Maharashtra

Nanded

CC/09/177

Rabbani Lalkhan Phathan - Complainant(s)

Versus

MSEDC,Nanded - Opp.Party(s)

Adv.Gigani M.Saleem

31 Oct 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/177
1. Rabbani Lalkhan Phathan R/o Shainagar,Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. MSEDC,Nanded Chophalla,NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 31 Oct 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :2009/177
 
                    प्रकरण दाखल तारीख -   04/08/2009     
                    प्रकरण निकाल तारीख    31/10/2009
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
                 मा.श्री.सतीश सामते                  - सदस्‍य
 
रब्‍बानीखॉन पि.लालखॉन पठाण,                        अर्जदार.
वय वर्षे 60 धंदा सेवानिवृत्‍त,
रा.साईनगर, नांदेड.
 
      विरुध्‍द.
 
एम.एस.ई.डी.सी मार्फत कनिष्‍ठ अभियंता,
चौफाळा, नांदेड.                                      गैरअर्जदार.
 
अर्जदारा तर्फे वकील       - अड.सयद अश्‍फाक अली.
गैरअर्जदारा तर्फे वकील    - अड.व्हि.व्हि.नांदेडकर.
 
निकालपञ
               (द्वारा-मा.बी.टी.नरवाडे पाटील,अध्‍यक्ष)
 
     गैरअर्जदार एम.एस.ई.डी.सी. यांच्‍या सेवेच्‍या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्‍या तक्रारी म्‍हणतात, अर्जदार हे महानगर पालिका घर क्र. 7-3-565 मध्‍ये गेल्‍या 20 ते 25 वर्षा पासुन कब्‍जेदार आहेत. यानंतर अर्जदार हे जिल्‍हा परीषद सेवेत असतांना त्‍यांना विजेची आवश्‍यकता असल्‍या कारणाने फेब्रुवारी 2008 या महिन्‍यात घरगुती वापरासाठी विज कंपनीकडे अर्ज करुन व आवश्‍यक ती रक्‍कम भरुन विज पुरवठा घेतला. गैरअर्जदाराने देखील पुर्ण कायदेशिर बाबींची पुर्तता केल्‍यावरच आर 78702/5 या क्रमांचा मिटरद्वारे अर्जदारास विज पुरवठा केला.   8 ते 10 दिवस विजेचा उपयोग घेतल्‍यानंतर दि.03/03/2008 रोजी गैरअर्जदाराने आश्‍चर्यकारक रित्‍या स्‍वतःच बसविलेले मिटर कसल्‍याही प्रकारची पुर्व सुचना न देता विद्युत मिटर घेऊन कार्यालयात नऊन ठेवले, याचे कोणतेही कारण सांगीतले नाही तेंव्‍हा अर्जदार हे कनेक्‍शनची मागणी करीत आहेत. अर्जदारची मागणी आहे की, त्‍यांचा विज पुरवठा परत सुरु करण्‍यात यावा व मानसिक त्रासपोटी रु.25000/- व दावा खर्चाबद्यल रु.5,000/- गैरअर्जदाराकडुन देण्‍यात यावे.
 
     गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्‍यांनी आपल्‍या लेखी जबाब दाखल केला आहे. अर्जदार यांची तक्रार खोटी व चुकीची आहे. त्‍यात सत्‍य परिस्थिती नमुद केलेली नाही. अर्जदार या प्रकरणामध्‍ये अर्ज करुन विजेचे मिटर घेऊन ग्राहक बनलेले आहे असे म्‍हटलेले आहे. जेंव्‍हा की या बाबत त्‍यांनी मा.सत्र न्‍यायाधशि,नांदेड यांचे समक्ष फौजदारी अर्ज क्र. 17/2008 दाखल केली होती, त्‍यामध्‍ये देखील हीच मागणी केली होती. अर्जदाराने त्‍यामध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे की, ज्‍या प्‍लॉट बाबत मागणी आहे तो प्‍लॉट आधी नुसरतजहॉ पि.अहेमदखान यांचे नांवे घेतलेला विज पुरवठा होता.   अर्जदार या प्रकरणांत जे विजेची बिल दाखल केलेले होते ते पण नुसरतजहॉ यांचे नांवे होते. दि.08/02/2008 रोजी ज्‍या जागेमये विजेचे कनेक्शन मागीतले त्‍या जागेमध्‍ये विज कंपनीचे कोणतेही कनेक्‍शन नव्‍हते व त्‍यावर कोणतीही थकबाकी नव्‍हती व ती नीघाल्‍यास त्‍यास अर्जदार जबाबदार राहतील असे म्‍हटले होते. अर्जदारांच्‍या शपथपत्रावर आधारीत पुढील कार्यवाही झाली केवळ अर्जदार ती बाब मा.मंचापासुन लपवुन ठेवली आहे. पठाण नुसरतजहॉ यांचे नावे जो विज पुरवठा होता त्‍या विजपुरवठयावर पी.डी.अरियर्स (मागील थकबाकी) रु.9,790/- चे होते ते बिल अर्जदाराना देण्‍यात आहे होते अर्थात याबाबतचा उल्‍लेख अर्जदाराने केलेला नाही परंतु नविन बाब सांगुन विज पुरवठा घेण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. सदर प्रकरणामये कंपनीच्‍या कार्यालयात दि.22/02/2008 रोजी शकीला बेगम उर्फ नुसरत जहॉ ही अर्ज दिला की, घर क्र.7-3-565 साईनगर हे त्‍यांचे नांवे आहे त्‍यामध्‍ये त्‍यांनी मा. कोर्टाकडुन मनाई हूकुम प्राप्‍त केला आहे. या आदेशाची प्रत अर्जासोबत दिली आहे. म्‍हणुन सदर प्रकरणांत कोर्ट प्रकरण चालु असून विज पुरवठा कंपनीकडुन दिल्‍यास मा.कोर्टाचे अवमान होईल अश धमकी वजा सुचना केली होती. अर्जदाराने ही बाब लपवुन ठेवली आहे. तसेच गैरअर्जदाराना कोणत्‍याही वादात पडायचे नसल्‍या कारणाने त्‍यांनी विज पुरवठा बंद केला आहे. सदरील प्रकरण अर्जदाराने घर क्र.7-3-565 याबद्यल दाखल केला आहे व त्‍यासोबत दाखल केलेले शपथपत्रामध्‍ये त्‍यांनी ए 1 फॉर्म मध्‍ये घर क्र. 7-3-538 चा उल्‍लेख केला आहे.   इतकेच नव्‍हे तर अर्जदाराने दिलेल्‍या असेसमेंट लिस्‍टमध्‍ये दिलेला घर क्र.7-3-496 व 7-3-345 असा करुन दिलेला आहे हे घर क्र. एकमेकास विसंगत आहेत. अर्जदाराने पुरेशी माहीती न देवून विज पुरवठाचा अर्ज केल्‍याचे उघड होते. अर्जदाराने विज पुरवठयासाठी दिलेले शपथपत्रामध्‍ये त्‍यांच्‍या अर्जात कोणताही दोष व तफावत आढळल्‍यास विज पुरवठा खंडीत करण्‍याचे अधिकार कंपनीकडे आहेत. अर्जदाराला त्‍यांच्‍या अर्जातील फोलपणा महिती असल्‍या कारणाने इतके दिवस अर्जदार गप्‍प राहीले व जवळपास सव्‍वा वर्षानंतर ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे 20 ते 25 वर्षा पासुन घर क्र.7-3-565 मध्‍ये राहतात हे त्‍यांना माहीत नाही. अर्जदार यांनी घेतलेल्‍या जागेवर थकबाकी असल्‍या कारणाने गैरअर्जदाराने केलेली कार्यवाही योग्‍य आहे. म्‍हणुन फिर्याद खर्चासह खारीज करावी असे म्‍हटले आहे.
     अर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्‍हणुन आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्‍तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात.
     मुद्ये.                                    उत्‍तर.
 
1.   गैरअर्जदार यांच्‍या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्‍द करतात काय? नाही.
2.   काय आदेश?                                                      अंतीम आदेशा प्रमाणे.
 
                           कारणे.
मुद्या क्र. 1
 
    अर्जदार यांनी पावती क्र.7536650 द्वारे दि.15/02/2008 रोजी रु.3,025/- भरुन आर 78702 याद्वारे विज पुरवठा घेतल्‍या बाबत कोटेशन व पावती दाखल केली आहे. अर्जदाराने महानगर पालीकाचे फॉर्म क्र. 43 बी दाखल केलेली आहे त्‍यात घर मालकाचे नांव शकीला बेगम पि. अहेमद असे लिहीलेले असुन कब्‍जेदार रब्‍बानीखान असे लिहीलेले आहे. या कागदपत्रावरुन अर्जदार हे त्‍या जागेचे मालक नाहीत असे दिसते व विद्युत पुरवठा घेण्‍यासाठी त्‍यांनी महानगरपालीकेचे नाहरकत प्रमाणपत्र घेतल्‍याचे दिसत नाही. अर्जदाराने आपल्‍या तक्रारीत सुरवातीसच घर क्र. 7-3-565 साईनगर येथे गेले 20 ते 25 वर्षा पासुन राहतात असे म्‍हटले आहे व फेब्रुवारी 08 मध्‍ये विज पुरवठयासाठी गैरअर्जदारांना अर्ज दिलेला आहे. एकंदरीत 20 ते 25 वर्षा पासुन अर्जदार तेथे राहत होते तर त्‍यांना विजेची आवश्‍यकता का पडली नाही. व दरम्‍यान 25 वर्षानंतर त्‍यांना 2008 मध्‍ये विजेची आवश्‍यकता का पडली. गैरअर्जदाराने आपल्‍या लेखी म्‍हणण्‍यत अर्जदाराने ए 1 फॉर्म देऊन त्‍यासोबत दिलेले शपथपत्र व कागदपत्रा आधारे त्‍यांनी विजेचा पुरवठा दिला व शपथपत्रामध्‍ये अर्जदार स्‍पष्‍टपणे लिहून दिले की, या जागेवरच आधीचे कुठलेही विजेचे कनेक्‍शन नव्‍हते, असल्‍यास अर्जदार हे स्‍वतः जबाबदार राहतील अर्जदाराने ही बाब मंचा पासुन लपवुन ठेवली आहे. या जागेवरती पठाण नुसरत जहॉ यांचे नांवे विज पुरवठा होता परंतु त्‍यांनी विज पुरवठा हे कायमचे बंद केले होते व त्‍या पी.डी.एरियर्स म्‍हणुन रु.9,790/- बाकी होती हे गैरअर्जदारांना मिटर दिल्‍याच्‍यानंतर लक्षात आले. या पी.डी.एरियर्स वसुलीसाठी तसेच गैरअर्जदाराने शपथपत्र दिले त्‍यात व ए 1 फॉर्म मध्‍ये घर क्र. 7-3-538 चा उल्‍लेख करण्‍यात आलेले आहे व असेसमेंट लिस्‍टमध्‍ये घर क्र.7-3-496 व 7-3-345 असा उल्‍लेख आहे व विज पुरवठा हे घर क्र. 7-3-565 या घरावर करण्‍यात आलेला आहे. अर्जदाराने शपथपत्र दिले व नंतर थकबाकी नीघाली व ती थकबाकी देण्‍यास अर्जदारा टाळाटाळ केली म्‍हणुन गैरअर्जदाराने त्‍यांचा विज पुरवठा बंद केला व मिटर काढुन नेले हे विज पुरवठा दि.03/03/2008 रोजी बंद केला असतांना अर्जदाराने हे प्रकरण दि.04/08/2009 रोजी म्‍हणजे तब्‍बल सव्‍वा वर्षानी दाखल केले आहे. एवढा वेळ गप्‍प का राहीले याचा अर्थ त्‍यांनी मंचापासुन ब-याच बाबी लपविल्‍या आहेत ते स्‍वच्‍छ हाताने समोर आले नाहीत. गैरअर्जदार यांचेकडे दि.22/02/2008 रोजी शकीला बेगम अहेमद खॉन उर्फ नुसरतजहॉ रा.साईनगर यांनी अर्ज दाखल केलेला आहे व या अर्जात असेच पत्र चार वर्षापुर्वी दिलेले आहे असे म्‍हटले आहे. परंतु त्‍यांनी सरळसरळ त्‍यात असे लिहीलेले आहे की, घर भाडयाने देखील दिलेले नाही किंवा विकलेले नाही म्‍हणजे जागे विषयीचा वाद दिसतो व दिलेला विज पुरवठा ताबडतोब बंद करण्‍यात यावा तसेच कोर्ट केस चालु आहे असे म्‍हटले आहे. सिव्‍हील जज सिनिअर डिव्‍हीजन यांचे कोर्टामध्‍ये हे प्रकरण चालु असून त्‍यांनी अर्जदार शकीला बेगम यांच्‍या हक्‍कात जैसे थे परिस्थिती ठेवण्‍याचे आदेश दिलेले आहे व पठाण रब्‍बानीखॉन यांना प्रतीबंध केला आहे. या आधारे गैरअर्जदार यांनी शपथपत्रात दिलेले घर क्रमांक या सर्वांच्‍या आधारे विज पुरवठा बंद केलेला आहे. गैरअर्जदाराना त्‍यांची जबाबदारी लक्षात आल्‍यानंतर त्‍यांनी हा निर्णय घेतल्‍याचे दिसते जे की, योग्‍य आहे. या प्रकरणांत मतदार यादी देखील दाखल केलेली आहे यात प्रभाग क्र.46/3 साईनगर यात अनुक्रमांक 2848 वर घर क्र.7-3-565 वर शकीला बेगम अहेमदखान व इतर यांचे नांव आहे व यात नुरसरतजहॉ यांचे नांव अनुक्रमांक 2853 वर आहे. पठाण रब्‍बानीखान यांचे नांव अनुक्रमंक 2852 वर आहे म्‍हणजे मालकीचा घोळ हे कायम आहे. एका कोर्टमध्‍ये केस चालु असल्‍यानंतर परत दुस-या कोर्टात येऊन प्रकरण दाखल करणे व ही बाब मंचा पासुन लपवुन ठेवली हे अर्जदाराकडुन अपेक्षित नव्‍हते. अर्जदार हे स्‍वच्‍छ हाताने मंचा समोर आलेले नाहीत त्‍यांनी ब-याच बाबी लपवुन ठेवल्‍या आहेत व हा वाद जागेचा व दिवाणी स्‍वरुपाचा आहे. म्‍हणुन हे मंचा या प्रकरणंत हस्‍तक्षेप करु इच्छित नाही. प्रथम दर्शनी गैरअर्जदाराने घेतलेला निर्णय हा योग्‍य स्‍वरुपाचा दिसतो. एकंदरीत प्रकरण पाहता गैरअर्जदाराच्‍या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्‍द करु शकले नाही.
 
 
 
 
     वरील सर्वर बाबींचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
                              आदेश.
 
1.   अर्जदाराचा तक्रारअर्ज खारीज करण्‍यात येतो.
2.   दावा खर्च ज्‍यांनी त्‍यांनी आपापला सोसावा.
3.   संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्‍यात यावा.
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे पाटील)                         (श्री.सतीश सामते)     
   अध्‍यक्ष                                                     सदस्‍य
 
 
 
 
 
गो.प.निलमवार,
लघूलेखक.