निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 26.08.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 26.08.2010 तक्रार निकाल दिनांकः- 22.02.2011 कालावधी 5 महिने26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सुवर्णा पिता गुणाजीराव कोरे अर्जदार वय 34 वर्षे धंदा नौकरी रा.प्रफुल निवास, ( अड सुरेश बी. चौधरी ) यशवंत नगर खानापूर फाटा, परभणी. -- विरुध्द उप कार्यकारी अभियंता गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमीटेड, ( अड सचीन देशपांडे ) शहरी विभाग,परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती सुजाता जोशी, सदस्या ) अर्जदार हा यशवंतनगर परभणी येथील रहिवासी असून तिने घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून दिनांक 22.01.2008 रोजी विद्युत सेवा ग्राहक क्रमांक 530010513064-8 व्दारे घेतली. विद्युत पुरवठा घेतल्यापासून गैरअर्जदाराने अर्जदारास रिडींग न घेता विद्युत देयके दिली. अर्जदाराने आतापर्यंतची सर्व विद्युत देयके भरली आहेत. दिनांक 27.06.2010 रोजी गैरअर्जदाराने अर्जदाराच्या घरी जावून जुने मिटर काढून नवीन मिटर बसवले. आतापर्यंत अर्जदारास जुन्या मिटर तपासणीचा अहवाल मिळालेला नाही. दिनांक 25.08.2010 रोजी अर्जदारास रुपये 20270/- चे प्रोव्हीजनल बील दिले आहे व जर ते भरले नाही तर विद्युत पुरवठा खंडीत करु अशी धमकी दिली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 7 विद्युत देयके, विद्युत देयके भरल्याच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखलकेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीसपाठविल्यावर त्यानी दिनांक14.02.2011 रोजी लेखी म्हणणे ( नि.18) दाखल केले आहे. गैरअर्जदारानी त्याचे लेखी जबाबात अर्जदारास सर्व विद्युत देयके मिटर रिडींगप्रमाणेच दिलेली आहेत. अर्जदाराचे मिटर हे घराबाहेर लावलेले होते परंतू अर्जदाराने त्या जागेला शटर लावून त्याला कुलूप लावले व अर्जदार व तिचा पती दोघेही बाहेरगांवी नौकरी करतात व घराला सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्येत कुलूप लावलेले असते त्यामुळे अर्जदाराच्या घरी जावूनही मिटर रिडींग मिळत नाही. त्यामुळे गैरअर्जदाराला अंदाजे विज बिले दयावी लागली व जेंव्हा गैरअर्जदाराच्या प्रत्यक्ष मिटर रिडींग मिळाली तेंव्हा अंदाजे लावलेल्या युनिटची रक्कम वजा केलेली आहे व स्लॅब बेनिफीटही देण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व विज बिले ही प्रत्यक्ष मिटर रिडींगप्रमाणेच आहेत. अर्जदाराचे मिटर फॉल्टी नसल्यामुळे मिटर तपासण्याचा प्रश्नच येत नाही. अर्जदाराला दिनांक 26.11.2010 रोजी विज बिल दुरुस्त करुन दिले आहे व अर्जदाराने ते 01.12.2006 दुरुसत करुन दिले आहे व अर्जदाराने ते दिनांक 01.12.2010 रोजी भरले आहे. त्यामुळे या तक्रारीतील वाद संपलेला आहे त्यामुळे अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी अशी गैरअर्जदाराने विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र ( नि.19) दाखल केले आहे. तक्रारीस दाख्ल केलेले कागदपत्रे अर्जदार व गैरअर्जदार यांचे वकिंलाचा युक्तीवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे. ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010513064-8 व्दारे घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा घेतला आहे ही बाब सर्वमान्य आहे. अर्जदाराने नि. 7/1 ते नि. 7/6 वर दाखल केलेले विद्युत देयकांवर एकाही विद्युत देयकावर रिडींग नाही ही विद्युत देयके दिनांक 11.10.2009 ते दिनांक 25.08.2010 म्हणजे दहा महिन्याची आहेत. अर्जदाराने सदरीत तक्रार दाखल करताना दिनांक 25.08.2010 चे रुपये 20270/- चे वीज बिल रद्य करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराकडून दिनांक 31.08.2010 रोजी रुपये 10,000/- व दिनांक 01.12.2010 रोजी रुपये 11700/- भरुन घेतले आहेत. ( नि. 20 व नि. 24) अर्जदाराला देण्यात आलेल्या कुठल्याही विद्युत देयकात मिटर रिडींग दिलेली नाही व गैरअर्जदाराच्या मतानुसार मिटरा फॉल्टी नाही असे असतानाही गेरअर्जदाराने अर्जदाराला विद्युत जोडणी घेतल्यापासून एकही विद्युत देयक मिटर रिडींगसह दिलेले नाही त्यामुळे गैरअर्जदाराने अर्जदाराला त्रूटीची सेवा दिलेली आहे असे आम्हास वाटते. 1999 (2) CPR 556 State Consumer Disputes Redressal Commission Madhya Pradesh Bhopal यांनी M.P.Electricity Board V/s Shivkand Choubey मध्ये मा. राज्य आयोग मध्ये प्रदेश यानी व्यक्त केलेले. Non recording of meter reading continuously for 6 months sending of arrear bill of large amount calculated at average basis held amounts to deficiency in service and harassment to the consumer मत सदरील तक्रारीत तंतोतंत लागू पडते. सदरील तक्रारीत खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 अर्जदारास दिलेल्या दिनांक 25.08.2010 च्या शेवटच्या वादग्रस्त बिलासह मागील सर्व वादग्रस्त बिले चुकीची व बेकायदेशीर असल्याने रद्य करण्यात येत आहे. 3 अर्जदारास गैरअर्जदाराने मिटरच्या प्रत्यक्ष मिटर रिडींगनुसार नवीन दुरुसत बील आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत कोणतेही व्याज न आकारता दयावे. अर्जदाराने आजपर्यंत गैरअर्जदाराकडे बिलापोटी जी काही रक्कम जमा केले असेल ती दुरुस्त विद्युत देयकातून वजा करावी.. 4 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 5 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |