जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –60/2011 तक्रार दाखल तारीख –06/02/2011
निकाल तारीख – 08/07/2011
-------------------------------------------------------------
शरद पि अर्जुनराव खडके
वय- 31 वर्षे, धंदा- व्यापार,
रा.सरस्वती कॉलनी नं.2 गेवराई
ता.गेवराई जि. बीड. ... तक्रारदार
विरुध्द
1. मुकेश चांदिराम मंघारमाणी
प्रो.प्रा.सदगुरु एंटरप्रायजेस
जुने बस स्टॅड रोड,शास्त्री चौक
गेवराई ता.गेवराई जि.बीड ... सामनेवाला
2. एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लि.
प्लॉट नं.51, उघोग विहार, सुरजपूर-कासना रोड,
ग्रेटर नोयडा -201306 (उत्तरप्रदेश)
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड. जे. डी.पांडव
सामनेवालेतर्फे :- अँड. डबडे डी.एम.
नि. 1 वरील आदेश
तक्रारदार व सामनेवाले यांचेत न्यायमंचा बाहेर तक्रारीच्या संदर्भात आपआपसात समझोता झाला.त्यामूळे तक्रारदारास सदरची तक्रार चालवणे नाही अशी पुरशीस त्यांनी दाखल केलेली आहे.
तक्रारदाराच्या तक्रारीचे निराकरण झाले असल्याने तक्रार निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
तक्रार पुरशीस प्रमाणे निकाली.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड