Maharashtra

Dhule

CC/13/100

Ashok Ramchandra Baviskar - Complainant(s)

Versus

Mukhya Karyakari Adhikari, Shri Samartha Sahkari Patpedhi Dhule. - Opp.Party(s)

S Shimpi

27 Jun 2014

ORDER

Consumer Disputes Redressal Forum,Dhule
JUDGMENT
 
Complaint Case No. CC/13/100
 
1. Ashok Ramchandra Baviskar
65, Satsang Colony, Gondur Road Deopur, Dhule
Dhule
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Mukhya Karyakari Adhikari, Shri= Samartha Sahkari Patpedhi Dhule.
1199, Nagarpatti Dhule
Dhule
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'BLE MR. S.S. Joshi MEMBER
 
For the Complainant:S Shimpi , Advocate
For the Opp. Party:
ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

                                  ग्राहक तक्रार क्रमांक   –  १००/२०१३

                                  तक्रार दाखल दिनांक  – १९/११/२०१३

                                 तक्रार निकाली दिनांक – २७/०६/२०१४

   

    १) अशोक रामचंद्र बावीस्‍कर       

    उ.व ६२ कामधंदा – निवृत्‍त

    २) सो. सुनंदा अशोक बावीस्‍कर

    उ. वय. ५५ कामधंदा – नोकरी

    ३) भुषण अशोक बावीस्‍कर

    उ.व.३२ कामधंदा – शिक्षण

    ४) अमोल अशोक बावीस्‍कर

    उ.व.३४ कामधंदा – शिक्षण

    रा.६५ सत्‍संग कॉलनी, गोंदुर रोड, देवपुर धुळे.         - तक्रारदार 

 

                   विरुध्‍द

श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे.

नोटीसची बजावणी मुख्‍यकार्यकारी अधिकारी यांचेवर करण्‍यात यावी.

सचिन सुरेश कुलकर्णी (मुख्‍य कार्यकारी अधिकारी)

११९९ नगरपट्टी धुळे.                           - सामनेवाले

 

न्‍यायासन

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी)

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

 उपस्थिती

(तक्रारदारा तर्फे – अॅड.एस.वाय. शिंपी)

(सामनेवाले तर्फे – एकतर्फा)

निकालपत्र

 (द्वाराः मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)

१.   तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍या पतसंस्‍थेत मुदतठेव पावतींमध्‍ये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.

  1. ‘श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे. या पतसंस्‍थेत मुदतठेव पावतींमध्‍ये रक्‍कम गुंतविली होती. त्‍याचा तपशील खालील प्रमाणे.

 

  1.  
  •  

ठेव दिनांक

देय दिनांक

ठेव रक्‍कम

देय रककम

  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  •  
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • ०००/-
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • ०००/-
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • ०००/-
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • ४००/-
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • १८४/-
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • ४००/-
  1.  
  •  
  •  
  •  
  • ,०००/-
  • ३२०/-

एकूण रक्‍कम रू५,८४,६३७/-+ व्‍याज

 

  1. सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडून मुदतठेव पावतींमधील  मुदतीअंती देय रक्‍कम रक्‍कम रूपये ५,८४,६३७/- व त्‍यावर १३% प्रमाणे व्‍याज आणि मानसिक त्रासापोटी रूपये २५,०००/- व अर्जाचा खर्च रक्‍कम रूपये १०,०००/- सामनेवाले यांचेकडून मिळावा, यासाठी सदरचा तक्रार अर्ज दाखल केला आहे. 

 

        

४.   तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ नि.१ ते नि.१३ वर मुदत ठेव पावतींच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत.

 

५.   सामनेवाले यांना मे. मंचाच्‍या नोटीसची बजावणी होवूनही ते मुदतीत हजर  झाले नाहीत व त्‍यांनी खुलासा दाखल केला नाही. त्‍यामुळे त्‍यांचेविरूध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारीत करण्‍यात आला आहे.

 

६.   तक्रारदार यांचा तक्रार अर्ज, शपथपत्र, पुराव्‍यासाठी दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.

 

              मुददे                                    निष्‍कर्ष

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ?           होय
  1.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात   

कसूर केली आहे काय ?                                                     होय

  1.  तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍याकडून देय रक्‍कम

व्‍याजासह आणि मानसिक त्रास व तक्रार अर्जाच्‍या

खर्चापोटी भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?          होय

  1. ?                              अंतिम आदेशाप्रमाणे

 

  • वेचन

७.   मुद्दा -  तक्रारदार यांनी आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍ट्यर्थ नि.१ ते नि.१३ वर मुदत ठेव पावतींच्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची मुदतठेव पावतींमधील रक्‍कम नाकारलेली नाही.  सदरील ठेवींमधील रक्‍कमेचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे  मत  आहे. म्‍हणून  मुद्दा ‘अ’ चे उत्‍तर  आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

८.   मुद्दा - तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता,  त्‍यांनी पतसंस्‍थेत रक्‍कम गुंतविली होती ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे गुंतवलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम दिलेली नाही ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना द्यावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘ब’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

 

  1. - तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या मुदतठेव पावतींमधील व्‍याजासह होणारी  रक्‍कम  सामनेवाले  यांच्‍याकडून मिळावी अशी मागणी केलेली आहे. या सर्व बाबींचा विचार होता तक्रारदार हे सामनेवाले पतसंस्‍था श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांचेकडून मुदतठेव पावतींमधील मुदतीअंती देय रक्‍कम रूपये ५,८४,६३७/- व त्‍यावर देय तारखेपासून  संपूर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के दराप्रमाणे व्‍याज अशी एकूण रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

 

      तक्रारदार यांची व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले यांच्‍याकडून परत मिळावी म्‍हणून तक्रारदार यांना सामनेवाले पतसंस्‍था श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांच्‍या विरुध्‍द या मंचात दाद मागावी लागली आहे. त्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे.  सबब तक्रारदार हे सामनेवाले यांच्‍या कडून मानसिक त्रासापोटी रु.२०००/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रू.१०००/- भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे या मंचाचे मत आहे. म्‍हणून मुद्दा ‘क’ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.

 

 

१०. मुद्दा - वरील सर्व विवेचनावरून पुढील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

आ दे श

 

 

  1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येत आहे.

 

 

  1. श्री. समर्थ सहकारी पतपेढी मर्या. धुळे. यांनी तक्रारदार यांना खालील नमुद    तपशीलाप्रमाणे मुदत ठेव पावतींमधील मुदतीअंती देय रक्‍कम व त्यावर देय    तारखेपासून संपूर्ण रक्‍कम फिटे पर्यंत द.सा.द.शे.६ टक्‍के प्रमाणे व्‍याज सदर     आदेशाचे तारखेपासून पुढील तीस दिवसांचे आत द्यावेत

 

  1. रूपये २,०१,३३३ दि.०८/११/२०११ पासून ६ टक्‍के व्‍याजासह

ब) रूपये १,८०,००० दि.२१/१२/२०१२ पासून ६ टक्‍के व्‍याजासह

क) रूपये४०,००० दि.२१/०२/२०१३ पासून ६ टक्‍के व्‍याजासह

ड) रूपये४०,४०० दि.१६/११/२०११ पासून ६ टक्‍के व्‍याजासह

इ) रूपये५०,१८४ दि.३१/११/२०११ पासून ६ टक्‍के व्‍याजासह

फ) रूपये७२,७२० दि.१८/११/२०११ पासून ६ टक्‍के व्‍याजासह

 

  1. मानसिक  त्रासापोटी रक्‍कम रू.२,०००/- (अक्षरी  रूपये दोन हजार        मात्र) व  अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रू.१,०००/- (अक्षरी रूपये एक            हजार मात्र) दयावेत.

 

४. वर नमूद आदेशाची अमंलबजावणी(अध्‍यक्ष/ संचालक/ व्‍यवस्‍थापक/        अवसायक)     यापैकी वेळोवेळी जे कोणी पतसंस्‍थेचा कारभार पाहात         असतील त्‍यांनी करावी.  तसेच आदेश क्रं. २ मधील रकमेपैकी काही           रक्‍कम अगर व्‍याज दिले असल्‍यास, कर्ज दिले असल्‍यास सदरची       रक्‍कम वजावट करुन उर्वरित रक्‍कम अदा करावी. 

 

  1.  
  2.  

 

               (श्री.एस.एस. जोशी)(सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)

  •                                  अध्‍यक्षा

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.

 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.