निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 16/03/2011 कालावधी 02 महिने 10 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सुभाष पिता बाबुराव निरपणे. अर्जदार वय 40 वर्षे.धंदा.शेती. अड.डि.यु.दराडे. रा.निमगाव ता.सोनपेठ जि.परभणी. विरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. गैरअर्जदार. तर्फे कनिष्ठ अभियंता. सोनपेठ ता.सोनपेठ.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती.अनिता ओस्तवाल.सदस्या. ) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे निमगाव येथील रहिवासी आहे.त्याने घरगुती वापरा करीता विज जोडणी घेण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन कोटेशनची रक्कम रु.1225/- चा भरणा दिनांक 13/07/2010 रोजी गैरअर्जदाराकडे केला,परंतु अनेक वेळा विनंती करुन देखील गैरअर्जदाराने अर्जदारास विद्युत जोडणी करुन दिलेली नसल्यामुळे अर्जदार हे दिनांक 01/11/2010 रोजी गैरअर्जदाराच्या कार्यालया समोर आमरण उपोषणास बसले होते.तदनंतर गैरअर्जदाराने स्वतः अर्जदारास विद्युत जोडणी जोडून दिली.त्यामुळे तक्रारदाराने त्याचे उपोषण सोडले.मात्र त्याच दिवशी संध्याकाळी गैरअर्जदाराच्या लाईनमन यानी विरोधकांच्या सांगण्यावरुन अर्जदाराचा विज पुरावठा कोणतेही कारण नसताना खंडीत केला, म्हणून मंचासमोर प्रस्तुतची तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने अर्जदाराचा विज पुरवठा सुरु करावा तसेच मानसीक त्रासाबद्दल रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- अर्जदारास द्यावे.अशा मागण्या अर्जदाराने केल्या आहे. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/3 मंचासमोर दाखल केले आहे. मंचाची नोटीस गैरअर्जदारास तामील होऊन देखील नेमल्या तारखेस गैरअर्जदार मंचासमोर हजर न राहिल्याने त्याच्या विरोधात एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला व त्याच्या विरोधात प्रकरण एकतर्फा चालविण्यात आले. अर्जदाराच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणती दाद मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशा पमाणे 2 कारणे 2 मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने घरगुती वापरा करीता विद्युत जोडणी घेण्यासाठी नियमा प्रमाणे कोटेशनची रक्कम रु.1225/- दिनांक 13/07/2010 रोजी भरली,परंतु गैरअर्जदाराच्या खोडसाळपणामुळ व विव्देषपूर्ण वर्तणुकीमुळे अर्जदाराचा विद्युत पुरवठा अवघ्या काही तासातच खंडीत करण्यात आला.अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.मंचासमोर अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली असता अर्जदाराच्या कथनात तथ्य असल्याचे जाणवते. कोटेशनची रक्कम भरुन देखील विद्युत जोडणी मिळविण्यासाठी अर्जदारास आमरण उपोषण करावे लागले हि बाब नक्कीच क्लेष कारक आहे.व गैरअर्जदाराचा मनमानी कारभार दर्शविण्यास पुरेशी आहे. गैरअर्जदाराची परभणी जिल्हयातील एकाधिकारशाही आहे.ग्राहकाला विज पुरवठा घेण्यासाठी गैरअर्जदाराची मनधरणी करावी लागते.गैरअर्जदाराच्या लहरीपणाचा व जुलमी कारभाराचा प्रत्यय सदर प्रकरणातून येतो.ही बाब नक्कीच गैरअर्जदारास भुषणावह नाही म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 8 दिवसांच्या आत अर्जदाराचा विज पुरवठा सुरु करावा.अन्यथा आदेश मुदतीनंतर विज पुरवठा देई पर्यंतच्या कालावधीसाठी दररोज रक्कम रु.50/- या प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी लागेल. 3 तसेच गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- अर्जदारास द्यावे. 4 संबंधितांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |