Maharashtra

Aurangabad

CC/14/299

Ashok Kisan Rajale - Complainant(s)

Versus

MSEDCl - Opp.Party(s)

Adv P R Sanluke

22 Jan 2015

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद

________________________________________________________________________________________________

ग्राहक तक्रार क्रमांक :-299/2014         

 तक्रार दाखल तारीख :-23/06/2014

 निकाल तारीख :- 22/01/2015

_____________________________________________________________________________________________________________ 

श्री.के.एन.तुंगार, अध्‍यक्ष

श्रीमती संध्‍या बारलिंगे,सदस्‍या                        श्री.के.आर.ठोले,सदस्‍य.

________________________________________________________________________________________________

 

अशोक किसन राजळे,

रा. का-होळ, ता.जि. औरंगाबाद                       ……..  तक्रारदार          

            

              विरुध्‍द

 

महाराष्‍ट्र राज्‍य विद्युत वितरण कंपनी तर्फे मुख्‍य अभियंता,

परीमंडळ कार्यालय, विद्युत भवन जुने पावर हाऊस कंपाउड,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रोड मिल कॉर्नर, औरंगाबाद      ........ गैरअर्जदार 

_______________________________________________________________________________________________

तक्रारदारातर्फे  – अॅड.पी.आर.साळुंके

गैरअर्जदारातर्फे  – अॅड.पी.एम.हिवाळे

_______________________________________________________________________________________________

   निकाल

(घोषित द्वारा – श्रीमती. संध्‍या बारलिंगे, सदस्‍या)

 

          तक्रारदार यांनी कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार सदर तक्रार ग्राहक मंचामध्‍ये दाखल केली आहे.

 

          तक्रारदार हा शेतकरी आहे. त्याला गोलटगाव येथे गट नं 533 मध्ये स्वतःच्या मालकीची 90 R शेत जमीन आहे. सदरील  शेत जमिनीमध्ये विहीर आहे. त्यावर 3 HP विद्युत पंप बसवण्यासाठी तक्रारदाराने दि.13/12/11 रोजी रु.4470/- इतकी रक्कम भरून कोटेशन अर्ज गैरअर्जदाराकडे सादर केला. त्यानंतर गैरअर्जदाराने तक्रारदाराच्या विहिरीपासुन पोलचे अंतर लांब आहे, हे कारण सांगून अनेक दिवस विद्युत पुरवठा दिलेला नाही. सदर पोल लावण्यासाठी गैरअर्जदाराने सुदर्शन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग वर्क्स यांना पत्राद्वारे कळवले आहे. परंतु आजवर पोल लावणे आणि विद्युत पुरवठा देणे दोन्ही काम झालेले नाही. कोणताही विद्युत पुरवठा नसताना दि.12/4/13 रोजी रु.6580/- चे विद्युत देयक तक्रारदारास देण्यात आले. विद्युत देयकाचा कालावधी दि.31/12/12 पासून 31/3/13 पर्यंतचा दाखवला आहे. तक्रारदाराने 3 HP करिता कोटेशन भरलेले  असताना विद्युत देयकामध्ये 5 HP चा भार दाखवला आहे. तसेच तक्रारदाराने कोटेशन अर्ज भरलेली तारीख दि.13/12/11 ही विद्युत पुरवठा सुरू झाल्याची तारीख दाखवली आहे. गैरअर्जदाराने दुसरे बिल रु.9595/- चे दिले आहे. त्यात रक्कम भरण्याची अंतिम तारीख 15/1/14 दिलेले आहे. तक्रारदाराने अनेक वेळा लेखी तक्रार केली परंतु त्याचा उपयोग झाला नाही. दि.25/3/14 रोजी गैरअर्जदाराने तक्रारदारास पत्र पाठवले, त्यात असे लिहिले होते की, कोटेशन अर्जासोबत तक्रारदाराने हमीपत्र लिहून दिले आहे की, पोलचे काम होईपर्यंत सर्विस वायर/केबल वापरुन तो विद्युत पुरवठा घेण्यास तयार आहे. परंतु तक्रारदारास तशा कोणत्याही हमीपत्राची माहिती नाही. कोटेशन अर्जासोबत अनेक कोर्‍या पेपरवर तक्रारदाराच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. तक्रारदाराचे विहीर आणि दुसरे पोल  यातील अंतर 1000 फुटाचे आहे. तक्रारदाराने कोणतीही केबल वापरली नाही. विद्युत पंप नसल्यामुळे तक्रारदाराच्या शेतातील आंब्याची झाडे जळाली आणि नुकसान झाले. त्यामुळे तक्रारदाराने पोल लावून विद्युत पुरवठा करून द्यावा व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

 

          गैरअर्जदाराने त्याचा लेखी जवाब दाखल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुदर्शन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग वर्क्स यांना पोल लावण्याविषयी कळवले आहे. जेष्ठता यादीनुसार विद्युत जोडणी आणि पोल उभे करून देण्यात येईल. तक्रारदाराने लिहून दिलेल्या हमीपत्रानुसार विद्युत वापर केला आहे, त्यामुळे त्याला विद्युत देयके देण्यात आली आहेत. तक्रारदाराने अद्यापपर्यंत कोणत्याही  विद्युत देयकाची रक्कम भरलेली नाही. तक्रारदाराने खोटी तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे ती खारीज करण्याची विनंती केली आहे. 

