जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 03/2014
तक्रार दाखल दिनांक:24/03/2014
तक्रार आदेश दिनांक :07/06/2014
निकाल कालावधी:0वर्षे02महिने13दिवस
श्री.परेश पदमाकर कुलकर्णी
वय 40 वर्षे,धंदा- व्यापार,
रा.16,कमल, कनिष्क नगर,
डी मार्ट समोर, जुळे सोलापूर, सोलापूर. ......तक्रारदार
विरुध्द
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या.सोलापूर
(ग्रामीण विभाग) रा.जुनी मील कंपाऊंड सोलापूर.
(समन्स/नोटीस कार्यकारी अभियंता यांचेवर
बजावण्यात यावी.) ......विरुध्दपक्ष
गणपुर्ती :- श्री.ए.झेड.तेलगोटे, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य
श्री.ओंकारसिंह जी.पाटील, सदस्य
तक्रारदार तर्फे अभियोक्ता : श्री.जी.एच.कुलकर्णी
निकालपत्र
श्री.ए.झेड.तेलगोटे, अध्यक्ष यांचे द्वारा :-
1. तक्रारदाराने प्रस्तुतचा अर्ज ग्राहक तक्रार दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ होऊन मिळण्यासाठी सादर केलेला आहे.
2. अर्जदाराचे थोडक्यात कथन असे की, अर्जदार यांचे मौजे गुंजेगांव ता.द.सोलापूर या ठिकाणी गट नं.160/1 ही शेत जमीन असून सन 2010-2011 या हंगामात त्यांनी सदर जमीनीत ऊसाची लागवड केलेली होती. तथापी सामनेवाला यांच्या चुकीमुळे तारीख 11/02/2011 रोजी अर्जदाराचे शेतातील ऊसाचे पिक जळाले व त्याचे नुकसान झाले. त्यांनी सामनेवाला यांचेकडून रु.6,00,000/- नुकसान भरपाई मिळावी म्हणून नोटीस पाठवून मागणी
(2) किअ3/14
केली. तथापी सामनेवाला यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. सबब अर्जदाराला सामनेवाला विरुध्द मंचामध्ये तक्रार दाखल करणे भाग होते.
3. अर्जदाराचे कथनाप्रमाणे त्यांनी तारीख 10/02/2013 रोजी किंवा त्यापुर्वी मंचामध्ये तक्रार दाखल करणे आवश्यक होते. परंतू ते आजारी पडल्यामुळे व त्यांचे मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे त्याला औषधोपचारासाठी दवाखान्यात भरती व्हावे लागले. तारीख 04/04/2013 रोजी त्याच्यावर मुत्रपिंड रोपनाची शस्त्रक्रिया करण्यात आली व जून 2013 पर्यंत दवाखान्यात उपचारासाठी भरती व्हावे लागले. सबब त्यांना त्याची तक्रार मुदती दाखल करणे शक्य झाले नाही. अर्जदाराचे म्हणण्यानुसार तक्रार करण्यास झालेला विलंबासाठी पुरेसे संयुक्तीक कारण आहे व न्यायाच्या दृष्टीने सदरचा विलंब माफीचा अर्ज दाखल करुन घेण्यात यावा अशी विनंती त्यांनी केलेली आहे.
4. सामनेवाला यांना मंचाने नोटीस पाठवली. त्यांना आपले लेखी म्हणणे सादर करण्यासाठी संधी दिली. सामेनवाला हे मंचामध्ये हजर होऊन त्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले नाही. सबब त्यांचे विरुध्द नो से चा आदेश पारीत करण्यात येऊन अर्जाची पुढील सुनावणी घेणेत आली.
5. तक्रारदाराचा सदरचा अर्ज त्यातील कथने व दाखल कागदपत्रे यांचा विचार करता पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
1)तक्रार दाखल करण्यासाठी झालेला विलंबासाठी पुरेशे व
संयुक्तीक कारण आहे असे अर्जदाराने सिध्द केले आहे काय ? - होय.
2)अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यास पात्र आहे काय ? - होय
3)काय आदेश ? - अंतीम आदेशाप्रमाणे
निष्कर्ष
6. मुद्दा क्र.1 व 2 :- अर्जदाराने त्यांच्या अर्जातील कथनाचे पृष्ठयार्थ स्वत:चे शपथपत्र व काही कागदपत्राचे यादीसह दाखल केली आहेत. त्यांचे म्हणण्यानुसार ते आजारी पडल्यामुळे व त्यांचे मुत्रपिंड निकामी झाल्यामुळे पटेल युरोलॉजीकल हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी भरती व्हावे लागले. त्याची ता.04/04/2013 रोजी मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. व ते उपरोक्त पटेल युरोलॉजीकल हॉस्पीटलमध्ये जून 2013 पर्यंत उपचारासाठी दाखल होते.
(3) किअ3/14
त्यामुळे त्यांना मुदतीत त्यांची तक्रार मंचासमोर दाखल करण्यात आलेली नाही.
7. अर्जदाराने वर नमुद केल्याप्रमाणे यादीसोबत वैद्यकिय प्रमाणपत्रे दाखल केली आहेत. त्यांचे अवलोकन केले असता अर्जदाराने अर्जात नमुद केलेल्या कथनास वरील कागदपत्रामुळे पुष्टी मिळते. त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अर्जदार हे मुत्रपिंडाचे आजारामुळे पटेल युरोलॉजीकल हॉस्पीटलमध्ये दाखल झालेले होते. व त्यासाठी ता.04/04/2013 रोजी मुत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. वरील कागदपत्रांचा विचार करता अर्जदाराना तक्रार दाखल करण्यासाठी झालेल्या विलंबासाठी पुरेशे व संयुक्तीक कारण असल्याचे या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे. सबब मुद्दा क्र.1 व 2 चा निष्कर्ष होकारार्थी येत आहे. अर्जदाराचा अर्ज मंजूर करण्यास पात्र आहे. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. अर्जदाराचा किरकोळ अर्ज क्र.03/2014 मंजूर करण्यात येत आहे.
2. अर्जदाराला तक्रार दाखल करण्यासाठी झालेला विलंब माफ करण्यात येत आहे.
3. अर्जदाराची तक्रार दाखल करुन घेण्यात येत आहे.
(श्री.ओंकारसिंह जी.पाटील) (सौ. विद्युलता जे. दलभंजन) (श्री.ए.झेड.तेलगोटे)
सदस्य सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.
दापांशिं00706140