निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 14/03/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 17/03/2011
तक्रार निकाल दिनांकः- 10/04/2012
कालावधी 01 वर्ष. 24 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या
सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.
संदिप पिता माणिकराव सावंत. अर्जदार
वय 40 वर्ष.धंदा.-वैद्यकीय व्यवसाय. अड.जे.एस.औटे.
रा.व्यंकटेश नगर.69 कारेगांव रोड.पराणी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 मुख्य चिफ टर्मिनल मॅनेजर. गैरअर्जदार.
इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लि. अड.ए.जी.सोनी.
पानेवाडी मनमाड ता.मनमाड.जि.नाशिक.
2 अमोल पिता मधुकरराव भेडसुरकर. अड.एस.एन.वेलणकर.
वय सज्ञान.धंदा व्यापार.
रा.दत्तधाम वसमत रोड.परभणी ता.जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.)
गैरअर्जदाराने दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की,
अर्जदाराने गैरअर्जदार यांच्या कंपनीचे एक्स्ट्रा फिल्टकार्ड दिनांक 05/10/2006 रोजी घेतले त्याचा नंबर 712601001021004 असा आहे.अर्जदार हा ट्रक टँन्कर क्रमांक एम.एच -24-ए/2234 चा मालक आहे.दिनांक 05/10/2006 नंतर कार्डाचा वापर करुन अर्जदाराने पेट्रोल खरेदी केले दिनांक 25/05/2007 च्या अगोदर अर्जदाराचे कार्ड बंद पडले म्हणून त्यांनी गैरअर्जदार कंपनीला दिनांक 25/05/2007 रोजी पहिले पत्र पाठवले की, कार्डावर रु.28,979/- शिल्लक असतांना अर्जदाराचे कार्ड बंद पडले सदरील पत्र पाठवल्यानंतरही गैरअर्जदार कंपनीने अर्जदारास त्याची राहिलेली रक्कम परत केली नाही व नंतरही अर्जदाराने गैरअर्जदाराशी वारंवार पत्रव्यवहार केला तरीही अर्जदाराची रक्कम त्याला मिळाली नाही.म्हणून दिनांक 12/01/2011 रोजी अर्जदाराने गैरअर्जदारास कायदेशिर नोटीस पाठवली.त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. व अर्जदाराचा बँक खाते नंबर फॅक्सव्दारे मागितला गैरअर्जदारंनी त्या खात्यावर चुकिच्या नावाने रु.5000/- चा डी.डी. पाठवला म्हणून सदरील रक्कम गैरअर्जदारांकडे परत गेली.
गैरअर्जदाराने दिनांक 25/07/2007 पासून अर्जदाराचे रु. 33,979/- परत केले नाहीत व अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व रु.33,979/- दिनांक 25/07/2009 पासून द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने मिळावेत व त्रुटीच्या सेवेबद्दल रु.25,000/- व अर्जाच्या खर्चापोटी रु.2000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदाराशी केलेला पत्रव्यवहार पोस्टाच्या पावत्या इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत.
गैरअर्जदार क्रं. 1 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने तक्रारीतील फिल्टकार्ड खरेदी केले होते व त्या खरेदीसाठीच्या शर्ती व अटी ह्या अर्जदाराने मान्य करुनच कार्ड खरेदी केलेले होते अर्जदाराने दिनांक 25/05/2007 रोजी त्याचे कार्ड बंद पडल्याचे गैरअर्जदाराला कळवल्याचे गैरअर्जदार अमान्य करतो.अर्जदारास दिनांक 23/02/2011 रोजी रु.34,000/- डि.डि.व्दारे देण्यात आले.अर्जदार हा पत्रव्यवहार कंपनीच्या मनमाड कार्यालयात करत होता त्यावेळी त्यास कल्पना देण्यात आली होती कि, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयातून प्रशासकीय कामकाज चालते परंतु अर्जदार हा पत्रव्यवहार मनमाड कार्यालयातच करत होता.
अर्जदाराने कार्डाच्या नियम व अटीनुसार गैरअर्जदारास कार्ड चालत नसल्याबाबत 15 दिवसाच्या आत गैरअर्जदारास कळवावे अशी अट असतानाही अर्जदाराने त्याचे कार्ड कधी बंद झाले याबाबत काहीही माहिती गैरअर्जदारास दिलेली नाही.
प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदाराने सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नसल्यामुळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने केलेली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, डी.डी.ची झेरॉक्स, कार्डासाठीचा ऑलीकेशन फॉर्म नियम व अटींसह दाखल केलेला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 1 चा लेखी जबाबा प्रमाणेच त्यांचा लेखी जबाब असल्याचे समजावे असे म्हंटले आहे.
तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे. उत्तर
1 अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली
आहे काय ? होय.
2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एक्स्ट्रा फिल्ट कार्ड क्रमांक 712601001021004 दिनांक 05/10/2006 रोजी घेतले ही बाब सर्वमान्य आहे.
अर्जदाराचे एकुण रु.34,000/- गैरअर्जदाराकडे शिल्लक होतें हे गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेल्या दिनांक 23/02/2011 (नि.23 वरील ) ड्राफ्टच्या छायाप्रती वरुन सिध्द होते.ती रक्कम गैरअर्जदाराने अर्जदारास दिनांक 23/02/2011 रोजी परत केलेली आहे.
गैरअर्जदाराने अर्जदारास ही रक्कम परत करुन अर्जदाराचे म्हणणे मान्यच केलेले आहे. हा ड्राफ्ट गैरअर्जदार क्रमांक 1 च्या मनमाड टर्मिनलनेच दिलेला आहे.त्यामुळे अर्जदाराने गैरअर्जदाराच्या मनमाड कार्यालयाशीच पत्रव्यवहार केला म्हणून गैरअर्जदारास अर्जदाराचे पत्रच मिळालेले नव्हते व म्हणूनच अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली नाही हे गैरअर्जदाराचे म्हणणे मंचास मान्य नाही व अर्जदाराने दिनांक 15/10/2007 रोजी गैरअर्जदाराच्या औरंगाबाद शाखेलाही पत्र पाठवलेले आहे ( नि.4/5) तरीसुध्दा गैरअर्जदाराने अर्जदाराचे रु.30,000/- दिनांक 23/02/2011 रोजी परत केलेले आहेत. त्यामुळे अर्जदारास गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिलेली आहे. असे आम्हांस वाटते.त्यामुळे खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास दिनांक 25/05/2007 पासून दिनांक
01/03/2011 पर्यंत रु.34,000/- वर द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज निकाल
समजल्यापासून 30 दिवसाचे आत द्यावे.
3 गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदारास मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व तक्रारीच्या
खर्चापोटी रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावेत.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या सदस्या अध्यक्ष.