--- आदेश ---
(पारित दि. 04-01-2007 )
द्वारा श्रीमतीप्रतिभाबा. पोटदुखे, अध्यक्षा
अर्जदार श्रीमती रेवाबाई नथ्थुजी नागपूरे यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की,.......................
1. अर्जदार श्रीमती रेवाबाई नथ्थुजी नागपूरे यांनी दि.05.06.05 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 यांना विजपुरवठा मिळण्यासाठी अर्ज दिला. गैरअर्जदार यांनी विजपुरवठा देण्यास उशीर केला. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना दि. 02.03.06 रोजी एका महिन्याकरिता तात्पुरता विजपुरवठा दिला. त्यासाठी अर्जदार यांनी रु.5,000/- ही रक्कम सुरक्षा ठेव म्हणून गैरअर्जदार यांचेकडे जमा केली आहे.
2. अर्जदार यांचा परिसर हा पोल क्रं. अ-286 या पासून जवळ आहे व या पोलवरुनच गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या शेजा-यांना विजपुरवठा केला आहे. परंतु अर्जदार यांना विजपुरवठा दिलेला नाही.
3. गैरअर्जदार यांनी दि. 16.06.06 रोजी रु.3,000/- सुरक्षा ठेव म्हणून घेतले तर दि. 09.08.06 रोजी रु.4,050/- ही रक्कम अर्जदार यांचेकडून वसूल केली. परंतु अर्जदार यांना विजपुरवठा दिला नाही. गैरअर्जदार यांनी विद्युत कायदा 2003 च्या तरतुदीचा भंग केला आहे. अर्जदार यांनी पैशाचा भरणा करुनही गैरअर्जदार यांनी त्यांना विद्युत पुरवठा दिलेला नाही ही गैरअर्जदार यांच्या सेवेतील न्यूनता आहे.
4. गैरअर्जदार यांनी दि. 30.09.06 रोजी रु.16,605/- चे मागणी देयक पाठविले. सदर देयक हे पूर्णपणे अवैध आहे.
4.
5. अर्जदार यांनी मागणी केली आहे की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांच्या मीटर नं. 10050226 चा विद्युत पुरवठा बंद करु नये असा आदेश व्हावा, दि. 30.09.06 चे देयक हे अपूर्ण व अवैध आहे असे घोषित करण्यात येवून गैरअर्जदार यांनी भरलेले पैसे समायोजित करुन योग्य देयक पाठविण्याचा आदेश व्हावा, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना स्थायी विज जोडणी न दिल्यामुळे विद्युत कायदा 2003 मधील तरतुदी नुसार रु.1,000/- हे हलगर्जीपणा केलेल्या प्रत्येक दिवसासाठी देण्याचा आदेश व्हावा.
6. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी बयाण नि.क्र.14 वर दाखल केले आहे. गैरअर्जदार म्हणतात की, अर्जदार यांनी नविन वीज जोडणी मिळण्यासाठी त्या विभागातील संबंधित जे.ई.यांचेकडे दि. 03.08.06 रोजी अर्ज दिला. घराचे बांधकाम सुरु असल्यामुळे नियमानुसार अर्जदार यांना अस्थायी विज जोडणी देण्यात आली. अस्थायी वीज जोडणी ही दि. 21.07.06 पर्यंतच देण्यात आली होती तरी सुध्दा अर्जदार या विधवा असल्यामुळे व त्यांनी घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर स्थायी विजजोडणी घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे अर्जदार यांचा विजपुरवठा बंद करण्यात आला नाही.
7. अर्जदार यांना स्थायी विज जोडणी देण्यासाठी एक नविन पोलची आवश्यकता होती. कारण पोल क्रं.अ- 286 हा नियमानुसार नेमून दिलेल्या अंतराच्या बाहेरचा होता. नविन पोलची किंमत ही 12455/- रुपये अशी आहे. अर्जदार यांना अस्थायी विद्युतपुरवठा हा लाकडी खांबावरुन देण्यात आला होता. अर्जदार यांना दिलेले रु.16605/- हे हिशोबानुसारच देण्यात आलेले आहे. जो पर्यंत अर्जदार हे देयक भरत नाही . तो पर्यंत त्या स्थायी विद्युत जोडणी मिळविण्यासाठी कायदेशीरपणे पात्र नाही.
8. अर्जदार यांनी गैरअर्जदार कडे आवश्यक ती रक्कम भरलेली नाही तसेच नविन विद्युत जोडणीकरिता लागणारा टेस्ट रिपोर्ट सुध्दा दिलेला नाही. अशा स्थितीत अर्जदार यांची तक्रार ही नुकसान भरपाईसह खारीज होण्यास पात्र आहे.
कारणे व निष्कर्ष
9 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, व लेखी युक्तिवाद यावरुन असे दिसून येते की, अर्जदार यांनी दि. 03.08.06 रोजी स्थायी विद्युत जोडणीसाठी विजपुरवठा मागणी अर्ज गैरअर्जदार यांचेकडे केला आहे. त्यासोबत दिलेल्या दि. 01.08.06 च्या अर्जदार यांच्या हलफनाम्यात परिच्छेद क्रं. 6 मध्ये ‘‘ अर्जदार विज पुरवठयाकरिता लागणारी देय रक्कम भरण्यास तयार आहे.’’ असे नमूद केले आहे. दि. 03.08.06 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना लिहिलेल्या पत्रात परिच्छेद क्रं. 1 मध्ये ‘‘ तात्पुरती कनेक्शनची मुदत संपत आली आहे. माझे विद्युत कनेक्शन परमनंट करुन द्या ’’ असा उल्लेख आहे.
10 अर्जदार यांनी दाखल केलेल्या दि. 02.03.06 च्या रु.5,000/- च्या पावतीमध्ये अस्थायी जोडणी सुरक्षाठेव असा उल्लेख आहे. तसेच दि. 16.06.06 च्या रु.3000/- च्या पावतीमध्ये सुध्दा अस्थायी जोडणी सुरक्षा ठेव असा उल्लेख आहे. तर दि. 09.08.06 च्या रु.4050/-च्या पावतीवर अस्थायी जोडणीचे फायनल बील असा उल्लेख आहे.
11 दि. 30.09.06 चे रु.16,605/- चे देयक हे स्थायी वीज जोडणीसाठी पोलच्या खर्चासह दिल्याचे दिसून येते.
12 गैरअर्जदार यांनी
अ I (1998) सीपीजे 94 एन.सी.
ब IV (2005)सीपीजे 211
क III (2005) सीपीजे 343
छ I (2005) सीपीजे 289
हे केस लॉ रेकॉर्डवर दाखल केले आहेत.
13 महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ विरुध्द शेषराव या I (1998) सीपीजे 94 एन.सी.मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय राष्ट्रीय आयोगाने असे प्रतिपादन केले आहे आहे की, विजमंडळाने लावलेल्या खर्चाचा योग्यपणा अथवा सेवा पुरवण्यासाठी लावलेली किंमत हा ग्राहक वाद होवू शकत नाही.
14 नटराज रेड्डीयार विरुध्द सुप्रींटेंडींग इंजिनिअर T.N.E.B व इतर या III (2005) सीपीजे 343 मध्ये प्रकाशित झालेल्या प्रकरणात आदरणीय तामिळनाडू राज्य आयोगाने असे प्रतिपादन केले आहे की, अर्जदार यांनी अटींची पुर्तता करण्यास हलगर्जीपणा केला असेल व आवश्यक ते उपचार पूर्ण केले नसतील तर अर्जदार यांना विज मंडळावर सेवेतील न्युनतेबद्दल आरोप करण्याचा अधिकार नाही.
15 गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा दि. 30.12.05 चा विजपुरवठा मागणीचा अर्ज रेकॉर्डवर दाखल केलेला आहे. त्यावर अस्थायी विजजोडणी व कालावधी हा दि. 03.03.06 ते 01.04.06 असा नमूद केला आहे. या कालावधीत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना अस्थायी जोडणी दिली होती. याबाबत वाद नाही. तसेच अर्जदार यांचेकडील अस्थायी वीज जोडणी 21.07.06 नंतरही सुरु होती ही सुध्दा वादातीत बाब आहे. अर्जदार यांनी दि. 03.08.06 ला नविन अस्थायी विद्युत जोडणी मिळण्यासाठी अर्ज केल्याचे रेकॉर्डवरुन दिसते त्यामुळे अर्जदार हे विद्युत कायदा 2003 चे कलम 43 (3) प्रमाणे जबाबदार आहे असे म्हणता येत नाही.
16 अर्जदार यांचा गैरअर्जदार यांना वीज जोडणीसाठी दिलेल्या पत्रावर दि. 05.06.05 ही तारीख नमूद केलेली आहे. मात्र त्यावर गैरअर्जदार यांचा पत्र मिळाल्याचा शिक्का नाही. तसेच दि. 30.12.05 ला अर्जदार यांनी गैरअज्रदार यांना नविन वीज जोडणीसाठी अर्ज दिला होता असे अर्जदार यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत कुठेही नमुद केलेले नाही.
17 पोल क्रं. अ-286 हा अर्जदार यांच्या घरापासून किती अंतरावर आहे. तसेच अर्जदार यांच्या ज्या शेजा-यांना त्या पोलवरुन स्थायी विज जोडणी दिली आहे. त्याच्या घरापासून तो पोल किती अंतरावर आहे याबाबत अर्जदार यांनी रेकॉर्डवर माहिती दाखल केलेली नाही. अशा स्थितीत गैरअर्जदार यांनी दि. 30.09.06 च्या बिलात नविन पोलकरिता लावलेली रक्कम 12,455/- ही अनाठायी आहे असे म्हणता येत नाही.
अशा स्थितीत सदर आदेशपारितकरण्यातयेतआहे.
आदेश
अर्जदार यांची ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.