निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 01/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 09/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11/01/2012 कालावधी 09 महिने 02 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. अब्दुल रऊफ मेहताब खान अर्जदार वय 60 वर्षे.धंदा सेवानिव़ृत्त, अड.श्री डी.यु.दराडे रा. युसुफ कॉलनी, परभणी, ता. जिल्हा परभणी. विरुध्द गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी. अड.एस.एस.देशपांडे तर्फे उप अभियंता शहर विभाग, जिंतुर रोड, परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष) अवाजवी बिलाबददल प्रस्तुतची तक्रार दाखल आहे. अर्जदाराने युसुफ कॉलनी परभणी येथील घरात गैरअर्जदाराकडुन घरगुती वापराचे ग्राहक क्रमांक 530010220628 नंबरचे वीज कनेक्शन घेतले आहे. घरात वीज वापर अत्यंत कमी असतो. परंतु गैरअर्जदार प्रत्येक वेळी रिडींग न घेताच बिले देतात. प्रत्यक्ष रिडींग न घेता बिल मार्च 2010 पासून दिली आहेत. ती नियमित भरली आहेत. अर्जदाराकडे कसलीही थकबाकी नसतांना मार्च 2010 च्या बिलात मागील थकबाकी 3243 दाखवुन अचानक 147 विज युनिट वापराचे अवास्तव रक्कमेचे बिल दिले. त्यानंतरही पुन्हा एप्रिल 2010 चे 1645 युनिटचे चुकीचे बिल दिले. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या घरातील जुने मीटर तारीख 11.06.2010 रोजी काढुन घेवुन नविन मीटर बसविले. त्यावेळी जुन्या मीटरचे शेवटचे रिडींग 11350 होते. नविन मीटर बसविल्यानंतर देखील गैरअर्जदाराने पुन्हा रिडींग न घेता सरासरीवर आधार बिले दिली. ऑक्टोंबर 2010 च्या बिलात जुन्या मीटरवरील एप्रिल 2010 चे चालु रिडींग 9195 नविन मीटर बदलण्याच्या तारखेत वजा करून समायोजीत युनिट 2155 देयकात दर्शविले. अर्जदाराचे म्हणणे असे की, मे 2010 पासुनचे दिलेले रिडींग व त्या बिलाची थकबाकी वजा करायला पाहिजे होती ती न करता मे 2010 चे 384 युनिट, जुलै 2010 चे 384 युनिट व ऑगष्ट 2010 चे 50 युनिट असे 1202 युनिटचे सरासरी देयके दिली. ती समायोजीत करून वजा केली नाही. त्यामुळे ऑक्टोंबर 2010 चे संपुर्ण देयक चुकीचे असल्यामुळे ते रदद व्हावे व मीटर रिडींगप्रमाणे देयक मिळावे अशी तक्रार अर्जातुन मागणी केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपञ (नि.2) व पुराव्यातील कागदपञ नि.4 लगत दिनांक 31.12.2009 ते 21.01.2010 ची विज बिले व तारीख 12/11/2010 रोजी रु.7000/- भरल्याची पावती दाखल केली आहे. तक्रर अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर त्याने दिनांक 30.08.2011 रोजी प्रकरणात आपले लेखी निवेदन (नि.12) दाखल केले आहे. अर्जदाराने त्यांच्या विरूध्द तक्रार अर्जातील सर्व केलेली विधाने साफ नाकारली आहेत. दिलेली बिले योग्यच आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जदाराने दिनांक 23.12.2006 रोजी 160 रूपये विज बिल भरल्यानंतर पुन्हा विज बिल भरलेलेच नाही. त्यामुळे थकबाकी वाढलेली आहे. अर्जदाराच्या घरी विज मंडळाचे कर्मचारी ज्या ज्या वेळी रिडींग करण्यासाठी जात होते त्या त्या वेळी त्याचे घर बंद होते त्यामुळे सरासरीचे बिल दिले आहे. एप्रिल 2010 च्या देयकात अर्जदाराने पुर्वी भरलेली रक्कम रूपये 1026.85 वजा करून ते देयक दिलेले आहे. गैरअर्जदाराने पुढे असा खुलासा केला आहे की, सर्वच ग्राहकांचे जुने मीटर बदलुन नवे इलेक्ट्रानीक मीटर घराबाहेर बसविण्याची मोहीम चालु केल्यामुळे अर्जदाराचे घरातील मीटर बदलले होते. तक्रार अर्जातील जुन्या मीटरचे शेवटचे रिडींग मीटर बदलते वेळी 11350 होते हे नाकारलेले नाही. मीटर बदलल्यानंतर संगणकात समावेश करेपर्यन्त सरासरीवरच बिले दयावी लागतात. अर्जदाराचे नविन मीटरचे रिडींग 714 युनिट मिळाल्यावर मीटर बसविते वेळी रिडींग 1 युनिट होते. ते वजा करून 713 युनिटचे मागील 6 महिन्याचे विज बिल दिले. जुन्या मीटरचे शेवटचे रिडींग 11350 होते. त्यातुन 6165 वजा करून 2155 समायोजीत युनिट अधिक 714 युनिट असे 2868 युनिटचे बिल दिले आहे. त्यातुन पुर्वी भरलेली रक्कम 5865.65 वजा करून बिलाची आकारणी केली आहे ती बरोबर आहे. याबाबतीत कोणत्याही प्रकारे सेवाञुटी झालेली नाही अथवा चुकीची अथवा अवाजवी बिल दिले नाही. तथापि सदर अर्ज खारीज करावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपञ आणि नि.20 लगत जानेवरी 2009 ते ऑक्टोंबर 2010 पर्यंन्तचा सी.पी.एल.चा उतारा दाखल केला आहे. तक्रार अर्जाच्या अंतीम सुणावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड श्री.दराडे आणि गैरअर्जदारातर्फे अड श्री सचिन देशपांडे यांनी युक्तीवाद केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदाराचे माहे मार्च 2010 पासून 1रिडींग न घेता चुकीचे व अवाजवी रक्कमेची बिले 1देवुन तसेच नविन मीटर बदलल्यानंतरही वरीलप्रकारेच पुन्हा बिले देवुन सेवाञुटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुददा क्र.1 व 2 - अर्जदाराने तक्रार अर्जामध्ये जानेवारी 2010 च्या बिलापोटी 500/- रु जमा केले होते व पूर्वीची कोणतीही थकबाकी नव्हती असे म्हंटलेले आहे,परंतु पुराव्यात 500/- रु.भरल्याची पावती दाखल केलेली नाही,याउलट नि.20 वरील CPL उता-यातील जानेवारी व फेब्रुवारी 2010 च्या तपशिलाचे अवलोकन केले असता दोन्ही महिझयाच्या “ लास्ट रिसीट अमाऊंट ” पुढे शुन्य आकडा दर्शवला आहे त्यामुळे याबाबत अर्जदाराने खोटे कथन केले असल्याचे स्पष्ट होते. तसेच मार्च 2010 च्या बिलात (नि4/3) वरील देयक तारीख 09/04/2010 रु.3244.87 मागील थकबाकी दाखवलेली असलीतरी CPL मधील नोंदीतून जानेवारी 2009 पासून मार्च 2010 पर्यंत अर्जदाराकडून एकाही बिलाची रक्कम भरलेली नसल्याची नोंद दिसते अर्जदाराने त्याकाळात बिले भरली होती याचा ठोस पुरावा दिलेला नसल्यामुळे मार्च 2010 च्या बिलात दाखवलेली थकबाकी चुकीची आहे असे मुळीच म्हणता येणार नाही.अर्जदाराचा त्याबाबतचा आक्षेप मान्य करता येणार नाही.अर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे एप्रिल 2010 च्या बिलात (नि.4/4 वरील देयक तारीख 06/05/2010) चालू रिडींग 9195 व मागील रिडींग 7550 ची नोंद करुन जे 1645 युनिटची आकारणी रु.10198.92 केलेल बील दिलेले आहे ते निश्चित चुकीचे आहे कारण एका महिन्यात अर्जदाराच्या घरी 1645 युनिटचा विज वापर केला असेल हे मुळीत पटण्यासारखे नाही सदर बीलात मे 2009 ते मार्च 2010 चा विज वापर केल्याचा जो तपशिल दिला आहे तो लक्षात घेता सरासरी 127 युनिट विज वापर दरमहा होत असल्याचे दिसत असल्यामुळे एप्रिल 2010 च्या बिलाची जास्तीत जास्त 127 युनिट प्रमाणे आकारणी होणे आवश्यक आहे ते बील रद्द करुन तसा आदेश देणे न्यायोचित होईल. अर्जदाराच्या घरातील जुने मिटर 11/06/2010 रोजी काढून त्या ठिकाणी नविन मिटर बसवले होते त्या मिटर चेंज रिपोर्टची कॉपी पुराव्यात (नि.4/5) दाखल केलेली आहे त्या मध्ये जुने मिटर काढते वेळी शेवटची रिडींग 11350 व नविन मिटरची चालू रिडींग 001 असल्याची नोंद आहे एप्रिल 2010 नंतर जुलै 2010 चे बील ( नि.4/6 देयक तारीख 06/08/2010) ऑगस्ट 2010 चे बील ( देयक तारीख 06/10/2010 नि.4/7) या दोन्ही बिलात मिटरचे चालू रिडींगचा उल्लेख नाही,परंतु जुलै 2010 च्या बिलात नविन मिटरची मागील रिडींग 01 असतांना मागील रिडींग 9195 दाखवुन 384 युनिट विज वापर केल्याची आकारणी कशी काय केली हे समजत नाही.ऑगस्ट 2010 च्या बिलात ही चालू व मागील रिडींगची नोंद नसतांना 50 युनिटची आकारणी केली असली तरी गैरअर्जदाराच्या म्हणण्या प्रमाणे नविन मिटरचे संगणकीय फिडींग झाले नसल्यामुळे कदाचित ते सरासरी 50 युनिट विज वापराचे बील दिले असावे हे एकवेळ मान्य करता येईल,तरी परंतु नविन मिटर बसवल्यावर गैरअर्जदाराच्या कर्मचा-यांनी प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे बील देण्याच्या बाबतीत निश्चितपणे निष्काळजीपणा केलेला आहे.हे उघड होते. त्या पुढिल सप्टेंबर 2010 चे बिलाचे ( देयक तारीख 06/11/2010 नि.4/8) अवलोकन करता मागील रिडींग 1 व चालू रिडींग 714 म्हणजे एप्रिल 2010 ते ऑगस्ट 2010 पर्यंत 5 महिन्यात एकुण 713 युनिट म्हणजे सरासरी दरमहा 143 युनिट विज वापर केला होता हे स्पष्ट दिसते. ऑगस्ट 2010 च्या बिलात 713 युनिटची आकारणी न करता समायोजित युनिटसह 2868 युनिटची आकारणी केलेली दिसते त्यामध्ये 2155 समायोजित युनिट म्हणजेच जुन्या मिटर वरील मिटर काढून घेण्यापूर्वीचे एप्रिल 2010 च्या बिलात चालू रिडींग 9195 ची नोंद आहे म्हणजे 11350 वजा 9195 = 2155 समायोजित युनिट आहेत अधिक नविन मिटरचे वरील मागील 5 महिन्यातील विज वापर 713 युनिट असे मिळून 2868 युनिटची आकारणी सप्टेंबर 2010 च्या बिलात आहे सदर बिलामध्ये अर्जदाराने एप्रिल 2010 पासून बिलाच्या तारखे पर्यंत पूर्वी भरलेली एकुण रक्कम रु.5895.95 वजा केलेली दिसते ती वजा जाता 2868 ची आकारणी रु.10631.63 अधिक मागील थकबाकी रु. 21360.90 असे एकुण रु.31992.53 चे बिल आहे ते बरोबरच आहे त्यामुळे या बिला बाबत अर्जदाराने घेतलेला आक्षेप मान्य करता येणार नाही. पुराव्यातील ही वस्तुस्थिती विचारात घेता फक्त एप्रिल 2010 चे बील गैरअर्जदाराने चुकीचे दिले असलयाचे वर नमुद केले प्रमाणे तेवढेच रद्द होण्यास पात्र ठरते आणि तेवढयाच बिलाच्या बाबतीत गैरअर्जदाराकडून सेवात्रुटी झालेली आहे.. सबबम मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने आदेश तारखे पासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास दिलेले माहे एप्रिल 2010 चे बील देयक तारीख 06/05/2010 रद्द करण्यात येत आहे. त्या ऐवजी अर्जदाराने त्या महिन्यात 127 युनिट इतकाच विज वापर केला होता असे गृहीत धरुन नव्याने आकारणी करुन त्यापूर्वीच्या थकबाकीसह अर्जदारास दुरुस्त बील द्यावे.व त्या अनुषंगानेच त्या पुढील बिलातही येणेबाकी दाखवावी. 3 याखेरीज मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- आदेश मुदतीत द्यावा अगर ती रक्कम थकबाकी मध्ये समायोजित करावी. 4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |