निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 03/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 11/08/2011 कालावधी 07 महिने 08 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. कैलास पी.शंकरराव लंगोटे. अर्जदार वय 38 वर्ष.धंदा.शेती. अड.डि.यु.दराडे. रा.लंगोट गल्ली ता.जि.परभणी. विरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं.लि. गैरअर्जदार. तर्फे उप कार्यकारी अभियंता. अड.एस.एस.देशपांडे. शहर उप विभाग.जिंतूररोड.परभणी.ता.जि.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.) अवास्तव विज बिला बद्दल प्रस्तुतची तक्रार आहे. अर्जदार हीने लंगोट गल्ली येथील तीच्या मालकीच्या घरामध्ये गैरअर्जदाराकडून घरगुती वापराचे विज कनेक्शन घेतलेले आहे.त्याचा ग्राहक क्रमांक 530010383209 आहे तक्रार अर्जात दिलेल्या तक्त्या प्रमाणे वीज वापर दरमहा सरासरी 50 युनीट पर्यंत होतो त्याप्रमाणे नियमितपणे वीज बीले भरली आहेत.परंतु गैरअर्जदाराने कधीही प्रत्यक्ष रिडींग प्रमाणे आतापर्यंत देयके दिली नाहीत केवळ सरासरीवर आधारीत सप्टेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 ची बिले दिली आहेत. तीचे म्हणणे असे की, दोन खोल्यांचे तीचे घर आहे त्यामध्ये एक पंखा व दोन सी.एफ.एल.बल्ब एवढाच विज वापर केला जातो.असे असतांना रिडींग प्रमाणे बिले मिळावीत म्हणून गैरअर्जदारास तोंडी विनंती केली असता त्याने त्याची दखल घेतली नाही.व अवास्तव विज बिले देवुन अर्जदारावर ती भरण्याची सक्ती करुन तारीख 21/01/2010 रोजी रु.10000/- भरुन घेतले आणि त्यानंतर पुन्हाअवास्तवरक्कमेची बिले देवुन ती तारीख 10/10/2010 रोजी विज पुरवठा तात्पुरता खंडीत केला अशा रितीने मानसिकत्रास देवुन सेवात्रुटी केली आहे म्हणून ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन अर्जदारास फेब्रुवारी 2009 पासुन दिलेली सर्व बिले रद्द व्हावीत व दरमहा 50 युनिट प्रमाणे दरमहा विज वापर होतो अशी विज बिले मिळावीत.तारीख 21/01/2010 रोजी जमा केलेले रु.10,000/- दुरुस्त बिलात समायोजित व्हावे अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.6 लगत माहे सप्टेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 ची बिले वगैरे 12 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठविल्यानंतर त्यांनी तारीख 30/04/2011 रोजी लेखी जबाब (नि.20) दाखल केला. तक्रार अर्जाबाबत सुरवातीलाच असा आक्षेप घेतला आहे अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही विज कनेक्शन श्रीमती शेषाबाई शंकरराव लंगोटे हिच्या नावे दिलेले आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ती दिनांक 06/09/2004 रोजी मयत झाली आहे परंतु त्यानंतर अर्जदाराने स्वतःच्या नावे आज पर्यंत विज कनेक्शन ट्रान्सफर करुन घेतलेले नाही.त्यामुळे तक्रारफेटाळण्यात यावी.गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, फेब्रुवारी 2008 पासून जानेवारी 2010 पर्यंत अर्जदाराने बिले भरलेली नाहीत फेब्रुवारी 2008 मध्ये रु. 2080/- थकबाकी असतांना फक्त रु 1000/- भरले तक्रार अर्जातील तक्यात नमुद केलेल्या कालावधीमध्ये गैरअर्जदारांचे कर्मचारी ज्यावेळी रिडींग घेण्यासाठी अर्जदाराच्या घरी गेलेला होता त्यावेळी घर बंद असल्यामुळे रिडींग घेता आली नाही त्यामुळे सरासरीची बिले द्यावी लागली.अर्जदाराने जानेवारी 10 मध्ये भरलेली रक्कम रु.10,000/- 23 महिन्यानंतर भरली आहे.त्यानंतर एकही बील भरलेली नाही त्यामुळे ऑक्टोबर 2010 मध्ये विज पुरवठा तात्पुरता खंडीत करावा लागला वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र (नि.21) दाखल केले आहे. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या नेमले तारखेस अर्जदार तर्फे अड.डि.यु.दराडे व गैरअर्जदार तर्फे अड.सचिन देशपांडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्त्र. 1 अर्जदाराची तक्रार गैरअर्जदाराचा ग्राहक म्हणून चालणेस पात्र आहे काय? होय. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास सप्टेंबर 2009 पासून नोव्हेंबर 2010 पर्यंतची रिडींग न घेता मनमानी पध्दतीने अवास्तव व चुकीची बिले देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय. 3 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 गैरअर्जदाराने अर्जदाराच्या घरात ग्राहक नं.530010383209 चे कनेक्शन श्रीमती शेषाबाई शंकरराव लंगोटे हिच्या नावे दिलेले आहे.ती दिनांक 06/09/2004 रोजी मयत झाल्यानंतर अर्जदाराने स्वतःच्या नावे विज कनेक्शन ट्रान्सफर करुन आजपर्यंत घेतलेले नाही व गैरअर्जदारचा तो ग्राहक नाही.म्हणून तक्रार फेटाळावी असा आक्षेप घेतलेला आहे.तो चुकीचा असून ग्राह्य धरता येणार नाही कारण ग्राहक सरंक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (डी) मधील तरतुदी नुसार उपभोक्त्या खेरीज लाभार्थी देखील ग्राहक संज्ञेत येत असल्यामुळे व गैरअर्जदाराची मुळ ग्राहक अर्जदाराची जनक आई असल्यामुळे व घेतलेले घरगुती वापराचे विज कनेक्शन एकत्र कुटूंबातील असल्याने मुळ ग्राहकाच्या पश्चात लाभार्थी म्हणून अर्जदाराने विज वापर केलेला आहे त्याप्रमाणे आजतागायत नाहरकत गैरअर्जदाराने बिले ही स्वीकारलेली असल्याने अर्जदार त्याचा ग्राहक नाही हे मान्य करता येणार नाही.लाभार्थी म्हणून अर्जदाराची तक्रार गैरअर्जदारा विरुध्द चालणेस पात्र आहे. मुद्दा क्रमांक 2 व 3 अर्जदाराच्या घरी घरगुती वापराचे गैरअर्जदाराकडून ग्राहक क्रमांक 530010383209 नं.चे विज कनेक्शन घेतलेले आहे ही अडमिटेड फॅक्ट आहे. अर्जदारने पुराव्यात नि.6 लगत दाखल केलेल्या बिलावरील नोंदी वरुन हे स्पष्ट होते. बिलाचे अवलोकन केले असता असे दिसते की, सप्टेंबर 2009 पासून नोव्हेंबर 2010 पर्यंतची बिले RNA, व Faulty असे शेरे मारुन सप्टेंबर 2009 ते डिसेंबर 2009 काळात 1000, 417, 834, 417 युनिट दरमहा विज वापर केल्याची नोंद करुन बिलांची आकारणी केलेली दिसते त्यानंतर ऑक्टोंबर 2010 पर्यंत सरासरी 50 युनिट विज वापर झाल्याचे ग्रहीत धरुन बिलांची आकारणी केलेली दिसते. गैरअर्जदारतर्फे सादर केलेल्या लेखी जबाबात अर्जदाराचे घर बंद असल्यामुळे रिडींग घेता आले नव्हते असा बचाव घेतलेला आहे परंतु तो मुळीच मान्य करता येणार नाही कारण सलग एकवर्ष भर एकदाही गैरअर्जदाराच्या कर्मचा-यास प्रत्यक्ष रिडींग घेता येवु नये त्याचे आश्चर्य वाटते.केवळ आपला निष्काळजीपणा दडवण्यासाठीच सदरचा बचाव घेतलेला आहे.तो मुळीच पटण्यासारखा नाही व विश्वासार्ह देखील नाही. माहे ऑक्टोबर 2009 ते डिसेंबर 2009 पर्यंत रिडींग कॉलम मध्ये RNA असा शेरा असतांनाही एक महिन्यात 417, 834, 1000, युनिट विज वापरल्याची जे युनीटस् बिलामध्ये दिलेले आहेत ते कशाचे आधारे दिलेली आहे या बद्दलचा कसलाही स्पष्ट खुलासा लेखी जबाबात दिलेला नाही किंवा युक्तिवादाच्या वेळी देखील गैरअर्जदारातर्फे अड देशपांडे यांनी मंचापुढे पुरावा दिलेला नाही त्यामुळे वरील काळात अवास्तव व भरमसाठ विज वापर केल्याच्या नोंदी करुन अर्जदारास दिली गेलेली बिले मनमानी पध्दतीने व अर्जदारावर अन्याय केलेला आहे व या बाबतीत गैरअर्जदाराकडून निश्चितपणे सेवात्रुटी झाली आहे असे पुराव्यातून सिध्द झाले आहे. त्यामुळे थकबाकीसह नोव्हेंबर 2010 चे शेवटेचे वादग्रस्त बील (देयक तारीख 06/11/2010 ) रु 17,530/- रद्द होण्यास पात्र ठरते.गैरअर्जदाराने माहे ऑगस्ट 2010 ते डिसेंबर 2010 पर्यंत ची बिले दरमहा विज वापर 50 युनिट होतो हे मान्य करुन व ग्रहीत धरुन दिलेले असल्यामुळे आणि अर्जदाराने तक्रार अर्जात आणि शपथपत्रातूनही नमुद केले नुसार त्याच्या दोन खोल्ंयाच्या घरात फक्त एक पंखा आणि दोन सि.एफ.एल.बल्ब एवढाच विज वापर होत असल्याने अर्जदाराच्या घरी जास्तीत जास्त 50 युनिट पेक्षा जास्त विज वापर मुळीच होत नसला पाहिजे या सर्व बाबी विचारात घेवुन गैरअर्जदाराने चुकीची व मनमानी पध्दतीने दिलेली बिले निश्चितपणे रद्द होण्यास पात्र आहेत.सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. गैरअर्जदाराने ग्राहक क्रमांक 530010383209 वरील माहे सप्टेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010 ची काळात दिलेली विद्युत बिले रद्द करण्यात येत आहेत. त्याऐवजी अर्जदाराच्या घरी दरमहा सरासरी 50 युनीट वीज वापर होतो असे गृहीत धरुन माहे सप्टेंबर 2009 पासून नोंव्हेंबर 2010 पर्यंत दरमहाची आकरणी करुन नवीन दुरुस्त बिले कोणताही दंड व्याज न आकारता आदेश तारखे पासून 30 दिवसांचे आत अर्जदारास द्यावे. या काळात अर्जदाराने जी काही रक्कम जमा केली असेल ती वजा करुन उरलेली रक्कम स्विकारावी जमा केलेली रक्कम जादा होत असेल तर ती पुढिल बिलात समायोजित करावी. 2 याखेरीज मानसिकत्रास व सेवात्रुटी पोटी रु.1,000/- व अर्जाचा खर्च रु.1,000/- अर्जदारास द्यावे. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष. जिल्हा ग्राहक मंचाच्या सन्माननीय दोन सदस्यांनी दिलेल्या निकालपत्रातील आदेशाशी मी सहमत नाही त्यामुळे मी माझे वेगळे निकालपत्र देत आहे. (सौ.अनिता ओस्तवाल) सदस्य – जिल्हा ग्राहक मंच,परभणी. (निकालपत्र पारीत व्दारा सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.) मुद्दे. उत्तर. 1 अर्जदार हा गैरअर्जदार विज वितरण कंपनीचा ग्राहक आहे काय ? नाही. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्दा क्रमांक 1 व 2 गैरअर्जदाराने लेखी निवेदनातून असा मुद्दा उपस्थित केला आहे की, अर्जदार हा त्यांचा ग्राहक नाही.प्रस्तुत प्रकरणाच्या निर्णयासाठी गैरअर्जदाराने उपस्थित केलेल्या कायदेशिर मुद्याचा ऊहापोह करणे गरजेचे आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराची आई श्रीमती शेषाबाई लंगोटे हिच्या नावे सदरील विज मीटर आहे,परंतु दिनांक 06/09/2004 रोजी ती मयत झाली.असे अर्जदाराने तक्रार अर्जातून मान्य केले आहे.दि.06/09/2004 ते अद्याप पावेतो अर्जदाराने सदरील मिटर स्वतःच्या नावे करुन घेतलेले नाही अथवा त्या संदर्भात कार्यवाही केल्याचेही दिसून येत नाही तब्बल 6 वर्षां एवढा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील अर्जदारास सदरील मिटर स्वतःच्या नावे करुन घेण्याची गरज देखील वाटली नाही. मृत व्यक्तीच्या नावे एकदा विज जोडणी घेतली व त्यानंतर अपेक्षीत दाद जर त्यांना मिळू लागली तर मृत व्यक्ंतीच्या नावे विज जोडणी ठेवुन पिढयान पिढया त्याचा उपभोग घेत राहतील व त्यांना विज जोडणी स्वतःच्या नावे करुन घेण्याची गरजच भासणार नाही असे मला वाटते. म्हणून ग्राहक मंचात दाद मागण्यासाठी मृत व्यक्तींच्या नावे असलेली विज जोडणी प्रथम अर्जदाराने स्वतःच्या नावे करुन घ्यावी व त्यानंतर त्याला दाद मागता येईल.असे माझे मत आहे. मृत व्यक्तींच्या नावे विज जोडणी ठेवुन त्याचा उपभोग घेणे हेच मुळात गैर आहे. रिपोर्टेड केस Chattisgarh State electricity board & others Vs goverdhan Prasad dhurandhar 1(2010) CPJ 63 मा.छत्तीसगड राज्य आयोग. मध्ये असे मत व्यक्त केले आहे की, IMP Point – Complainant enjoying electricity through connection which was standing in the name of dead person – No application made for change in name of consumer or mutation of his name in place of his father – complainant not a consumer under CPA 1986.हे मत प्रस्तुत प्रकरणाला तंतांतंत लागु होते. म्हणून वरील सर्व बाबींचा सारासार विचार करुन मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मी खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सदस्या
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |