Maharashtra

Pune

CC/11/355

Sou.Shalini Sunil Gargote& Shri.Sunil Rahul Gargote - Complainant(s)

Versus

M/sRajashree Bhagidari Sanstha - Opp.Party(s)

Adv.Umesh Murlidhar Bhande

08 Mar 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/355
 
1. Sou.Shalini Sunil Gargote& Shri.Sunil Rahul Gargote
87/4/a,1,flat n 1,Shri Ganesha Residency,Azadnagar,Kothrud pune 38
Pune
Maha
...........Complainant(s)
Versus
1. M/sRajashree Bhagidari Sanstha
Sahtataraka Apt,lokmanya colony ,Kothrud pune 38
Pune
Maha
2. Shri.Virendra Ganpat Jagadale
S.N.140/03,flat no 07, Anant Apt,Belkenagar,Kothrud Pune 38
Pune
Maha
3. Shri.Rajesh Bandopant Shinde
Shindechal,Bhelkenagar,Kothrud pune 38
Pune
Maha
4. Shri.Chitrasen Devakar,Khilare
31/1,AmrutBuildiing,Karveroad,Near Shetriya Karyalaya
Pune
Maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S. M. KUMBHAR MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

** निकालपत्र **
(08/03/2013)
 
      प्रस्तुतची तक्रार, तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदेणार क्र. 1, 2, 3 व 4 चे विरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारीतील कथने खालीलप्रमाणे.
1]    तक्रारदार यांना निवासाकरीता सदनिकेची आवश्यकता असल्याने त्यांनी जाबदेणार क्र. 1, मे. राजश्री डेव्हलपर्स तर्फे भागीदार, जाबदेणार क्र. 2, 3 व 4 यांच्याकडे सदनिका विकत देण्याची मागणी केली. तक्रारदार यांनी जाबदेणार यांच्याश्री सदनिकेसंबंधी चर्चा करुन दि. 16/10/1999 रोजी करारनामा करुन सिटी सर्व्हे क्र. 87/4अ/1, आझादनगर, कोथरुड, पुणे येथील “श्री गणेशा रेसिडेन्सी” या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. 1, 60.07 चौ. मी. खरेदी करण्याचे मान्य केले. सदरचा करारनामा हा दि. 16/10/1999 रोजी दुय्यम मिबंधक, हवेली क्र. 4 येथे 1229/99 अ‍न्वये नोंदविला. सदनिकेचा मोबदला एकुण रक्कम रु. 5,45,000/- इतका ठरला, त्यापैकी तक्रारदार यांनी करारनामा करण्यापूर्वी रक्कम रु. 2,20,000/- चेकद्वारे जाबदेणार यांना अदा केली. तसेच उर्वरीत रक्कम रु. 3,25,000/- तक्रारदारांनी दि. 17/12/1999 रोजी कॉसमॉस बँक, पौड रोड शाखेच्या चेकने अदा केली. याप्रमाणे तक्रारदारांनी जाबदेणार यांना सदनिकेपोटी संपूर्ण मोबदला अदा केला. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना अतिरिक्त
 
 
रक्कम रु. 20,000/- डीड ऑफ अपार्टेमेंट व सोसायटी नोंद करण्याकरीता दिली होती. या व्यतिरिक्त तक्रारदार यांनी जाबदेणार यांना रक्कम रु. 14,650/- स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी आणि रक्कम रु. 5,996/- करारनाम्याच्या रजिस्ट्रेशनसाठी दिले, अशाप्रक्रारे तक्रारदार यांनी जाबदेणार यांना सदनिकेपोटी एकुण रक्कम रु. 5,65,646/- दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार यांनी त्यांना सदनिकेचा ताबा दि. 01 जानेवारी 2000 रोजी दिला, परंतु करारनाम्याच्या अटी व शर्तींनुसार सोयी व सुविधांबाबतची पुर्तता केली नाही. जाबदेणार यांनी मान्य करुनही इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला दिला नाही, सदनिकाधारकांची सोसायटी, अपार्टमेंट ऑफ असोसिएशन किंवा कन्डोमिनम करुन रितसर दस्त करुन देण्याची जबाबदारी ही जाबदेणारांची आहे, ती त्यांनी पार पाडलेली नाही. त्याचप्रमाणे जाबदेणार यांनी कन्व्हेयन्स डीड करुन दिलेले नाही. या सर्व गोष्टींमुळे तक्रारदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.   जाबदेणार यांनी तक्रारदारांना करारामध्‍ये ठरल्‍याप्रमाणे व कबूल केल्‍या प्रमाणे सेवा व सुविधा दिलेल्‍या नाहीत. म्‍हणून जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेल्‍या सेवेत कमतरता आहे. ही सेवा दोषपूर्ण आहे म्‍हणून सदरील तक्रार तक्रारदारांनी जाबदेणारांविरुद्ध दाखल केलेली आहे. तक्रारदार, जाबदेणार यांच्याकडून इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला, सदनिकाधारकांची सोसायटी, अपार्टमेंट ऑफ असोसिएशन किंवा कन्डोमिनम करुन तसेच कन्व्हेयन्स डीड करुन मागतात. त्याचप्रमाणे तक्रारदार सर्व जाबदेणारांकडून सदनिका क्र. 1 चे डीड ऑफ असाईनमेंट व खरेदीखत, शारिरीक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- द्यावेत व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- द्यावा अशी मागणी करतात.
 
 
 
2]    सदर प्रकरणातील जाबदेणार क्र. 2, 3 व 4 यांना नोटीस बजावूनही गैरहजर राहिल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुध्‍द मंचाने दि. 12/12/2011 रोजी एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला. जाबदेणार क्र. 1 यांना या कामी हजर राहून म्हणणे मांडण्यासाठी दि. 27/4/2012 रोजीच्या “पुढारी” या दैनिकामध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली, तरीही जाबदेणार क्र. 1 मंचामध्ये अनुपस्थित राहिले म्हणून मंचाने दि. 9/7/2012 रोजी जाबदेणार क्र. 1 यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला. त्‍यामुळे प्रस्‍तूतच्या प्रकरणामध्ये तक्रारदार यांनी दाखल केलेले शपथपत्र व कागदपत्रे, त्‍याचप्रमाणे तक्रारदारांनी केलेल्‍या युक्‍तीवादाचा विचार करुन गुणवत्‍तेवर निर्णय देण्‍यात येत आहे.
 
4]    तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या तक्रारीतील कथने, कागदपत्रे व युक्‍तीवादाचा विचार करता खालील मुद्ये निश्चित करण्‍यात येत आहेत. सदर मुद्ये व त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे-
            मुद्ये                                       निष्‍कर्ष
[अ]   जाबदेणार यांनी तक्रारदार यांना दिलेल्या    :                
      सदनिकेसोबत अनुषंगिक सेवा न देऊन     :
      सदोष सेवा दिलेली आहे का ?                  :     होय
 
[ब]    जाबदेणार हे तक्रारदार यांना नुकसान      :
      भरपाई व मागणी केल्‍या प्रमाणे सेवा            :
      देण्‍यास जबाबदार आहेत का ?                  :     होय
 
 [क]   अंतिम आदेश काय   ?                 :     तक्रार अंशत: मंजूर
 
 
कारणे :-
5]    प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारदार यांनी जाबदेणार व तक्रारदार यांच्यातील नोंदणीकृत करारनामा, भागीदारी पत्र, जाबदेणार यांना दिलेली नोटीस व त्याच्या आर. पी. ए. डीच्या पावत्या इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 1 ते 4 यांच्याकडून सिटी सर्व्हे क्र. 87/4अ/1, आझादनगर, कोथरुड, पुणे येथील “श्री गणेशा रेसिडेन्सी” या इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. 1, 60.07 चौ. मी. खरेदी केली व त्याचा करारनामा दि. 16/10/1999 रोजी दुय्यम मिबंधक, हवेली क्र. 4 येथे 1229/99 अ‍न्वये नोंदविला. तक्रारदार यांनी जाबदेणार यांना सदनिकेपोटी संपूर्ण मोबदला दिलेला आहे. आजरोजी तक्रारदार हे जाबदेणार यांना काहीही देणे लागत नाहीत. सदनिकेच्या किंमतीपोटी तक्रारदारांनी जाबदेणारांना एकुण रक्कम रु.  5,65,646/- अदा केलेले आहेत. जाबदेणारांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा दि. 01/01/2000 रोजी दिला, परंतु करारनाम्यातील अटी व शर्तींप्रमाणे कबुल करुनही इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही, तसेच कबुल करुनही सदनिकाधारकांची सोसायटी, अपार्टमेंट ऑफ असोसिएशन किंवा कन्डोमिनम करुन दिलेली नाही आणि कन्व्हेयन्स डीडही करुन दिलेले नाही. त्याचप्रमाणे सदनिका क्र. 1 चे डीड ऑफ असाईनमेंट व खरेदीखत करुन दिलेले नाही. अशा रितीने जाबदेणार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदारांना दिलेली सेवा ही सदोष आहे व त्‍यामुळे सेवा दोषरहित करुन देण्‍यास जाबदेणार जबाबदार आहेत.
 
6]    तक्रारदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे व तक्रारीतील कथने ही जाबदेणार यांनी मंचामध्ये हजर राहून नाकारलेली नाहीत. कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून
 
 
येते की, तक्रारदार यांनी केलेल्‍या मागण्या या योग्‍य व कायदेशिर आहेत. तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यापूर्वी दि. 14/06/2011 रोजी अ‍ॅड. श्री. उमेश भांडे यांच्यामार्फत सर्व जाबदेणारांना नोटीस पाठविली होती, परंतु जाबदेणार यांनी नोटीशीस कुठलेही उत्तर दिले नाही. या प्रकरणातील कथने व कागदपत्रांचा विचार करता तक्रारदार हे जाबदेणार यांच्‍याकडून पूर्णत्वाचा दाखला, सदनिकाधारकांची सोसायटी, अपार्टमेंट ऑफ असोसिएशन किंवा कन्डोमिनम करुन आणि कन्व्हेयन्स डीडही करुन मिळण्यास, त्याचप्रमाणे सदनिका क्र. 1 चे डीड ऑफ असाईनमेंट व खरेदीखत करुन मिळण्‍यास पात्र आहेत. त्‍याचप्रमाणे नुकसान भरपाई पोटी रक्‍कम रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च 3,000/- मिळण्‍यास पात्र आहेत. सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.
:- आदेश :-
      1]     तक्रारदारांची तक्रार ही अंशत: मंजूर करण्यात येते.
      2]    असे जाहिर करण्‍यात येते की, जाबदेणार क्र. 1 ते 4 यांनी
तक्रारदार यांना कबूल करुनही सदनिका दिल्यानंतर वर नमुद
      केल्याप्रमाणे व नोंदणीकृत करारनाम्याप्रमाणे सेवा न देऊन
सेवेत कमतरता केलेली आहे. 
 
3]         जाबदेणार क्र. 1 ते 4 यांना असे आदेश देण्‍यात येतात की,
त्‍यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांना इमारतीच्या
पूर्णत्वाचा दाखला, सदनिकाधारकांची सोसायटी, अपार्टमेंट
ऑफ असोसिएशन किंवा कन्डोमिनम करुन द्यावे, तसेच
सदनिका क्र. 1 चे डीड ऑफ असाईनमेंट व खरेदीखत आणि
कन्व्हेयन्स डीड, त्यांना आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून
एक महिन्‍याच्‍या आत करुन द्यावे. 
 
 
 
      4]    जाबदेणार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदार यांना वैयक्तीक व
संयुक्तीकरित्या रक्कम रु. 20,000/- (रु. वीस हजार फक्त)
      मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून
व रक्कम रु. 3,000/- (रु. तीन हजार फक्त) तक्रारीच्या
खर्चापोटी त्यांना या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून एक
महिन्‍याच्‍या आत द्यावी. 
 
5]    जाबदेणार क्र. 1 ते 4 यांनी नुकसान भरपाईची रक्‍कम
आदेशाची प्रत मिळाल्यासून एक महिन्‍याच्‍या आत
अदा न केल्‍यास, तक्रारदार सदर रक्‍कमेवर द.सा.द.शे
9 % दराने रक्‍कम फिटेपर्यन्‍त व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत.
 
6]    आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S. M. KUMBHAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.