::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, किर्ती गाडगीळ (वैदय) मा. सदस्या)
(पारीत दिनांक :- 21/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार भागीदार असून ते गुरुनानक प्रॉप्रटी अॅन्ड रियल ईस्टेट या नावाने भुखंड विक्रीचा व्यवसाय करतात गैरअर्जदाराने निवासी भुखंड खरेदी करण्याकरीता आमंञित केले. गैरअर्जदाराचे म्हणण्यानुसार सदर भुखंडचे ले-आऊट तथा कुठे गहाण बक्षीस विक्री व अन्य रितीने हस्तांतरीत केलेले नव्हते. अर्जदाराने दि. 21/10/08 ला स. न. 71 मधील भुखंड क्रं. 56 आराजी 1614 चौ. फुट चतुःसिमा असलेला भुखंड रु. 64,560/- मध्ये विकत घेण्याचा करार केला. सदर भुखंडाची एकूण रक्क्म 32,000/- रु. वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. अर्जदाराने गैरअर्जदाराला विक्री संबंधी आवश्यक कागदपञे संबधी विचारले असता शेवटी दि. 25/02/10 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास आवश्यक परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले व विक्रीची मुदत गैरअर्जदाराचे अडचणी दूर होवून आवश्यक परवानगी मिळेपर्यंत वाढविण्यात आल्याचे कळविले. अर्जदाराने वेळोवेळी गैरअर्जदाराला वरील नमुद असलेल्या भुखंडाची विक्रीपञ करुन देण्याकरीता संपर्क साधला परंतु गैरअर्जदाराने सदर भुखंडाची विक्रीपञ करण्यास टाळमटाळाची उत्तरे दिली भुखंडाची विक्रीपञ करुन दिले नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराना दि. 29/10/12 रोजी वकीलामार्फत सदर भुखंडाच्या विक्री करुन देण्याबाबत नोटीस पाठविले. गैरअर्जदार क्रं. 1 ने सदर नोटीस घेण्यास नाकारले व गैरअर्जदार क्रं. 2 व 3 ला नोटीस मिळून सुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचे नोटीस वर कोणतेही दखल घेतली नाही व अर्जदाराला सदर भुखंड विक्री करुन दिले नाही गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदाराकडून अर्जदारा सदर निवासी भुखंड विक्रीपञ करुन देण्याचे आदेश दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 यांचे विरुध्द दि. 03/05/13 ला नि. क्रं. 1 वर एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रं. 1 हजर होवून नि. क्रं. 08 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप हे खोटे असून नाकबुल करुन पुढे असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 हे प्रॉप्रर्टी डिलरचा व्यवसाय करतात अर्जदाराने खरेदी केलेल्या भुखडांशी गैरअर्जदार क्रं. 1 चा काहीही संबंध नाही व त्यांनी सदर सौदयावर ऐजंट म्हणून भुमिका निभावली आहे. म्हणून अर्जदाराच्या नावे प्लॉटची विक्री करुन देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रं. 2 व 3 ची आहे. अर्जदाराने पाठविलेल्या नोटीसाचे उत्तर गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराला दि. 03/11/12 ला दिले. सबब सदर तक्रार खोटी असून ती खारीज होण्यास पाञ आहे.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदार क्रं. 1 चे लेखीउत्तर, दस्ताऐवज व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(3) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराने दि. 21/10/08 ला स. न. 71 मधील भुखंड क्रं. 56 आराजी 1614 चौ. फुट चतुसिमा हा भुखंड रु. 64,560/- मध्ये विकत घेण्याचा करार केला. सदर भुखंडाची एकूण रक्क्म 32,000/- रु. वेळोवेळी अर्जदाराने गैरअर्जदाराला दिले. ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ- 1 ते अ- 9 वरुन सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 04 वर दस्त क्रं. अ- 1 वर दाखल विसारपञाची पडताळणी करतांना असे दिसले कि, सदर प्लॉट गैरअर्जदाराने अर्जदाराला लिहून दिले व त्यावर गैरअर्जदार क्रं. 1, 2 व 3 यांची सही आहे. म्हणून गैरअर्जदार क्रं. 1 ने बचाव पक्षात असे कथन करणे कि, सदर भुखंडाच्या व्यवहारात त्यांची भुमिका ऐजंट म्हणून होती हे ग्राहय धरण्यासरखे नाही. गैरअर्जदार क्रं. 2 व 3 सदर प्रकरणात हजर झाले नाही अर्जदाराचे लेखी तक्रार, दस्ताऐवज व शपथपञावरुन असे सिध्द झाले आहे कि, गैरअर्जदाराने सदर भुखंडाचे विसारपञ करुन अर्जदारापासून 32,000/- रु. घेवून सुध्दा सदर भुखंडाची विक्रीपञ कोणतेही ठोस कारण नसतांना करुन दिले नाही. म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदाराने अर्जदाराकडून घेतलेली रक्कम रु. 32,000/- दि.
07/01/2013 पासून 12 टक्के व्याजासह आदेशाची प्रत मिळाल्यापासून
45 दिवसाचे आत अर्जदाराला दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदाराने
रु. 5,000/- व तक्रारीचाखर्च रु. 2,500/- अर्जदाराला
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करुन दयावे.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/01/2015