तक्रार क्रमांक – 122/2009 तक्रार दाखल दिनांक – 17/03/2009 निकालपञ दिनांक – 25/02/2010 कालावधी - 00 वर्ष 11महिने 08दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर मानसरोवर को. हॉ. सो. लि., तर्फे विशाल सिंगासने, सेक्रेटरी बिल्डींग नं.17,18,19,20, नवरे नगर , बि केबीन रोड, अंबरनाथ(पुर्व), जिल्हा - ठाणे 421 501. .. तक्रारदार विरूध्द 1. मे. रघुनाथ असोसियेट्स लक्षमनराव, नवरे नगर , गट नं. 15(पीटी) ऑफ मोरिवली , बि केबीन रोड, अंबरनाथ(पुर्व), जिल्हा - ठाणे 421 501. 2.श्री.अजीत ए.पदते पार्टनर, लक्षमनराव, नवरे नगर , गट नं. 15(पीटी) ऑफ मोरिवली , बि केबीन रोड, अंबरनाथ(पुर्व), जिल्हा - ठाणे 421 501. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल पुनम माखिजानी वि.प एकतर्फा एकतर्फा आदेश (पारित दिः 25/02/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार मानस सरोवर को.ऑप.हॉ.सो. तर्फे विशाल सिंगासने, सेक्रेटरी यांनी मे.रघुनाथ असोसिएट्स व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडे सदर सोसायटीचे कन्व्हेयन्स OC, CC, व इतर क्लॉज 8 A to k पर्यंत मागण्या मागितल्या आहे.
2. सदर सोसायटी हि दि.22/06/2006 पासुन नोंदणीकृत आहे. विरुध्द पक्षकार हे पेशाने बिल्डर व डेव्हलपर आहेत. सोसायटीतील सर्व सदस्यांच्या मागण्या समान आहेत. त्यांच्यामध्ये झालेल्या करारनाम्याप्रमाणे विरुध्द पक्षकार यांनी ब-याच सेवा देण्यामध्ये कमतरता दाखविली आहे. विरुध्द पक्षकार हे करारनाम्यातील अटी व इतर नियमांशी बांधिल आहेत त्यामुळे .. 2 .. नियमाबहाय्य घातलेल्या करारनाम्यातील अटी मंचाच्यामते चुकीच्या वाटतात.
3. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार सोसायटीच्या जागेचे कन्व्हेयन्स OC, CC सोसायटी नोंदणीकृत होईपर्यंतचे चार्जेस प्रॉपर्टी टॅक्स भरणे इलेक्ट्रीसिटीची सोय, स्वतंत्र पाण्याचे कनेक्शन, ड्रेनेज लाईन देणे व तोपर्यंतचे म्युनिसिपल टॅक्सेस भरणे यासर्व गोष्टींना कायदेशिररित्या जबाबदार आहेत. इलेक्ट्रीक मिटर व इतर बिले पाण्याचे बिले प्रॉपर्टी टॅक्स हे सासायटी बनल्या नंतर तक्रारदार सोसायटीच्या नावे करुन देण्यास बांधिल आहेत. तसेच तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे विरुध्द पक्षकार यांनी ’ड्रेनेज सर्टिफिकेट’ तक्रारदारांना दिले पाहिजे. अद्यापी या सर्व सेवा विरुध्द पक्षकारांनी पुरवण्यामध्ये निष्काळजीपणा दाखविलेला आहे. 4. मंचाने विरुध्द पक्षकार 1 व 2 यांना नोटिस बजावणी करुनही ते मंचात हजर राहीले नाही व त्यांनी त्यांची लेखी कैफीयत दाखल केली नाही म्हणुन मंचाने विरुध्द पक्षकार 2 यांचे विरुध्द दि.10/08/2009 रोजी व विरुध्द पक्षकार 1 यांचे विरुध्द दि.23/11/2009 रोजी ’नो डब्ल्यु एस’ आदेश पारित केला. व त्याप्रमाणे पुढे एकतर्फा चौकशी होऊन मंच पुढील एकतर्फा आदेश पारित करित आहेत. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 122/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रु. दोन हजार फक्त) तक्रारदार यांस द्यावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार सोसायटी मानस सरोवर को.ऑप.हॉ.सो याच्या नावे कन्व्हेयन्स व OC, CC करुन देणे तसेच प्रॉपर्टी टॅक्स् पाण्याचे व इलेक्ट्रीक मिटर सोसायटीच्या नावे बदलुन द्यावे. शिवाय अंबरनाथ मुनिसिपल कॅरपोरेशन कडुन ड्रेनेज सर्टिफिकेट व मुळ सॅक्शन प्लॅन सोसायटीच्या ताब्यात द्यावा. सोसायटी रजिस्टर होईपर्यंतचे मेन्टेनसचे स्टेटमेंट ऑफ अकाऊंट सोसायटीस सुपुर्त करावे. या आदेशाची अमलबजावनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2 महिन्यांच्या आत करावे. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार सोसायटीस मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु. 2,500/-(रु.दोन हजार पाचशे फक्त) द्यावे.
.. 3 .. 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
5.तक्रारकर्ता-यांनी मा.सदस्यां करिता दाखल केलेले सेट (2 प्रती) त्वरित परत घ्याव्यात, मुदती नंतर मंचाची जबाबदारी नाही. दिनांक – 25/02/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट ) (सौ.भावना पिसाळ ) सदस्य प्र.अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|