          आम्ही दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. तक्रारदाराची तक्रार, गैरअर्जदाराचा लेखी जवाब आणि दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन केले.

तक्रारदाराने दि.13/12/11 रोजी 3 HP load करिता रु.4470/- रक्कम भरल्याची पावतीकोटेशन अर्ज दाखल केला आहे. गैरअर्जदाराने सुदर्शन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग वर्क्स यांना लिहिलेले पत्र (तारीख नसलेले) पत्र मंचासमोर दाखल आहे. गैरअर्जदाराने त्यांना तक्रारदाराराचे प्रलंबित काम करण्याची सूचना त्या पत्राद्वारे दिली आहे. दि.25/3/13 चे विद्युत देयक रु.6580/- चे आहे. त्यात वीज भार 5 HP दाखवला आहे. मीटर रीडिंग व वीज वापराचे रकाने रिक्त आहेत. दि.15/1/14 चे दुसरे बिल रु.9995/- चे असून त्यात इतर कोणतीही माहिती नाही. विद्युत बिलावर लिहिलेली  रक्कम हस्त लिखित स्वरुपात आहे.

          दि.25/3/14 रोजी गैरअर्जदाराने तक्रारदारास दिलेल्या पत्राचे आम्ही  अवलोकन केले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, तक्रारदार हा पोलचे काम होईपर्यंत केबल वायर जोडून विद्युत जोडणी घेण्यास तयार होता. त्यामुळे  त्यानुसार त्याने विद्युत वापर केला आहे. त्यामुळे त्याला देण्यात आलेली विद्युत देयके योग्य आहेत.

          वरील निरीक्षणावरून असे दिसून येते की, गैरअर्जदाराने तक्रारदाराकडून कोटेशन ची रक्कम घेतली. परंतु त्याचे काम करून दिलेले नाही. उलटपक्षी त्याला चुकीचे विद्युत देयके देण्यात आली आहेत. तक्रारदारास अद्याप वीज जोडणी करून दिलेली नाही. गैरअर्जदाराने जर एखाद्या कंपनीकडे सदर काम सोपवले असेल तर ते काम झाले किंवा नाही याचा पाठपुरावा करणे त्यांचे काम आहे कारण त्याकरिता त्यांनी तक्रारदाराकडून रक्कम घेतली आहे. पोल  पासून तक्रारदाराचे शेत विहीर 1000 फुटाच्या अंतरावर असताना केबल वायर द्वारा वीज वापरणे सहज शक्य नाहीतसेच गैरअर्जदाराने त्याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. गैरअर्जदाराने ज्या कंपनीला पोल उभे करण्याचे काम सोपवले आहे त्यांनी अद्यापपर्यंत ही तक्रारदाराचे काम केलेले नाही. 2011 पासून तक्रारदाराचे काम प्रलंबित असताना त्याला त्यानेवापरलेल्या विजेचे विद्युत देयक देऊन गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिली आहे. तक्रारदारास त्याने भरलेल्या कोटेशन नुसार ताबडतोब वीज जोडणी करून देणे गरजेचे आहे. तक्रारदाराने वीज वापर केलेला नाही त्यामुळे त्याला देण्यात आलेली विद्युत देयके रद्द करणे योग्य राहील.

 

          वरील कारणामुळे हा मंच खालील आदेश पारित करत आहे

                                                                                            आदेश   

  1. गैरअर्जदारांनी दिलेले दि.25/3/13 व दि.15/1/14 ची विद्युत देयके रद्द करण्यात येतात.         
  2. गैरअर्जदारास आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत, तक्रारदाराच्या त्याच्या  शेताजवळ पोल उभे करून त्याला वीज जोडणी करून द्यावी. प्रत्यक्षात विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतर नियमानुसार विद्युत देयक द्यावे.
  3. गैरअर्जदारास आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाच्या आत तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.2000/- व ह्या कार्यवाहीच्या खर्चाचे रु.1500/- बँक DD च्या स्वरुपात द्यावेत.

 

         

 

                                           (श्रीमती संध्‍या बारलिंगे)        (श्री.किरण.आर.ठोले)       (श्री.के.एन.तुंगार)

                                                    सदस्‍या                              सदस्‍य                       अध्‍यक्ष

 

 

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.