: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 26/05/2015)
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे तो नगर परिषद अचलपुर जि. अमरावती यांच्या हद्दीतील मालमत्ता क्र. १५१ चा मालक आहे व त्या ठिकाणी तो त्यांच्या कुटुंबियासह राहतो. त्याच्या कथना प्रमाणे त्याच्या घराच्या मागे सर्व्हीस लाईन आहे परंतु विरुध्दपक्ष त्या सर्व्हीस लाईनची साफसफाई करीत नाही. मागील दिड वर्षापुर्वी सर्व्हीस लाईन फुटली व तेव्हा पासुन विरुध्दपक्षाने त्याची साफसफाई करणे बंद केले. यामुळे त्या ठिकाणी पाणी साचते व साचलेले पाणी तक्रारदाराच्या घरात झीरपते त्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबियांच्या स्वास्थ्याला हाणी पोहचत आहे. तसेच त्यामुळे होणा-या रोगावर औषधोपचारासाठी त्याला आतापर्यंत रु. ५०,०००/- खर्च करावा लागला.
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने नाली दुरुस्तीसाठी व सतत साफसफाई करण्यासाठी विरुध्दपक्षाकडे वेळोवेळी तक्रार अर्ज दिला परंतु विरुध्दपक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. विरुध्दपक्षाने नाली दुरुस्तीकरीता निवीदा मागविण्याची जाहिरात
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..3..
दिली होती व आलेल्या निविदातून एक निविदा मंजूर केली, तरीही नालीच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरु करण्यात आले नाही.
4. तक्रारदार हा त्याच्या इमारतीत ब्लड बॅंक चालवितो. रक्तदान करण्यास येणा-या लोकांना तसेच रुग्णांना या नालीची सफाई न झाल्याने आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
5. तक्रारदाराचे कथना प्रमाणे मागील 10 वर्षापासुन तो विरुध्दपक्षाकडे तक्रारी करीत असून सुध्दा नियमानुसार आवश्यक असणारी मुलभूत सुविधा त्यास प्रदान करण्यात आली नाही, जेव्हा की, त्याने आतापर्यंत विरुध्दपक्ष यांना रु. ३,००,०००/- कर दिलेला आहे. असे असतांना मुलभूत सुविधा प्रदान करण्यात न आल्याने विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली. तक्रारदाराने यापुर्वी तक्रार अर्ज क्र. ७३/२०१३ दाखल केला होता, परंतु त्यात नोटीस योग्यरित्या बजावण्यात आली नसल्याने विरुध्दपक्षा विरुध्द ती तक्रार त्या मुद्दावरुन रद्द करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने दि. १६.९.२०१४ रोजी पुनश्च एक तक्रार विरुध्दपक्ष यांना दिली परंतु त्यानंतर विरुध्दपक्षाने नालीची साफसफाई व दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्याने हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. ज्यात त्यांनी अशी विनंती केली की, विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असून त्यानी सर्व्हीस नालीची साफसफाई योग्य पध्दतीने
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..4..
करावी तसेच नालीची दुरुस्ती करुन द्यावी व तक्रारदाराला वैद्यकीय उपचारासाठी आलेला खर्च रु. ५०,०००/- व मानसिक शारिरीक त्रासापोटी रु. २५,०००/- तसेच तक्रार अर्जाचा खर्च रु. ५,०००/- विरुध्दपक्षाने द्यावा.
6. विरुध्दपक्ष यांनी निशाणी 12 ला अर्ज देवून तक्रार अर्जास प्राथमिक आक्षेप घेतला. निशाणी 13 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला, ज्यात त्यांच्या विरुध्द तक्रार अर्जात करण्यात आलेल्या बाबी त्यांनी नाकारल्या. परंतु विरुध्दपक्षाने हे कबुल केले की, तक्रारदार हा त्यांच्या हद्दीतील मालमत्ता क्र. १५१ चा मालक आहे. विरुध्दपक्षाच्या कथना प्रमाणे तक्रारदाराने पुर्वी विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केलेला तक्रार अर्ज रद्द करण्यात आल्याने हा तक्रार अर्ज आता चालु शकत नाही. त्यांनी असे कथन केले की, नाली दुरुस्ती संबंधी त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात देवून निविदा मागविल्या व श्री. महम्मद सादीक यांची निविदा या कामासाठी मंजूर करण्यात आली होती. परंतु निधी उपलब्ध होत नसल्याने काम सुरु करता आले नाही. निधी उपलब्ध होताच काम करण्यात येईल. त्यांनी असेही कथन केले की, तक्रारदाराने या नालीवर अंदाजे 40 फुट लांबीचा स्लॅब टाकलेला आहे तसेच श्री. कमलेश अंबाडकर यांनी 20 ते 25 फुटाचा स्लॅब या नालीवर
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..5..
टाकला असल्याने साफसफाई करण्यास अडथडा निर्माण होत आहे असे असतांना या नालीची साफसफाई करण्याचा प्रयत्न करण्यात येतो व त्याची साफसफाई करण्यात येते. तक्रारदाराने टाकलेल्या नालीवरील स्लॅब काढून टाकावा असे वारंवार सूचित केले, या सर्व बाबींची माहिती असतांना तक्रारदाराने हा तक्रार अर्ज दाखल केला तो रद्द करावा अशी विनंती विरुध्दपक्षाने केली.
7. तक्रारदाराने निशाणी 16 ला प्रतिउत्तर दाखल केले.
8. तक्रार अर्ज, लेखी जबाब, दाखल दस्त तसेच तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. जुनेजा व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. श्री. ठाकरे यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. त्यावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.
मुद्दे उत्तरे
- तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक
आहे का ? .... नाही
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली
आहे का ? ... नाही
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..6..
कारणमिमांसा ः-
9. विरुध्दपक्षातर्फे अॅड. श्री. ठाकरे यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदार हा विरुध्दपक्ष यांना कर देत असला तरी करदाता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. कारण कराच्या बदल्यात तक्रारदाराला विरुध्दपक्ष कोणतीही सेवा देत नाही. यावरुन तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी विनंती श्री. ठाकरे यांनी केली यासाठी त्यांनी खालील न्यायनिर्णायाचा आधार घेतला.
(1) Raosaheb Devrao Hajare //Vs// Ulhasnagar Municipal Council V-1993(2) CPR 234 State Commission, Bombay.
(2) The Commissioner, Mannargudi Municipality //Vs// Consumer Protection Council I – 1993(1) CPR 191 State Commission Madras.
(3) The Commissioner Mannargudi Municipality //Vs// Consumer Protection Council III (1992) CPJ 455.
10. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. जुनेजा यांनी विरुध्दपक्षातर्फे करण्यात आलेल्या वरील कथन खोडतांना असा
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..7..
युक्तीवाद केला की, तक्रारदार हा विरुध्दपक्षाकडे कर भरत असल्याने व आजपर्यंत त्याने रु. ३,००,०००/- विरुध्दपक्ष यांना कर दिला असल्याने त्या कराच्या बदल्यात आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची जबाबदारी विरुध्दपक्षावर येत असतांना मागील 10 वर्षापासुन सर्व्हीस लाईन दुरुस्त व साफसफाई बाबत तक्रारदाराने तक्रार केल्यावर सुध्दा विरुध्दपक्षाने दुर्लक्ष केले असल्याने त्यांनी सेवेत त्रुटी केली आहे. सेवा पुरविणे ही विरुध्दपक्षाची जबाबदारी येते व त्यांनी ती पूर्ण न केल्याने तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक असून तक्रार अर्ज या मंचासमोर चालु शकतो.
11. दोन्ही वकीलांचा युक्तीवाद विचारात घेता अॅड. श्री. ठाकरे यांचा युक्तीवाद स्विकारावा लागेल, कारण त्यांनी वर नमूद ज्या न्यायनिर्णयाचा आधार घेतला त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, नगरपालिकेला कर दिला असतांना तो करदाता विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही. कारण कराच्या बदल्यात कोणतीही सेवा देण्यात येत नाही. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदार हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होत नाही.
12. तक्रारदार हा त्यांचा ग्राहक होतो असे गृहीत धरल्यास विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली का हे पाहावे लागेल. तक्रारदाराने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे त्याच्या घराच्या मागे
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..8..
असलेल्या सर्व्हीस लाईनची दुरुस्ती व साफसफाई करण्याबाबत तक्रारी केल्या आहेत. विरुध्दपक्षाने लेखी जबाबात हे स्पष्ट नमूद केले की, तक्रारदाराने ही सर्व्हीस लाईन ज्याची लांबी अंदाजे 70 ते 80 फुट असून त्यावर जवळपास 40 फुट स्लॅब तक्रारदाराने टाकला तसेच श्री.अंबाडकर यांनी जवळपास 25 फुट स्लॅब त्या नालीवर टाकला त्यामुळे नालीची साफसफाई करण्यात अडचण निर्माण होते. तक्रारदारास या नालीवर टाकलेला स्लॅब काढण्यास सांगितले ते तक्रारदाराने प्रतिउत्तर निशाणी 16 मध्ये स्पष्टपणे नाकारले नाही. विरुध्दपक्षाने दाखल केलेल्या दस्तावरुन तसेच तक्रारदाराने तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे असे दिसते की, विरुध्दपक्षाने या नालीची दुरुस्तीसाठी निविदा महम्मद कादीर यांनी स्विकारली असून त्याबाबत ठेका देण्यात आला आहे परंतु निधी उपलब्ध नसल्याने काम सुरु करता आले नाही. यावरुन हे शाबीत होते की, विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केलेली नाही. कारण त्यांनी निशाणी 14 सोबत दाखल केलेल्या दस्तावरुन असे दिसते की, नालीवर स्लॅब टाकल्याने दुरुस्ती तसेच साफसफाई करीता काम करण्यास अडथडा निर्माण होत आहे तरी शक्य ते प्रयत्न करुन नालीची साफसफाईचे काम करण्यात येत आहे. वास्तविक या ठिकाणी हे नमूद करावे लागेल की, तक्रारदाराने प्रतिउत्तरात
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..9..
त्यांनी नालीवर स्लॅब टाकला ही बाब स्पष्टपणे नाकारली नाही व अशा परिस्थितीत नालीची नियमीत साफसफाई करण्यास जी अडचण निर्माण होत आहे त्यास काही अंशी तक्रारदार व श्री. अंबाडकर हे जबाबदार आहेत. वास्तविक स्लॅब नालीवर असल्याचे विरुध्दपक्षाचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधी कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना अशा बांधकामाबाबत जे अधिकार देण्यात आलेले आहे त्या अधिकाराचा वापर विरुध्दपक्षाचे मुख्याधिकारी यांनी करणे अपेक्षीत होते परंतु ते का करण्यात येत नाही हे विरुध्दपक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले नाही. तसेच नाल्यांची साफसफाई नियमितपणे करणे हे विरुध्दपक्षाकडून अपेक्षीत आहे.
13. तक्रारदाराने जरी रु. ५०,०००/- औषधोपचाराचा खर्चा पोटी व रु. २५,०००/- मानसिक व शारिरीक त्रासापोटी मागितले असले तरी रु. ५०,०००/- च्या खर्चाबाबत त्यांनी कोणतेही दस्त दाखल केले नाही किंवा त्याला व त्याच्या कुटुंबियांना त्यांनी तक्रार अर्जात नमूद केलेल्या रोगांची लागण झाल्याबद्दल कोणतेही दस्त दाखल केले नाही. मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल रु. २५,०००/- नुकसान भरपाईची मागणी मंजूर करणे शक्य नाही. कारण नाली सफाई करण्यासाठी जी अडचण येत आहे त्यास काही अंशी तक्रारदार हा स्वतः जबाबदार असल्याचे निदर्शनास येते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 314/2014
..10..
14. वरील विवेचनावरुन मुद्दा क्र. 1 व 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते. व खालील आदेशा प्रमाणे तक्रार अर्ज हा नामंजूर करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 26/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष