निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 29/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 05/01/2012 कालावधी 01 वर्ष. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. बालाजी पि.काशिनाथराव मुंढे. अर्जदार वय 39 वर्ष.धंदा.- नोकरी. अड.डि.यु.दराडे. रा.यशोधन नगर,परभणी. विरुध्द महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. गैरअर्जदार. तर्फे उप कार्यकारी अभियंता अड.एस.एस.देशपांडे. जिंतूररोड.परभणी. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) अर्जदाराला विज चोरीचे चुकीचे बील देवुन दिलेल्या त्रुटीच्या सेवेबद्दल अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व त्याचा ग्राहक क्रमांक 530010498286 आहे. गैरअर्जदार हे रिडींग न घेताच बील देतात व बील भरले नाही तर वीज तोडण्याची धमकी देतात. दिनांक 31/03/2010 रोजी गैरअर्जदाराच्या काही लोकांनी तक्रारदाराच्या घरी भेट देवुन मीटर तपासणी केली व मीटर कमी वेगाने फिरते व त्यात गडबड आहे असे सांगुन 3098 युनिटचे रु.33502/- चे बील दिले तक्रारदाराचा वापर घरगुती असून सुध्दा व्यापारी वीज वापर दाखवुन रु.20,000/- दंड लावला अर्जदारास दिलेले असेसमेंट देयक व कंपाऊंडींग देयक रद्द करण्यात यावे,म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रु.5000/- व दाव्याचा खर्च रु.3000/- मिळाला अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, विद्युत देयके, पावत्या, इ. कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदाराने त्याच्या लेखी जबाबात त्यांनी अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही व वीज चोरीचे असेसमेंट व कंपाऊंडींग बील योग्य तेच दिलेले आहे व तक्रारदारावर विशेष न्यायालय परभणी येथे स्पेशल केस क्रमांक 06/2010 दिनांक 01/04/2010 रोजी विद्युत कायदा 2003 चे कलम 135 व 138 अन्वये विज चोरीची तक्रार दाखल केलेली होती, परंतु तक्रारदाराने असेसमेंट व कंपाऊंडींग बील भरल्यामुळे वरील तक्रार वापस घेण्यात आली दिनांक 31/03/2010 रोजी गैरअर्जदारांच्या भरारी पथकाने अर्जदाराच्या घरी जावुन अर्जदाराच्या उपस्थितीतच मीटर तपासले असता मीटर सील तुटलेल्या अवस्थेत आढळले व मंजूर भार 0.40 के.डब्ल्यु. ऐवजी 1.721 KW संलग्न भार आढळून आला व मीटर अक्युचेक मशीनने तपासले असता – 68.53 टक्के इतक्या मंद गतीने चालत असल्याचे आढळले म्हणून मीटर जप्ती पंचनामा करुन मीटर जप्त केले व मीटर लॅब मध्ये तक्रारदारा समोरच तपासले त्यात 3 रेझीस्टंट दिसले त्यानंतर असेसमेंट व कंपाऊंडींग बीले देण्यात आली, सदरील वीज बीले वीज चोरीची असल्यामुळे प्रस्तुतची तक्रार मा.मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.अर्जदारास गैरअर्जदाराने कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही उलट अर्जदाराने सर्व माहिती लपवुन खोटी तक्रार केलेली असल्यामुळे तक्रार रु.6000/- खर्च लावुन फेटाळण्याची विनंती गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, स्पॉट इन्स्पेक्शन रिपोर्ट, पंचनामा, नोटीस,टेस्टरीझल्ट,असेसमेंट शीट, पावत्या,स्पेशल केस 6/10 इ कागदपत्र दाखल केलेले आहेत. तक्रारीत अर्जदार व गैरअर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदाराची तक्रार ग्राहक न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात येते काय ? नाही. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदारा कडून विद्युत पुरवठा घेतलेला आहे व त्याचा ग्राहक क्रमांक 530010498286 आहे ही बाब सर्वमान्य आहे नि.4/7 व नि.4/8 वरील विद्युत देयकांवर असेसमेंट बील थेफ्ट केस As per E A 2003 See 135/1 असे नमुद केलेले आहे यावरुन सदरचे बील अर्जदाराने वीजेची चोरी करुन विज वापरली असल्याचे सिध्द झाले असल्यामुळेच दिलेले होते हे गैरअर्जदाराने लेखी जबाबा सोबत नि.15 लगत दाखल केलेल्या कागदपत्रातुन स्पष्ट दिसते त्यामध्ये दिनांक 31/03/2010 रोजी गैरअर्जदाराच्या भरारी पथकाने मीटरची पाहणी करुन ते मंदगतीने चालते म्हणून मीटर जप्त करुन केलेला पंचनामा, इन्स्पेक्शन रिपोर्ट, मीटर जप्ती पंचनामा, मीटरच्या अंतर्गत भागतील तपासणी बाबत लॅबोरेटरी मध्ये हजर राहणे संबंधी अर्जदाराला दिलेली नोटीस मीटर तपासणी अहवाल, मीटर टेस्ट रिझल्ट असेसमेंट शिट, विशेष न्यायालयात अर्जदारा विरुध्द दाखल केलेली तक्रारीची प्रत व गैरअर्जदाराने न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर अर्जदाराने भरलेले असेसमेंट बील व कंपाऊंडींग बील त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारा विरुध्द केलेली तक्रार काढून घेतली यावरुन सदरील तक्रार वीज चोरीची होती हे सिध्द झालेले आहे. संयुक्त तपासणी अहवालात मीटर मध्ये 5 रेझिझस्टंट आहेत व टेस्ट रिझल्ट मध्ये मीटर स्लो असल्याचे पुराव्यातून स्पष्ट होत असल्यामुळे अर्जदाराने गैरमार्गाने विजेची चोरी केलेली होती याबद्दल कोणतीही शंका उरत नाही त्यावरुन गैरअर्जदाराने दिनांक 03/04/2010 रु. 33502/- चे वीज अधिनियम 2003 कलम 135/1 अन्वये वीज चोरीचे बील दिलेले असल्यामुळे अशा प्रकारचा वाद ग्राहक मंचापुढे चालू शकत नाही या संदर्भात मा. राष्ट्रीय आयोगाने रिपोर्टेड केस 2011 CTJ 649 ( CP) ( NCDRC) Ishwar sing V/s Dakshin Haryana Vidyut prasaram Nigam Ltd मध्ये असे स्पष्टपणे मत व्यक्त केले आहे की, “ The consumer forum have no jurisdiction to go into the issues of theft of electricity by the electricity consumers” ते सदरील तक्रारीस लागु पडत असल्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन खालील प्रमाणे आदेश करण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 अर्जदार व गैरअर्जदाराने तक्रारीचा खर्च आपापला सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |