Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/98

Shri Sanjay Damodhar Thakre - Complainant(s)

Versus

M/S Sankalp Developers & Other - Opp.Party(s)

S.M. Parate

21 Jan 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/98
 
1. श्री.संजय दामोधर ठाकरे
रा.हुडकेश्‍वर रोड, महात्‍मा गांधी नगर,नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मेसर्स संकल्‍प डेव्‍हलपर्स
नोंदणीकृत कार्यालय ब्‍लॉक न.26 पहिला माळा सांस्‍कृतिक संकुल झांसी राणी चौक सिताबर्डी नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
2. श्री.धमेन्‍द्र वंजारी भागीदार मेसर्स संकल्‍प डेव्‍हलपर्स
रा.यश बिअरबारच्‍या बाजुला नंदनवन चौक नागपूर.1
नागपूर
महाराष्‍ट्र
3. श्री.धमेन्‍द्र वंजारी (भागीदार) मेसर्स संकल्‍प डेव्‍हलपर्स
रा.यश बिअर बारच्‍या बाजुला नंदनवन चौक नागपूर-9
नागपूर
महाराष्‍ट्र
4. श्रीमती वंदना तरारे (भागीदार)मेसर्स संकल्‍प डेव्‍हलपर्स
रा.वैशाली नगर A/ 2122 मोठे ग्राऊंडचे बाजुला नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

    (पारीत व्‍दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष )

                (पारीत दिनांक 21 जानेवारी, 2014 )

 

1.    तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षा कडून, करारानुसार उर्वरीत रक्‍कम एकमुस्‍त स्विकारुन भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळण्‍यासाठी अथवा अशी भूखंडाची विक्री करुन देणे  विरुध्‍दपक्ष यांना शक्‍य नसल्‍यास,  भूखंडापोटी जमा केलेली रक्‍कम व्‍याजासह मिळावी तसेच अन्‍य अनुषंगीक मागण्‍यांसाठी  ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.

2.    तक्रारकर्त्‍याचे कथन थोडक्‍यात खालील प्रमाणे-

      विरुध्‍दपक्ष  मे. संकल्‍प डेव्‍हलपर्स गृह निर्माण सहकारी संस्‍था, नागपूर ही एक भागीदारी संस्‍था असून, वि.प.क्रं 2 व 3 हे तिचे भागीदार आहेत आणि विरुध्‍दपक्षाचा शासना कडून शेतीचे अकृषक रुपांतरण करुन निवासी भूखंड विक्रीचा व्‍यवसाय आहे.

      तक्रारकर्ता ने विरुध्‍दपक्षाचे योजनेतील मौजा सुराबर्डी, तालुका उमरेड,  जिल्‍हा नागपूर (ग्रामीण)  येथील खसरा क्रं 27, पटवारी हलका नं.26, भूखंड क्रं-42, क्षेत्रफळ-1615.00 चौरसफूट खरेदी करण्‍यासाठी दि.27.11.2007 रोजी पावती क्रं-2966 अन्‍वये नगदी रुपये-1000/- आणि  दि.30.11.2007 रोजी पावती क्रं-3033 अन्‍वये नगदी रुपये-19,000/- विरुध्‍दपक्षास दिलेत. त्‍याअनुसार विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याचे नावे भूखंड विक्री  बाबत  दि.30.11.2007 रोजी करारनामा करुन दिला आणि भूखंडाची उर्वरीत रक्‍कम रुपये-44,600/- प्रतीमाह समान हप्‍ता रुपये-1239/- प्रमाणे एकूण-36 मासिक हप्‍त्‍यांमध्‍ये भरावयाचे उभय पक्षांमध्‍ये ठरले. विरुध्‍दपक्षाने भूखंडाचे विक्रीपत्र नोंदविण्‍यापूर्वी भूखंडा संबधी आवश्‍यक असलेली सर्व प्रक्रिया अकृषक परवानगी, नगररचनाकार यांचे कडील ले-आऊट मंजूरी करुन देण्‍याचे आश्‍वासन दिले. करारा नुसार भूखंडाची विक्री करुन देण्‍याची मुदत दि.27.11.2010 अशी होती.

 

 

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने  मासिक किस्‍ती नुसार दि.10.07.2010 पर्यंत  भूखंडाची उर्वरीत रक्‍कम रुपये-39,659/- विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात जमा केली व पावत्‍या प्राप्‍त केल्‍यात. उर्वरीत रक्‍कम विक्रीपत्र नोंदवून देण्‍याचे वेळी एकमुस्‍त वि.प.ला अदा करण्‍याचे ठरविण्‍यात आले होते. अशाप्रकारे भूखंडापोटी तक्रारकर्त्‍याने दि.10.07.2010 पर्यंत एकूण               रुपये-59,659/- विरुध्‍दपक्षाकडे जमा केलेत. त्‍यानंतर भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळावे म्‍हणून तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असता प्रत्‍येक वेळी भूखंड विक्री योग्‍य होण्‍यासाठीची आवश्‍यक प्रक्रिया सुरु असल्‍याचे विरुध्‍दपक्षाने आश्‍वासित केले. त्‍यावरुन विरुध्‍दपक्ष करारातील अटीची पुर्तता करण्‍यास टाळाटाळ करीत असल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे लक्षात आले. वस्‍तुतः तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचे मेहनतीचे उत्‍पन्‍नातून काटकसर करुन सदरची भूखंडाची रक्‍कम विरुध्‍दपक्षाकडे जमा केली होती आणि भूखंड खरेदी करुन त्‍यावर घर बांधण्‍याचे ठरविले होते. विरुध्‍दपक्षाने करारा नुसार दि.10.07.2010 पर्यंत  विहित मुदतीत भूखंडाची विक्री करुन न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे घरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि शारीरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.  

      म्‍हणन तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केली आणि त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील प्रकारे मागणी केली.

      करारा प्रमाणे विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍या  कडून भूखंडाची उर्वरीत रक्‍कम एकमुस्‍त स्विकारुन, भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देण्‍याचे आदेशित व्‍हावे अथवा असे करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास तक्रारकर्त्‍याने भूखंडापोटी विरुध्‍दपक्षाकडे वेळोवेळी जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-59,659/- व्‍याजासह परत करण्‍याचे आदेशित व्‍हावे.  तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल व आर्थिक नुकसानी बद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/-, तसेच विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात जाण्‍या येण्‍या करीता आलेला खर्च रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-10,000/- देण्‍याचे विरुध्‍दपक्षास आदेशित व्‍हावे.

 

 

3.    प्रस्‍तुत न्‍यायमंचाचे मार्फतीने यामधील विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविण्‍यात आली.

 

अ)    विरुध्‍दपक्ष क्रं-1 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृहनिर्माण सहकारी संस्‍था, ब्‍लॉक नं.26, पहिला माळा, सांस्‍कृतीक संकुल, झांसी राणी चौक, सिताबर्डी, नागपूर-


 

 

 

12 या  भागीदारी संस्‍थेच्‍या नाव आणि संपूर्ण पत्‍त्‍यावर पोस्‍टातर्फे  रजिस्‍टर्ड नोटीस पाठविली असता, “ Door Closed- Ist Intimation-08/10/2012” &“ Door Closed- IInd  Intimation-09/10/2012” “Not claimed. Return to Sender” या पोस्‍टाचे  शे-यासह नोटीसचे पॉकीट परत आले व ते निशाणी क्रं-08 वर अभिलेखावर दाखल आहे.

 

ब)     विरुध्‍दपक्ष क्रं-2 धमेंद्र वंजारी भागीदार मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स यांचे कार्यालय, ब्‍लॉक नं.26, पहिला माळा, सांस्‍कृतीक संकुल, झांशी राणी चौक, सिताबर्डी, नागपूर-12 या नाव आणि कार्यालयीन पत्‍त्‍यावर पोस्‍टा तर्फे पाठविलेली रजिस्‍टर्ड नोटीस    “ Door Closed- Ist Intimation-03/07/2013” &“ Door Closed- IInd  Intimation-04/07/2013” “Not claimed. Return to Sender-11/07/2013”  या पोस्‍टाचे शे-यासह परत आली. परत आलेले नोटीसचे पॉकिट अभिलेख  निशाणी क्रं -13 वर दाखल आहे.

 

क)      तर विरुध्‍दपक्ष क्रं-3 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृह निमार्ण सहकारी संस्‍था तर्फे भागीदार श्रीमती वंदना तरारे रा. वैशाली नगर, A/2122 मोठे ग्राऊंडचे बाजुला, नागपूर-17 या नाव आणि पत्‍त्‍यावर पोस्‍टाव्‍दारे पाठविलेली रजिस्‍टर नोटीस घरवाले लेनेसे इन्‍कार-08/10/2012 ” “ Not Claimed-15/10/2012” या पोस्‍टाचे शे-यासह परत आले व ते निशाणी क्रं-07 वर दाखल आहे.

 

ड)     अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष  क्रं-1 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स नागपूर ही भागीदारी फर्म तसेच मे. संकल्‍प डेव्‍हलपर्सचे या फर्मचे भागीदार वि.प.क्रं-1 व वि.प. क्रं-2 यांना पाठविलेली रजिस्‍टर पोस्‍टाची नोटीस “Not claimed. Return to Sender-”   या  शे-यासह परत आल्‍या बद्दल नोटीसची पॉकीटे अभिलेखावर दाखल आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 यांना रजिस्‍टर पोस्‍टाचे  मंचाचे नोटीसची सुचना मिळूनही त्‍यांनी नोटीस स्विकारली नाही म्‍हणून मंचाची नोटीस विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 यांना  तामील झाल्‍याचे समजण्‍यात आले. वि.प.क्रं 1 ते 3 यांना न्‍यायमंचाचे नोटीसची सुचना मिळूनही ते न्‍यायमंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा त्‍यांनी आपले लेखी उत्‍तरही दाखल केले नाही म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने निशाणी क्रं-1 वर दि.23.08.2013 रोजी पारीत केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

4.   तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत  दाखल दस्‍तऐवजांचे यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात,  ज्‍यामध्‍ये उभय पक्षांमधील भूखंडा संबधीचे बयाणापत्र, विरुध्‍दपक्षाचा ले-आऊट नकाशा, विरुध्‍दपक्ष संस्‍थेचे पैसे जमा करण्‍याचे पुस्‍तक, तक्रारकर्त्‍या  तर्फे विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात वेळोवेळी भूखंडापोटी जमा केलेल्‍या रकमेच्‍या पावत्‍यांच्‍या प्रती अशा दस्‍तऐवजाचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने दि.12.12.2013 रोजी लेखी युक्‍तीवाद सादर केला.

 

5.  तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, आणि  अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले.  

 

6.   प्रस्‍तुत‍ प्रकरणात न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे नोंदविलेले आहेत.

             

        मुद्दा                                    उत्‍तर

(1)  करारा नुसार विरुध्‍दपक्षाने भूखंडा पोटी त.क.

     कडून मोबदला स्विकारुनही, भूखंडाचे विक्रीपत्र

     त.क.चे नावे करुन न दिल्‍याने, विरुध्‍दपक्षाने

     त.क.ला दिलेल्‍या सेवेत कमतरता सिध्‍द होते

     काय? ………………........................................होय.

(2)  काय आदेश? ………………………………….... ..अंतीम आदेशा प्रमाणे

                                              

::  कारण मीमांसा    ::

मुद्दा क्रं 1 व 2

7.   तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर, तक्रारकर्ता  आणि विरुध्‍दपक्ष गृहनिर्माण संस्‍था यांचे मध्‍ये ( विरुध्‍दपक्ष म्‍हणजे क्रं-1 मे.संकल्‍प डेव्‍हलपर्स गृहनिर्माण संस्‍था, सिताबर्डी नागपूर आणि तिचे भागीदार विरुध्‍दपक्ष क्रं-2 धमेंद्र वंजारी व विरुध्‍दपक्ष क्रं-3 श्रीमती वंदना तरारे असे वाचण्‍यात  यावे ) तक्रारकर्त्‍याने दि.30.11.2007 रोजी त्‍याचे आणि विरुध्‍दपक्षामध्‍ये झालेल्‍या भूखंडाचे               ( करारनाम्‍या नुसार भूखंड क्रं-42 म्‍हणजे- मौजे सुराबर्डी, प.ह.नं.26, तालुका जिल्‍हा नागपूर येथील खसरा क्रं-27 मधील भूखंड क्रं-42, एकूण क्षेत्रफळ-1615.00 चौरसफुट  असे वाचण्‍यात यावे) विक्री संबधाने झालेल्‍या बयाणापत्राची (करारनामा) प्रत पान क्रं 10 वर दाखल केली.

 

 

 

8.   सदर दि.30.11.2007 रोजीचे उभय पक्षांमधील करारनाम्‍या नुसार  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा कडून नमुद भूखंड क्रं-42 एकूण रुपये-64,600/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा करार केला. करारनाम्‍यापूर्वी दि.27.11.2007 रोजी पावती क्रं-2966 अन्‍वये टोकन राशी म्‍हणून नगदी रुपये-1000/- आणि  दि.30.11.2007 रोजी पावती क्रं-3033 अन्‍वये डाऊन पेमेंट म्‍हणून नगदी रुपये-19,000/- विरुध्‍दपक्षास दिलेत. टोकन राशी रुपये-1000/- आणि डाऊन पेमेंट म्‍हणून रुपये-19,000/- विरुध्‍दपक्षास नगदी दिल्‍याच्‍या पावत्‍या अभिलेखावर दाखल आहेत. तसेच करारनाम्‍या मध्‍ये सुध्‍दा तक्रारकर्ता  कडून टोकनराशी आणि बयाणा दाखल एकूण रुपये-20,000/- नगदी मिळाल्‍याचा उल्‍लेख आहे. उर्वरीत रक्‍कम रुपये-44,600/- प्रतीमाह समान हप्‍ता रुपये-1239/- प्रमाणे एकूण 36 मासिक किस्‍तीमध्‍ये दि.27.11.2007 ते 27.11.2010 या कालावधीत भरावयाची होती असे करारनाम्‍यात नमुद आहे. विहित मुदतीत भूखंडाची पूर्ण रक्‍कम जमा केल्‍यास भूखंडाची विक्री लावून देण्‍यात येईल आणि विक्रीचा पूर्ण खर्च घेणा-याकडे राहिल असेही करारात नमुद केले आहे.

 

9.    तक्रारकर्त्‍याने पान क्रं 11 वर विरुध्‍दपक्षाने भूखंडा पोटी प्राप्‍त झालेल्‍या रकमे बद्दलची नोंद केल्‍या बद्दलचा दस्‍तऐवज दाखल  केलेला आहे, त्‍यानुसार तक्रारकर्ता ने दि.05.12.2007 ते दि.10.07.2010 या कालावधीत विरुध्‍दपक्षाकडे एकूण 32 मासिक किस्‍तीमध्‍ये भूखंडापोटी रकमा भरल्‍याच्‍या नोंदी नमुद आहेत.

     तक्रारकर्त्‍याने पान क्रं 13 ते 29 वर विरुध्‍दपक्ष संकल्‍प डेव्‍हलपर्स यांचेकडे करारातील नमुद भूखंडापोटी रकमा जमा केल्‍या बद्दल पावत्‍यांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत, त्‍याचे विवरण खालील प्रमाणे आहे-

अक्रं

पावती क्रं

पावती दिनांक

जमा केलेली रक्‍कम

शेरा

1

2

3

4

5

1

2966

27/11/2007

1000/-

टोकन राशी

2

3033

30/11/2007

19000/-

डाऊन पेमेंट

3

3124

05/12/2007

1239/-

मासिक किस्‍त

4

3729

05/01/2008

1239/-

मासिक किस्‍त

5

000625

06/02/2008

1239/-

मासिक किस्‍त

6

001313

11/03/2008

1240/-

मासिक किस्‍त

7

001854

09/04/2008

1240/-

मासिक किस्‍त

8

001908

10/05/2008

1240/-

मासिक किस्‍त

9

003376

21/06/2008

1240/-

मासिक किस्‍त

10

004006

23/07/2008

1240/-

मासिक किस्‍त

11

004420

11/08/2008

1250/-

मासिक किस्‍त

12

004990

11/09/2008

1220/-

मासिक किस्‍त

13

6004

21/10/2008

1240/-

मासिक किस्‍त

1

2

3

4

5

14

6300

04/11/2008

1240/-

मासिक किस्‍त

15

7236

18/12/2008

1240/-

मासिक किस्‍त

16

7537

06/01/2009

1240/-

मासिक किस्‍त

17

8119

05/02/2009

1240/-

मासिक किस्‍त

18

8755

09/03/2009

1240/-

मासिक किस्‍त

19

9242

08/04/2009

1240/-

मासिक किस्‍त

20

9694

08/05/2009

1235/-

मासिक किस्‍त

21

10220

06/06/2009

1240/-

मासिक किस्‍त

22

10733

09/07/2009

1240/-

मासिक किस्‍त

23

11139

06/08/2009

1240/-

मासिक किस्‍त

24

11556

05/09/2009

1240/-

मासिक किस्‍त

25

12067

16/10/2009

1240/-

मासिक किस्‍त

26

12412

10/11/2009

1240/-

मासिक किस्‍त

27

12787

09/12/2009

1200/-

मासिक किस्‍त

28

....

07/01/2010

1278/-

मासिक किस्‍त

29

13426

08/02/2010

1239/-

मासिक किस्‍त

30

13592

09/03/2010

1240/-

 

31

13959

10/04/2010

1240/-

 

32

14163

08/05/2010

1240/-

 

33

14376

12/06/2010

1240/-

 

34

14539

10/07/2010

1240/-

 

 

 

एकूण

59,659/-

 

 

 

 

10.  अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याने करारनाम्‍या नुसार भूखंडापोटी टोकन अमाऊंट/डाऊन पेमेंट या सदराखाली आणि वेळोवेळी मासिक किस्‍तीव्‍दारे एकूण रक्‍कम रुपये-59,659/- विरुध्‍दपक्षाकडे भूखंडापोटी भरल्‍याची बाब दाखल करारनामा आणि उपलब्‍ध पावत्‍यांच्‍या प्रतीं वरुन पूर्णतः सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याची तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल आहे तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 ते 3 यांनी  सुध्‍दा न्‍यायमंचा समक्ष उपस्थित होऊन त्‍यांचा प्रतिवाद दाखल केलेला नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षाकडे, भूखंडा पोटी एकूण रक्‍कम रुपये-59,659/- चा भरणा केल्‍याची बाब मान्‍य करण्‍यास हरकत नाही, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

11.   मंचाचे मते, विरुध्‍दपक्षाने ले आऊट मधील भूखंड विक्रीचे नावाखाली तक्रारकर्त्‍या  कडून  जवळपास भूखंडाचे किंमतीचे 92 टक्‍के रक्‍कम वसूल केल्‍याची बाब सिध्‍द झालेली आहे आणि उर्वरीत रक्‍कम भरुन भूखंडाची विक्री करुन घेण्‍यास तक्रारकर्ता  तयार होता. परंतु आज पावेतो भूखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे करुन दिलेले नाही. दरम्‍यानचे काळात एकतर निवासी भूखंडाच्‍या  किंमती दिवसें  दिवस जलद गतीने वाढून गेलेल्‍या असतात आणि


 

वाट पाहून बराच कालावधी उलटून गेल्‍यामुळे भूखंडाच्‍या वाढलेल्‍या किंमतीमुळे दुसरीकडे संबधित ग्राहक भूखंड विकत घेऊ शकत नाही. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍या  कडून भूखंडाचे किंमतीपोटी 92 टक्‍के मोबदला स्विकारुन करारा नुसार भूखंडाची विक्री करुन न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याची बाब पूर्णतः सिध्‍द होते.

 

12.   तक्रारकर्त्‍याने करारा प्रमाणे भूखंडाचे विक्रीपत्र त्‍याचे नावे नोंदवून मिळण्‍याची मागणी आपले तक्रारीत केलेली आहे व असे करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास त्‍याने भूखंडापोटी जमा केलेली रक्‍कम रुपये-59,659/- व्‍याजासह  परत मिळण्‍यास तसेच  त्‍या संबधाने अन्‍य अनुषंगीक मागण्‍या केलेल्‍या आहेत.

 

13.   उपरोक्‍त नमुद परिस्थितीत, विरुध्‍दपक्षाने भूखंडाची उर्वरीत‍ रक्‍कम (भूखंडाची एकूण किंमत रुपये-64,600/-(वजा) भूखंडापोटी जमा केलेली एकूण रक्‍कम-59,659/-) रुपये-4941/- तक्रारकर्त्‍या  कडून स्विकारुन, तक्रारकर्त्‍याचे नावे भूखंडाचे नोंदणीकृत खरेदीखत नोंदवून द्दावे. नोंदणीचा खर्च करारा नुसार तक्रारकर्त्‍याने करावा. काही कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदणीकृत खरेदीखत नोंदविणे, विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास, भूखंडापोटी तक्रारकर्त्‍या कडून वेळोवेळी स्विकारलेली एकूण रक्‍कम रुपये-59,659/- भूखंडापोटी शेवटची मासिक किस्‍त स्विकारल्‍याचा दिनांक-10.07.2010 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.12% दराने व्‍याजासह, तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्षाने परत करावी. तसेच तक्रारकर्त्‍यास  झालेल्‍या  शारिरीक  व मानसिक त्रासाबद्दल रुपये-7000/- व तक्रारीचे खर्चा बद्दल रुपये-3000/- विरुध्‍दपक्षाकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र ठरतो, असे न्‍यायमंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

14.   वरील वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

          

                    ::आदेश::

 

       तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 यांचे विरुध्‍द वैयक्तिक

       आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

1)     विरुध्‍दपक्ष यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी भूखंडाचे खरेदी

       बाबत नोंदणीकृत करारा नुसार मौजा सुराबर्डी,तालुका जिल्‍हा नागपूर-

 

 

 

       येथील योजनेनुसार भूखंड क्रं-42 चे नोंदणीकृत खरेदीखत, तक्रारकर्त्‍या

       कडून उर्वरीत रक्‍कम रुपये-4941/- (अक्षरी रुपये चार हजार नऊशे

       एक्‍केचाळीस फक्‍त ) स्विकारुन तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून द्दावे. असे

       करणे विरुध्‍दपक्षास शक्‍य नसल्‍यास, तक्रारकर्त्‍याने, वि.प.कडे भूखंडा

       पोटी जमा केलेली एकूण रक्‍कम रुपये-59,659/-(अक्षरी रु.एकोणसाठ-

       हजार सहाशे एकोणसाठ फक्‍त) भूखंडापोटी शेवटची मासिक किस्‍त

       स्विकारल्‍याचा दि.- 10.07.2010  पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य

       अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्षाने

       तक्रारकर्त्‍यास परत करावी.

2)     विरुध्‍दपक्षाने, तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल

       रु.-7000/-(अक्षरी रु. सात हजार फक्‍त)  आणि तक्रारखर्च म्‍हणून

       रु.-3000/-(अक्षरी रु. तीन हजार फक्‍त) द्दावेत.

3)     सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्षाने सदर निकालपत्राची प्रत प्राप्‍त

       झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे..

4)     तक्रारकर्त्‍याच्‍या अन्‍य मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येत आहेत.

5)     निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

       देण्‍यात यावी.

          

 

 

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.