(द्वारा - श्री. ना. द. कदम ................... मा.सदस्य)
1. सामनेवाले ही बांधकाम व्यावसायिक संस्था आहे. सामनेवाले यांनी वसर, ता. अंबरनाथ येथे विकसित केलेल्या प्रकल्पातील विकत घेतलेल्या सदनिकेबाबत प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले यांनी वसर, ता. अंबरनाथ, जि. ठाणे येथील स.न.39, हिस्सा नं. 4, या भुखंडावर निवासी सदनिकेचा प्रकल्प विकसित करत असल्याबाबतची आकर्षक जाहीरात दिल्यानंतर सामनेवाले यांच्या प्रायोजित प्रकल्पातील 450 चौ.फुट क्षेत्रफळाची एक सदनिका रु. 4 लाख किंमतीस विकत घेण्याचा व्यवहार केला व दि. 26/05/2013 ते दि. 14/03/2014 दरम्यान रु. 4.50 लाख सामनेवाले यांना दिले. समानेवाले यांनी तक्रारदाराबरोबर सदनिका विक्री बाबतचा समझोता करार (memorandum of understanding) दि. 16/07/2013 रोजी केला. तथापी, सामनेवाले यांनी दीर्घकाळ कोणतेही बांधकाम केले नाही व ताबाही दिला नाही. तक्रारदारांनी बराच काळ वाट पाहुनही, सामनेवाले यांनी बांधकामाबाबत तसेच, ताबा देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे सामनेवाले यांचे विरुध्द पोलीसामध्ये फिर्यादही दाखल केली व त्यानंतर प्रस्तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांचे कडुन सदनिकेचा ताबा मिळावा अथवा रक्कम रु. 4.50 लाख व्याजासह परत मिळावी, तक्रारदारांना झालेले नुकसान रु. 85,000/- मिळावे व तक्रार दाखल केल्यापासुन ताबा मिळेपर्यंत रु. 5,000/- प्रतिमहिना प्रमाणे मिळावेत, व रु. 50,000/- तक्रार खर्च मिळावी अशा मागण्या केलेल्या आहेत.
3. सामनेवाले यांना पाठविलेली तक्रारीची नोटीस दि. 19/08/2016 रोजी मिळावी असल्याबाबतचा पोस्टल ट्रॅकरिपोर्ट तक्रारदारांनी दाखल केला. तसेच सामनेवाले हे तक्रारीमधील नमुद पत्त्यावर व्यवसाय करत असल्याचे व सामनेवाले यांना नोटिस बजावणी झाल्याबाबतचे शपथपत्र तक्रारदारांनी दाखल केले. त्यानंतर सामनेवाले यांना दि. 19/11/2016 पर्यंत लेखी कैफियत दाखल करण्याची संधी दिली परंतु ते गैरहजर राहिल्याने / तक्रारीस जबाब दाखल न केल्याने, सामनेवाले यांचे विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तवाद दाखल केला. तक्रारदारांचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यात आला. त्यावरुन प्रकरणाध्ये खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात -
अ) तक्रारदारांनी तक्रारीमध्ये नमुद केल्यानुसार तसेच तक्रारीसोबत शपथेवर दाखल केलेल्या दि.16/07/2013 रोजीच्या समझोता करारामधील तरतुदीनुसार व अन्य कागदपत्रांवरुन असे स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी मौजे वसार, ता. अंबरनाथ येथील सर्वे नं. 39 व हिस्सा क्र. 4 या भुखंडावर भव्य घरकुल योजना प्रस्तावित केली होती. त्या प्रकल्पातील 450 चौ.फुट क्षेत्रफळाची खोली रु. 4 लाख या किमतीस विकत घेण्याचा व्यवहार पुर्ण होऊन उभयपक्षी दि. 16/07/2013 रोजी समझोता करार करण्यात आला. तक्रारदारांनी खोलीची किंमत खालील प्रमाणे सामनेवाले यांना दिली.
पावती क्र. दि. रु.
18 26/05/2013 10,000/-
018 19/06/2013 48,000/-
018 19/06/2013 1,67,000/-
018 19/06/2013 1,75,000/-
018 14/03/2014 50,000/-
4,50,000/-
उपरोक्त तपशिल व करारनाम्यातील तरतुदी यांचे अवलोकन केले असता, असे दिसुन येते की, खोलीची किंमत रु. 4 लाख उभय पक्षी निश्चित केली असतांना, तक्रारदारांनी रु. 4,50 लाख म्हणजे किंमतीपेक्षा रु. 50,000/- सामनेवाले यांना जास्त दिल्याचे दिसुन येते.
ब) तक्रारदारांनी खालीची किंमत दिल्यानंतर, ताबा मिळण्यासाठी सामनेवाले यांचेकडे पाठपुरावा केला असता, सामनेवाले यांनी प्रत्यक्ष जागेवर कोणतेही बांधकामाच केले नसल्याचे त्यांना आढळले व त्यांच्या सारख्या अनेक लोकांशी खोली विक्री व्यवहार करुन अनेक लोकांना फसविले असल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांचे विरुध्द पोलीसामध्ये फसवणुकीची फिर्यादही दाखल केली.
क) यानंतरही, सामनेवाले यांनी बांधकाम करण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे सामनेवाले यांना कायदेशीर नोटिसही पाठविण्यात आल्याचे दिसुन येते. तथापी, सामनेवाले यांनी तक्रारदारास कोणताही प्रतिसाद दिला नाही. तक्रारदारांनी शपथेसह दाखल केलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होते की, सामनेवाले यांनी तक्रारदाराशी खोली विक्री व्यवहार केला, लिखित समझोता करार केला, तसेच, खोलीच्या किंमतीपेक्षा जास्त रक्कम तक्रारदाराकडुन घेतली. तथापी सामनेवाले यांनी बांधकाम करण्याबाबत तसेच ताबा देण्यासंदर्भात कोणतीच कार्यवाही केली नसल्याची बाब स्पष्ट होते.
5. सामनेवाले यांना नोटीस बजावणी झाल्यानंतर जबाब दाखल करणे कामी संधी मिळुनही ते गैरहजर राहिल्याने, तक्रारदाराची तक्रारीमधील सर्व कथने अबाधित राहतात.
6. उपरोक्त चर्चेवरुन व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्र. 1035/2015 अंशतः मंजुर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदारांना विकलेल्या खोलीची सर्व किंमत स्वीकारुनही खोलीचे बांधकाम न करुन पर्यायाने तक्रारदारास खोलीचा ताबा न देवुन त्रृटीची सेवा दिल्याचे व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे जाहीर करण्यात येते.
3) सामनेवाले यांनी दि. 16/07/2013 रोजीच्या समझोता करारनाम्यानुसार तक्रारदारास विकलेल्या 450 चौ.फुट क्षेत्रफळाच्या खोलीचा ताबा दि.31/05/2017 पुर्वी तक्रारदारांना द्यावा. सदर आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्ये न केल्यास दि. 01/06/2017 पासून आदेशपुर्ती होईपर्यंत प्रतिदिन रु. 100/- (अक्षरी रु. शंभर फक्त) प्रमाणे रक्कम तक्रारदारांना द्यावी. सदर खोलीचा ताबा देणे शक्य नसल्यास सामनेवाले यांनी तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम रु. 4,50,000/- (अक्षरी रु. चार लाख पन्नास हजार फक्त) दि. 01/04/2014 पासून 12% व्याजासह दि. 31/05/2017 पुर्वी तक्रारदारांना परत करावी सदर आदेशपुर्ती नमुद कालावधीत न केल्यास दि. 01/04/2014 ते आदेश पुर्ती होईपर्यंत 15% व्याजासह संपुर्ण रक्कम तक्रारदारांना द्यावी.
4) व्याज दिल्यामुळे नुकसान भरपाईचा आदेश नाही.
5) तक्रार खर्चाबद्दल रु.10,000/- (अक्षरी रु. दहा हजार फक्त) दि. 31/05/2017 पुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावेत.
6) आदेशाच्या प्रति उभय पक्षांना विनाशुल्क, विनाविलंब पाठविण्यात याव्यात.