Maharashtra

Parbhani

CC/10/131

Shri Kailash Shankarlal Parekh - Complainant(s)

Versus

MSEDCL Ltd. Through Its Executive Engg. - Opp.Party(s)

Adv. Vijay Kaldate

10 Feb 2011

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/131
1. Shri Kailash Shankarlal ParekhR/O New Mondha ParbhaniParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. MSEDCL Ltd. Through Its Executive Engg.Parbhaniparbhanimaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :Adv. Vijay Kaldate, Advocate for Complainant

Dated : 10 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र

 

           तक्रार दाखल दिनांकः-     05/05/2010

              तक्रार नोदणी दिनांकः-    14/05/2010

          तक्रार निकाल दिनांकः-    10/02/2011

                                                                            कालावधी 08  महिने 27 दिवस

 

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी

 

अध्यक्ष -         श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.                 

सदस्या                                                                                         सदस्या

  सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                     सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.              

    

      कैलास पिता शंकरलाल पारीख @ शर्मा.                      अर्जदार

      वय 30 वर्षे.धंदा.व्‍यवसाय.                            अड.विजय काळदाते.

रा.न्‍यु मोंढा.परभणी ता.जि.परभणी.

       विरुध्‍द

     महाराष्‍ट्र स्‍टेट इलेक्‍ट्रीसिटी डिस्‍ट्रीब्‍युशन कं.लि.                गैरअर्जदार.                                                                                  

     व्‍दारा- एक्‍झीक्‍युटिव्‍ह इंजिनियर.परभणी.                 अड.एस.एस.देशपांडे.              

  -------------------------------------------------------------------------------------       

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्या.                                              3)        सौ.अनिता ओस्तवाल.                 सदस्‍या.

 -------------------------------------------------------------------------------------------------------                

                    (  निकालपत्र  पारित व्‍दारा श्रीमती.अनिता ओस्‍तवाल.सदस्‍या. )

      गैरअर्जदार विज वितरण कंपनीने त्रुटीची सेवा दिल्‍याच्‍या आरोपावरुन अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.

      अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की,

      अर्जदाराच्‍या वडीलांनी राहत्‍या घरासाठी व दुकानासाठी अनुक्रमें ग्राहक क्रमांक 530010083582  मीटर क्रमांक 6501684866 व ग्राहक क्रमांक 530010041715  मीटर क्रमांक 7601684728 अन्‍वये विज पुरवठा घेतला होता.अर्जदाराच्‍या वडीलांचे निधन वर्ष 2001 मध्‍ये झाले. मे.2008 मध्‍ये अर्जदाराने सदरील मीटर Faulty असल्‍या बद्दल तक्रार केली.गैरअर्जदाराने सदरचे मीटर बदली करुन देण्‍या ऐवजी अर्जदार व त्‍याचे कुटूंबीयांवर विज चोरीचा आरोप करुन  त्‍याला कम्‍पाऊंडींग बील दिले अर्जदाराने निमुटपणे त्‍या विद्युत बीलाचा भरणा केला.पुढे गैरअर्जदाराने मिटर बदलले परंतु मीटर चार्जर रिपोर्ट हा चुकीचा तयार केला.तदनंतर सप्‍टेंबर 2008 व ऑक्‍टोबर 2008 मध्‍ये ग्राहक क्रमांक 530010083582 व मीटर क्रमांक 6501684866 चे अनुक्रमें रक्‍कम रु.67590/- व रक्‍कम रु.79860/- चे विद्युत देयक गैरअर्जदाराने दिल्‍यामुळे अर्जदाराने सदर विद्युत देयकांच्‍या दुरुस्‍तीसाठी गैरअर्जदाराकडे संपर्क साधला. त्‍यानंतर गैरअर्जदाराने मीटर चार्जर रिपोर्ट हा चुकीचा असल्‍याचे मान्‍य करुन अर्जदारास रक्‍कम रु.5000/- भरण्‍यास सांगीतले व ते पुढील विद्युत देयकामध्‍ये समायोजीत करण्‍यात येतील असे आश्‍वासन अर्जदारास दिले.त्‍यानुसार अर्जदाराने रक्‍कम रु. 5000/- चा भरणा गैरअर्जदाराकडे केला पुढे दिनांक 07/11/2008 रोजी गैरअर्जदाराने ग्राहक क्रमांक 530010041715 व मीटर क्रमांक 7601684728 चे रक्‍कम रु. 2000/- चे विद्युत देयक अर्जदारास दिले. ते सुध्‍दा अर्जदाराच्‍या विज वापरा पेक्षा जास्‍त असल्‍यामुळे त्‍या विद्युत देयकामध्‍ये दुरुस्‍ती करण्‍यासाठी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे संपर्क साधला असता गैरअर्जदाराने फक्‍त रक्‍कम रु.1000/- भरण्‍यास सांगीतले ते ही अर्जदाराने भरले.त्‍यानंतर देखील गैरअर्जदाराने सातत्‍याने अवास्‍त रक्‍कमेचे व चुकीचे विद्युत देयक अर्जदारास दिले.

      पुढे माहे फेब्रुवारी 2009 मध्‍ये मीटर क्रमांक 6501684866 व ग्राहक क्रमांक 530010083582 चे रक्‍कम रु. 5620/- चे विद्युत देयक अर्जदारास दिले.अर्जदाराने त्‍या विद्युत देयकाचा भरणा केला परंतु गैरअर्जदाराने त्‍या विद्युत देयकांवर चुकीने ग्राहक क्रमांक 530010083582 च्‍या ऐवजी ग्राहक क्रमांक 53001008352 नमुद करण्‍यात आल्‍यामुळे अर्जदाराने भरलेली रक्‍कम दुस-या ग्राहकांच्‍या नावावर जमा झाली.ही बाब लक्षात आल्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराशी संपर्क साधला व त्‍याने भरलेली रक्‍कम त्‍याच्‍या विद्युत देयकामध्‍ये समायोजीत करण्‍यात यावी अशी मागणी गैरअर्जदाराकडे केली परंतु गैरअर्जदाराने त्‍याच्‍या विनंतीकडे कानाडोळा केला.

पुन्‍हा दिनांक 09/04/2010 रोजी ग्राहक क्रमांक 530010083582 चे रक्‍कम रु.38480/- व ग्राहक क्रमांक 530010041715 चे रक्‍कम रु.75770/-चे विद्युत देयक अर्जदारास दिले. ते दुरुस्‍त करुन देण्‍याची मागणी गैरअर्जदाराकडे केली. पंरतु त्‍यास कोणताही प्रतिसाद गैरअर्जदाराने दिला नाही व शेवटी दिनांक 24/04/2010 रोजी गैरअर्जदाराने विद्युत देयकामध्‍ये दुरुस्‍ती करुन देण्‍यास नकार दिला. म्‍हणून अर्जदाराने ग्राहक मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने मीटर क्रमांक 6501684866 मीटर क्रमांक 7601684728 चे दिलेले विद्युत देयक रद्द करण्‍यात यावी. तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.20,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.5000/- द्यावे अशा मागण्‍या अर्जदाराने मंचासमोर केल्‍या आहेत.

     अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्‍यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/19 व नि.18/1 ते नि.18/10 मंचासमोर दाखल केली.

मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील झाल्‍यानंतर त्‍याने लेखी निवेदन नि.12 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्‍य केले आहे.गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे की, अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा ग्राहक नाही कारण विज मिटर हे अर्जदाराच्‍या वडीलांच्‍या नावार आहे.व अर्जदाराच्‍या वडीलाचा मृत्‍यू वर्ष 2001 मध्‍ये झालेला आहे.वास्‍तविक पाहता अर्जदाराने त्‍याच वेळेस मीटर स्‍वतःच्‍या नावे करुन घ्‍यावयास हवे होते.परंतु इतक्‍या अवधीनंतर देखील अर्जदाराने मीटर स्‍वतःच्‍या नावे करुन घेतलेले नाही पुढे अर्जदाराने दोन वेगळया मीटर संबंधीच्‍या तक्रारीसाठी वेगळे तक्रार अर्ज दाखल करणे गरजेचे होते.परंतु त्‍याने दोन मीटरचा वाद एका तक्रार अर्जाव्‍दारे उपस्थित केलेला आहे तसेच दोन मीटर पैकी एक मीटर ( मीटर क्रमांक 7601684728 ) व्‍यवसायीक कारणासाठी वापरीत असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या तरतुदी नुसार त्‍याला मीटर क्रमांक 7601684728 च्‍या वाद मंचासमोर उपस्थित करता येणार नाही.म्‍हणून वरील सर्व कारणास्‍तव अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करण्‍याची विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे.

गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.13 वर दाखल केले.

दोन्‍ही पक्षांच्‍या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.     

         

             मुद्दे.                                       उत्‍तर

1     अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा

      ग्राहक आहे काय ?                                  नाही.

2     आदेश काय ?                               अंतिम आदेशा पमाणे.

 

 

 

 

 

  कारणे

  मुद्दा क्रमांक 1 व 2

     गैरअर्जदाराने लेखी निवेदनात कायदेशिर मुद्दा असा उपस्थित केला आहे की, उपरोक्‍त क्रमांकाचे मीटर हे अर्जदाराच्‍या वडीलांच्‍या नावावर असल्‍यामुळे व ते अद्याप पावेतो अर्जदाराने स्‍वतःच्‍या नावे करुन न घेतल्‍यामुळे अर्जदार हा त्‍याचा ग्राहक नाही.म्‍हणून मंचासमोर दाद मागण्‍याचा त्‍याला कसलाही अधिकार नाही. प्रकरणाचा निर्णय मेरीटवर घेण्‍यापूर्वी अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? हे आधी पहावे लागेल. अर्जदाराने स्‍वतःच तक्रार अर्जात असे नमुद केले आहे की, वरील क्रमांकाचे दोन्‍ही मीटर त्‍याचे वडील शंकरलाल हनुमानदास शर्मा यांच्‍या नावावर आहे.व त्‍यांचा मृत्‍यू वर्ष 2001 मध्‍ये झालेला आहे.यावर मंचाचे असे मत आहे की, अर्जदाराने मीटर स्‍वतःच्‍या नावे करुन घ्‍यावयास हवे होते वर्ष 2001 ते वर्ष 2010 पर्यंत म्‍हणजे तब्‍बल 9 वर्षे अर्जदाराने मीटर मयत इसमाच्‍या नावे ठेवुन विज वापर केलेला दिसतो हे गैर आहे.अर्जदार हा जरी मयत इसमाचा कायदेशिर वारस असला तरी उपरोक्‍त क्रमांकाचे मीटर त्‍याने स्‍वतःच्‍या नावे करुन घेण्‍याची गरज नक्‍कीच होती व तसे करणे त्‍याला शक्‍य ही होते परंतु त्‍याने मीटर स्‍वतःच्‍या नावे करुन घेतलेला नाही अथवा त्‍या संबंधीची कारवाई सुरु असल्‍याचा पुरावा देखील मंचासमोर दाखल केलेला नाही.रिपोर्टेड केस Chattisgarh state electricity board & other विरुध्‍द Goverdhan Prasad dhurandhar  (2010) CPJ 36  मा.छत्‍तीसगढ राज्‍य आयोगाने असे मत व्‍यक्‍त केले आहे की,

IMP  Point.  – Complainant was enjoying the electricity through supply connection which was standing in the name of dead person

( Complainant’s father ) – No application for change in the name of the complainant or providing connection in the name of the consumer or mutation of his name in place of his father was ever made by the complainant These facts show that the complainant was not a consumer of the appellant- He was simply paying some times charges of the electricity already used through connection standing in the name of a dead person.

      मा.छत्‍तीसगढ राज्‍य आयोगाचे मत प्रस्‍तुतच्‍या प्रकरणाला तंतोतंत लागु पडते.अर्जदाराने दाखल केलेल्‍या रिपोर्टेड केस मधील मा.राष्‍ट्रीय आयोगाचे मत सदर प्रकरणला लागु होत नसल्‍यामुळे ते या ठिकाणी विचारात घेतलेले नाही म्‍हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर नकारार्थी देऊन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. 

                             आदेश

      1  अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजुर करण्‍यात येत आहे.                                 

3  दोन्‍ही पक्षांना आदेशाच्‍या प्रति मोफत पुरवाव्‍यात.

 

     

  श्रीमती अनिता ओस्‍तवाल.       सौ.सुजाता जोशी.           श्री.सी.बी.पांढरपट्टे.

     सदस्‍या.                     सदस्‍या.                    अध्‍यक्ष.

 

 

 

 

सदस्‍याच्‍या निकालपत्रातील मताशी सहमत नसल्‍यामुळे माझे निकालपत्र सोबत देत आहे.

                                        सुजाता जोशी.

                                         10.2.2011

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                          मुद्दे.                                                                 उत्‍तर.

1                        ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) (ii) नुसार

       अर्जदार गैरअर्जदारचा ग्राहक या संज्ञेत येतो काय ?

             व तक्रार अर्ज चालणेस पात्र आहे काय ?                                   होय.

2          गैरअर्जदाराकडून वादग्रस्‍त विज बिलाच्‍या बाबतीत

             सेवात्रुटी झाली आहे काय ?                                                       होय.

कारणे

मुद्दा क्रमांक 1

या प्रकरणातील तक्रारकर्ता तथा अर्जदार हा विज कंपनीच्‍या मयत मुळ ग्राहकाचा जनक मुलगा असून कायदेशिर वारस आहे. मयताने स्‍वतःच्‍या नावे घेतलेले विज कनेक्‍शन हे त्‍याच्‍या एकट्यासाठी नसून एकत्र कुटूंबातील सर्व घटकासाठी घरगुती वापरासाठी घेतलेले आहे ही वस्‍तुस्थिती आहे.गैरअर्जदारांचा मुळ ग्राहक म्‍हणजे अर्जदाराचे वडील 2001 साली मयत झाल्‍यावर अर्जदार अथवा घरातील अन्‍य वारसापैकी कोणीही  विज कनेक्‍शन वडीलांचे मृत्‍यूनंतर आपल्‍या नावे आजपर्यंत ट्रान्‍सफर करुन घेतलेले नसले तरी ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 2 (1) (डी) मधील तरतुदी नुसार सेवा विकत घेणारा ग्राहक किंवा सेवेचा लाभ उपभोगणारे लाभार्थी हे दोघेही या ग्राहक व्‍याख्‍येखाली येत असल्‍यामुळे लाभार्थी अर्जदाराला गैरअर्जदार विरुध्‍द निश्चित दाद मागता येऊ शकते.आता एवढाच प्रश्‍न उरतो की, गेली 9 वर्षे अर्जदार मयत वडीलाच्‍या नावे असलेले विज कनेक्‍शन स्‍वतःच्‍या नावे ट्रान्‍सफर करुन न घेता गप्‍प का राहिला ? याबाबतीत माझे मत असे की, मुळ ग्राहक मयत झाल्‍यावर आजपर्यंतची मुळ ग्राहकाच्‍या नावावरील सर्व बिलांच्‍या रक्‍कमा गैरअर्जदारने ना हरकत स्‍वीकारलेल्‍या आहेत एवढेच नव्‍हेतर र्गैरर्जदारांचे कर्मचारी अर्जदाराच्‍या घरी प्रत्‍येक महिन्‍याला रिडींगची नोंद करुन घेण्‍यासाठी जात असल्‍यामुळे गैरअर्जदारांना त्‍यांचा मुळ ग्राहक मयत झाल्‍याचे त्‍यांना निश्चित  माहित असणारच आणि ते माहित असतांनाही अर्जदाराने वादग्रस्‍त बिलाच्‍या बाबतीत तक्रार केल्‍यावर विज कनेक्‍शन ट्रान्‍सफर करुन घेण्‍याविषयीची त्‍याला एकदाही सुचना न देता किंवा अर्जदाराच्‍या तक्रारीवर कोणताही आक्षेप न घेता गप्‍प राहिले त्‍या अर्थी अर्जदाराने केलेल्‍या तक्रारी गैरअर्जदारांचा लाभार्थी म्‍हणून त्‍यांनी मान्‍य होत्‍या असेच मानावे लागेल. एवढेच नव्‍हेतर गेली 09 वर्षे गैरअर्जदारांनी बिलाच्‍या रक्‍कमा ना हरकत अर्जदाराकडून स्‍वीकारलेल्‍या असल्‍यामुळे कायद्यातील law of estoppel  या तत्‍वानुसार आता अर्जदार त्‍यांचा ग्राहक नाही असे त्‍यांना आता गैरअर्जदारास म्‍हणता येणार नाही व तो अधिकार त्‍यांना उरलेला नाही. रिपोर्टेड केस 2001 ( 1) सी.पी.जे. पान 324 पंजाब राज्‍य आयोगाने अशाच प्रकारच्‍या टेलिफोन सेवेच्‍या संदर्भात असे मत व्‍यक्‍त केले आहे की, मुळ ग्राहकाच्‍या मृत्‍यूनंतर कुटूंबातील कोणीही कायदेशिर वारस ग्राहक म्‍हणून ग्रा.सं.कायद्यातील कलम 2 (1) (डी) (ii) नुसार टेलिफोन खात्‍याविरुध्‍द वादग्रस्‍त बिलाबाबत ग्राहक म्‍हणून दाद मागुशकतो आणखी एक रिपोर्टेड केस 2001 (3) सी.पी.जे. पान 210 मध्‍ये बिहार राज्‍य आयोगानेही वरील प्रमाणेच मत व्‍यक्‍त केले आहे ते अर्जदाराच्‍या प्रस्‍तुत तक्रारीस लागु पडते. त्‍यामुळे वरील सर्व बाबी विचारात घेता अर्जदाराची तक्रारगैरअर्जदाराचा ग्राहक म्‍हणून मंचापुढे निश्चित चालणेस पात्र आहे.सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रमांक 2

     अर्जदाराने तक्रार अर्जातून त्‍याचे कडील घरगुती कारणासाठी आणि व्‍यवसायिक कारणासाठी घेतलेली दोन वेगवेगळी विज कनेक्‍शनच्‍या वादग्रस्‍त बिला बाबत तक्रार अर्जातून दाद मागितलेली आहे.परंतु प्रकरणाच्‍या अंतिम सुनावणीच्‍या वेळी अड.काळदाते यांनी व्‍यवसायिक कारणासाठी घेतलेले मिटरचा ग्राहक क्रमांक 530010041715 बाबतची तक्रार मागे घेतली असल्‍याचे निवेदन करुन फक्‍त घरगुती कारणासाठी घेतलेल्‍या विजेचा ग्राहक नंबर 530010083582 बाबततच तक्रारीचा निर्णय द्यावा अशी विनंती केल्‍यामुळे त्‍याप्रमाणे निर्णय देण्‍यात येत आहे. त्‍यामुळे प्रकरणात दाखल केलेल्‍या नि.4/13 ते 4/19 वरील व्‍यवसायिक मिटरच्‍या बिलाचा पुराव्‍यात विचार केलेला नाही.

      अर्जदाराची तक्रार प्रामुख्‍याने मार्च 2010 च्‍या नि.4/3 वरील रु. 38,480/- या बिला बाबत आणि त्‍या पूर्वीही माहे ऑगस्‍ट 2008 पासून दिलेल्‍या चुकीच्‍या रिडींगची व अवास्‍तव आकारणी केलेल्‍या बिला बाबतची आहे.नि.4/3 वरील मार्च 2010 च्‍या वादग्रस्‍त बिला खेरीज त्‍या पूर्वीच्‍या देयकातील नोंदीचे बारकाईने अवलोकन केले असता.असे दिसून येते की, माहे ऑगस्‍ट 2008 च्‍या देयकात ( नि.4/7) मागील रिडींग 4 युनिट व चालू रिडींग 1040 दाखवले आहे.मात्र वजावटी प्रमाणे 1036 युनिटची आकारणी न करता त्‍यामध्‍ये समायोजित युनिट 8795 दाखवुन 9831 युनिटचे बिल रु. 67,590/- दिलेले आहे. परंतु समायोजित 8795 युनिट कसले ? याबाबत त्‍या बिलावर कोणताही खुलासा केलेला नाही.अगर युक्तिवादाच्‍या वेळीही गैरअर्जदार तर्फे अड.देशपांडे यांना मंचापुढे खुलासा सांगता आला नाही.अर्जदाराने त्‍या बिलाची रक्‍कम भरलेली असल्‍याचे दिसत असले तरी समा‍योजित युनिटसह 9831 बाबत केलेली आकारणी निश्चित गैर असल्‍याचे प्रथमदर्शनी दिसते. त्‍या नंबरचे नि.4/6 वरील सप्‍टेंबर 2008 चे बिलात चालू रिडींगचे खाली RNA ( रिडींग उपलब्‍ध नाही ) व मागील रिडींग 1040 दाखवुन 1685  युनिटचा वापर दाखवुन रु. 79,860/- ची केलेली आकारणी बोगस व चुकीचीच असल्‍याचे दिसते त्‍याही बिलाची आकारणी कशी केली याचा खुलासा अड.देशपांडे यांना मंचापुढे करता आला नाही.उलट त्‍या बिलावर गैरअर्जदाराने मिटरचेंज रिपोर्ट रॉंगली फिडेड असा शेरा लिहून बिलाची रक्‍कम काढून त्‍यावर 5,000/- रु. दुरुस्‍ती करुन दिली असल्‍याचे दिसते.सदर वादग्रस्‍त बिलाची दुरुस्‍ती करुन मिळणेसाठी अर्जदाराने तारीख 29/09/2008  रोजी गैरअर्जदाराकडे लेखी तक्रार केली होती त्‍याची स्‍थळप्रतही पुराव्‍यात ( नि.4/1) दाखल केलेली आहे.अर्जदाराला 24/02/2009 तारखेचे 5613 रु.चे प्रोव्‍हीजनल बिल ( नि.4/4) दिलेले होते ते बिल गैरअर्जदाराने अर्जदाराचा ग्राहक नंबर -- 008352 चा चुकीचा टाकुन दिलेले होते बिलाची रक्‍कम अर्जदाराने डिपॉझिट केल्‍यावर ती रक्‍कम चुकीच्‍या ग्राहक नंबरवर ती जमा केली असल्‍याचे अर्जदाराचे लक्षात आल्‍यावर त्‍याने त्‍याबाबत लेखी तक्रार केली होती त्‍या अर्जाची स्‍थळप्रतही पुराव्‍यात ( नि.4/2) दाखल केलेली आहे.त्‍यामध्‍ये त्‍याने असे नमुद केले होते की, दिनांक 24/02/2009 ला कंपनीने दिलेले रक्‍कमे प्रमाणे रु.5,620/- ही रक्‍कम भरलेली माझ्या खात्‍यात नंतर जमा होती दुसरीकडे जमा झालेली आहे कंपनीचा बिलावर ग्राहक क्रमांक चुकीचा लिहिला आहे.माझी रक्‍कम माझ्या बिलात जमा व्‍हावी वगैरे अर्जदाराने वरील प्रमाणे गैरअर्जदारास कळवल्‍यानंतर वास्‍तविक त्‍याची तातडीने दखल घेवुन चुकीच्‍या ग्राहक नंबरमध्‍ये अर्जदाराच्‍या नावे भरलेली रक्‍कम  त्‍याच्‍या ---- 3582 या ग्राहक नंबरवर जमा दाखवुन तशी दुरुस्‍ती करुन अर्जदाराला लगेच उत्‍तर द्यायला काहीच हरकत नव्‍हती परंतु त्‍या बाबतीतही अर्जदारास काहीही न कळवता गप्‍प राहिले.चुकीच्‍या ग्राहक नंबरवर जमा झालेली रक्‍कम अर्जदाराच्‍या खात्‍यात क्रेडीट केली किंवा नाही या संदर्भात कोणताही पुरावा गैरअर्जदाराने दाखल केलेला नाही.किंवा युक्तिवादाच्‍यावेळी देखील अड.देशपांडे यांनी त्‍याबाबत खुलासा केला नसल्‍यामुळे याबाबत गैरअर्जदाराकडून निश्चितपणे सेवात्रुटी झाली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.अड.देशपांडे याने मंचापुढे असेही निवेदन केली की, अर्जदारास माहे सप्‍टेंबर 2008 च्‍या बिलात 5,000/- ची दुरुस्‍ती करुन दिलेली असतांनाही त्‍याने ते बिल भरले नाही त्‍यामुळे गैरअर्जदाराकडून योग्‍य ती दखल घेतली होती.असा युक्तिवाद केला असला तरी तो गळेपडूपणाचा आहे कारण मुळातच ऑगस्‍ट 2008 पासून दिलेली बिले प्रत्‍यक्ष रिडींग प्रमाणे दिली असल्‍याचे एकाही बिलावर दिसून येत नाही.शिवाय बिलावर चालू व मागील रिडींगची नोंद नसतांनाही आकारणी केलेली युनिटचेही आकडे ताळमेळ नसलेले चुकीचे व बोगस असलेले पुराव्‍यातून स्‍पष्‍ट होते.त्‍यामुळे अर्जदाराच्‍या घरगुती वापराच्‍या मीटर वरची दिलेली बिले चुकीची असल्‍याचे स्‍पष्‍ट होते पुराव्‍यात दाखल केलेल्‍या फेब्रुवारी 2009 चे बिल ( नि.4/5) रु.1,38,020/- मार्च 2010 चे बिल (नि.4/3) 38,480/- या दोन्‍ही बिलावर देखील चालू व मागील रिडींग न देता मनमानी पध्‍दतीने विज खर्च केल्‍याचे युनिटस् दाखवुन बिलाची आकारणी केलेली दिसते त्‍यामुळेच अर्जदाराला त्‍याची कायदेशिर दाद मिळणेसाठी प्रस्‍तुतच्‍या तक्रार अर्जाव्‍दारे ग्राहक मंचाकडून दाद मागावी लागली आहे.हे स्‍पष्‍ट होते आणि  या बाबतीत गैरअर्जदाराकडून निश्चितपणे सेवात्रुटी झालेली असल्‍यामुळे मार्च 2010 चे वादग्रस्‍त बिल निश्चितपणे रद्द होण्‍यास पात्र ठरते.सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्‍तर होकारार्थी देवुन मी खालील प्रमाणे आदेश देत आहे.

                                  आदेश

1     तक्रार अर्ज अंशत मंजूर करण्‍यात येत आहे.

2     गैरअर्जदाराने अर्जदाराचे घरगुती वापराचा नंबर 530010083582 वरील माहे मार्च

      2010 चे बिल ( देयक तारीख 09/04/2010 ) रद्द करण्‍यात येत आहे.

      त्‍या ऐवजी अर्जदाराच्‍या सदर मीटर वरील प्रत्‍यक्ष रिडींग आदेश तारखे पासून 30

      दिवसांचे आत घेवुन बिला वरील मागील रिडींग 5546 मधून ते वजा करुन

      प्रत्‍यक्ष रिडींग प्रमाणे नविन दुरुस्‍ती बिल अर्जदारास द्यावे.बिलात कोणतेही व्‍याज

      आकारु नये बिलापोटी यापूर्वी भरलेली रक्‍कम दुरुस्‍त बिलातून वजा करुन     

      उरलेली रक्‍कमच वसुल करावी.

3          याखेरीज मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व अर्जाचा खर्च रु. 1,000/- आदेश

3  मुदतीत द्यावे.अगर ती रक्‍कम येणे बिलात समायोजित करावी.

4          अर्जदाराच्‍या मयत वडीलाच्‍या नावे असलेल्‍या सध्‍याचे विज कनेक्‍शन अर्जदाराच्‍या

4  स्‍वतःच्‍या नावे करुन घेणे बाबत अर्जदारास आवश्‍यक ती सुचना देवुन त्‍याची

4  कार्यवाही आदेश मुदतीत करुन घ्‍यावी.       

5          संबंधीताना आदेश कळविण्‍यात यावे.

 

 

 

 

           सौ.सुजाता जोशी.                 श्री.सी.बी.पांढरपट्टे.

              सदस्‍या.                          अध्‍यक्ष.

 


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member