जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 113/2012 तक्रार दाखल तारीख – 01/08/2012
निकाल तारीख – 13/05/2015
कालावधी - 02 वर्ष , 09 म. 12 दिवस.
संतोष पांडुरंग जाजू,
वय – 33 वर्षे, धंदा – नौकरी,
रा. उजनी, ता. औसा, जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) मुख्य व्यवस्थापकीय संचालक,
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
वहातुक भवन, मुंबई सेन्ट्रल,
मुंबई.
2) आगार प्रमुख,
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
गंगापुर एस.टी.डेपो,
ता. गंगापुर, जि. औरंगाबाद.
3) विभाग प्रमुख,
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
एस.टी.डेपो, विभागीय कार्यालय,
समर्थ नगर, औरंगाबाद.
4) विभागीय नियंत्रक,
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
एस.टी. विभागीय कार्यालय,
जळगाव.
5) विभागीय नियंत्रक,
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
एस.टी.विभागीय कार्यालय,
बुलढाणा.
6) आगार व्यवस्थापक, (वरिष्ठ)
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
एस.टी.डेपो, शिवाजी चौक,
लातुर.
7) विभाग प्रमुख,
वय – सज्ञान वर्षे, धंदा – नौकरी,
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ,
विभागीय नियंत्रक,
विभागीय कार्यालय,
अंबाजोगाई रोड, लातुर. .....गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. अनिल क. जवळकर.
गैरअर्जदार क्र. 2, 3, 4, 6 व 7 तर्फे :- अॅड.एस.टी.मनाळे.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हा उजनी येथील रहीवासी असुन, त्याचा स्वत:चा व्यवसाय आहे. अर्जदाराचे नातेवाईक हे उस्मानाबाद, लातुर, नांदेड व बीड येथे राहतात अर्जदार हा वेळोवेळी नातेवाईकांना भेटण्यासाठी उस्मानाबाद, लातुर, नांदेड व बीड येथे जात असत. गैरअर्जदार क्र. 2,3,4,5,6
व 7 हे गैरअर्जदार क्र. 1 च्या अधिपत्याखाली कार्य करतात. अर्जदार हा त्याच्या नातेवाईकास भेटण्यासाठी बीड येथे जाण्यासाठी दि. 04/07/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 2 च्या आगाराच्या बस क्र. एम.एच. 20 - डी- 9883 मध्ये सकाळी 7.30 वाजता बसला. सदरची बस लातुर बसस्टँड वरुन
निघाल्यानंतर सदरच्या बसच्या वाहकाने अर्जदारास तिकीटाची विचारणा केली तेव्हा अर्जदाराने सांगितले की, बीडचे एक तिकीट दया त्याप्रमाणे त्या वाहकाने अर्जदारास बीड साठीचे तिकीट दिले. त्यापोटी अर्जदाराकडुन रु. 113/- घेतले. अर्जदाराने सदरचे तिकीटाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर प्रवासाचे एकुण टप्पे 26, तिकीटाचा क्र. 017056 दि. 04/07/2011 वेळ सकाळी 7.48 मिनीट वाहकाचे यु.एन.कासीयुर (U.N.Kasiur) असे टाईप झालेले होते.
अर्जदार हा दि. 07/07/2011 रोजी बीड वरुन लातूर येथे जाण्यासाठी गैरअर्जदार क्र. 6 च्या बस क्र. एम.एच. 20 – बी.एल. 0614 मध्ये दुपारी 3.30 वाजता बीड बसस्टँड वरुन बसले. सदर बसच्या वाहकाने अर्जदारास लातूर साठीचे अर्जदाराच्या मागणीवरुन टिकीट दिले व त्यापोटी रु. 109/- घेतले. अर्जदाराने पुन्हा सदर तिकीटाचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यावर प्रवासाचे एकुण टप्पे 25 तिकीट क्र. 027011, दि. 07/07/2011 वेळ दुपारी 3.45 मिनीट टाईप झालेली होती व सदर तिकीटावर वाहकाचे नाव स्पष्ट टाईप झालेले नव्हते. अर्जदाराने बीड ते लातुर, लातुर ते बीड असा प्रवास केल्यानंतर अंतर काढुन त्यास 6 किलोमीटरने भागले असता एकुण किती टप्पे होतात याचा हिशोब केलेला असतो. यावरुन असे स्पष्ट होते की गैरअर्जदार क्र. 2,3,4,5,6 व 7 तिकीटाबाबत व अंतराच्या टप्प्याबाबत कधीही पुर्ण तपासणी करत नाहीत, त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला नाहक रु. 4/- किंवा 11/- रुपये जास्तीचे दयावे लागत आहेत.
गैरअर्जदार क्र. 6 व 7 च्या अधिपत्याखाली काम करणारे वाहक यांनी तेवढयाच अंतरासाठी दि. 07/07/2011 रोजी रु. 109/- व दि. 15/07/2011 रोजी रु. 120/- घेतले या बाबत नोटीस
दिल्यानंतरही कोणताही खुलासा गैरअर्जदाराकडुन प्राप्त झालेला नाही अथवा दिलगीरीबाबत दोन शब्दाचे पत्रही मिळाले नाही यावरुन असे दिसुन येते की गैरअर्जदार क्र. 1 हे अप्रत्यक्षरीत्या गैरअर्जदार क्र. 2 व 7 यांना मदत करत आहेत व याची आर्थिक झळ गोरगरीबांना तसेच प्रवाशांना होत आहे. अर्जदाराने दि. 03/12/2011 रोजी जळगाव आगाराच्या ऑर्डीनरी बसने प्रवास केला त्यावेळेस प्रवासाचे एकुण टप्पे 27 दाखविण्यात आले. त्यासाठी अर्जदाराकडुन 130/- रुपये एवढे भाडे घेण्यात आले. अर्जदाराने दि. 01/08/2011 रोजी औसा आगाराच्या एम.एच. 14 बी.टी. 1438 या ऑर्डीनरी बसने प्रवास केला त्यावेळेस अर्जदाराकडुन 120/- रुपये एवढे भाडे लातुर ते बीडसाठी घेण्यात आले. अर्जदाराने दि. 01/12/2011 रोजी लातुर आगाराच्या सेमी लक्झरी एम.एच. 07 सी-
7572 या बसने बीड ते लातुर असा प्रवास केला. अर्जदाराने घेतलेल्या तिकीटावर प्रवासाचे एकुण टप्पे 26 दाखविण्यात आले व त्यासाठी 166/- रुपये भाडे घेतले. अर्जदाराने दि. 03/12/2011 रोजी औसा आगाराच्या ऑर्डीनरी बसने बीड ते लातुर असा प्रवास केला. अर्जदाराने घेतलेल्या तिकीटावर एकुण प्रवासाचे 25 टप्पे दाखविण्यात आले त्यासाठी अर्जदाराने रु. 120/- एवढे भाडे दिले. अर्जदाराने दि. 12/12/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 4 च्या एम.एच. 14 बी.टी. 2143 या ऑर्डीनरी बसने लातुर ते बीड असा प्रवास केला. त्यासाठी अर्जदारास भाडे म्हणुन 130/-रुपये घेण्यात आले. अर्जदारास दिलेल्या तिकीटावर प्रवासाचे एकुण टप्पे 27 दाखविण्यात आले. अर्जदाराने दि. 11/08/2011 रोजी एम.एच. 14 बी.टी. 1498 या ऑर्डीनरी बसने बीड ते लातुर असा प्रवास केला. अर्जदारास दिलेल्या तिकीटावर प्रवासाचे एकुण टप्पे 25 दाखविण्यात आले. अर्जदाराने दि. 07/12/2011 रोजी लातुर ते बीड औरंगाबाद आगाराच्या सेमी लक्झरी बसने प्रवास केला त्यासाठी
अर्जदारास 160/- रुपये इतके भाडे दयावे लागले. अर्जदारास दिलेल्या बिलावर प्रवासाचे एकुण टप्पे 25 असे दाखविण्यात आले. अर्जदाराने दि. 08/12/2011 रोजी लातुर आगाराच्या एम.एच. 14 बीटी. 1810 या ऑर्डीनरी एक्सप्रेस या बसने बीड ते लातुर असा प्रवास केला त्यासाठी अर्जदारास
रु. 120/ एवढे भाडे दयावे लागले. सदरच्या बिालावर प्रवासाचे एकुण टप्पे 25 असे दाखविण्यात आले. कारण गैरअर्जदारांचे बोधवाक्य हे बहुजन सुखाय बहुजन हिताय हे आहे. अर्जदाराप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील बहुतांशी ग्राहक व गोरगरीब गैरअर्जदाराच्या बसमधुन प्रवास करतात त्याचा गैरअर्जदार हे तेवढयाच किलोमीटरसाठी जास्तीचे टप्पे दाखवून अर्जदाराची व अनेक गोरगरीबांची आजपर्यंत लूट केलेली आहे. तसेच दि. 15/07/2011 रोजी घेतलेले जास्तीचे 11 रुपये याची मागणी केली होती. तसेच दि. 15/07/2011 रोजी बीड ते लातुर या बसमध्ये किती प्रवासी होते याची माहिती मागीतली व जास्तीची घेतलेली रक्कम रु. 11/- 18 टक्के व्याजासह मागीतली होती. प्रत्यक्षात किती टक्के वाढ झालेली आहे याचा कोणताही खुलासा अथवा परिपत्रक देण्यात आलेले
नाही.तसेच अर्जदाराने लातुर ते बीड व बीड ते लातुर प्रवास केला ती बस अंबाजोगाई मार्गे गेल्यामुळे टप्यात वाढ दाखविण्यात आलेली आहे असे कळविण्यात आले. अर्जदाराकडुन गैरअर्जदाराने वेगवेगळया दिवशी वेगवेगळया कंडक्टरने लातुर ते बीड व बीड ते लातुर हे अंतर 25 टप्याचे असतानाही कधी 26 टप्याचे तर कधी 27 टप्याचे बील देऊन जास्तीची रक्कम घेतली.
महामंडळाच्या 2 X 2 च्या बसमध्ये एकुण 44 आसन असतात. गंगापुर आगार, औरंगाबाद आगार, जळगाव आगार, बुलढाणा आगार, औसा आगार असे 5 आगाराच्या बसेस लातुर ते बीड आणि बीड ते लातुर ये जा करतात. एका आगाराच्या कंडक्टरने बीड ते लातुरसाठी सर्व साधारणत:10/- रुपये जास्तीचे घेतले. म्हणजेच लातुर ते बीड एक टप्पा वाढवला असता 44 प्रवाशांचे 440/- रुपये होतात. तर एकुण 5 आगाराचे मिळुन फक्त जाण्याचे रु. 2,200/- एवढे होतात. म्हणजेच 1 वर्षाचे
रु. 8,03,000/- होतात. व जाण्या-येण्याचे रु. 16,06,000/- होतात. अर्जदाराने मानसिक त्रासापोटी रु. 1,50,000/- ची मागणी केली आहे.
तरी विनंती की, अर्जदारास गैरअर्जदार क्र.1 ते 7 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या रक्कम रु. 100/- 18 टक्के व्याजासह परत दयावी असा आदेश करण्यात यावा. अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरीक त्रासापोटी रु. 1,50,000/- देण्याचा आदेश गैरअर्जदार क्र. 1 व 7 यांना
वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या देण्याचा आदेश करण्यात यावा. गावाचे अंतर जेवढे कि.मी आहे तेवढयाच कि.मी चे तिकीट गैरअर्जदारानी या पुढे सर्वाना दयावे असा आदेश सर्व गैरअर्जदारांना करण्यात यावा. लातुर – बीड – लातुर या मार्गावरुन चालणा-या सर्व बसेसनी 1 वर्षा पर्यंत जास्तीची घेतलेली रक्कम रु. 26 किंवा 27 टप्पे दाखवून घेतली ती ही रक्कम रु. 16,06,000/- राज्य शासनाच्या ग्राहक कल्याण निधीत जमा करावी असा आदेश करण्यात यावा.
तक्रारदाराने तक्रारी सोबत एस.टी.महामंडळाचे तिकीट (एकुण – 13 प्रती), नोटीस, आर.पी.ए.डी पावत्या (एकुण – 05 प्रती), नोटीसचे उत्तर (एकुण – 02 प्रती), पोहच पावत्या (एकुण - 05) इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार हे परिवहन मंडळ असून, राज्यामध्ये गोरगरिबांच्या सेवेसाठी बहुजनहिताय बहुजन सुखाय या हितासाठी सेवा राबवते.
महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेशिवाय भाडेवाढ करता येत नाही. गैरअर्जदारास कायदयाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चालावे लागते. अर्जदारास बीड येथे वारंवार जावे लागते त्या दरम्यान त्यांच्याकडुन महामंडळाने जास्तीचे पैसे घेवून मनमनी आकारुन जास्तीचे टप्पे दाखवून प्रवाशांना टिकिटे दिली आहेत, ही बाब चुकीची आहे. अर्जदारास दि. 04/07/2011 रोजी गंगापुर आगाराच्या बसने लातुर बीड प्रवास केला त्यास 26 टप्पे दाखवून रु. 113/- भाडे आकारले. ती गाडी लातुर-अंबाजोगाई – बीड असा प्रवास करते व त्याने दि. 07/07/11 ला बीड – लातुर प्रवास केला त्यास रु. 109/- भाडे आकारुन 25 टप्पे दाखविले म्हणजे ती गाडी लातुर – बीड प्रवास करणारी आहे. दि. 15/07/2011 रोजी रु. 120/- डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे तिकीट आकारण्यात आले आहे. यात परिवहन मंडळाचा काही दोष नाही. सर्व तिकीटाची आकारणी ही शासनाच्या मान्यतेने होत असल्यामुळे गैरअर्जदाराना विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न अर्जदार करत आहे. त्यामुळे सदरचे प्रकरण फेटाळण्यात यावे.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय
- काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असुन, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. व अर्जदाराने दि. 04/07/11, 15/07/11 व वेळोवेळी या बसचा प्रवास केलेला असल्यामुळे व त्या सर्व तिकीटांची पावती न्यायमंचात दाखल केलेली आहे. सदरची तक्रार ही PIL स्वरुपाचे आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराने लातुर ते बीड हे अंतर कधी लातुर-अंबाजोगाई-बीड भाडे हे 113/- आहे, असा प्रवास करते तर लातुर-बीड असा प्रवास करणा-या गाडीचे भाडे हे रु. 109/- आहे. त्यामुळे कधी गैरअर्जदाराची गाडी 25 टप्पे घेवून बीडला पोहचवतेतर कधी 26 टप्पे घेवून ती बीडला प्रवाशांना पोहचवत असते. या रुपयांचे तिकीट जेव्हा प्रवाशाला दिले जाते तेव्हा यात गैरअर्जदार परिवहन मंडळाने अशा प्रकारची सेवेतील त्रुटी केल्याचे निष्पन्न होते. जे तिकीट आहे तेच प्रवाशांना दिले जाणार तसेच महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकानुसार परिवहन मंडळाची भाडेवाड दि. 15/07/11 रोजी झालेली आहे व त्यानंतर अर्जदारास रु. 120/- आकारण्यात आलेले आहेत. यात गैरअर्जदाराने कोणतीही प्रवाशांना गैरसोय केलेली नाही. म्हणजेच गैरअर्जदारने अशा प्रकारची वागणूक इतर प्रवाशांना दिलेली आहे. जनहित याचिका स्वरुपाची सदरची तक्रार असली तरी अर्जदाराने ती सिध्द करावयास पाहिजे अर्जदार ज्या गाडयामधून गेला त्याला छापील तिकिट आहे. तेच देण्यात आलेले आहे. कोणत्याही कागदी पावत्या लिहून महामंडळाने तिकीट दिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांची कुठल्याही प्रकारची गैरसोय महामंडळाने केलेली दिसुन येत नाही. तसेच कोणतेही दर लावून एकास एक अशी वागणूकही दिलेली नाही. म्हणून अर्जदाराने दिलेला अर्ज हा जनहित याचिका स्वरुपाचा असून त्याने प्रत्येकास 10/- रुपये आगाऊचे आकारले. यावरुन साधारण 10/- रुपये जास्तीचे घेतले. परंतु केवळ सर्व तिकीट रु. 120/- व रु. 130/- दिसुन येत आहे. व त्यांच्या गाडीची जे टप्पे आहेत ते 25 कधी तर कधी 27 असे आहे. गैरअर्जदार यांनी रु. 10 आगाऊचे आकारलेले दिसुन येतात. म्हणून अर्जदाराचा अर्ज मंजुर करत असून त्यांची एकुण तिकीटे 21 आहेत. 5 तिकीटे रु. 120 असुन 10 तिकीटावरील रक्कम दिसुन येत नाही. म्हणून सरासरी रु. 120/- तिकीट व रु. 130/- तिकीट दिसुन येत असल्यामुळे सदरच्या केसमध्ये 21 तिकीटात 5 तिकीट स्पष्ट रु.120/- आहेत. 16 मध्ये 10 तिकीटांवर रक्कम दिसुन येत नाही. एकुण 6 मधील रक्कमा रु. 130/- व रु. 160/- अशा दिसुन येत आहेत. म्हणून 21 तिकीटाचे रु. 120/- चे तिकीट रु. 210/- चे नुकसान अर्जदाराचे झालेले असल्यामुळे अर्जदाराची तक्रार मंजुर करण्यात येत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्र. 1 ते 7 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास रक्कम रु. 210/- त्यावर
तक्रार दाखल तारखेपासुन त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
3) गैरअर्जदार क्र. 1 ते 7 यांना आदेश देण्यात येतो की, अर्जदारास मानसीक व शारिरीक
त्रासापोटी रु. 500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.500/- आदेशाची प्रत प्राप्तीपासुन 30
दिवसाच्या आत देण्यात यावेत.
4) गैरअर्जदार क्र. 1 ते 7 यांना आदेश देण्यात येतो की, प्रवाशी ग्राहक ज्या अंतराचा प्रवास
करतो त्या अंतराचे प्रवास भाडे सर्व विभागाच्या बसेसचे सारखे तिकीट दर ठेवून प्रवाशी
ग्राहकांना तिकीट देण्यात यावे.
5) गैरअर्जदार क्र. 1 ते 7 यांना आदेश देण्यात येतो की, आदेश क्र. 4 चे पालन योग्य प्रकारे
होत नसल्याचे सदर तक्रारीवरुन सिध्द झाल्यामुळे ग्राहक सहाय्यता निधीत रु. 1,000/-
आदेश प्राप्तीपासुन 30 दिवसाच्या आत भरावेत.
(श्री. अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते)
सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.