‍यामुळे सामनेवाले नं.2 कोणत्‍याही नुकसान भरपाईस जबाबदार नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामधील अनु क्र.17 मधील अ) तणनाशकाचा वापर केला आहे / नाही असल्‍यास कधी... कोणते तणनाशक वापरले... किती प्रमाणात.. फवारणी पंप ... कोणी फवारले.. वेळ पावती आहे नाही असल्‍यास तपशिल... यामध्‍ये कोणतीही माहिती अथवा अभिप्राय दिलेला नाही. जेव्‍हा की, कृषी अधिकारी यांनी सदर संपुर्ण माहिती अहवालामध्‍ये देणे आवश्‍यक होते. परंतू त्‍यांनी केले नाही. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा नैसर्गिक न्‍याय विरोधी असल्‍याने रद्द होण्‍यास पात्र आहे.

12.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामधील अनु.क्र.24 प्रमाणे समांतर प्‍लॉट पाहणी निष्‍कर्षः- समांतर प्‍लॉटची पाहणी केली असता सदर शेतक-यांनी फक्‍त तणनाशक फवारणी केलेली आहे. त्‍यामुळे सदर   शेतक-याचे गहू पिकाचे नुकसान झालेले नाही.

13.  याचाच अर्थ की, अर्जदाराने कोठेही सामनेवाला यांचेमुळे नुकसान झालेले नसल्‍याने सामनेवाला नं.2 कोणत्‍याही नुकसान भरपाईस जबाबदार नाही.

14.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालातील अनु.26 समितीचा निषकर्षः- यामध्‍ये शेतक-याने मिस्‍तू तणनाशक व त्‍याअगोदर लिफान व बुस्‍टर यांचे फवारणी केली. त्‍यानंतर पाहणी मध्‍ये गहू पिक पिवळे झालेले दिसून आले. पिकांची वाढ खुंटली व ओंबे भरणेवर परिणाम होणार आहे. उत्‍पादन मिळणार नाही. शेतक-याचे आर्थिक नुकसान होणा आहे. सदर निष्‍कर्षाप्रमाणे अर्जदाराने एकाच पिकांवर 3 वेगवेगळी औषधी वापरली असे दिसून येते. त्‍यामुळे सामनेवाला नं.2 चे औषधी सदोष होती किंवा भेसळयुक्‍त होती असे समितीचे कोठेही म्‍हणणे नाही. सदरचे पिक हे औषधीमुळे पिवळे झाले असे समितीने कोठेही नमुद केलेले नाही. यामुळे सामनेवाला कोठेही दोषी ठरत नसल्‍याने कोणत्‍याही नुकसान भरपाईस जबाबदार नाही.

15.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालावर केवळ कृषी अधिकारी यांचीच सही आहे. तालुका तक्रार निवारण समिती अध्‍यक्ष यांनी सही केलेली नाही. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा नैसर्गिक न्‍यायत्‍त्वाचे विरोधी आहे.

16.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहणी अहवाल हा केवळ एकाच गट नं. चा आहे. अर्जदाराचे कथनाप्रमाणे 3 वेगवेगळे गट नं. चे शेतामध्‍ये फवारणी केल्‍याचे सांगत आहे. त्‍यामुळे अर्जदाराचे कथनात व समितीच्‍या अहवालात साम्‍यता दिसून येत नाही. जर 3 वेगवेगळे गट नं. शेती असतांना 3 वेगवेगळे शेत पाहाणी अहवाल समितीने देणे गरजेचे होते. परंतू तसे कोठेही दिसून येत नाही. त्‍यामुळे अर्जदाराचे कथन हे पुर्णता बनावटीचे असल्‍याने खारीज करणे योग्‍य आहे.

17.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामध्‍ये कोठेही नमुद नाही की, सामनेवाला नं.2 यांची औषधी सदोष किंवा भेसळयुक्‍त होती.

18.  सामेनवाले हे तणनाशकाबाबत त्‍याच्‍या वापरण्‍याची पध्‍दत कशी आहे आणि ते किती प्रमाणात वापरावे यासंबधी माहिती पत्रक कास्‍तकार यांना देतात. सदर माहिती पत्रकामध्‍ये तणनाशक वापराबाबत महत्‍वाच्‍या सुचना दिलेल्‍या असतात. यासंबधी सामनेवाला नं.2 यांचे माहिती पत्रकामध्‍ये शेवटी दिलेली आहे. सुचना या उत्‍पादनाचा वापर कंपनीच्‍या नियंत्रणाबाहेर आहे. त्‍यामुळे उत्‍पादनाची एकसमान गुणवत्‍ता सोडून इतर कोणतीही जबाबदारी आम्‍ही घेत नाही. असे नमुद आहे. करीता अर्जदाराने सुचना न पाळता तणनाशकाचा वापर केलेला असल्‍याने कोणत्‍याही नुकसान भरपाईस सामनेवाला नं.2 जबाबदार नाही.

अनयिमित हवामान व जास्‍त तापमानामुळे तसेच तणनाशकाचे अयोग्‍य प्रमाणात वार यामुळे परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे अर्जदाराने चुकीच्‍या पध्‍दतीने तणनाशकाची फवारणी केली असेलन तर अर्जदार हा त्‍यास स्‍वतः जबाबदार आहे.

19.  तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकासरी सदरची शेत मौका पाहाणी पंचनामा फक्‍त प्रथम दर्शनी पाहुन त्‍यांचा अहवाल सादर केला आहे. केवळ प्रथम दर्शनी पाहून अहवाल देणे योग्‍य नाही. कारण अहवाल देण्‍यापुर्वी त्‍या तणनाशकाची प्रयोगशाळेमध्‍ये परिक्षण करुन त्‍या नंतरच अहवाल द्यायला पाहिजे. कृषी अधिकारी यांनी तसे न करता केवळ प्रथम दर्शनी पाहून अहवाल दिला आहे. म्‍हणून हा अहवाल पुर्णतः दोषपुर्ण आहे.

20.  तसेच सामनेवाले नं.2 यांने सदर तणनाशकाची जिल्‍हयामध्‍ये भरपूर विक्री केलेली आहे. तक्रारकर्ता वगळता इतर कोणत्‍याही कास्‍तकाराने आजपर्यंत सदर तणनाशकाबाबत तक्रार केलेली नाही. याचा अर्थ की, तक्रारकर्ता याने सदर तणनाशकाची सुचनेप्रमाणे वापर केलेला नाही. तक्रारकर्ता याने सदर तणनाशकाची सुचनेप्रमाणे वापर केलेला नाही. तक्रारकर्ताने तणनाशकाची चुकीच्‍या पध्‍दतीने फवारणी केली असल्‍याने तक्रारकर्ता हा स्‍वतः नुकसानीस जबाबदार आहे. वरील कथनास बाधा न येता सामनेवाला नं.2 नमुद करु इच्‍छीतो की, सदर प्रकरणामध्‍ये सामनेवाला नं.2 निर्माता कंपनी यांना हे तणनाशक परिक्षण प्रयोग शाळेत पुढील परिक्षणासाठी पाठवायचे आहेत. त्‍याकरीता लागणारा सर्व खर्च सामनेवाला नं.2 करण्‍यास तयार आहे. करीता तक्रारकर्ताची तक्रार ही कायद्याच्‍या चौकटीत नसुन पुर्णता खोटी व बनावटी दाखल केली असल्‍यामुळे खर्चासह खारीज व्‍हावी अशी विनंती केली आहे.

21.  सामनेवाला नं.3 यांनी निशाणी 16 ला खुलासा दाखल केलेला आहे. त्‍यात त्‍यांनी असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. सामनेवाले नं.3 कंपनीचे उत्‍पादन सामनेवाले नं.1 दुकानदाराकडुन खरेदी केलेले आहे ही बाब केवळ मान्‍य व कबुल आहे. मात्र तक्रारदाराने संदर्भ तक्रारीमधील कलम 2 व 3 नुसार उत्‍पादनाबाबत केलेले तथाकथित दोषारोप आणि कलम 7 मधील मागणी सामनेवाले यास मान्‍य नसुन कबुल नाही.

22. तक्रारीमधील कथने उदा.सामनेवाले यांचे भेसळयुक्‍त, सदोष औषधामुळे व कृतीमुळे व दिलेलया चुकीच्‍या औषधामुळे तक्रारदाराचे गव्‍हाचे पिक जळुन नष्‍ट झाले. इ.दोषारोप मान्‍य व कबुल नाहीत. तसेच नमुद रक्‍कम रु.1,08,000/- खर्च / भरपाई मिळावी. नुकसानीस सामनेवाले यांची वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या जबाबदारी आहे व अन फेअर प्रॅक्‍टीसचा गंभीर गुन्‍हा केलेला आहे. इ. दोषारोप मान्‍य व कबुल नाही. तक्रारदाराने केलेले नमुद दोषारोप केवळ मोघम स्‍वरुपाचे असुन काल्‍पनिक आहेत. त्‍यात तथ्‍यांश व सत्‍यांश नाही. या शिवाय तक्रारीमधील कोणतीही विनंती कायदेशिर नसल्‍यामुळे सामनेवाले यास मान्‍य व कबूल नाही. त्‍यामुळे तक्रार फेटाळण्‍यात यावी.

23. तक्रारदाराचे कथनात व दोषारोपांमध्‍ये परस्‍पर विसंगती असुन तक्रारदाराने पिकांसाठी खरेदी केलेली उत्‍पादने/ औषधे योग्‍य त्‍या प्रमाणात आणि विशिष्‍ट निर्देशानुसार वापरलेली नाहीत असे तक्रारीमधील कथनानुसार स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे स्‍वतःचे चुकीमुळे घडलेल्‍या नुकसानीस तक्रारदार स्‍व्‍तःच जबाबदार आहे. म्‍हणून तक्रारीत नमुद भरपाई मागणी व इतर विनंती कायदेशिरपणे मान्‍य करता येणार नाही. त्‍यामुळे तक्रार रद्द करावी ही विनंती.

24.  सामनेवाले विनम्रपणे कळवितात की, सामनेवाले नं.3 कंपनी शेती संशोधनावर आधारीत दर्जेदार पिक पोषक व इतर उत्‍पादने बनविते. त्‍याबाबत कंपनीला उत्‍पादन व विक्रीचा मोठा अनुभव असुन बाजारपेठेत नावलौकीक असुन अनेक वर्षापासुन ग्राहक विश्वासाने उत्‍पादन वापरतात. सामनेवाले नं.3 कंपनीचे उत्‍पादन (Folibooster) कोणत्‍याही प्रकारचे औषध किंवा तणनाशक नाही. सामनेवाले नं.3 कंपनीचे उत्‍पादन (Folibooster ) हे केवळ पिक वाढीसाठचे पोषक असुन पिकांची प्रतिकारशक्‍ती वाढुन पिकांची अन्‍नद्रव्‍य शोषणाची व चयापयाची वाढविण्‍यास मदत होते. त्‍यामुळे पिकांचे उत्‍पादन व दर्जात लक्षणीय सुधारणा होत असते. नमुद उत्‍पादन हे कोणतेही औषध नसल्‍यामुळे कोणतेही अपायकारक किंवा हानीकारक परिणाम पिकांवर होत नाहीत हे नामवंत शेती विद्यापीठाचे परीक्षण व संशोधकानुसार सिध्‍द झालेले आहे. त्‍यामुळे तक्रारदाराचे संदर्भ दोषारोप सामनेवाले यास मान्‍य व कबुल नाहीत. म्‍हणून सदर तक्रार फेटाळण्‍यात यावी ही विनंती.

