निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 05/04/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/04/2010 तक्रार निकाल दिनांकः- 01/09/2010 कालावधी 04 महिने 26 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 शेख कादर पि.शेख हुसेन. अर्जदार वय 80 वर्षे.धंदा सेवानिवृत्त. अड.आर.एस.मेतकेवार. रा.मुमताज नगर.परभणी. विरुध्द 1 कार्यकारी अभियंता. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी. अड.ए.एन.पालिमकर. परभणी विभाग जिंतूर रोड.परभणी. 2 उप कार्यकारी अभियंता. महावितरण.शहरी उपविभाग परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. ) अवास्तव व बेकायदेशिर वीज बिलाबाबत प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदाराने मुमताज नगर परभणी येथील स्वतःच्या घरात गैरअर्जदाराकडून घरगुती वापरासाठी ग्राहक नंबर 53001013905-7-2 अन्वये वीज कनेक्शन घेतलेले आहे माहे फेब्रुवारी 2010 पर्यंतची सर्व बीले त्याने नियमित भरलेली आहेत तारीख 05/03/2010 रोजी गैरअर्जदारांचा 3 कर्मचा-यांनी अर्जदाराच्या घरातील मिटर अचानक काढून दुसरे नवीन मीटर बसविले त्यांनतर लगेच दुसरे दिवशी 3650 युनीट चोरुन वीज वापर केल्याचे रु.44334/- रुपयांचे बील देवुन 12/03/2010 पर्यंत भरण्यास सांगितले. अर्जदाराचे म्हणणे असे की,त्याने घरामध्ये वीज चोरीचे कसलेही कृत्त केले नसताना खोटा आरोप करुन वरील बील दिले त्याबाबत कोणताही खुलासा दिला नाही अशा प्रकारे त्रुटीची सेवा देवुन मानसिकत्रास देवुन त्याचेवर अन्याय करुन बेकायदेशिर दिलेले बील रद्द करण्याचे आदेश व्हावेत मानसिकत्रासापोटी रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु. 2500/- ची गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2 ) व पुराव्यातील कागदपत्रात नि.6 लगत वादग्रस्त 11/03/2010 तारखेची असेसमेंट शीट, 12/03/2010 तारखेचे असेसमेंट बील, मागील व चालू महिन्याची भरलेली बीले दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर अड पालीमकर यांनी पुरशिस दाखल करुन वकिलपत्र व लेखी म्हणणे सादर करण्यासाठी मुदतीचा अर्ज दिला तो मंजूर केला मात्र त्यानंतर 3-4 वेळा संधी देवुनही लेखी जबाब सादर न केल्यामुळे गैरअर्जदारां विरुध्द नो से चा आदेश पारीत केला अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार तर्फे अड मेतकेवार यांचा युक्तिवाद एकुन प्रकरणाचा अंतिम निकाल देण्यात येत आहे. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदाराने वीज चोरी केल्याचे गैरअर्जदाराकडून शाबीत झाले आहे काय नाही. 2 गैरअर्जदारांनी अर्जदार 12/03/2010 तारखेचे बेकायदेशिर वीज चोरी असेसमेंट बील रु.44334/- देवुन सेवात्रुटी केली आहे काय होय. 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे. अंतिम आदेशा प्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 ते 3 अर्जदाराच्या घरात ग्राहक क्रमांक 53001013905-7-2 अन्वये घरगुती वापराचे वीज कनेक्शन दिलेले आहे हे पुराव्यातील नि.6 लगत दाखल केलेल्या बिलांचे अवलोकन केले असता शाबीत झाले आहे. अर्जदाराचे म्हणणे असे की, फेब्रुवारी 2010 पर्यंतची सर्व बिले त्याने नियमित भरलेली आहेत. माहे जानेवारी 2010 चे ( देयक तारीख 06/02/201) भरलेले बिलाची छायाप्रतही पुराव्यात ( नि.6/3 ) दाखल केली आहे.अर्जदाराचे म्हणणे असे की, तारीख 5/3/2010 रोजी गैरअर्जदारांचे तीन कर्मचारी कोणतीही पूर्वै सुचना न देता घरी येवुन मीटरची पाहाणी केली व जुने मिटर काढून त्याजागी नवीन मिटर बसविले व त्यानंतर दुसरे दिवशी विज चोरी केल्याचे कारण सांगुन 3650 युनीटचे विज चोरीचे रु.44334 रक्कमेचे असेसमेंट बील (नि.6/1) देवुन 12/03/2010 पर्यंत भरणेस सांगितले मात्र त्यासंबंधीचा कसलाही खुलासा दिला नाही. सदर बीला सोबत दिलेली असेसमेंटशिट देखील अर्जदारने पुराव्यात नि.6/2 दाखल केलेली आहे.गैरअर्जदारांनी मिटरची तपासणी करुन जुने मिटर काढून घेताना वास्तविक त्याबाबतचा पंचनामा करणे आवश्यक होते शिवाय विज चोरीचा ग्राहकावर ठपका ठेवुन मिटर काढून नेल्यावर त्याची लॅबोरेटरी टेस्टींग करण्यासाठी अर्जदाराला तशी पूर्व नोटीस देवुन मिटरची तपासणी करणे आवश्यक होते.यापैकी कोणतीही कार्यवाही न करताच गैरअर्जदारांनी रु. 44334/- चे विज चोरीचे दिलेले असेसमेंट बील निश्चितच बेकायदेशिर आहे.ते प्रथम दर्शनीच लक्षात येते.याबाबत ग्राहक मंचात अर्जदारने कायदेशिर दाद मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केल्यावर गैरअर्जदारांनी तक्रार अर्जाबाबत कोणताही लेखी खुलासा न देता किंवा अर्जदाराने विज चोरी केल्यासंबंधीचा कसलाही ठोस पुरावा सादर न करता मौन बाळगले आहे त्याअर्थी दिलेले असेसमेंट बील आकसापोटी व कोणतेही कायदेशिर कारण घडले नसतांना नियमबाह्य व बेकायदेशिर दिले आहे.असाच यातुन निष्कर्ष निघतो. आणि या बाबतीत गैरअर्जदारकडून सेवात्रुटी झालेली असल्यामुळे दिलेले वादग्रस्त विजचोरी असेसमेंट बील रद्द होण्यास पात्र आहे.सबब आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदारांनी अर्जदारारस 06/03/2010 तारखेचे रु.44334/- चे दिलेले विज चोरी असेसमेंट बील रद्द करण्यात येत आहे. 3 प्रस्तुत प्रकरण दाखल केल्यावर नि.3 च्या तुर्तातूर्त ताकिद अर्जावर मंचाने केलेल्या आदेशा प्रमाणे वादग्रस्त बिलापोटी आदेशात नमुद केले प्रमाणे रक्कम रु.1,000/- अर्जदारने गैरअर्जदाराकडे जमा केलेली होती.त्याची पावती प्रकरणात (नि.13/2) दाखल केलेली आहे.ती रक्कम अर्जदारास आदेश तारखे पासून 30 दिवसाचे आत परत करावी. 4 याखेरीज मानसिकत्रासापोटी रु.1,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- ची नुकसान भरपाई आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी. 5 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |