Maharashtra

Nashik

cc/87/2014

Geeta Ravindra Khatri - Complainant(s)

Versus

Mundada Corporation - Opp.Party(s)

Sharad Bhaskar Kokate

20 Mar 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum
Collector Office Compound
Nashik
 
Complaint Case No. cc/87/2014
 
1. Geeta Ravindra Khatri
205, Unilit Avenue, R/H, Parijat Nagar, Near Idia Showroom, Nashik
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M. S. Sonawane PRESIDENT
 HON'BLE MRS. Prerana Kalunkhe Kulkarni MEMBER
 HON'BLE MR. K. P. Jadhav MEMBER
 
For the Complainant:Sharad Bhaskar Kokate, Advocate
For the Opp. Party:
ORDER

(निकालपत्र कारभारी पुं.जाधव, सदस्‍य यांनी पारीत केले)

नि का ल प त्र

पारित दिनांकः20/03/2015

तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 (यापुढे संक्षेपासाठी ‘ग्रा.सं. कायदा’) च्‍या कलम 12 नुसार प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे.

2.    तक्रारदारांचे म्‍हणणे थोडक्‍यात असे की, त्‍यांनी सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडून दि.22/8/2012 रोजी असूस कंपनीचा लॅपटॉप मॉडेल X530U SX181D रक्‍कम रु.27,850/- ला चलन क्र.2902 अन्‍वये खरेदी केला. सामनेवाला क्र.1 यांनी लॅपटॉपची 1 वर्षाची वारंटी दिलेली होती. काही दिवसांनी लॅपटॉपची तळाची बाजु म्‍हणजे हिंजस निघाल्‍यामुळे लॅपटॉप वापरणे शक्‍य होत नव्‍हते. त्‍याबाबत ते सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे गेले असता त्‍यांनी सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे पाठविले. सामनेवाला क्र.2 यांनी सदर लॅपटॉप दुरुस्‍तीला रु.5000/- खर्च लागेल असे सांगितले. लॅपटॉप वारंटी पिरीयडमध्‍ये असतांना सुध्‍दा तक्रारदार यांचा व्‍यवसाय व उदरनिर्वाह त्‍याच्‍यावरच असल्‍याने त्‍यांनी खर्च देण्‍याचे मान्‍य करुन लॅपटॉप दुरुस्‍तीसाठी टाकला. सामनेवाला क्र.2 यांनी लॅपटॉपची पुर्ण बॉडी बदलून दिली. मात्र लॅपटॉप सुरु केला असता त्‍याचा पुर्ण डिस्‍प्‍ले गेल्‍याचे दिसून आले. सदर बाब सामनेवाला क्र.2 यांच्‍या लक्षात आणून दिली असता त्‍यांनी लॅपटॉप पुन्‍हा ठेवून घेतला. सामनेवाला क्र.2 यांच्‍या चुकीमुळेच लॅपटॉप पुर्ण खराब झालेला असून त्‍यास सर्वस्‍वी सामनेवाला क्र.1 व 2 हे जबाबदार आहेत. लॅपटॉपबाबत सामनेवाला यांच्‍याकडे चौकशी केली असता ते दुरुस्‍तीसाठी कंपनीकडे पाठविल्‍याचे वारंवार सांगतात. आजपर्यंत लॅपटॉप सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडेच आहे.  सामनेवाल्‍यांनी सेवा देण्‍यात कमतरता केलेली आहे.  त्‍यामुळे सामनेवाला यांच्‍याकडून असूस कंपनीचा लॅपटॉप मॉडेल X530U SX181D नवीन लॅपटॉप मिळावा.  मानसिक त्रासासाठी रु.10,000/- शारिरीक त्रास व असुविधेपोटी रु.10,000/- आर्थिक झळीपोटी रु.10,000/- व फायद्यापासून वंचीत राहील्‍यामुळे रु.10,000/- तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- अशी एकूण रु.50,000/- इतकी नुकसान भरपाई मिळावी, अशी विनंती त्‍यांनी मंचास केलेली आहे.

3.    तक्रारदार यांनी तक्रार अर्जाच्‍या पुष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी नि.5 लगत लॅपटॉप खरेदीची पावती, इन्‍फो कॉम सिस्‍टीमचे सर्व्‍हीस सेंटरचे बील, सामनेवाल्‍यांना पाठविलेली नोटीस, त्‍याच्‍या पावत्‍या इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.

4.    सामनेवाल्‍यांना नोटीसा मिळूनही ते गैरहजर राहील्‍याने प्रस्तूत तक्रार अर्ज त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍यात आला.

5.    तक्रारदार तर्फे अॅड.कोकाटे यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

6.    निष्‍कर्षांसाठीचे मुद्दे व त्‍यावरील आमचे निष्‍कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.

             मुद्दे                         निष्‍कर्ष

  1. सामनेवाल्‍यांनी तक्रारदारांना

सदोष लॅपटॉप विक्री केला काय?          होय.                                                 

  1. आदेशाबाबत काय ?                    अंतीम आदेशाप्रमाणे.

                   का  र  ण  मि  मां  सा

मुद्दा क्र.1 बाबतः

7.    सामनेवाल्‍यांनी आपल्‍याला सदोष लॅपटॉप विक्री केला. त्‍याबाबत सामनेवाला क्र.1 यांच्‍याकडे गेलो असता त्‍यांनी सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडे पाठविले. सामनेवाला क्र.2 यांनी सदर लॅपटॉप दुरुस्‍तीला रु.5000/- खर्च लागेल असे सांगितले. लॅपटॉप वारंटी पिरीयडमध्‍ये असतांना सुध्‍दा तक्रारदार यांनी खर्च देण्‍याचे मान्‍य करुन लॅपटॉप दुरुस्‍तीसाठी टाकला. सामनेवाला क्र.2 यांनी लॅपटॉपची पुर्ण बॉडी बदलून दिली. मात्र लॅपटॉप सुरु केला असता त्‍याचा पुर्ण डिस्‍प्‍ले गेल्‍याचे दिसून आले. सदर बाब सामनेवाला क्र.2 यांच्‍या लक्षात आणून दिली असता त्‍यांनी लॅपटॉप पुन्‍हा ठेवून घेतला. आजपर्यंत लॅपटॉप सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडेच आहे. तो सदोष असल्‍यामुळेच रिपेअर करणे त्‍यांना शक्‍य झालेले नाही, इत्‍यादी विधाने तक्रारदारांनी मंचासमोर शपथेवर केलेली आहेत. त्‍यांनी दस्‍तऐवज यादी नि.5/2 ला दाखल केलेली सामनेवाला क्र.2 यांच्‍याकडील कस्‍टमर कॉपी स्‍पष्‍ट करते की,  लॅपटॉपमधील Hingies came out from Bootom case मुळे लॅपटॉप दुरुस्‍तीसाठी टाकलेला आहे. सामनेवाल्‍यांनी तक्रारदारांचा वरील पुरावा हजर होवून आव्‍हानित केलेला नाही.  तक्रारदारांचा पुरावा सामनेवाल्‍यांना मान्‍य असल्‍यामुळेच तो त्‍यांनी आव्‍हानित केलेला नाही, असा प्रतिकूल निष्‍कर्ष त्‍यामुळे काढण्‍यास पुरेसा वाव आहे.  परिणामी सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारदारांना सदोष लॅपटॉप विक्री केला व सामनेवाला क्र.2 यांनी तो दुरुस्‍त करुन परत न दिल्‍यामुळे दोघांनीही तक्रारदारांना सेवा देण्‍यात कमतरता केली, असे आमचे मत आहे. यास्‍तव मुद्दा क्र.1 चा निष्‍कर्ष आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

मुद्दा क्र.2 बाबतः

8.    मुद्दा क्र.1 चा निष्‍कर्ष स्‍पष्‍ट करतो की, सामनेवाल्‍यांनी तक्रारदारांना सेवा देण्‍यात कमतरता केली. त्‍यामुळे तक्रारदार असूस कंपनीचा मॉडेल X530U SX181D नवीन लॅपटॉप गॅरंटी/वारंटीसह सामनेवाला यांच्‍याकडून मिळण्‍यास पात्र आहेत. विकल्‍पेकरुन सामनेवाला यांना लॅपटॉप देणे शक्‍य नसल्‍यास लॅपटॉपची किंमत रु.27,850/-/- लॅपटॉप खरेदी करण्‍याचा दिनांक 22/8/2012 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% व्‍याजासह सामनेवाला क्र.1 व 2 यांच्‍याकडून वैयक्‍तीक व संयुक्‍तीरित्‍या मिळण्‍यास पात्र आहेत‍.  तक्रारदारांनी शारिरीक व मानसिक त्रास तसेच आर्थीक झळ व लॅपटॉपच्‍या फायद्यापासून वंचीत राहिल्‍याची नुकसान भरपाई म्‍हणून एकूण रक्‍कम रु.50,000/- मिळावेत, अशी मागणी केलेली आहे. मात्र तक्रारदारांची ती मागणी पुर्णतः अवाजवी आहे. आमच्‍या मते, त्‍यापोटी तक्रारदारांना रु.5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3000/- मंजूर करणे न्‍यायोचित ठरेल. यास्‍तव मुद्दा क्र.2 च्‍या निष्‍कर्षापोटी आम्‍ही खालील आदेश देत आहोत.

                              आ दे श

1. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या असूस कंपनीचा मॉडेल X530U SX181D चा नवीन लॅपटॉप गॅरंटी/वारंटीसह तक्रारदारांना अदा करावा.  विकल्‍पेकरुन सामनेवाला क्र.1 व 2 यांना लॅपटॉप देणे शक्‍य नसल्‍यास त्‍यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीक रित्‍या लॅपटॉपची किंमत रु.27,850/- दिनांक 22/8/2012 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम हाती मिळेपावेतो द.सा.द.शे.12% व्‍याजासह अदा करावी.

2. सामनेवाला क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या  मानसिक, शारिरीक व आर्थीक त्रासापोटी भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3000/- अदा करावेत.

3. निकालपत्राच्‍या प्रती उभय पक्षांना विनामुल्‍य द्याव्‍यात.

 

नाशिक

दिनांकः-20/03/2015

 
 
[HON'BLE MR. M. S. Sonawane]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Prerana Kalunkhe Kulkarni]
MEMBER
 
[HON'BLE MR. K. P. Jadhav]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.