दरखास्तदाराने प्रस्तुतची दरखास्त आरोपी यांचेविरुद्ध ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 71 अन्वये दिनांक 29/03/2022 रोजी आयोगात दाखल केली आहे.
2. सदर प्रकरणांत दि. 18/07/2023 रोजी सामनेवाले यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
3. त्यानंतर प्रस्तुत प्रकरणांत दि. 11/08/2023 पासून सामनेवाले याचेविरुध्द तजवीज करणेकामी ठेवण्यात आले, परंतु अर्जदाराने आजपर्यंत कोणतीही तजवीज केली नाही. तसेच मागील सलग 4 तारखेपासून म्हणजेच दि. दरखास्त दिनांक 07/12/2023, 06/02/2024, 03/04/2024, 22/05/2024, व आज दिनांक 09/07/2024 रोजी आहे त्याच टप्प्यावर तजवीज करणेकामी ठेवून देखिल अर्जदार वकीलासह गैरहजर राहिल्यामुळे प्रकरण आहे त्याच टप्प्यावर राहिले.
4. आज प्रकरण वादसूचीवर असून देखील अर्जदार वकीलासह गैरहजर राहिले.
5. नैसर्गिक न्याय हिताच्यादृष्टीने अनेक वेळा संधी देऊन देखील दरखास्तदार आयोगासमोर गैरहजर राहिले, त्यामुळे दरखास्त अर्ज आजपर्यंत आहे त्याच टप्प्यावर प्रलंबित आहे.
6. सततच्या गैरहजेरीमुळे दरखास्तदाराला सदरची दरखास्त चालविण्यात कोणतेही स्वारस्य असल्याचे आढळून येत नाही.
7. परिणामतः उपरोक्त दरखास्त क्रमांक 29/2022 निकाली काढल्यास न्यायसंगत होईल असे आयोगाचे मत आहे.
8. दरखास्त क्रमांक 29/2022 निकाली काढण्यात येते, प्रकरण समाप्त,