25.  वरील नमुद तक्रारदार यांनी सामनेवाला नं.3 कंपनीचे उत्‍पादन (Folibooster ) याचा उल्‍लेख औषध/ तणनाशक असा चुकीचा केलेला असुन नमुद उत्‍पादन कधीही औषध / तणनाशक म्‍हणुन विकले जात नाही. कारण नमुद उत्‍पादन हे केवळ पिकांसाठी पोषक म्‍हणुन वापरले जाते आणि त्‍याचे वापरांपासुन पिकांस कोणताही अपाय किंवा धोका पोहोचत नाही. नमुद विक्री केलेले उत्‍पादन हे योग्‍य काळजी घेऊन दर्जाबाबत परीक्षण करुन उत्‍पादीत केले जात असते. तसेच सदर उत्‍पादन वापराबाबत सविस्‍त सुचना उत्‍पादनासोबत दिल्‍या जातात व त्‍यांचे संपुर्णतः पालन खरेदीदार ग्राहकाने करणे ही अत्‍यावश्‍यक अट असते. त्‍यामुळे उत्‍पादनाचे सदोषपणाबाबत किंवा दर्जाबाबत तक्रारदाराने केलेले दोषारोप खरे नाहीत व कबुल नाहीत. याशिवाय तक्रारदाराने नमुद उत्‍पादन कसे व कधी आणि कोणत्‍या कारणांसाठी वापरले याचा स्‍पष्‍ट उल्‍लेख तक्रारीत नमुद नाही. तक्रारदाराने उत्‍पादनाचा वापर कसा केला यावर सामनेवाले यांचे कोणतेही नियंत्रण किंवा देखरेख नाही. नमुद उत्‍पादन वापरत असतांना किंवा नंतर लगेच आलेल्‍या कोणत्‍याही अडचणींसाठी तक्रारदाराने सामनेवाले नं.3 कंपनीस कधीही संपर्क केलेला नव्‍हता व नाही. त्‍यामुळे तक्रारदाराने केलेली शेती व कार्ये व फवारणी, पिक वाढ किंवा नुकसानी इ.कोणतीही माहिती सामनेवाले यांना मिळालेली नसल्‍यामुळे तथाकथीत नुकसानीस सामनेवाले नं.3 कंपनीस जबाबदार धरता येणार नाही. सामनेवाले यास उशीरा माहिती मिळाल्‍यानंतर सामनेवाले नं.1 दुकानदार मार्फत संपर्क साधुन तक्रारदारास उत्‍पादनाबाबत व वापराबाबत सविस्‍तर माहिती देण्‍यात आलेली होती. त्‍यामुळे तक्रार विनाकारण ठरवुन रद्द करावी, ही विनंती.

26.  सामनेवाले नं.3 कपंनीने संदर्भ उत्‍पादनाची महाराष्‍ट्र व जिल्‍हयात भरपुर विक्री केलेली असुन तक्रारदार वगळता इतर कोणाचीही तक्रार आजपर्यंत उत्‍पादक सामनेवाले यास मिळालेली नाही. तक्रारदाराने सामनेवाले नं.2 कंपनीचे औषधासोबत सामनेवाले नं.3 कंपनीचे पोषक उत्‍पादन एकत्रितपणे व चुकीच्‍या पध्‍दतीने फवारणी करीता वापरल्‍याचे दिसत आहे. नमुद बाब उत्‍पादकांचे वापर निर्देशांविरुध्‍द आहे. तक्रारदाराने स्‍वतः चुकीचे पध्‍दतीने उत्‍पादनाचा वापर केलेला असल्‍यामुळे त्‍याचे झालेले नुकसानीस स्‍वतः जबाबदार आहे. त्‍यामुळे तक्रार फेटाळावी.

27.  वरील कथनास बाध न येता, सामनेवाले नं.3 उत्‍पादक विनम्रपणे कळवितात की नमुद उत्‍पादन सदोष आहे किंवा नाही हे शासकीय प्रयोगशाळा परीक्षणाशिवाय सिध्‍द धरता येणार नाही. म्‍हणुन आवश्‍यकतेप्रमाणे नमुद परीक्षणाची परवानगी असावी.

28. सामनेवाले नं.3 खुलाशात नमुद कथनाशिवाय जादा खुलासा दाखल करण्‍यास आणि पुरावा कागदपत्रे सादर करण्‍यास परवानगी मिळावी अशी विनंती केली.

29.  सामनेवाले नं.3 कळवितो की तक्रारदाराची तक्रार विनाकारण असुन तक्रार फेटाळण्‍यात यावी व तक्रार कलम 7 नुसार केलेली कोणतीही विनंती मान्‍य करण्‍यात येऊ नये ही विनंती.

30.  तक्रारदार यांनी निशाणी 19 ला पुराव्‍याचे अॅफिडेव्‍हीट दाखल केलेले आहे. तक्रारदाराने त्‍यांचे लेखी युक्‍तीवाद निशाणी 22 ला दाखल केलेला आहे. त्‍यामध्‍ये तक्रारदाराने असे नमुद केलेले आहे की, तक्रारदार हा शेतकरी असून तो शेती व्‍यवसाय करता. तो त्‍याचे शेतीमध्‍ये सोयाबीन, मका, गहु अशी पिके करतो. सामनेवाले नं.1 यांचा शेतीचे औषध विक्रीचा व्‍यवसाय आहे. त्‍यांचे मौजे साकुरी येथे मे.अरविंद सेल्‍स एजन्‍सी या नावाने दुकान आहे. त्‍यामुळे अर्जदार ग्राहक व सामनेवाले हे विक्रेता असे नाते उभयतांमध्‍ये निर्माण झालेले आहे.

31.  सामनेवाले नं.1 यांचे कृषी सेवा केंद्रामधून तक्रारदाराने त्‍यांचे मालकीचे मौजे शिर्डी येथील गट नं.13/1, 13/5 व 27/3 याचे एकत्रीत क्षेत्र 1 हे. या गव्‍हाचे पिकातील तनावर फवारणी करणेसाठी तणनाशक औषधाची मागणी सामनेवाले नं.1 यांचे दुकानात केली व त्‍यामुळे सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास त्‍यांचे दुकानातुन सदर गव्‍हावरील तणनागशक म्‍हणून पुढील औषधे दिली.

1) Mitsu-8 G Batch No.161005.

2) Leafan 50 % 1 Lit.

3) Folibooster 1 Lit.

32.  सदरच्‍या औषधामुळे गव्‍हातील तण जळून जाईल, असा विश्‍वास व भरोसा सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारास दिला व वरील औषधाचे परिणामामुळे फक्‍त गव्‍हातील तन जळून गव्‍हाचे पिक जोमदार येईल, असा विश्‍वास व भरोसा तक्रारदारास दिल्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाले नं.1 कडून खरेदी केलेली सामनेवाले नं.2 व 3 यांचे कंपनीची वर नमुद औषधे अनुक्रमे सामनेवाले नं.2 कंपनीचे  Mitsu-8 G Batch No.161005 व  Leafan 50 % 1 Lit. व सामनेवाले नं.3 कंपनीचे Folibooster 1 Lit. ही औषधे खरेदी केली. त्‍याचा बिल नं.सीओएम 10302 ता.15.12.2016 असे आहे व सामनेवाले नं.1 याने सांगितल्‍याप्रमाणे वरील औषधाची रक्‍कम रु.1540/- देवून तक्रारदाराने त्‍याचे बिल अदा केले. सामनेवाले नं.1 ने सांगितल्‍याप्रमाणे वर दिलेल्‍या औषधाची फवारणी तक्रारदाराने त्‍यांचे वरील जमीनीतील गव्‍हाचे पिकास केली असता तक्रारदाराचे सदर गव्‍हाचे पिक हे पिवळसर होवून त्‍याची वाढ खुंटून गेली व संपुर्ण गव्‍हाचे पिक जळून नष्‍ट झाले. वस्‍तुतः वरील औषधामुळे व सुचविल्‍याप्रमाणे तक्रारदाराचे गव्‍हातील तण जळून जाणे जरुरीचे होते, परंतु तसे न होता संपुर्ण गव्‍हाचे पिक वरील औषधामुळे नष्‍ट झालेले आहे व त्‍यामुळे तक्रारदाराचे मोठे प्रमाणात नुकसानही झाले. अशा प्रकारे तक्रारदारास चुकीची, भेसळयुक्‍त, सदोष औषधे सामनेवाले नं.1 ने दिली. व तक्रारदाराची फसवणूक केली. त्‍यासाठी सामनेवाले नं.1 ते 3 वैयक्तिकरित्‍या सर्वस्‍वी जबाबदार आहेत.

33.  तक्रारदाराने वरील जमीनीतीत गव्‍हाचे पिकासाठी नांगरट, रोटा कल्‍टीव्‍हेटर, 15 ट्रेलर शेणखत, युरिया, इफको, ग्रीन गोल्‍ड रासायनिक खत तसेच मशागतीसाठी सुमारे रु.79,350/- खर्च केलेला आहे. परंतु तुमचे भेसळयुक्‍त सदोष औषधामुळे व सामनेवाले नं.1 ते 3 च्‍या कृतीमुळे व दिलेल्‍या चुकीच्‍या औषधामुळे गव्‍हाचे पिक संपुर्ण जळून नष्‍ट झालेले आहे. त्‍यामुळे मशागतीसाठी तक्रारदारास जो खर्च रु.79,350/- झाला. तसेच गव्‍हाचे पिकाचे उत्‍पन्‍न तक्रारदारास सुमारे 60 क्विंटल इतके मिळाले असते व त्‍याची किंमत सुमारे 1,08,000/- इतके उत्‍पन्‍न मिळाले असते. म्‍हणजे तक्रारदारास सुमारे रु.28,650/- इतका नफा झाला असता, परंतु सामनेवाले नं.1 ते 3 चे भेसळयुक्‍त सदोष औषधामुळे व सामनेवाले नं.1 ते 3 च्‍या निष्‍काळजीपणामुळे, कृतीमुळे व सामनेवाले नं.2 व 3 चे कंपनीच्‍या भेसळयुक्‍त सदोष औषधामुळे व चुकीच्‍या तण नाशक औषधामुळे तक्रारदाराचे गव्‍हाचे पिक जळून गेल्‍यामुळे नुकसान झालेले आहे. त्‍यामुळे गहू पिकाचा खर्च रु.79,350/- अधिक गहु पिकाचा नफा रु.28,650/- अशी एकूण रु.1,08,000/- नुकसान भरपाई देण्‍याची सामनेवाले नं.1 ते 3 यांची जबाबदारी वैयक्‍तीक व संयुक्‍तीक अशी आहे. सामनेवाले नं.1 ने सामनेवाले नं.2 व 3 चे वर नमुद कंपनीचे सदोष औषधे तक्रारदाराचे गव्‍हाचे पिकावर फवारणीसाठी देवून अनफेअर ट्रेड प्रॅक्‍टीसचा गंभीर गुन्‍हा सुध्‍दा केलेला आहे. सामनेवाले नं.1 यांना वेळोवेळी भेटूनही तक्रारदाराने त्‍यांचे झालेल्‍या नुकसानीबाबत सांगितलेले आहे. तसेच तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी राहाता जि.अहमदनगर यांचेकडेही रितसर सामनेवाले नं.1 विरुध्‍द तक्रार अर्ज करुन कृषी अधिकारी यांनीही सदरचे पिकाची समक्ष शेतात येवून पहाणी करुन पंचनामे सुध्‍दा केलेले आहे. त्‍याबद्दलही तक्रारदाराने सामनेवाले नं.1 यास वेळोवेळी कल्‍पना दिलेली आहे व त्‍याकामी  सामनेवाले नं.1 ने तक्रारदारास टाळाटाळीची उत्‍तरे दिलेली आहेत. त्‍यामुळे तक्रारदाराने अॅड.जे.के.गोंदकर यांचेमार्फत दिनांक 02.03.2017 रोजी वरील नुकसानीबद्दल रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविलेली आहे. त्‍याबद्दल सामनेवाले नं.1 ने आज पावेतो सदर नोटीसला कोणतेही उत्‍तर दिलेले नाही. तसेच त्‍यानंतर सामनेवाले नं.2 व 3 यांनासुध्‍दा सदर घटनेबाबत अॅड.आर.एम.पिंगळे यांचेमार्फत रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठवून कळविलेले आहे. व  त्‍यानंतर सामनेवाले नं.2 अॅडव्‍हान्‍स पेस्‍टीसाईड यांनी खोटया व लबाडीच्‍या मजकूराचे नोटीस उत्‍तर देवून आपली जबाबदारी टाळलेली आहे. सामनेवाले नं.1 व 3 ने नोटीसीबद्दल कोणताही खुलासा आजपोवेतो केलेला नाही व त्‍यांनीही जबाबदारी टाळण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे व तक्रारदाराचे मानसिक व आर्थिक नुकसान केलेले आहे.

34.  तक्रारदाराची अशी विनंती आहे की, तक्रारदाराचा तक्रार अर्ज वकील फी व खर्चासह मंजुर करण्‍यात यावा. अर्जातील कारणास्‍तव सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदारास वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराचे गव्‍हाचे पिकासाठी झालेल्‍या खर्चाची रक्‍कम रु.79,350/- व गहु पिकाचा अपेक्षीत नफा रु.28,650/- अशी एकुण रु.1,08,000/- प्रचलीत व्‍याजासह तक्रारदारास देण्‍याचा हुकूम सामनेवाले नं.1 ते 3 विरुध्‍द व्हावा. तक्रारदारास झालेल्‍या मानसिक त्रासापोटी, मनस्‍तापापोटी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरत्‍या रक्‍कम रु.1,00,000/- तक्रारदारास देण्‍याचा हुकूम सामनेवाले नं.1 ते 3 विरुध्‍द व्‍हावा. सोबत महात्‍मा फले कृषी विद्यापीठ राहुरी ग्रो-वर (Folibooster) बाबत तज्ञ परिक्षण अहवाल सत्‍य प्रत दाखल केली आहे. तसेच फोटी बुस्‍टर माहितीपत्रकाची सत्‍य प्रत दाखल केली आहे. आणि ग्रो- वर माहितीपत्रकाची सत्‍यप्रत दाखल केली आहे. सामनेवाले नं.3 यांचेविरुध्‍द तक्रार फेटाळण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

35.  सामनेवाला नं.2 यांनी निशाणी 23 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केली आहे. त्‍यात असे कथन केले आहे की, अर्जदाराने संपुर्ण प्रकरणामध्‍ये कोठेही नमुद केलेले नाही की, त्‍याने सदर पिकाची पेरणी कधी केली व पेरणीनंतर किती दिवसांनी त्‍याने पिकावर फवारणी केली आहे. तसेच प्रकरणामध्‍ये कृषी अधिकारी यांनी कोणत्‍या तारखेस शेत पाहाणी केली याची सुध्‍दा तारीख कोठेही नमुद केलेली नाही. तसेच अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवाल प्रकरणामध्‍ये दाखल केला जो फक्‍त प्रथम दर्शनी असल्‍याने त्‍याला कसलाही आधार नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवाल हा फक्‍त शेत गट नं.13 चा आहे व अर्जदार हा 3 वेगवेगळया गट नं. चे शेतात फवारणी केल्‍याचे सांगत आहे. त्‍यामुळे अर्जदाराचे कथनास कोठेही दुजोरा मिळत नसल्‍याने अर्जदाराचे कथनावर विशवास ठेवणे नैसर्गिक न्‍याय विरोधी आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामध्‍ये सामनेवाला नं.2 यांचे औषधे व सामनेवाला नं.3 चे सुध्‍दा औषध वापरल्‍याचे सांगत आहे. सामनेवाला नं.2 नमुद करतात की, अर्जदाराने जर तिनही औषधे हे एकाच शेतात वापरले असल्‍याचे दिसून येते कारण की, सदरचा अहवाल हा फक्‍त गट नं.13 चाच आहे. याचाच अर्थ की अर्जदाराने केलेली फवारणी ही चुकीच्‍या पध्‍दतीने केली आहे. ज्‍यामुळे नेमके कोणाच्‍या औषधामुळे नुकसान झाले आहे हे स्‍पष्‍ट होत नाही. वास्‍तविक पाहता जर अर्जदाराने औषधी फवारणी करतांना एकाच पध्‍दतीने वेगवेगळया कंपनीचे औषधी फवारणी केली त्‍यामुळे अर्जदार हा स्‍वतः त्‍याचे नुकसानीस जबाबदार आहे. त्‍यामुळे सामनेवाले नं.2 कोणत्‍याही नुकसान भरपाईस जबाबदार नाही. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामधील अनु क्र.17 मधील अ. तणनाशकाचा वापर केला आहे / नाही असल्‍यास कधी... कोणते तणनाशक वापरले... किती प्रमाणात.. फवारणी पंप ... कोणी फवारले.. वेळ पावती आहे / नाही असल्‍यास तपशिल... यामध्‍ये कोणतीही माहिती अथवा अभिप्राय दिलेला नाही. जेव्‍हा की, कृषी अधिकारी यांनी सदर संपुर्ण माहिती अहवालामध्‍ये देणे आवश्‍यक होते. परंतू त्‍यांनी केले नाही. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा नैसर्गिक न्‍याय विरोधी असल्‍याने रद्द होण्‍यास पात्र आहे.

36.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामधील अनु.क्र.24 प्रमाणे समांतर प्‍लॉट पाहणी निष्‍कर्षः- समांतर प्‍लॉटची पाहणी केली असता सदर शेतक-यांनी फक्‍त तणनाशक फवारणी केलेली आहे. त्‍यामुळे सदर   शेतक-याचे गहू पिकाचे नुकसान झालेले नाही.

37.  याचाच अर्थ की, अर्जदाराने कोठेही सामनेवाला यांचेमुळे नुकसान झालेले नसल्‍याने सामनेवाला नं.2 कोणत्‍याही नुकसान भरपाईस जबाबदार नाही.

38.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालातील अनु.26 समितीचा निषकर्षः- यामध्‍ये शेतक-याने मिस्‍तू तणनाशक व त्‍याअगोदर लिफान व बुस्‍टर यांचे फवारणी केली. त्‍यानंतर पाहणी मध्‍ये गहू पिक पिवळे झालेले दिसून आले. पिकांची वाढ खुंटली व ओंबे भरणेवर परिणाम होणार आहे. उत्‍पादन मिळणार नाही. शेतक-याचे आर्थिक नुकसान होणार आहे. सदर निष्‍कर्षाप्रमाणे अर्जदाराने एकाच पिकांवर 3 वेगवेगळी औषधे वापरली असे दिसून येते. त्‍यामुळे सामनेवाला नं.2 चे औषधी सदोष होती किंवा भेसळयुक्‍त होती असे समितीचे कोठेही म्‍हणणे नाही. सदरचे पिक हे औषधीमुळे पिवळे झाले असे समितीने कोठेही नमुद केलेले नाही. यामुळे सामनेवाला कोठेही दोषी ठरत नसल्‍याने कोणत्‍याही नुकसान भरपाईस जबाबदार नाही.

39.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालावर केवळ कृषी अधिकारी यांचीच सही आहे. तालुका तक्रार निवारण समिती अध्‍यक्ष यांनी सही केलेली नाही. त्‍यामुळे सदरचा अहवाल हा नैसर्गिक न्‍यायत्‍तवाचे विरोधी आहे.

तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहणी अहवाल हा केवळ एकाच गट नं. चा आहे. अर्जदाराचे कथनाप्रमाणे 3 वेगवेगळे गट नं. चे शेतामध्‍ये फवारणी केल्‍याचे सांगत आहे. त्‍यामुळे अर्जदाराचे कथनात व समितीच्‍या अहवालात साम्‍यता दिसून येत नाही. जर 3 वेगवेगळे गट नं. शेती असतांना 3 वेगवेगळे शेत पाहाणी अहवाल समितीने देणे गरजेचे होते. परंतू तसे कोठेही दिसून येत नाही. त्‍यामुळै अर्जदाराचे कथन हे पुर्णता बनाटीचे असल्‍याने खारीज करणे योग्‍य आहे.

40.  तसेच तालुका कृषी अधिकारी यांचा शेत पाहाणी अहवालामध्‍ये कोठेही नमुद नाही की, सामनेवाला नं.2 यांची औषधी सदोष किंवा भेसळयुक्‍त होती.

41.  सामेनवाले हे तणनाशकाबाबत त्‍याच्‍या वापरण्‍याची पध्‍दत कशी आहे आणि ते किती प्रमाणात वापरावे यासंबधी माहिती पत्रक कास्‍तकार यांना देतात. सदर माहिती पत्रकामध्‍ये तणनाशक वापराबाबत महत्‍वाच्‍या सुचना दिलेल्‍या असतात. यासंबधी सामनेवाला नं.2 यांचे माहिती पत्रकामध्‍ये शेवटी दिलेली आहे. सुचना या उत्‍पादनाचा वापर कंपनीच्‍या नियंत्रणाबाहेर आहे. त्‍यामुळे उत्‍पादनाची एकसमान गुणवत्‍ता सोडून इतर कोणतीही जबाबदारी आम्‍ही घेत नाही. असे नमुद आहे. करीता अर्जदाराने सुचना न पाळता तणनाशकाचा वापर केलेला असल्‍याने कोणत्‍याही नुकसान भरपाईस सामनेवाला नं.2 जबाबदार नाही.

अनियमित हवामान व जास्‍त तापमानामुळे तसेच तणनाशकाचे अयोग्‍य प्रमाणात वार यामुळे परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे अर्जदाराने चुकीच्‍या पध्‍दतीने तणनाशकाची फवारणी केली असेलन तर अर्जदार हा त्‍यास स्‍वतः जबाबदार आहे.

42.  तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी सदरची शेत मौका पाहाणी पंचनामा फक्‍त प्रथम दर्शनी पाहुन त्‍यांचा अहवाल सादर केला आहे. केवळ प्रथम दर्शनी पाहून अहवाल देणे योग्‍य नाही. कारण अहवाल देण्‍यापुर्वी त्‍या तणनाशकाची प्रयोगशाळेमध्‍ये परिक्षण करुन त्‍या नंतरच अहवाल द्यायला पाहिजे. कृषी अधिकारी यांनी तसे न करता केवळ प्रथम दर्शनी पाहून अहवाल दिला आहे. म्‍हणून हा अहवाल पुर्णतः दोषपुर्ण आहे.

43.  तसेच सामनेवाले नं.2 यांने सदर तणनाशकाची जिल्‍हयामध्‍ये भरपूर विक्री केलेली आहे. तक्रारकर्ता वगळता इतर कोणत्‍याही कास्‍तकाराने अजापर्यंत सदर तणनाशकाबाबत तक्रार केलेली नाही. याचा अर्थ की, तक्रारकर्ता याने सदर तणनाशकाची सुचनेप्रमाणे वापर केलेला नाही. तक्रारकर्ता याने सदर तणनाशकाची सुचनेप्रमाणे वापर केलेला नाही. तक्रारकर्ताने तणनाशकाची चुकीच्‍या पध्‍दतीने फवारणी केली असल्‍याने तक्रारकर्ता हा स्‍वतः नुकसानीस जबाबदार आहे.

44.  सदर फवारणी आणि मौका पाहाणी यामध्‍ये पुष्‍कळ दिवसांचा कालावधी असल्‍याने केवळ प्रथम दर्शनी पाहून अहवाल देणे योग्‍य नाही, कारण अहवाल देण्‍यापुर्वी त्‍या तणनाशकाची प्रयोगशाळा परीक्षण करुन त्‍या नंतरच अहवाल द्यायला पाहीजे. म्‍हणुन हा अहवाल पुर्णतः दोषपुर्ण आहे. वास्‍तविक पाहता जर कृषी अधिकारी यांना अशी तक्रार प्राप्‍त झाल्‍यास त्‍यांनी बाधीत शेत जमिनीसह अजून काही दुस-या शेत जमिनी ज्‍यावर अशा तणनाशकाची फवारणी केली आहे असे शेत जमिनीचा सुध्‍दा पंचनामा व मौका पाहणी करावयास पाहिजे व त्‍यानंतर अहवाल सादर करतांना बाधीत क्षेत्र तसेच अन्‍य शेत जमिनीचा अहवाल सादर केला गेला पाहिजे व त्‍यानंतर शेतक-यांने वापरलेल्‍या पंपाचाही पंचनामा केला आहे. तसेच बाधीत पिकाच्‍या पानाचे पान संशोधन केंद्रामध्‍ये तपासणी करुन सदरचे पिक कोणत्‍याही कारणाने बाधीत झाले आहे याचा पुर्ण अहवाल दिला पाहिजे.

45.  सामनेवाला क्र.2 यांनी त्‍याची बाजू सिध्‍दतेकरीता मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे दाखल केले आहेत.

(I) 201 STPL 5414 NC, JASWINDER SING V.S PUJANB PESTICIDES AND SEEDS & ORS.

(II) 2016 STPL 13013 NC, MOHINDER PAL VS. KISAN PESTICIDES

(III) 2013 STPL 18613 NC.

(IV) 2005 STPL, 9092 NC, HINDUSTAN INSECTICIDE LTD VS. KOPOLU SAMBASIVA RAO & ORS.

(V) 2013 STPL 18536, DEVENDER KUMAR VS.  M/S. AMSONS LAB

46. तक्रारदार यांची दाखल तक्रार, सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, त्‍यांनी दाखल केलेला लेखी युक्‍तीवाद, तसेच सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेला खुलासा, त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाला यांनी दाखल केलेले लेखी युक्‍तीवाद, व सामनेवाला नं.2 यांनी दाखल केलेल्‍या लेखी युक्‍तीवादासोबत मा.वरीष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे यांचे बारकाईने अवलोकन केले असता न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यवहार प्रथेचा अवलंब केला आहे ही बाब तक्रारकर्ताने सिध्‍द केली आहे काय.?                    

 

... नाही.

2.

तक्रारदार हा तक्रारीतील मागणी प्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे काय.?

 

