जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिरोली
चौकशी अर्ज क्रमांक :- 2/2017 चौ.अर्ज नोंदणी दि. :- 25/1/2017
तक्रार निकाली दि. :- 15/3/2017
अर्जदार/फिर्यादी :- सुर्यप्रकाश गजानन गभणे,
वय 42 वर्ष, धंदा – वैद्यकीय व्यवसाय,
राह.301, कस्तुरबा वार्ड, हटवार व्यापार संकुल जवळ,
देसाईगंज, ता.देसाईगंज, जिल्हा – गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/आरोपी :- 1) मुरलीधर कवडू सुंदरकर,
मार्फत-अध्यक्ष,
श्री.संताजी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्या.देसाईगंज (वडसा) ता.देसाईगंज,
जिल्हा – गडचिरोली-441207.
2) वसंत तुकाराम गोंगल,
मार्फत-सचिव,
श्री.संताजी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्या.देसाईगंज (वडसा) ता.देसाईगंज,
जिल्हा – गडचिरोली-441207.
3) प्रल्हाद नामदेव धोटे,
मार्फत-व्यवस्थापक,
श्री.संताजी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्या.देसाईगंज (वडसा) ता.देसाईगंज,
जिल्हा – गडचिरोली-441207.
4) सौ.सी.पी.धोटे,
मार्फत-अल्पबचत प्रतिनिधी,
श्री.संताजी नागरी बिगर शेती सहकारी पतसंस्था
मर्या.देसाईगंज (वडसा) ता.देसाईगंज,
जिल्हा – गडचिरोली-441207.
अर्जदार :- स्वतः
गैरअर्जदार :- अॅड.श्री.कांचन मशाखेत्री
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
- आदेश निशाणी क्र.1 वरील -
(मंचाचे निर्णयान्वये, रोझा फु.खोब्रागडे (अध्यक्ष (प्र.))
(पारीत दिनांक : 15 मार्च 2017)
1. फिर्यादी यांनी, सदर अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 27 सह 25 अन्वये कारवाई होण्याकरीता दाखल केला.
2. सदर चौकशी अर्ज नोंदणी करुन, गैरअर्जदार/आरोपी विरुध्द समन्स काढण्यात आले. अर्ज मंचात न्यायप्रविष्ठ असतांना, फिर्यादी व आरोपी यांनी दि.7.3.2017 रोजी मंचाबाहेर आपसी समझोता झाल्याने, सदर दरखास्त पुढे चालवायचा नाही त्यामुळे सदर दरखास्त निकाली काढण्यात यावी, असा अर्ज नि.क्र.13 नुसार दाखल केला. तसेच अर्जदारास मंचासमोर नि.क्र.13 चे अर्जाबाबत विचारणा केली असता, प्रकरणात गैरअर्जदार यांचेशी मंचाबाहेर समझोता झालेला असल्याने प्रकरण पुढे चालवायचे नाही असे सांगीतले.
3. अर्ज नि.क्र.13 मधील अर्जानुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात मंचा बाहेर आपसात समझोता झालेला असून व फिर्यादी यांना सदर चौकशी अर्ज यापुढे चालवायचा नसल्याने, सदर चौकशी अर्ज निकाली काढणे योग्य होईल, असे या मंचाचे मत आहे. सबब, पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आंदेश //
फिर्यादीचा चौकशी अर्ज परत घेतल्यामुळे निकाली काढण्यात येत आहे.
( Application disposed by way of withdraw)
गडचिरोली.
दिनांक :- 15/3/2017