... नाही.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

47.   मुद्दा क्र.1  – तक्रारकर्ताने दाखल केलेली तक्रार, तक्रारदाराने दाखल केलेले पुराव्‍याचे अॅफिडेव्‍हीट निशाणी 19, तक्रारकर्ताचा लेखी युक्‍तीवाद निशाणी 22 चे अवलोकन केले. त्‍याप्रमाणे सामनेवाले नं.1 ते 3 यांचा खुलासा त्‍यांनी दाखल केलेला युक्‍तीवाद यांचे बारकाईने अवलोकन केले असता तक्रारकर्ताने सामनेवाला क्र.1 कृषी केंद्राकडून सामनेवाला नं.2 व 3 यांचे उत्‍पादन केलेले खरेदी केले या बद्दल कुठलाही वाद नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा सामनेवालाचा ग्राहक आहे. तक्रारकर्ताने त्‍याचे मालकीचे शिर्डी येथील गट नं.13/1, 13/5 व 27/3 यांचे एकत्रीत क्षेत्र 1 हे. या गव्‍हाचे पिकातील तणावर फवारणी करणेसाठी तणनाशक औषधाची मागणी समोनवाले नं.1 यांचे दुकानातून खरेदी केली व सदर औषध ही सामनेवाला नं.2 व 3 यांनी उत्‍पादीत केलेले आहे असे तक्रारदाराचे तक्रारीतील कथन आहे. तिन्‍ही एकत्रित क्षेत्र 1 हे. वर सदर औषध फवारणी केली असे तक्रारदाराचे म्‍हणणे आहे. संपुर्ण तक्रारीची व त्‍यात उभय पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन केले असता कृषी अधिकारी गट नं.13 चा पाहणी अहवाल दिलेला आहे. इतर क्षेत्राचा नाही. सामनेवाला नं.2 च्‍या कैफियतीमध्‍ये पुराव्‍यास उत्‍तर व पुरावा दिलेला नाही. कृषी अधिकारी राहाता यांनी दिनांक 10.01.2017 रोजी तक्रारदार यांचे शेत जमीन गट नं.13 च्‍या पाहणी अहवालात निष्‍कर्षामध्‍ये क्र.26 समिती “ सदर शेतक-यांनी मिस्‍तू तणनाशक व त्‍या अगोदर लिफान व बुस्‍टर फवारणी केली. त्‍यानंतर प्रत्‍यक्ष पहाणीमध्‍ये गहु पिक पुर्णपणे पिवळे झालेले दिसुन आली. तसेच वाढ खुंटल्‍यामुळे ओंबे भरणेवर परिणाम होणार आहे. त्‍यामुळै शेतक-यांना गहू पिकांचे अपेक्षीत उत्‍पादन मिळणार नाही. शेतक-यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.” असे नमुद केले आहे. परंतू तक्रारदाराने या निष्‍कर्षानंतर पिकाचे नुकसान झाले आहे किंवा नाही याबाबत पुराव्‍यास पुरावा तक्रारदाराने सादर केलेला नाही. निशाणी 5 सोबत तक्रारदाराने जोडलेल्‍या कागदपत्रामधील क्र.10 मध्‍ये प्रक्षेत्र पाहाणी अहवाल मधील कलम 24 समांतर प्‍लॉट पाहाणी निष्‍कर्षामध्‍ये “ समांतर प्‍लॉटची पाहाणी केली असता सदर शेतक-यांनी फक्‍त तणनाशक फवारणी केलेली आहे. त्‍यामुळे सदर शेतक-यांचे गहू पिकांचे नुकसान झालेले  नाही.” असे नमुद केलेले आहे. सामनेवाला क्र.1 ने निशाणी 8 सोबत दाखल केलेले दस्‍तावेज यादीचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला क्र.1 चा खुलासा, लेखी युक्‍तीवाद व त्‍यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता सामनेवाला सामनेवाला नं.1 यांनी अरुण बबनराव पोटे, साकुरी ता.राहाता जि.अहमदनगर यांचे औषधाचे बिल दाखल केलेले आहे. व तक्रारदार नमुद तणनाशक औषध फवारणी केले असता गव्‍हाचे पिकाचे नुकसान झालेले नाही याबाबत अॅफीडेव्‍हीट व जबाब दाखल केलेला आहे. सामेनवालाचे या म्‍हणणेबाबत तक्रारदाराने त्‍यांचे युक्‍तीवादात काही कथन केलेले नाही.

48.  तक्रारदाराने खरेदी केलेले तक्रारीत नमुद केलेले औषध एकाच क्षेत्रात शेतात वापरलेले दिसून येते. संपुर्ण तक्रार, दाखल केलेले उभय पक्षकारांचे संपुर्ण दस्‍तावेज यांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ताचे मालकीचे शेतातील गट नं.13 याचेकडील प्रक्षेत्र पाहणी अहवाल तक्रारीत दाखल केलेला आहे. त्‍यात वरील बाबीचे तीनही औषधे शेतक-यांनी वापरलेले दिसून येते. तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांना दिलेली विविध सुचनांचे व नियमांचे योग्‍य पालन न केल्‍यामुळे तक्रारदार हा त्‍यांचे नुकसानीस स्‍वतः कारणीभूत असल्‍याचे म्‍हंटले आहे. सामनेवाला नं.1 यांनी संबधीत कालावधीत अनेक शेतक-यांना तक्रारीत नमुद औषधाची विक्री केली. परंतू कोणत्‍याही शेतक-यांची तक्रार नाही.  सामनेवाला क्र.1 यांनी बेफिकीरीने औषध वापरले. या सामनेवाला नं.1 चे म्‍हणण्‍याला व वर नमुद सर्व बाबी मुळे दुजोरा मिळतो. सामनेवाला नं.2 यांनी त्‍यांचे जबाबात व युक्‍तीवादात, तक्रारदाराचे तक्रारीतील म्‍हणणे खोडून काढले असून तक्रारीत तथ्‍य नसल्‍याचे म्‍हंटले आहे. तालुका कृषी अधिकारी यांचे प्रक्षेत्र पाहाणी अहवालामध्‍ये तीनही औषधे एकाच शेतात वापरली असल्‍याचे शेतीचे पाहाणी अहवालामध्‍ये नमुद आहे. व सदर प्रक्षेत्र पाहाणी अहवाल हा गट नं.13 असा आहे. तक्रारदाराने फवारणी चुकीच्‍या पध्‍दतीने केली असून नेमके कोणत्‍या औषधामुळे झाले हे स्‍पष्‍ट होत नाही. म्‍हणून तक्रारदार हे स्‍वतःचे नुकसानीस कारणीभुत आहे असे नमुद केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी दाखल केलेले न्‍याय निवाडयाचा बारकाईने अवलोकन केले असता सदरील न्‍याय निवाडे या तक्रारीस तंतोतंत लागू होत नाहीत असे मंचाचे मत आहे.

49.  वरील सर्व कारण मिमांसेवरुन सामनेवालाने तक्रारदाराला विकलेल्‍या तणनाशकामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले आहे. तक्रारदाराला सामनेवाला क्र.1 यांनी चुकीची व भेसळ युक्‍त सदोष औषधे दिली या बद्दल कुठलाही पुरावा तक्रारदाराने मे.मंचात सादर केलेला नाही. सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकरित्‍या तक्रारदाराची फसवणूकीस जबाबदार नाहीत व त्‍यांनी तक्रारदारप्रति अनुचित व्‍यापारी प्रथेची अवलंबना केली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

50.  मुद्दा क्र.2 – मुद्दा क्र.1 चे विवेचनावरुन तक्रारदार हा तक्रारीतील मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदविण्‍यात येते.

51.  मुद्दा क्र.3 - मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येते.

2.   उभय पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

3.   या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.  

4.   तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.